Home Blog Page 1391

कसबा : रासने ,धंगेकर आणि रुपाली पाटलांवर ही गुन्हा दाखल ..पुढे काय होणार ते सर्वानांच ठाऊक

पुणे- कसबा पोट निवडणुकीच्या दरम्यान झालेल्या काही प्रसंग घटनांच्या वरून दोन्ही उमेदवार म्हणजे धंगेकर आणि रासने यांच्यासह राष्ट्रवादी च्या रुपाली पाटलांवरही गुन्हा दाखल झाला आहे ,गुन्हा घडत असताना अगदी वर पासून खालपर्यंत चे निवडणूक अधिकारी कोणते कर्तव्य बजावत होते ? कोणास साथ देत होते याची कोणतीही चौकशी अगर काहीही करण्याचा इरादा मात्र दिसून आलेला नाही . या तिघांवर गुन्हे दाखल करून प्रशासन मात्र अगदी स्वच्छ, सभ्य ,कायद्याचे पालन करणारे असल्याचा तोरा आता मिरविणार आहे. आणि या तिघांवरही दाखल झालेल्या गुन्ह्यांचे पुढे काय होणार आहे ? या प्रश्नाचे उत्तर हि जनतेला ठाऊकच असावे.

कसबा आणि चिंचवड विधानसभा पोट निवडणुकांसाठी काल मतदान पार पडलं. मतदानाचा दिवस भाजप आणि महाविकास आघाडीच्या आरोप-प्रत्यारोपांनी गाजला. तर आज मतदानाच्या दुसऱ्या दिवशीही राजकीय घडामोडींना वेग आला आहे.भाजपचे कसब्याचे उमेदवार हेमंत रासने यांनी मतदानाला जाताना गळ्यात भाजपचं उपरणं घातलं होतं. कमळाचं चिन्ह असलेलं हे उपरणं घालूनच त्यांनी मतदान केंद्रात प्रवेश केला आणि मतदान करून बाहेर पडले. या प्रकरणी रासने यांच्याविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर मतदारांना पैसे वाटप केल्याचा आरोप करत उपोषण केलं होतं. भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला होता. पत्नीसह त्यांनी कसबा गणपतीसमोर उपोषण सुरु केलं होतं. हा आचारसंहितेचा भंग असल्याच्या कारणामुळे त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. तर रुपाली पाटील यांनी गोपनियतेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

आपची पुण्यात जोरदार निदर्शने

पुणे – दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांच्या काल रात्री सीबीआयने केलेल्या सुडात्मक अटकेविरोधात आज पुण्यात बालगंधर्व चौक येथे झाशीच्या राणी पुतळ्यासमोर आम आदमी पार्टीच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली.

“दिल्लीत शिक्षण क्रांती घडवून आणण्यात आप नेते व शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांचा सिंहाचा वाटा आहे. दिल्लीतील सरकारी शाळांमध्ये घडलेले अभूतपूर्व बदल हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरलेला आहे. सरकारी शाळांचा कायापालट करुन आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांना बदनाम करण्यासाठी भाजपच्या केंद्र सरकारने मोठी मोहीम चालवली होती. सिसोदिया यांची अटक म्हणजे इडी, सीबीआय द्वारे केंद्र सरकारने चालवलेली दडपशाही आहे”, असा आरोप यावेळी अपच्या कार्यकर्त्यांनी केला .

आरोग्य व शिक्षण क्षेत्रात आम आदमी पार्टीने केलेल्या कामांची दखल देशातील जनतेने घेतली असून केवळ दहा वर्षात आम आदमी पार्टी हा राष्ट्रीय पक्ष म्हणून नावारूपाला आला आहे. जनतेचा प्रचंड प्रतिसाद आम आदमी पार्टीला भेटत आहे. त्यामुळे भाजप चिंताग्रस्त झाला आहे. भाजपला आरोग्य, शिक्षण क्षेत्रात कधीच भरीव कामगिरी करता न आल्याने आकसाने आम आदमी पार्टीच्या दिल्लीतील आरोग्य मंत्री, शिक्षण मंत्री व इतर नेत्यांवर सुडात्मक कारवाई केली जात आहे. त्यासाठी खोटे आरोप करुन इडी, सीबीआय यासारख्या यंत्रणांचा गैरवापर करत आपच्या नेत्यांना अटकेत टाकत आहे. मनीष सिसोदिया यांच्यावर लावलेले आरोप खोटे असून केंद्र सरकारच्या दडपशाही विरोधात आम आदमी पार्टी संविधानिक मार्गाने जोरदार लढाई लढेल.असाही दावा यावेळी अपच्या नेत्यांनी केला.

यावेळी आप राज्य संघटक विजय कुंभार, पुणे जिल्हाध्यक्ष मुकुंद किर्दत,वाहतूक विंग राज्य अध्यक्ष श्रीकांत आचार्य, आनंद अंकुश, सुजीत अग्रवाल, प्रभाकर कोंढाळकर, मीरा बीघे, सीमा गुट्टे, वैशाली डोंगरे, किरण कद्रे, किशोर मुजुमदार, घनश्याम मारणे, किरण कांबळे, शेखर ढगे, मनोज शेट्टी, अमोल काळे, राजू परदेशी, सहील परदेशी, फेबियन सॅमसन, किर्तीसिंग चौधरी, सतीश यादव, योगेश इंगळे, धनंजय बेनकर, मनोज फुलावरे, अनिल धुमाळ, निरंजन अडगले, रोहन रोकडे, आबासाहेब कांबळे, अनिल कोंढाळकर, सर्फराज मोमीन, संजय कोणे, ललिता गायकवाड, ऋषिकेश मारणे, सुरेखा भोसले, रामभाऊ इंगळे, अंजली इंगळे, शंकर पोटघन, सुभाष कारंडे, अमोल मोरे, निखिल देवकर, आसिफ खान, समीर अरवाडे, सुनील वाल्हेकर, रमेश मते , शिवाजी डोलारे, संजय कटारनवरे, चंद्रकांत गायकवाड, तानाजी शेरखाने, प्रीती नीकाळजे, बीघे, बापू रणसिंग, श्रद्धा शेट्टी, मिताली वडवराव, मिलिंद ओव्हाळ, मनोज एरंडकर व अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुंबईत पोलीस आणि आप च्या कार्यकर्त्यांत बाचाबाची, रेटारेटी, असंख्य कार्यकर्ते पोलिसांनी घेतले ताब्यात

0

मुंबई- मनीष सिसोदिया यांच्या अटकेच्या निषेधार्थ आज प्रीती मेनन आणि अपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली , चर्च गेट ते भाजपा कार्यालय असे आंदोलन सुरु केलेल्या या आंदोलन समयी संतप्त आप चे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात जोरदार बाचाबाची झाली.धक्काबुक्की झाली . आंदोलनाला परवानगी नाही या कारणास्तव पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना अखेरीस ताब्यात घेतले . नरेंद्र मोदी हाय हाय च्या घोषणांनी यावेळी चर्चगेट चा परिसर दणाणून गेला .

इडी, सीबीआय ,पोलीस यांच्यामार्फत भाजपा तानाशाही राबवू आहात असल्याचा आरोप यावेळी प्रीती मेनन यांनी केला. सिसोदिया यांच्या घरी , कार्यालयात , त्यांच्या नातेवाईकांच्या घरावर छापे मारूनही एक हि रुपया बेहिशेबी मिळालेला नाही तरीही देशातील सर्वोत्तम शिक्षण मंत्री असलेल्या सिसोदिया यांना अटक करण्यात आली आहे .मोदी अशा प्रकारे विरोधकांना दाबून ठेऊन देशात अघोषित तानाशाही अंत असल्याचा आरोप त्यांनी केला .

CBI ने मनीष सिसोदियांना न्यायालयात हजर केले:5 दिवसांची कोठडी मागितली; दिल्लीत AAP चे निदर्शन, पोलिस पक्षाच्या कार्यालयात घुसले

दिल्ली-सीबीआयने सोमवारी दुपारी 3.10 वाजता दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना राऊस अॅव्हेन्यू कोर्टात हजर केले. दिल्ली मद्य धोरण प्रकरणात तपास यंत्रणेने विशेष सीबीआय न्यायाधीश एमके नागपाल यांच्याकडे सिसोदिया यांची 5 दिवसांची कोठडी मागितली आहे.

सीबीआयने 8 तासांच्या चौकशीनंतर रविवारी सिसोदिया यांना अटक केली. सिसोदिया प्रश्नांची नीट उत्तरे देत नसल्याचे तपास संस्थेने म्हटले होते.सिसोदिया यांच्या अटकेनंतर आम आदमी पार्टी (आप) दिल्लीसह देशातील अनेक शहरांमध्ये निदर्शने करत आहे. नेते-कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. दिल्लीतील भाजप कार्यालयाचा घेराव करू, असे आपने म्हटले आहे.

जुलै 2022 मध्ये दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी मनीष सिसोदिया यांच्या विरोधात सीबीआय चौकशीची मागणी केली. सक्सेना यांनी सिसोदिया यांनी नियमांकडे दुर्लक्ष करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. यानंतर ईडी आणि सीबीआयने सिसोदियाविरुद्ध तपास सुरू केला.

सीबीआयला सिसोदिया यांची उत्तरे समाधानकारक वाटली नाहीत म्हणून अटक, चौकशीतील 4 महत्त्वाचे मुद्दे
1.
 मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीबीआयने अटकेनंतर सांगितले की, सिसोदिया यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे समाधानकारक नाहीत. मद्य धोरणातील अनियमितता आणि त्यातून वैयक्तिक फायदा करून घेतल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे.

2. सीबीआयने म्हटले की, सिसोदिया यांनी अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देणे टाळले. आम्ही त्यांच्यासमोर पुरावेही सादर केले, मात्र त्यांनी तपासात सहकार्य केले नाही. सखोल चौकशीसाठी त्यांना कोठडीत ठेवणे आवश्यक असल्याचे एजन्सीने म्हटले आहे.

3. सीबीआयने सांगितले की, सिसोदिया यांची 8 तास चौकशी करण्यात आली. सिसोदिया यांना मद्य धोरण, दिनेश अरोरा यांच्याशी सिसोदिया यांचे कनेक्शन याविषयी चौकशी करण्यात आल्याचे वृत्त आहे. याप्रकरणी अनेक फोन कॉल्सही करण्यात आले आहेत. त्यांच्या तपशीलाच्या आधारे सिसोदिया यांना प्रश्न विचारण्यात आले.

4. दिनेश अरोरा हे दिल्लीचे व्यापारी आहेत. त्यांचे रेस्तरॉं आहे. याप्रकरणी ईडीनेही तपास केला आहे. त्यात दिनेश अरोरा हे सिसोदिया यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगण्यात आले आहे. एजन्सीने म्हटले आहे की निवडणूक निधीबाबत आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी अरोरा यांच्याशी बोलले होते. यानंतर अरोरा यांनी अनेक व्यावसायिकांकडून निधीसाठी सहकार्य मागितले आणि विधानसभा निवडणुकीसाठी सिसोदिया यांना 82 लाख रुपये दिले.

आज काय काय घडले

  • दिल्लीत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. त्यांची सुरक्षा दलांशी चकमकही झाली. यावेळी महिला कार्यकर्त्यां आणि महिला पोलिसांमध्ये बाचाबाचीही झाली.
  • आम आदमी पार्टी देशभरात निदर्शने करत आहे. पंजाब, मध्य प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेशमध्ये आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
  • रविवारी दिल्लीत अटकेत असलेल्या 26 आप नेत्यांना सोमवारी सोडण्यात आले. पक्ष कार्यालयात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सीबीआय कार्यालयाची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.

सीबीआयच्या सूत्रांचा हवाला देत रिपोर्ट्समध्ये असे सांगण्यात येत आहे की, गेल्या वर्षी 19 ऑगस्ट रोजी सीबीआयने दिल्ली उत्पादन शुल्क विभागाची चौकशी केली होती. तेथून एक डिजिटल उपकरण जप्त करण्यात आले. या डिव्हाइसमधून सीबीआयला मद्य पॉलिसीचे दस्तऐवज उत्पादन शुल्क विभागाच्या नेटवर्कमध्ये नसलेल्या यंत्रणेकडे पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली.यानंतर सीबीआयने उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याला चौकशीसाठी बोलावले. या अधिकाऱ्याने सिसोदिया यांच्या कार्यालयातून यावर्षी 14 जानेवारी रोजी जप्त केलेल्या प्रणालीचा तपशील दिला. या प्रणालीतील बहुतांश फाईल्स डिलीट करण्यात आल्या होत्या, मात्र फॉरेन्सिक टीमच्या मदतीने सीबीआयने डेटा परत मिळवला. हे कागदपत्र बाहेरून बनवून व्हॉट्सअॅपवर मिळाल्याचे फॉरेन्सिक तपासणीत उघड झाले आहे.ही माहिती मिळाल्यानंतर सीबीआयने 1996 च्या बॅचच्या नोकरशहाला तपासासाठी बोलावले. या नोकरशहाने सिसोदिया यांचे सचिव म्हणून काम केले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्याने सीबीआयला सांगितले की, मार्च २०२१ मध्ये सिसोदिया यांनी त्यांना केजरीवाल यांच्या कार्यालयात बोलावले होते. तेथे मद्यविक्री धोरणाच्या मसुद्याचा मंत्र्यांचा अहवाल अधिकाऱ्यांना देण्यात आला. यावेळी सत्येंद्र जैनही उपस्थित होते.अधिकाऱ्याने सांगितले की, या मसुदा अहवालातूनच 12% नफा मार्जिनचा नियम आला आहे. या नियमासाठी कोणत्याही चर्चेची किंवा त्याच्याशी संबंधित कोणतीही फाइल आढळली नाही. रविवारी सीबीआयने या मसुद्याच्या अहवालाबाबत सिसोदिया यांची चौकशी केली मात्र सिसोदिया यांनी माहिती देण्यास नकार दिला. या अधिकाऱ्याचे जबाब फेब्रुवारीच्या सुरुवातीला दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवण्यात आले होते.

1. उपमुख्यमंत्री म्हणाले- मुलांनी कठोर अभ्यास करावा
सीबीआय कार्यालयात पोहोचण्यापूर्वी त्यांनी म्हटले की, ‘जेव्हा मी टीव्ही चॅनलमध्ये होतो. चांगला पगार होता, अँकर होतो. आयुष्य छान चालले होते. सर्व काही सोडून केजरीवाल यांच्यासोबत आलो. झोपडपट्टीत काम करू लागलो. आज जेव्हा ते मला तुरुंगात पाठवत आहेत, तेव्हा माझी पत्नी घरी एकटी असेल. ती खूप आजारी आहे. मुलगा विद्यापीठात शिकतो.

ते पुढे म्हणाले, मला शाळेत शिकणारी मुले खूप आवडतात. शिक्षणमंत्री मनीष काका तुरुंगात गेले आणि आता सुट्टी आली, असे समजू नका. सुट्टी असणार नाही. अपेक्षेप्रमाणे मेहनत करत आहात. मन लावून उत्तीर्ण व्हा. मुलं गाफील राहिली हे कळाले तर मला वाईट वाटेल.

2. सिसोदिया म्हणाले- भगतसिंग देशासाठी फासावर गेले, तुरुंगात जाणे ही छोटी बाब
चौकशीसाठी जाण्यापूर्वी सिसोदिया म्हणाले की, मी आज पुन्हा सीबीआय कार्यालयात जात आहे, संपूर्ण तपासात मी पूर्ण सहकार्य करेन. लाखो मुलांचे प्रेम आणि करोडो देशवासीयांचे आशीर्वाद पाठीशी आहेत. मला काही महिने तुरुंगात राहावे लागले, तरी मला पर्वा नाही. मी भगतसिंग यांचे अनुयायी आहे, देशासाठी भगतसिंग यांना फाशी देण्यात आली. तर त्यापुढे खोट्या आरोपांमुळे तुरुंगात जाणे ही छोटी गोष्ट आहे.

NIA चा मुंबई पोलिसांना अलर्ट, चीन – हाँगकाँमध्ये ट्रेनिंग घेतलेला धोकादायक मेमन मुंबईत

0

मुंबई-राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) मुंबई पोलिसांना एक अलर्ट पाठवला आहे. त्यात एक धोकादायक व्यक्ती मुंबई शहरात पोहोचल्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या सूत्रांच्या माहितीनुसार, NIA ने एक ईमेल पाठवला आहे. त्यात सरफराज मेमन नामक व्यक्तीचा उल्लेख आहे. एजंसीने सरफराज हा देशासाठी अत्यंत धोकादायक व्यक्ती असल्याचे नमूद करत पोलिसांना 24 तास अलर्ट राहण्याचे निर्देश दिलेत.

अलर्ट मेलमध्ये NIA ने म्हटले आहे की, सरफराज मध्य प्रदेशाचा आहे. त्याने चीन व हाँगकाँगमध्ये ट्रेनिंग घेतली आहे. एजन्सीने मुंबई पोलिसांना सरफराजचे आधार कार्ड, ड्रायव्हिंग परवाना व पासपोर्टही मेल केला आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणी इंदूर पोलिसांशीही संपर्क साधला आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या प्रारंभीच NIA ला एका अज्ञात व्यक्तीने ईमेल पाठवला होता. त्यात त्याने आपण तालिबानी असल्याचा दावा केला होता. तसेच मुंबईत अतिरेकी हल्ला करण्याची धमकीही दिली होती. NIA ने या प्रकरणी मुंबई पोलिसांना संपूर्ण घटनाक्रम समजावून सांगितला होता. त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांत अलर्ट जारी करण्यात आला होता.

रात्रभर वाघोलीमधील खंडित वीजपुरवठा सकाळी सुरळीत,वाहिन्यांमध्ये एकामागे एक अनेक तांत्रिक बिघाड

पुणे, दि. २७ फेब्रुवारी २०२२:एकामागे एक तांत्रिक बिघाड होत गेल्याने तसेच महापारेषण कंपनीच्या अतिउच्चदाब लोणीकंद उपकेंद्रातील आकस्मिक दुरुस्ती कामामुळे वाघोलीमधील सुमारे ९५०० वीजग्राहकांचा वीजपुरवठा रात्रभर खंडित होता. महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांनी रात्रभर केलेल्या अथक दुरुस्ती कामानंतर सोमवारी (दि. २७) सकाळी साडेआठ वाजता वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

याबाबत माहिती अशी की, वाघोली परिसराला पूर्वरंग २२/२२ केव्ही उपकेंद्राद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो. या उपकेंद्राला महापारेषणच्या लोणीकंद अतिउच्चदाब उपकेंद्रामधून महावितरणच्या पूर्वरंग २२ केव्ही वाहिनीद्वारे वीजपुरवठा केला जातो. मात्र रविवारी (दि. २६) सकाळी ११ वाजताच्या सुमारास पूर्वरंग वीजवाहिनीमध्ये बिघाड झाल्यामुळे पूर्वरंग उपकेंद्राला करोल-२ या वीजवाहिनीद्वारे पर्यायी स्वरुपात ताबडतोब वीजपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र दुपारनंतर महापारेषणच्या लोणीकंद अतिउच्चदाब उपकेंद्रामध्ये तातडीचे आकस्मिक दुरूस्तीचे काम उद्भवले. ते करणे अत्यंत गरजेचे असल्याने सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत या अतिउच्चदाब उपकेंद्रातून निघणाऱ्या महावितरणच्या वाघेश्वर, संघार व करोला-२ या तिनही २२ केव्ही वाहिन्यांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर महावितरणच्या तीनही वाहिन्यांचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला. मात्र अर्ध्या तासात वाघेश्वर व करोला-२ या वाहिन्यांमध्ये बिघाड होऊन वीजपुरवठा पुन्हा खंडित झाला.

दरम्यान महापारेषणच्या आकस्मिक दुरुस्ती कामामुळे सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत वाघोली परिसरातील कमीत कमी ग्राहकांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यासाठी महावितरणकडून पर्यायी वीजपुरवठ्यासाठी तांत्रिक उपाययोजना करण्यात आली. यामध्ये वाघोली २२ केव्ही वाहिनीवर आकस्मिक दुरुस्ती कामामुळे बंद असलेल्या वीजवाहिन्यांचा भार टाकण्यात आला. मात्र वाढत्या उन्हामुळे विजेची मागणी देखील वाढली आहे. परिणामी नाईलाजास्तव वाघोली परिसरातील आव्हाळवाडी रोड, साईसत्यम पार्क, रेणुका पार्क, दाभाडे वस्ती, बायफ रस्ता, डोमखेल वस्ती या परिसरातील सुमारे ९ हजार ५०० ग्राहकांचा वीजपुरवठा महापारेषणच्या आकस्मिक दुरुस्ती कामामुळे सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आला. त्यानंतर महावितरणच्या वाघेश्वर व करोला-२ या वाहिन्यांमध्ये बिघाड झाल्यामुळे तसेच विजेचे भारव्यवस्थापन शक्य नसल्यामुळे या परिसरात रात्री ८.३० वाजेपासून वीजपुरवठा पुन्हा बंद झाला. महावितरणचे अभियंता व कर्मचाऱ्यांनी रात्रभर वाघेश्वर व करोला-२ या दोन्ही भूमिगत वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी अथक प्रयत्न केले. जेसीबी व ब्रेकरने खोदकाम करण्यात आले. यामध्ये वाघेश्वर २२ केव्ही वाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर सकाळी ८.३० वाजता सर्वच ९ हजार ५०० ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.

 हेमंत रासने यांच्यावर कडक कारवाई करावी-


पुणे-
रविवार, दिनांक 26 फेब्रुवारी: पुणे शहर कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने यांनी मतदान करताना आचारसंहितेचा भंग केला आहे ते स्वतः नूतन मराठी विद्यालय प्रशाला बुध क्रमांक 75 या मतदान केंद्रावर मतदान करायला गेले असताना त्यांनी त्यांचे चिन्ह असलेले कमळाची पट्टी गळ्यात घालून मतदान केले. निवडणूक प्रचार संपल्यानंतर त्यांनी ही कमळाची पट्टी घालून प्रचार केल्याचे यावरून निदर्शनास येत आहे ही बाब गंभीर असून त्यावर निवडणुकीत आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी शिवसेना पुणे शहर उद्धव ठाकरे गटाच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन तक्रारी अर्ज करण्यात आलेला आहे.
यावेळी शिवसेना पुणे शहर प्रमुख संजय मोरे संघटक संतोष गोपाळ,  किशोर रजपूत, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, विभाग प्रमुख प्रसाद काकडे, सुरज लोखंडे, महेश पोकळे राजेश मोरे, दिलीप पोमान, नितीन वाघ, प्रणव वाडकर ,  व इतर शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.

 पैशांचे पाकीट न घेतल्याने  कुटुंबाला मारहाण; भाजप माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल

पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीत पैशांचे पाकीट न घेतल्याच्या कारणावरुन भाजपचे माजी नगरसेवक व त्यांच्या साथीदारांनी एका कुटुंबाला बेदम मारहाण केली.यावरुन गंजपेठेत शनिवारी रात्री जोरदार राडा झाला. मध्यरात्रीपर्यंत दोन्ही गटातील लोक गंजपेठ पोलीस चौकीसमोर ठाण मांडून बसले होते. पोलिसांनी दोन्ही गटातील २५ ते ३० जणांवर गुन्हा दाखल केला.

याबाबत निता किशन शिंदे (वय ४२, रा. गंज पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विष्णु हरीहर, निर्मल हरीहर, हीरा हरीहर व इतर १५ ते १६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या घरी असताना विष्णु हरीहर तसेच इतर १५ ते १६ जणा आले. फिर्यादी यांनी पैशांचे पाकीट न घेतल्याच्या कारणावरुन त्यांचा भाऊ कुणाल यास धक्काबुक्की केली. तुला लय माज आलाय का, तुझ्या घरी खायला नाही, असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच त्याच्याबरोबर आलेल्या लोकांनी कुणाल याला लाकडी फळीने मारले व सावधान मित्र मंडळाच्या मागे मोकळ्या पटांगणात फिर्यादीच्या मावशीच्या हातावर, पोटावर ठोसा मारला. फिर्यादी सोडविण्यास गेल्यावर त्यांनाही मारहाण केली. ही घटनेची माहिती मिळताच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते गंजपेठ पोलीस चौकीसमोर जमले. त्यांनी ॲट्रासिटीखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पहाटे साडेतीन वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.

याविरोधात हिरालाल नारायण हरीहर (वय ६७, रा. गंज पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विशाल कांबळे, निहाल कांबळे, गोविंद लोंढे, आकाश भोसले, सनी नाईक व इतर १० ते १५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी हे रात्री साडे अकरा वाजता सावधान मित्र मंडळाजवळ मारुतीचे दर्शन घेऊन घरी जात असताना विशाल कांबळे याने इकडे कशाला आलास, असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ केली. फिर्यादी हे त्यांना समजावून सांगत असताना इतरांनी धक्काबुक्की केली. व ओढत पटांगणात नेऊन हाताने लाकडी फळीने मारण्यात सुरुवात केली. डोक्यात मारहाण करुन प्लास्टीकचे खुर्चीने मारहाण केली. फिर्यादी यांनी मदतीसाठी आरडाओरड केला असता याला सोडायचे नाही, असे बोलून धमकी दिली.

या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त रमाकांत माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगिता यादव, पोलीस निरीक्षक राजेश तटकरे, उपनिरीक्षक राहुल जोग यांनी भेट दिली. या संपूर्ण प्रकाराने पहाटेपर्यंत गंजपेठ परिसरात गोंधळाचे वातावरण होते. पोलिसांनी जादा कुमक मागवून बंदोबस्त वाढला आहे.

कसब्यात झाले हो ४५ टक्के मतदान …. हाणमार,पैशांचा पाऊस, मंत्र्यांची,बड्याबड्या नेत्यांची फौज, प्रशासनाची हुशारी ..सारे सफल, आता २ तारीख …

पुणे-हाणामाऱ्या , रात्रींचा दिवस अन दिवसांची रात्र , पैशांच्या बड्याबड्या बाता , मंत्र्यांची ,माजी मंत्र्यांची , बड्याबड्या नेत्यांची फौज अन त्यात भरीस भर प्रशासनाची हुशारी या सर्वांच्या लढायांनी ४५ टक्के मतदानापर्यंत कसब्यात तर चिंचवड मध्ये ४१ टक्के मतदानापर्यंत मजल मारली . साडेतीन वाजेपर्यंत अवघे ३० टक्के मतदान झाल्यावर साडेचार वाजता खासदार बापटांना मतदानासाठी आणले गेले आणि साडेपाच वाजेपर्यंत ४५.२५ टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले . २ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. कसब्यातील मतमोजणी कोरेगाव मार्क येथील वखार महामंडळाच्या गोदामात होणार आहे. चिंचवडमधील मतमोजणी कामगार भवन, थेरगाव इथे होणार आहे. दोन्ही मतदारसंघांत महाविकास आघाडी व महायुतीने निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे निकालाबाबत पुणे जिल्ह्यालाच नाही, तर राज्यालाही उत्सुकता आहे.

पुण्यातले भूखंड घशात घालण्याचे भाजपाचे मनसुबे प्रशासक पूर्ण करू पाहत असल्याचा आप चा आरोप

महापालिका भुखंड सरकारी शाळेस वापरा, खाजगी शाळेस देण्यास आप चा विरोध

पुणे- बाणेर येथील सुमारे साडेचार एकराचा भूखंड आणि हडपसर येथील सुमारे साडेतीन एकरांचा भूखंड महापालिका प्रशासक कोणाच्या घशात घालू पाहत आहेत , हाच प्रयत्न भाजपा आणि राष्ट्रवादीच्या काही लोकप्रतिनिधींनी लोकनियुक्त शासन महापालिकेवर असताना केला होता मात्र त्यास विरोध करण्यात आल्याने तो बारगळला होता आता तोच प्रस्ताव महापालिका प्रशासक राबवीत असल्याचा आरोप आम आदमी पार्टी चे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी केला आहे.

ते म्हणाले,’ पुण्यातील बाणेर येथील 4.5 एकर आणि हडपसर येथील 3.35 एकर जागेवर पिपिपी तत्त्वावर खाजगीकरणातून शाळा बांधून तीस वर्षासाठी चालवण्यास देण्याचे नियोजन प्रशासन करीत असल्याचे कळते. ऑगस्ट 2021 मध्ये याच पद्धतीने महानगरपालिकेचे ताब्यातील जवळपास 185 जागा , ॲमेनिटी स्पेस, दीर्घकालीन कराराने देण्याचे भाजपने योजले होते. त्यास प्रथम राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा सहमती दर्शवली होती. परंतु आम आदमी पार्टीच्या विरोधामुळे हा प्रस्ताव बारगळला. आता मागील दरवाजाने तीच योजना पुन्हा आणण्याचे प्रशासनाचे धोरण दिसत आहे लोकनियुक्त प्रतिनिधी नसताना सध्या प्रशासनाकडून अशी दीर्घकालीन परिणाम करणारी धोरणे राबवणे हे अयोग्य आहे. राज्यसरकार नियुक्त प्रशासक हे कामकाज चालवीत आहेत, त्यामुळे भाजप आणि शिंदे गट – शिवसेना युतीचे राज्य सरकार हे धोरण प्रशासनामार्फत रेटण्याचा प्रयत्न करत आहे असे दिसते आहे. पुणे शहरामध्ये सर्वसामान्यांसाठी आठवी पुढे शिक्षणाची सोय वर्ष नाही. तसेच बऱ्याच शाळांमध्ये खेळण्यासाठी चे ग्राउंड उपलब्ध नाही. पुणे शहरात तर स्वच्छतागृहे आणि पार्किंग यासाठी पुरेशा जागा नाहीत असे असताना उपलब्ध जागा खाजगीकरणसाठी देण्यास आम आदमी पार्टीचा विरोध आहे.
पुण्यातील मध्यमवर्गीय पालकांना इंग्रजी माध्यमाच्या सरकारी शाळा हवे आहेत. त्यातच आठवी पुढच्या शिक्षणाच्या शाळा उपलब्ध नाही, त्यामुळे मुलींचे शिक्षण अर्धवट राहते असा अनुभव आहे. यात भर म्हणून येणाऱ्या काळात नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार नर्सरी पासूनच ते दहावीपर्यंत मोफत शिक्षण देण्याचे धोरण अवलंबले जाणार आहे. त्यामुळे आंगणवाडी, नर्सरी केजी साठी पण जागा लागतील. या जागा उपलब्ध करून देणे सुविधा उपलब्ध करणे ही शासनाची जबाबदारी असणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीच्या पीपीपी तत्त्वावरील खाजगी शाळांच्या बांधणीस आम आदमी पार्टीचा विरोध आहे. मध्यंतरी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी यापुढे शाळांना अनुदान देणार नाही असे सांगितले होते. एकुणात गरीब, मध्यमवर्गीय जनतेस शिक्षण हक्क नाकारण्याचे धोरण भाजप सरकार राबवणार आहे असे दिसते आहे. यामुळेच या भागात नवीन अनुदानित शाळा उभी करणार नाही असे शिक्षण मंडळाने म्हंटले असावे. शिक्षण हक्क कायद्यानुसार नजिक शाळा उपलब्ध करून देणे ही स्थानिक प्रशासनाचे कर्तव्य आहे. शिक्षण हक्क आणि दीर्घकालीन जनहितासाठी आम आदमी पार्टी अश्या जमिनी खाजगी संस्थांना देण्यास सर्व पातळीवर विरोध करेल याची दखल राज्य सरकार व पुणे मनपा प्रशासनाने घ्यावी.

एखाद्याला पोरगा झाला तरी माझ्यामुळेच झाला, काहीही केले तरी मीच केले म्हणतात,ही सवय काहींना असते, ठाकरेंवर टीका करताना म्हणाले फडणवीस

0

मुंबई-एखाद्याला पोरगा झाला तरी माझ्यामुळेच झाला, कोणाचे लग्न झाले तरी माझ्यामुळेच झाले, नोकरी लागली तरी माझ्यामुळेच लागली. एखाद्याला सवयच असते काहीही केले तरी मीच केले म्हणतात. असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. मुंबईच्या कायापालट प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याचे भूमिपुजन आज करण्यात आले. यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते.

मुंबईतील विकासकामांच्या श्रेयावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. मुंबईतील कोणताही प्रकल्प आम्ही हाती घेतला तर मीच हे काम केले असा दावा केला आहे. जे लोक अडीच वर्षांच्या कार्यकाळात दोन वर्षे दरवाजाच्या आतच होते. त्यांनी 6 महिन्यांच्या काळात काय विकास केला? तुम्ही काहीच केले नाही म्हणून तर आज मुंबईची ही अवस्था झाली आहेदेवेंद्र फडणवीस म्हणाले, महापालिका बँकेत पैसा गुंतवून त्यांच्या इंटरेस्टवर जगण्यासाठी निर्माण झाली नाही. तर महापालिका जनतेचा पैसा जनतेच्या कल्याणासाठी वापरण्याकरीता असते. म्हणून जनतेचा पैसा जनतेसाठी लावा, असे निर्देश महापालिका आयुक्तांना दिले. मुंबईतील ज्या समस्या आहेत. त्या दूर कशा करता येईल याचे प्रकल्प आम्ही सुरू केले आहेत.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, दर पावसाळ्यात किंवा त्या दरम्यान तीन ते चार महिने माध्यमांमध्ये केवळ मुंबईतील खड्ड्यांची चर्चा असते. मुंबईच्या खड्ड्यांवर जेवढे मिम्स तयार होतात, तेवढे कोणत्याही गोष्टीवर होत नाही. ज्या महापालिकेकडे इतका पैसा आहे. 25 वर्ष राज्य करूनही रस्ते दुरुस्त करता येत नाही, ही लाजिरवाणी गोष्ट आहे.येणाऱ्या 2 वर्षांमध्ये खड्डेमुक्त मुंबई होणार. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात दोन वर्षात हे काम होऊ शकते तर 25 वर्ष राज्य करणाऱ्यांना सवाल का विचारू नये? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला.

मुंबईकरांची क्षमा मागितली

देवेंद्र फडणवीस ​​​​​​यांनी यावेळी मुंबईकरांची क्षमा मागितली. ते म्हणाले, आम्ही एकाचवेळी अनेक कामे हाती घेतली आहेत. त्यामुळे तुम्हाला थोडा त्रास होणार आहे. त्यामुळेच मुंबईकरांची क्षमा मागायची आहे. एकावेळी अनेक कामे घेतल्याने प्रदूषण होत आहे. ट्रॅफिक जाम होत आहे. पण काळजी करू नका. दोन तीन वर्षात ही कामे झाली की पुन्हा त्रास होणार नाही. नंतर 30 ते 40 वर्ष त्याकडे बघण्याची गरज पडणार नाही.

मुंबईत रस्ते काँक्रिटीकरण, मलनिस्सारण वाहिन्या कामांचे भूमिपूजन

0

मुंबईच्या विकासाला मानवी चेहरा देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

मुंबई, दि. २६ : मुंबईच्या विकासाला मानवी चेहरा देणार असून मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदलासाठी विविध प्रकारच्या प्रकल्पांव्दारे प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने संपूर्ण मुंबई महानगराचे सुशोभीकरण प्रकल्प अंतर्गत अतिरिक्त ३२० कामे हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाले.

चेंबूर (पश्चिम) मध्ये टिळक नगर परिसरातील लोकमान्य टिळक क्रीडांगण येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी खासदार श्रीमती पूनम महाजन, राहुल शेवाळे, आमदार मंगेश कुडाळकर, प्रसाद लाड, राजहंस सिंह, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू उपस्थित होते.

मुंबईला स्वच्छ आणि निरोगी करणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबईला स्वच्छ सुंदर आणि निरोगी करायची आहे. त्यासाठी समुद्र किनारे, सार्वजनिक जागा आणि झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यात येणार आहेत. यामुळे मुंबईतील नागरिकांचे दैनंदिन जीवनात सुधारणा होईल. मुंबईच्या विकासाला मानवी चेहरा देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. ज्यामुळे मुंबईतील नागरिकांचे दैनंदिन जीवनमान उंचावले जाईल.

रखडलेल्या प्रकल्पांना गती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबईतील रखडलेल्या प्रकल्पांना गती देणार आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाला चालना दिली. म्हाडा , उपकर प्राप्त इमारती, एसआरए प्रकल्पांना गती देण्यासाठी निर्णय घेण्यात येईल. मुंबईतील रस्ते सिमेंट कॉंक्रिटीकरण करणार असून येत्या दोन वर्षांत एकही खड्डा दिसणार नाही, असे काम करणार आहोत.

नागरी समस्यांवर उपायांसाठी प्रकल्प

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबईतील नागरी समस्या दूर करण्यासाठी सुशोभीकरण प्रकल्प हाती घेतला आहे. मुंबईचे परिवर्तन करण्यासाठी प्रकल्पांच्या माध्यमातून अनेक उपक्रम सुरू आहेत. मुंबई महापालिकेकडे असलेला निधी नागरिकांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी खर्च केला जात आहे.

ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटीवर भर

मुंबईत व्यापक स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे, असे सांगून ते म्हणाले, मुंबईतील सार्वजनिक जागा राज्य शासन विकसित करणार . समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी उपक्रम राबविणार आहे. मुंबईच्या ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटी वर भर देण्यात येत आहे. यासाठी विविध ठिकाणी भुयारी मार्ग विकसित करण्यात येत आहेत. रेल्वे आणि मेट्रो रेल्वे चे जाळे विकसित केले जात आहे.

मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी प्रास्ताविक केले. मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण अंतर्गत, एकूण ५२ किलोमीटर लांबी असलेल्या १११ रस्त्यांच्या कामांचा प्रत्यक्ष प्रारंभ तसेच, टिळक नगर, नेहरु नगर व सहकार नगरातील मलनिस्सारण वाहिन्यांच्या कामांचे आज भूमिपूजन झाले.

हेमंत रासने म्हणाले ,कमळाचे उपरणे अनवधानाने राहिले , मला अधिकाऱ्यांनी लक्षात आणून दिले नाही

पुणे- सकाळी आपण मतदान केंद्रात गेलो तेव्हा चुकून अनवधानाने गळ्यात भाजपचे चिन्ह कमळ असलेली मफलर -उपरणे अनवधानाने राहिले, मला कोणी अधिकाऱ्यांनी वेळेत लक्षात आणून दिले नाही , पण लक्षात आल्यावर मी ते काढून टाकले.

प्रत्यक्षात काही डिजिटल मिडिया आणि वृत्तवाहिन्यांनी रासने मतदान करताना छायाचित्रण करून दाखविले आहे त्यात रासने बोटाला शाई लावताना , मतदान करताना , मतदान करून बाहेर येताना त्यांच्या गळ्यात कमळाची मफलर दिसते आहे.

पहिले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची तसदी घ्या-रुपाली पाटील

पुणे-कसबा मतदारांचा असं पोस्ट करत ईव्हीएममध्ये मतदान करतानाचा फोटो रूपाली ठोंबरे पाटील यांनी पोस्ट केला आहे. हा फोटो त्यांचाच आहे असे समजून विरोधकांनी टीकेची झोड उठवायला सुरूवात केली. त्यानंतर रूपाली ठोंबरे पाटील यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.आपण मतदान केलेच नाही तर फोटो काढू कसा? हा फोटो अन्य कुणी तरी पाठवल्याचे त्यांनी म्हटले आहे त्यानंतर त्यांनी दुपारी १२ ते १ वाजण्याच्या दरम्यान फेसबुक वर एक फोटो पोस्ट केला आहे , आणि त्यात हेमंत रासने कमळ चिन्ह असलेली मफलर गळ्यात पांघरून काही जणांच्या समवेत दिसत आहेत. त्यावर रुपाली पाटील यांनी असे म्हटले आहे कि,’

कसबा पोटनिवडणूक:मतदान केंद्रावर उमेदवार पक्षाचा मफलर घालून मतदान करणे गुन्हा नाही का? .नूमवी मतदान केंद्रातील फोटो आहे.आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या लोकांनी पहिले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची तसदी घ्यावी.सत्ताधारी यांनी कायद्यानी राज्य चालवावे.

मी शेंगा खाल्ल्या नाहीत ,मी टरफले उचलणार नाही

रुपाली पाटील त्यांच्या वरील गोपनीयतेचा भंग या आरोपाबद्दल बोलताना म्हणाल्या की, कसबा मतदारसंघात सकाळी ७ वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.त्याच दरम्यान एका मतदाराने मला रविंद्र धंगेकर यांना मतदान केल्याचा फोटो शेअर केला.त्यानंतर तो फोटो सोशल मीडियावर आणि माझा व्हॉटस स्टेटस ठेवला.त्यावरून भाजपकडून टीका करण्यात येत आहे.पण मी अजून मतदान केल नाही. माझ्यावर जे आरोप करीत आहेत त्या व्यक्तीनी माझ्या मतदान केंद्रावर जाऊन पाहून यावे की मी मतदान केले की नाही. त्यामुळे मी शेंगा खाल्ल्या नाही आणि मी टरफले उचलणार नाही. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करायचा असेल तर करू शकता. तसेच मी ४.३० वाजता आदर्श विद्यालय येथे मतदान करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रूपाली ठोंबरेंवर गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप:फेसबुकवर शेअर केला EVM मशीनचा फोटो, म्हणाल्या-मी अजून मतदानच केले नाही

पुणे-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आक्रमक नेत्या अशी ओळख असलेल्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. सकाळी ७ च्या दरम्यानच त्यांनी ही फेसबुक पोस्ट केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका होते आहे. रूपाली ठोंबरे पाटील यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचंही म्हटलं जातं आहे. तसंच विविध आरोप रूपाली ठोंबरे पाटील यांच्यावर केले जात आहेत. अशात रूपाली ठोंबरे पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे तसंच हा फोटो मी पोस्ट केला आहे कारण माझा तो हक्क आहे. माझ्यावर त्यासाठी कुणीही कारवाई करू शकत नाही. जर कारवाई करायचीच असेल तर भाजपाच्या गुंडांवर करा असंही रूपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटलं आहे.

लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 मधील कलम 130 नुसार मतदान हे गोपनीय असते. मतदाराला त्याने कुणाला मतदान केले, याबद्दल गुप्तता बाळगावी लागते. जर मतदाराकडून गोपनीयतेचा भंग झाला, तर त्याच्यावर लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 मधील कलम 130 नुसार कारवाई होते.