अग्निशमन दलाच्या जवानांकडून लोखंडी जाळीत अडकलेल्या त्या चिमुकल्याचे सुखरुप सुटका
पुणे – दिनांक १७•११•२०२३ रोजी सिहंगड कॉलेज रस्यावर हिंगणे खुर्द, राजश्री सोसायटीत इमारतीच्या दुसरया मजल्यावर एक लहान बाळ अडकल्याची वर्दि अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मिळताच सिहंगड अग्निशमन केंद्र येथून तातडीने अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले.
घटनास्थळी पोहोचताच जवानांना समजले की, दुसरया मजल्यावर एका सदनिकेच्या गॅलरीमध्ये असणारया लोखंडी जाळीमध्ये एक वर्षाचे बाळ अडकले असून दरवाजा देखील बंद झाला आहे. जवानांनी घटनेचे गांभीर्य ओळखून लगेच धाव घेतली असता बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकला आणि प्रथम अग्निशमन वाहनातील कॉम्बी टुल किटमधील हायड्रोलिक स्प्रेडर व जॅकचा वापर करुन दरवाजाची कडी तोडून पाहिले असता बाळाचे डोके त्या लोखंडी जाळीमध्ये अडकले असून बाळ तळमळत असल्याचे पाहताच बाळाच्या आईला त्याच्याजवळ बसवत अगदी कुशलतेने अग्निशमन उपकरण वापरुन त्या बाळाची पाचच मिनिटात सुखरुप सुटका केली. बाळाच्या आई वडिलांनी दलाच्या जवानांनी केलेल्या कामगिरीबद्दल आभार मानले.
या कामगिरीत सिंहगड अग्निशमन केंद्र येथील वाहनचालक अशोक कडू व जवान तुषार करे, संभाजी आटोळे, आदिनाथ पवार यांनी सहभाग घेतला.