पुणे-
रविवार, दिनांक 26 फेब्रुवारी: पुणे शहर कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने यांनी मतदान करताना आचारसंहितेचा भंग केला आहे ते स्वतः नूतन मराठी विद्यालय प्रशाला बुध क्रमांक 75 या मतदान केंद्रावर मतदान करायला गेले असताना त्यांनी त्यांचे चिन्ह असलेले कमळाची पट्टी गळ्यात घालून मतदान केले. निवडणूक प्रचार संपल्यानंतर त्यांनी ही कमळाची पट्टी घालून प्रचार केल्याचे यावरून निदर्शनास येत आहे ही बाब गंभीर असून त्यावर निवडणुकीत आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी शिवसेना पुणे शहर उद्धव ठाकरे गटाच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन तक्रारी अर्ज करण्यात आलेला आहे.
यावेळी शिवसेना पुणे शहर प्रमुख संजय मोरे संघटक संतोष गोपाळ, किशोर रजपूत, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, विभाग प्रमुख प्रसाद काकडे, सुरज लोखंडे, महेश पोकळे राजेश मोरे, दिलीप पोमान, नितीन वाघ, प्रणव वाडकर , व इतर शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.