पुणे-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आक्रमक नेत्या अशी ओळख असलेल्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. सकाळी ७ च्या दरम्यानच त्यांनी ही फेसबुक पोस्ट केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका होते आहे. रूपाली ठोंबरे पाटील यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचंही म्हटलं जातं आहे. तसंच विविध आरोप रूपाली ठोंबरे पाटील यांच्यावर केले जात आहेत. अशात रूपाली ठोंबरे पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे तसंच हा फोटो मी पोस्ट केला आहे कारण माझा तो हक्क आहे. माझ्यावर त्यासाठी कुणीही कारवाई करू शकत नाही. जर कारवाई करायचीच असेल तर भाजपाच्या गुंडांवर करा असंही रूपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटलं आहे.
लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 मधील कलम 130 नुसार मतदान हे गोपनीय असते. मतदाराला त्याने कुणाला मतदान केले, याबद्दल गुप्तता बाळगावी लागते. जर मतदाराकडून गोपनीयतेचा भंग झाला, तर त्याच्यावर लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 मधील कलम 130 नुसार कारवाई होते.