ओबीसी तसेच आर्थिक मागास प्रवर्गातील मुलींची १०० टक्के शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती शासन करणार – मंत्री चंद्रकांत पाटील

Date:

मुंबई, दि. 17 : आठ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागास वर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील मुलींच्या सर्व अभ्यासक्रमाची 100 टक्के शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती शासनामार्फत करण्यात येईल, असा ठराव मराठा आरक्षण व इतर सोयीसुविधांबाबत मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. हा ठराव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येऊन मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर हा निर्णय लागू करण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मागील तीन वर्षात प्रलंबित राहिलेल्या शुल्क प्रतिपूर्तीची 100 टक्के परतफेड करण्यासाठी येत्या अधिवेशनात तरतूद करण्यात येणार असल्याचे मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.

मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली  मराठा आरक्षण व इतर सोयीसुविधांबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची तसेच  अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ तसेच सारथी महामंडळाची आढावा बैठक आज मंत्रालयात संपन्न झाली. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे, ग्रामविकास मंत्री  गिरीश महाजन, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे संचालक नरेंद्र पाटील, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे, व्यवस्थापकीय संचालक मंगेश मोहिते तसेच, सारथीचे अध्यक्ष अजित निंबाळकर, उमाकांत दांगट मधुकरराव कोकाटे,  डॉ. नवनाथ पासलकर  यांच्यासह संबंधित उपस्थित होते.

यावेळी मंत्री श्री. पाटील म्हणाले की, मराठा समाजाला स्वतःचे स्वतंत्र आरक्षण मिळण्यासाठी सर्व्हे करण्यासाठी मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले (निवृत्त) उच्च न्यायालय अलाहाबाद, न्यायमूर्ती मारोती गायकवाड (निवृत्त), न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) या तीन सदस्यीय समितीचे कामकाज प्रत्यक्ष  सुरू झाले असून  त्यांना आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल,असे त्यांनी सांगितले. ही समिती टाटा सामाजिक विज्ञान संस्था, गोखले शैक्षणिक संस्था आणि ऑल इंडिया पॉप्युलेशन सायन्स या तीन नामांकित संस्थाच्या माध्यामातून सर्वेक्षणाचे काम करणार आहे. तसेच आतापर्यंत सुरू असलेल्या नोंदीच्या कामात मराठवाड्यात 22 हजार कुणबी नोंदी नव्याने आढळल्या असल्याचे मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.

राज्यातील सर्व जिल्ह्यात मराठा समाजातील लाभार्थींना उद्योग व्यवसायासाठीच्या कर्जाचा व्याज परतावा करण्याची सुविधा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळांच्या जिल्हास्तरीय यंत्रणेच्या माध्यमातून व्यापक स्वरुपात सुरु आहे, सर्व जिल्ह्यात महामंडळाचे स्वतंत्र कार्यालय सुरु करावे, त्याचसोबत महामंडळाच्या विभागीय कार्यालयांच्या माध्यमातून मराठा समाजातील रोजगार इच्छुकांसाठी रोजगार नोंदणी सुविधा उपलब्ध करुन द्यावी, अशा सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.

मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळांच्या जिल्हास्तरीय तसेच विभागीय यंत्रणांचा आढावा घेऊन सर्व जिल्ह्यात महामंडळांच्या स्वतंत्र कार्यालयांची व्यवस्था करण्याचे सूचित केले. यासाठी प्राधान्याने महसूल, कौशल्य विकास तसेच सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयांच्या अखत्यारीतील जागेत महामंडळाचे स्वतंत्र कार्यालय सुरु करण्याचे सूचित केले ज्या ठिकाणी अशी जागा उपलब्ध नसेल त्याठिकाणी भाडयाने खाजगी जागेत तातडीने जिल्हा कार्यालयाची व्यवस्था कार्यान्वित करण्याचे सूचित केले. तसेच विभागीय स्तरावर महामंडळाने त्यांच्या विभागीय समन्वयकांच्या माध्यमातून रोजगार नोंदणी सुविधा सुरु करुन इच्छुकांचे रोजगार मेळावे आयोजन, संबंधित कंपन्यासोबत समन्वय साधावा. नोकरी इच्छुकांना मुलाखत प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देणे या माध्यमातून जास्तीत जास्त संख्यने रोजगार संधीची निर्मिती करावी. त्याचसोबत कर्ज इच्छुक लाभार्थींना व्यवसाय सुरु करण्यासाठीचे प्रशिक्षण प्राप्त करुन देण्याच्या दृष्टीने सारथी संस्थेसोबत समन्वय करण्याचे सूचित केले.

महामंडळाच्या योजनेमुळे व्यापक प्रमाणात लाभार्थींना सहाय्य मिळत आहे, त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी नवी मुंबई येथे महामंडळाच्या भवन उभारण्यासाठी सिडकोकडे पाच एकर जमीन ग्रहण करण्यासाठीचा प्रस्ताव सादर करावा. महामंडळाने कर्ज दिलेल्या 71 हजार 376 लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करुन त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या रोजगाराची माहिती संकलित करावी. तसेच महामंडळाच्या पाच हजार कर्ज लाभार्थी यांची कर्ज परतफेड पूर्ण झाली आहे, त्यांचे सर्वेक्षण करावे अशा सूचना मंत्री श्री.पाटील यांनी संबंधितांना दिल्या. दहा हजार ते दोन लाख पर्यंतच्या बँकेतून घेतलेल्या कर्जाच्या 100 टक्के व्याज प्रतिपूर्तीचा निर्णय उपसमितीने घेतला आहे. त्याचप्रमाणे देशांतर्गत शिक्षणासाठी घेतलेल्या शैक्षणिक कर्जाच्या 100 टक्के व्याज प्रतिपूर्तीचाही निर्णय उपसमितीने घेतला असल्याचे मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.

सारथीच्या पीएचडी फेलोशिपसाठीच्या विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा तातडीने घ्यावी

या बैठकीत मंत्री श्री.पाटील यांनी सारथीच्या पीएच.डी फेलोशिपसाठीच्या विद्यार्थ्यांची सीईटी परिक्षा तातडीने घेण्याचे सूचित केले. यामध्ये पात्र झालेल्या विद्यार्थांना गुणवत्ता यादीनुसार फेलोशिप देण्याची प्रक्रिया राबवण्याचे सूचित केले. तसेच सारथी संस्थेच्या योजना अमंलबजावणीचा आढावा घेऊन त्यांनी मराठा समाजातील तरुण तरुणींना उच्च शिक्षण, स्पर्धा परिक्षा यासह शेतकरी वर्गासाठीच्या सर्व योजनांची प्रवेश प्रक्रिया तसेच प्रशिक्षण संस्था यांची निवड प्रक्रीया पारदर्शकपणे करण्याच्या सूचना यावेळी संबंधितांना दिल्या.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

… अन्यथा शिंदेंच्या शिवसेनेवर राज्यभर बहिष्कार:पुणे श्रमिक पत्रकार संघाचा इशारा

पुणे: पत्रकारांना धमक्या दिलेले खासदार संजय दिना पाटील यांना...

पत्रकारांचा अपमान करणाऱ्या खासदारावर कडक कारवाई करावी – राजा माने

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सर्व जिल्ह्यात करणार आंदोलन मुंबई...

पुण्यात 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या पहिल्या केंद्राच्या उद्घाटनासह कॉस्मो कन्झ्युमरने ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रात आपले स्थान केले आणखी मजबूत

पुणे, 25 जून 2026: कॉस्मो फर्स्ट लिमिटेडच्या ग्राहकाभिमुख व्यवसाय विभाग असलेल्या कॉस्मो कन्झ्युमरने आज पुण्यात आपल्या पहिल्या 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या उद्घाटनाची घोषणा केली. या माध्यमातून कंपनीने संघटित वाहन संरक्षण आणि कार केअर सेवा क्षेत्रात धोरणात्मक विस्तार केला आहे. मजबूत ऑटोमोटिव्ह परिसंस्था, वाढता प्रीमियम वाहनांचा ग्राहकवर्ग आणि वाहन संरक्षण उपायांचा वाढता ग्राहक स्वीकार या कारणांमुळे पुण्याची पहिल्या केंद्रासाठी निवड करण्यात आली. कंपनीच्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट पोर्टफोलिओमधील कॉस्मो पीपीएफ पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कॉस्मो सनशील्ड विंडो फिल्म्स आणि कॉस्मो गार्ड कोटिंग्ज व कंपाऊंड्स यांना मिळालेल्या मजबूत प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर हे उद्घाटन करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष 26 मध्ये या व्यवसायाने 23 कोटी रु. चा महसूल नोंदवला असून, विंडो फिल्म्ससाठी 75 हून अधिक वितरक आणि पेंट प्रोटेक्शन फिल्म्ससाठी 40 वितरक अशा देशव्यापी वितरण जाळ्याच्या बळावर ही वाढ साध्य झाली आहे. नवीन 4C केंद्र हे उत्पादनातील नवकल्पना, वितरण विस्तार, सेवा क्षमता आणि ग्राहक सहभाग यांच्या एकत्रित माध्यमातून ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट मूल्यसाखळीत आपले स्थान अधिक बळकट करण्याच्या कॉस्मो कन्झ्युमरच्या व्यापक धोरणाचे प्रतिक आहे. वाहनांचे सौंदर्य जपणे, अधिक आरामदायी अनुभव देणे आणि वाहनाचे दीर्घकालीन मूल्य टिकवून ठेवणे यासाठी ग्राहकांकडून वाढत्या प्रमाणात उपाययोजनांची मागणी होत असल्याने वेगाने विकसित होत असलेल्या कार केअर आणि वाहन संरक्षण बाजारपेठेत कंपनीला मोठ्या संधी दिसत आहेत. या घडामोडीबाबत बोलताना कॉस्मो फर्स्टचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज पोद्दार म्हणाले, “कॉस्मो फर्स्टमध्ये आम्ही सातत्याने उच्च वाढीची क्षमता असलेली क्षेत्रे ओळखून त्यामध्ये व्यवसाय उभारले आहेत. ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट हे असेच एक भरपूर व्यवसाय संधी असलेले क्षेत्र आहे. भारतातील विंडो फिल्म बाजारपेठेचा आकार सुमारे 1,000 कोटी रु. असल्याचा अंदाज आहे तर पेंट प्रोटेक्शन फिल्म विभागात दरवर्षी जवळपास 30% वाढ होत आहे. त्यामुळे दर्जेदार उत्पादने आणि विश्वासार्ह सेवा देणाऱ्या संघटित कंपन्यांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. आमच्या पहिल्या 4C केंद्राचे उद्घाटन हे त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. 4C नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी आणि कॉस्मो पीपीएफ तसेच कॉस्मो सनशील्ड या आमच्या ब्रँड्सना अधिक बळकटी देण्यासाठी आम्ही सुमारे 20 कोटी रु. ची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. येत्या काही वर्षांत वाहन संरक्षण आणि कार केअर क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून कॉस्मो कन्झ्युमरची ओळख निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.” नवीन कॉस्मो कार केअर सेंटरमध्ये ग्राहकांना एकाच छताखाली वाहन संरक्षण आणि वाहन सौंदर्यवर्धनाशी संबंधित सर्वसमावेशक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये ऑटोमोटिव्ह विंडो फिल्म्स, पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कोटिंग्ज, डिटेलिंग सोल्यूशन्स तसेच वैशिष्ट्यपूर्ण कार केअर सेवांचा समावेश असेल. प्रीमियम उत्पादनांमध्ये व्यावसायिक दर्जाची जोडणी आणि कुशल सेवा यांचा संगम घडवून विना अडथळा, अखंड आणि समाधानकारक ग्राहक अनुभव देण्यासाठी या केंद्राची रचना करण्यात आली आहे. उद्घाटनाबाबत बोलताना कॉस्मो कन्झ्युमरचे व्यवसाय प्रमुख अभिनीश दास म्हणाले, “आमच्या पहिल्या कॉस्मो कार केअर सेंटरचे उद्घाटन हा ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रातील आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. गेल्या वर्षभरात आम्ही आमची उत्पादने, वितरण जाळे आणि इंस्टॉलर भागीदारी यांच्या माध्यमातून मजबूत पाया निर्माण केला आहे. 4C च्या माध्यमातून आम्ही या सर्व क्षमतांना एकत्र आणत ग्राहकांना एकाच छताखाली संपूर्ण वाहन संरक्षण आणि कार केअरचा अनुभव उपलब्ध करून देत आहोत. भविष्याचा विचार करता आर्थिक वर्ष 26-27 दरम्यान भारतभरात सुमारे 35 कॉस्मो कार केअर सेंटर स्थापन करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यामुळे देशव्यापी प्रीमियम कार केअर केंद्रांचे जाळे उभारण्याच्या आमच्या बांधिलकीला अधिक बळ मिळेल.” गेल्या वर्षभरात कॉस्मो कन्झ्युमरने कॉस्मो सनशील्ड अंतर्गत कार्बन पिगमेंट सिरीज सादर करून तसेच कॉस्मो पीपीएफ अंतर्गत चार नवीन प्रकार बाजारात आणून आपला उत्पादन पोर्टफोलिओ अधिक मजबूत केला आहे. तसेच, बाजारपेठेतील पोहोच वाढवण्यासाठी आणि ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कंपनीने भारतभरातील विविध डिटेलिंग स्टुडिओंसोबत भागीदारी केली आहे. पुढील काळात कॉस्मो कन्झ्युमर भारतातील प्रमुख ऑटोमोटिव्ह बाजारपेठांमध्ये 4C मॉडेलचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. यासोबतच विपणन उपक्रमांमध्ये आक्रमक गुंतवणूक, वितरण व भागीदार जाळ्याचा विस्तार आणि सातत्यपूर्ण नवनवीन कल्पना तसेच नवीन ऑटोमोटिव्ह केअर सोल्यूशन्सच्या माध्यमातून उत्पादन पोर्टफोलिओ अधिक सक्षम करण्यावर कंपनी भर देणार आहे. यामुळे देशातील वेगाने वाढणाऱ्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट उद्योगातील तिचे स्थान आणखी मजबूत होईल.

पीएमपीएमएलसाठी महापालिकेची खास सभा-श्रीनाथ भिमाले

पुणे, दि. २५ जून : शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा...