⮚ ५ लाख ते १ कोटी रुपयांपर्यंत कव्हरेज
⮚ पॉलिसीधारकांना अतिरिक्त संरक्षणासाठी ५ पर्यायी कव्हर्स
⮚ वैयक्तिक कव्हर आणि फ्लोटर कव्हर असे दोन्ही पर्याय उपलब्ध
पुणे , 18 नोव्हेंबर २०२३: स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स, भारतातील आघाडीच्या हेल्थ इन्शुरन्सने स्मार्ट हेल्थ प्रो ही डिजिटल-ओन्ली हेल्थ पॉलिसी लॉन्च केली आहे. ही पॉलिसी ग्राहकांना पाच पर्यायी अॅड-ऑन कव्हरमधून त्यांचे कव्हरेज निवडण्याचे पर्याय उपलब्ध करून देते. भारतातील डिजिटलवर असलेल्या लोकांच्या आधुनिक गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने ही पॉलिसी सुरू करण्यात आली असून, ही पॉलिसी व्यक्तींना त्यांच्या विशिष्ट गरजांनुसार ५ लाख ते १ कोटी रुपयांपर्यंतच्या विविध विम्याची रक्कम निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून देते.
हे नाविन्यपूर्ण उत्पादन आरोग्य विम्याने स्वतःला सुरक्षित करण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणणार आहे. पॉलिसी ग्राहकांना त्यांचे विमा कवच त्यांना अनुकूल असलेल्या आणि त्यांच्या गरजेनुसार पाच पर्यायी कव्हर निवडण्याची सुविधाही देते. त्यामुळे ग्राहकांचे त्यांच्या पॉलिसींवर अधिक नियंत्रण राहाते.
विम्याची रकमेत अमर्यादित वेळा रिस्टोअर होईल. निवडलेली विमा रक्कम प्रत्येक वेळी जास्तीत जास्त 100% पर्यंत रिस्टोअर होईल. त्यासाठी कितीही वेळा ऑटोमॅटिक रिस्टोअर होऊ शकेल. ही पुनर्संचयित विम्याची रक्कम नंतरच्या हॉस्पिटलायझेशनसाठी वापरली जाऊ शकते. कव्हरच्या मर्यादेचा आंशिक किंवा पूर्ण वापर केल्यावर पुनर्संचयित वैशिष्ट्य ट्रिगर केले जाते. अशी पुनर्संचयित विम्याची रक्कम नंतरच्या हॉस्पिटलायझेशनसह सर्व दाव्यांसाठी वापरली जाऊ शकते.
एकत्रित बोनस बूस्टर : प्रत्येक क्लेम फ्री वर्षासाठी विम्याच्या रकमेच्या ५०% आणि 600% पर्यंत विम्याची कमाल रक्कम असू शकते.
श्रेणीतील बदलाला वाव : विमाधारक व्यक्ती खाजगी सिंगल ए/सी रूममधून कोणत्याही खोलीत/सामायिक खोलीत श्रेणी वाढवू अथवा कमी करू शकते.
पूर्व–अस्तित्वात असलेल्या रोगांचा प्रतीक्षा कालावधी कमी करणे : विमाधारक व्यक्ती पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या रोगांचा प्रतीक्षा कालावधी ४८ महिन्यांवरून ३६/२४/१२ महिन्यांपर्यंत कमी करू शकते.
गैर–वैद्यकीय वस्तूंसाठी कव्हरेज : गैर-वैद्यकीय वस्तू म्हणून सूचीबद्ध केलेल्या वस्तू उपभोग्य वस्तूंच्या अंतर्गत येतात आणि सामान्यतः विमा संरक्षणातून वगळल्या जातात. या नवीन पर्यायी कव्हरसह, इनपेशंट किंवा डे-केअर ट्रीटमेंटसाठी पॉलिसी अंतर्गत स्वीकार्हाह हक्क असल्यास गैर-वैद्यकीय वस्तू म्हणून सूचीबद्ध केलेल्या वस्तूवर विमा कवच राहील.
स्मार्ट हेल्थ प्रो २ प्रौढ आणि ३ मुलांपर्यंतच्या कुटुंबांसाठी वैयक्तिक आणि फ्लोटर असे दोन्ही कव्हर ऑफर करते. आयुष उपचार, आधुनिक उपचार आणि घरगुती उपचारांसह आजार किंवा अपघातांमुळे कराव्या लागणाऱ्या हॉस्पिटलायझेशनसाठी हे उत्पादन अखंड कव्हरेज सुनिश्चित करते. पॉलिसीमध्ये नवविवाहित, नवजात आणि दत्तक घेतलेल्या मुलांसाठी मध्यावधीत समावेशाचा पर्यायही आहे. पॉलिसीधारकांना स्टार हेल्थच्या २४x७ मोफत टेलिमेडिसिन सल्लामसलतीचाही लाभ मिळेल आणि अनुभवी वैद्यकीय तज्ञांद्वारे वेलनेस प्रोग्राममध्ये सहभागी होऊ शकतात.
स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ श्री आनंद रॉय म्हणाले की, “स्मार्ट हेल्थ प्रोमध्ये नवकल्पना, वैयक्तिकरण आणि प्रवेशयोग्यतेची स्टार हेल्थची बांधिलकी आहे. आरोग्य विम्याने वैयक्तिक गरजांशी जुळवून घेतले पाहिजे, ही सध्याची गरज आहे. हा डिजिटल-प्रथम उपक्रम केवळ सर्वसमावेशक कव्हरेजच देत नाही तर कुटुंबांना त्यांना हवी तशी पॉलिसी सहजतेने तयार करण्यास सक्षम बनवतो. तरुण आणि ग्रामीण समुदायांसाठी आरोग्य विमा सर्वसमावेशक आणि युजर फ्रेंडली बनवून आम्ही अंतर भरून काढत आहोत. स्मार्ट हेल्थ प्रो सह, आम्ही फक्त विमा देत नाही; आम्ही मनःशांती प्रदान करत आहोत. जेव्हा प्रत्येकाला सर्वात जास्त गरज असते तेव्हा दर्जेदार आरोग्यसेवा मिळू शकेल, याची आम्ही खात्री करून घेतो. डिजिटल माध्यम आपल्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या युगात, भारताच्या तंत्रज्ञानस्नेही पिढीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खास तयार केलेले उत्पादन सादर करताना आम्हाला आनंद होत आहे.”
हा उपक्रम स्टार हेल्थचे ग्राहक-प्रथम वैशिष्ट्य आहे. यामध्ये एकत्रिकरणाची आणि हवा तसा बदल करण्याची सुविधा देण्यात आली आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मचा स्वीकार करून, कंपनीने आरोग्य विम्याच्या सुलभतेतील अंतर भरून काढण्याचा प्रयत्न केला असून, याचा फायदा ग्रामीण भागातील लोकांना होणार आहे. त्यांच्या आर्थिक कल्याणाचे रक्षण करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे.
स्मार्ट हेल्थ प्रो इन्शुरन्स पॉलिसीची प्रमुख वैशिष्ट्ये :
● १८ वर्षे ते ५० वर्षांपर्यंतच्या व्यक्तींसाठी उपलब्ध. अवलंबित मुलांसाठी विम्याची रक्कम किमान – 18 वर्षे आणि कमाल 50 वर्षांपर्यंत असेल
● उपलब्ध विम्याचे पर्याय : रु. ५ लाख, रु. १० लाख, रु. १५ लाख, रु. २० लाख, रु. २५ लाख, रु. ५० लाख, रु. ७५ लाख, रु. १ कोटी
● या गोष्टी होतात कव्हर – रूग्णांना रूग्णालयात दाखल करणे, डे केअर उपचार, रूग्णवाहिका, रूग्णालयात दाखल होण्यापूर्वीचा आणि नंतरचा खर्च, डोमिसिलरी हॉस्पिटलायझेशन, वार्षिक आरोग्य तपासणी, होमकेअर उपचार
● अतिरिक्त फायदे : टेली-आरोग्य सेवा
● विम्याची रक्कम संपल्यानंतर १००% ने मूळ विम्याची रक्कम स्वयंचलित पुनर्संचयित करणे आणि पॉलिसी कालावधीत क्लेम बोनस नाही
● नूतनीकरण प्रीमियमवर सवलत – विमाधारक प्रथम खरेदी आणि त्याच्या नूतनीकरणासाठी १०% सवलत मिळते.