Home Blog Page 1390

८० वर्षीय शेतकरी बच्चू कडूंना भिडला:ठाकरेंना का दगा दिला …म्हणाला…(व्हिडीओ)

0

धाराशिव/उस्मानाबाद : “तुमच्याकडून वेगळ्या अपेक्षा होत्या पण तुम्ही अयोग्य वर्तन केलं. शिंदे फडणवीस डाकू आहेत. तुम्ही त्यांच्याबरोबर गेलात. तुमच्याकडून असं वर्तन अपेक्षित नव्हतं. यासाठी आम्ही जनतेने तुम्हाला निवडून दिलं होतं का?” अशा शब्दात उद्धव ठाकरे यांची साथ सोडणाऱ्या माजी मंत्री बच्चू कडू यांचा समाचार धाराशिवच्या ८० वर्षीय अर्जुन घोगरे या शेतकऱ्याने घेतला. यावेळी शेतकऱ्याने काही मिनिटे बच्चू कडू यांची गाडी रोखून धरली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर बच्चू कडूंच्या गाडीचा मार्ग मोकळा झाला.एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व अमान्य करत भाजपच्या साथीने शिवसेना काबीज केली .

आज धाराशिव दौऱ्यावर असलेल्या बच्चू कडू यांना तेथील एका शेतकऱ्याच्या रोषाचा सामना करावा लागला.महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही का त्रास दिलात…? तुमच्याकडून असं वागणं अपेक्षित नव्हतं, असं तावातावाने शेतकरी बोलू लागला. तेव्हा बच्चू कडू यांनी शेतकऱ्याला टाळण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शेतकऱ्याने मीडियाला पाचारण करत ‘माझा आवाज रेकॉर्ड करा’, अशी सूचनाच केली. त्यावर बच्चू कडू हलकेसे हसले. मग शेतकऱ्याने बोलणे सुरु केले . “राज्यात जे काही घडलं ते बरोबर नव्हतं. तुमच्याकडून वेगळ्या अपेक्षा होत्या. पण तुम्हीही त्या फडणवीस आणि शिंदे या डाकू बरोबर गेलात. घटनेची पायमल्ली केलीत. यासाठी आम्ही तुम्हाला निवडून दिलं होतं का?” अशी विचारणा अर्जुन घोगरे या शेतकऱ्याने बच्चू कडू यांना केली.

“ओमान आणि दुबईत महाराष्ट्रातील अडीच ते तीन हजार महिलांची मानवी तष्करी”

0

अहमदनगर : महाराष्ट्रातील सुमारे अडीच ते तीन हजार महिलांची ओमान आणि दुबई या देशांत मानवी लष्करी झालेली आहे. त्या महिलांची सोडवणूक करण्यसाठी महिला आयोगाचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी नगरमध्ये दिली.

राज्य महिला आयोग आपल्या दरी या उपक्रमातून मंगळवारी चाकणकर यांनी नगरमध्ये येऊन महिलांच्या तक्रारी जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

चाकणकर म्हणाल्या, ओमान या देशात फसवून नेलेल्या एका महिलेचा व्हिडीओ महिला आयोगाला आला होता. त्यावरून संबंधित महिलेचा शोध घेतला असता ती त्या जागेवर आढळून आली नाही. राज्यातील महिलांना परदेशात काम देतो, असे सांगून नेले जाते. यासाठी काही एजंट कार्यरत आहेत. परदेशात गेल्यावर या महिलांकडून त्यांचे कागदपत्रे, फोन काढून घेतले जातात आणि त्यांना अत्यंत छळ करीत डांबून ठेवले जाते. असाच एक व्हिडीओ आम्हाला आला होता. त्यावरून मुंबईत ओशिवरा पोलीस ठाण्यात आम्ही तक्रार दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाशी पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे या महिलांच्या शोधासाठी सरकारी पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. महिला आयोग पाठपुरावा करीत आहे. पुढील ५ ते ६ महिन्यात सर्व महिलांची सुटका केली जाईल, असेही त्या म्हणाल्या. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे सीईओ आशिष येरेकर आदी उपस्थित होते.

आठवणींना उजाळा अन यशाचं कौतुक:विद्यार्थी सहाय्यक समितीच्या माजी विद्यार्थ्यांचा ३४ वा मेळावा उत्साहात


पुणे : वसतिगृहातील जुन्या आठवणी… केलेल्या कमवा व शिका, चार तास काम… सांस्कृतिक कार्यक्रमांत केलेली मौज मस्ती… वेगवेगळ्या क्षेत्रांत मिळवलेल्या यशाचं कौतुक आणि आज करीत असलेल्या कामाची, मुलाबाळांची माहिती एकमेकांना सांगताना, एकत्रित स्नेहभोजनाचा आस्वाद घेताना, पुन्हा एकदा स्मरणरंजन करताना चेहर्‍यावरचा विलक्षण आनंद ओसंडून वाहत होता.

निमित्त होते, विद्यार्थी साहाय्यक समितीच्या माजी विद्यार्थी मंडळाच्या वतीने आयोजित ३४ व्या माजी विद्यार्थी मेळाव्याचे. या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी अमोल शहाणे, तर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ माजी विद्यार्थी प्रसाद रायकर होते. याप्रसंगी समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार, कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड, मंडळाचे अध्यक्ष राजू इंगळे आदी उपस्थित होते.

मेळाव्याच्या निमित्ताने कृतज्ञता व्यक्त करताना ज्येष्ठ कार्यकर्ते व कर्मचार्‍यांचा सत्कार करण्यात आला. कार्यकर्त्या सुहासिनी बिवलकर, कर्मचारी संगीता गारवे यांना, तसेच देणगीदार राजेंद्र गायकवाड यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. अरुण कोंडेजकर, ऍड. दौलत इंगवले, रत्नाकर मते व अरविंद औताडे पुरस्कृत आदर्श विद्यार्थी-विद्यार्थिनी पुरस्कार वितरित करण्यात आले. स्वर्गीय रमाकांत तांबोळी व समिती परिवारातील निधन झालेल्या इतर सदस्यांना आदरांजली वाहण्यात आली. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले.

यंदाच्या मेळाव्याचे प्रायोजकत्व मुंबई व कोकण विभागातील माजी विद्यार्थ्यांकडे होते. मंडळाचे सचिव सुनील चोरे, सहसचिव मनीषा गोसावी, खजिनदार संतोष घारे, सहखजिनदार गणेश काळे, मुंबई व कोकण टीममधील समन्वयक अरविंद औताडे, संजीव पाध्ये, दिनकर वैद्य, मंडळाचे सदस्य जिभाऊ शेवाळे, निसार चौगुले, डॉ. अभय व्यवहारे, मनोज गायकवाड, अलकनंदा पाटील, देविदास टिळे, शंकर बारवे, रेवती गटकळ कार्यालयीन सहायक गणेश ननवरे मेळावा यशस्वी करण्यात कठोर परिश्रम घेतले.

प्रसाद रायकर म्हणाले, “समितीने आपल्याला घडवले. जीवन मूल्यांची शिकवण देणारी ही संस्था आहे. समाजाला आपण काहीतरी देणे लागतो, असा दृष्टीकोन समितीने दिला. इथे मिळालेल्या मूल्यांचा आज आपण जिथे काम करतो, तिथे लाभ होतो. खेड्या-पाड्यात अजूनही अनेक गरजू विद्यार्थी आहेत. त्यांना शोधून आधार देण्याचे काम करावे लागेल. समितीतून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी या कामात सक्रीय सहभाग घेऊन समितीचे हे काम पुढे न्यायला हवे.”

अमोल शहाणे म्हणाले, “समितीने कामाची प्रेरणा आणि आत्मविश्वास दिला. विविध भागांतून आलेल्या विद्यार्थ्यांमुळे संस्कृतीतील विविधता अनुभवली. नेतृत्व, शिस्त, संघर्ष, चिकाटी आणि स्वावलंबी वृत्ती जोपासायला समितीने शिकवले. सामाजिक बांधिलकीचे संस्कार देत आशावादी बनवले.”

प्रतापराव पवार म्हणाले, “समितीच्या कार्यात माजी विद्यार्थ्यांचा वाढणारा सहभाग आनंददायी आहे. गरजू मुलांची संख्या मोठी असल्याने समिती वसतीगृहाचा विस्तार करत आहे. या कामात माजी विद्यार्थ्यांचे योगदान महत्वाचे आहे.”

तुकाराम गायकवाड यांनी समितीच्या भावी योजना आणि आव्हाने विशद केली. नवीन वसतिगृहाच्या उभारणी विषयी माहिती दिली. राजू इंगळे यांनी मंडळाच्या उपक्रमाची माहिती दिली. आजी व माजी विद्यार्थ्यांच्या हितासाठी मंडळ पुढील काळात काम करणार असल्याचे नमूद केले. सुनील चोरे यांनी सूत्रसंचालन, स्वागत-प्रास्ताविक केले. संतोष घारे यांनी आर्थिक अहवालाचे वाचन केले. निसार चौगुले यांनी समन्वयन केले. मनीषा गोसावी यांनी आभार मानले.

पत्रकार वारीशे यांची तर राजकीय हत्या (व्हिडीओ)

0

मुंबई -चौकशीसाठी नेमलेला एसआय टी अधिकारी याचा प्रकल्पात समावेश असून सरकारी अधिकारी असलेल्या अनिलकुमार गायकवाड यांचे नाव घेत त्यांची प्रकल्पात हजार एकर जमीन आहे, पत्रकार वारीशेंची हत्या ही राजकीय हत्या आहे. चार पत्रकारांना यात जमिनी दिल्या गेल्या असे आरोप आज विधानसभेत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार वारीशे हत्या प्रकरणाच्या मुद्द्यावर बोलताना केला .

तहसीलदाराला गाडीखाली आणले जाते , पत्रकाराला मारले जाते , मंत्र्याच्या तोंडावर शाई फेकली तर अजामीनपात्र गुन्हे दाखल केले म्हणून कोर्टाने सरकारला २५ हजाराचा दंड ठोठावला , फडणविसांच्या पोलिसांचे चाललेय काय ? असे नाना पटोले यांनी म्हटले.

राज्यात रिफायनरी विरोधात लिखाण केलं म्हणून कोकणातील पत्रकार शशिकांत वारिसे यांची हत्या करण्यात आली, ही पुरोगामी महाराष्‍ट्रासाठी लाजिरवाणी घटना आहे. संशयित आरोपी हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदयांचे फोटो वापरुन रिफायनरीचं समर्थन करत होता. ही गंभीर बाब आहे. पत्रकार वारिसे यांच्या हत्येची नि:पक्षपणे चौकशी करावी, पोलिसांना तपासात ‘फ्री हॅण्ड’ देण्यात यावा, तपासात कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नाही याची काळजी घ्यावी. राज्यात पत्रकारांवर हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला असून हत्येच्या मागचा मास्टरमाईंड शोधला पाहिजे.अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली .

सर्वात मोठा असा ग्रीन रिफायनरी प्रकल्प उभारणार ; उपमुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या मृत्यू प्रकरणी तपास सुरु असून यामध्ये पोलीस उप अधीक्षक यांच्या अधिपत्याखाली १६ जणांची एसआयटी टीम नेमली आहे. या प्रकरणाचा लवकरच तपास पूर्ण होईल.पत्रकार  बांधवांवर हल्ला ही बाब गंभीर आहे. राज्यातील प्रसार माध्यमातील व्यक्ती आपली कर्तव्ये पार पाडत असताना त्यांच्यावर होणाऱ्या हिंसक कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच पत्रकार संरक्षण कायदा केलेला आहे. त्यामुळे अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद कमी झाली आहे. परंतु कडक कार्यवाहीबाबत आवश्यक असेल तर या कायद्यात सुधारणा करण्यात येईल. या तपास प्रकरणात कोणताही हस्तक्षेत नाही किंवा पोलीसांवर दबाव नाही. यामध्ये पोलिस महासंचालक यांनी लक्ष द्यावे, अशा सूचना देण्यात येतील. राज्य शासनाकडून या पत्रकाराच्या कुटुंबाला २५ लाखांची आर्थिक मदत करण्यात आली आहे, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.रत्नागिरी जिल्ह्यात रिफायनरी प्रकल्प उभारण्यात येणार असून सर्वात मोठा असा ग्रीन रिफायनरी प्रकल्प असणार आहे. यामध्ये ३ कंपन्या गुंतवणूक करणार आहेत. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला मोठी मदत होणार आहे. त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊन राज्याच्या हितासाठी हा प्रकल्प करण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी अधिक माहिती देताना सांगितले.

कांद्यावरून रणकंदन : शासन कांदा उत्पादकांच्या पाठीशी ठामपणे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

मुंबई, दि. २८ : ‘कांदा उत्पादकांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असून नाफेडकडून कांदा खरेदी सुरु झाली आहे’, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी विधानसभेत बोलताना सांगितले.राज्यभरात कांद्याचे भाव अवघ्या 2 ते 3 रुपये किलोंवर आले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज याचे तीव्र पडसाद उमटले.

मुख्यमंत्री आपल्या निवेदनात म्हणाले की, हे सरकार शेतकऱ्यांना न्याय देणारे आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निकषापेक्षा जास्त मदतही केली आहे. नाफेडला अतिरिक्त कांदा खरेदी करण्याची विनंती केली होती, त्याप्रमाणे खरेदी सुरु झाली आहे. 2.38 लाख मेट्रिक टन कांदा आत्तापर्यंत खरेदी झाला असून जिथे खरेदी केंद्र बंद असेल तिथे सुरु करण्यात येईल . कांदा निर्यातीवर देखील बंदी नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनासुद्धा आवश्यकतेनुसार मदत जाहीर करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले

कांद्याचे दर वाढावेत म्हणून राज्य सरकारने तातडीने कांदा खरेदी सुरू करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. तर, केंद्र सरकारकडे पाठपुरावा करुन कांदा निर्यात पुन्हा सुरू करण्यासाठी राज्य सरकारने पाठपुरावा करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली. सध्या केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे, असे भुजबळ यांनी सांगितले.

निर्यातीला परवानगी द्यावी- छगन भुजबळ

छगन भुजबळ म्हणाले, भाव पडल्यामुळे कालपासून अनेक शेतकऱ्यांनी कांदे रस्त्यावर टाकलेत आहेत. 518 क्विंटल कांदे विकल्यावर उलट एका शेतकऱ्यालाच 318 रुपये द्यावे लागले आहेत. कांदा उत्पादक शेतकरी अत्यंत गरीब वर्गातला असतो. सध्या तुर्की, मोरक्को या देशात कांद्याचा प्रचंड तुटवडा आहे. त्यामुळे तेथे भाव वाढलेले आहेत. या देशांत कांदा निर्यातील सरकारने परवानगी द्यावी. केंद्र व राज्य सरकारने मनात आणल्यास हा विषय ते सहज सोडवू शकतात. फक्त त्यांनी मनावर घ्यावे, असे आवाहन छगन भुजबळांनी केले.

दरम्यान, मुख्यमंत्री बोलत असताना विरोधकांकडून जोरदार धोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात गदारोळ झाल्याचं बघायला मिळालं. यामुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आले होते. अखेर विधानसभा अध्यक्षांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

राज्य सरकार सीमा भागातील जनतेच्या पाठीशी ठाम – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सीमाप्रश्नावरील चर्चेवर विधानसभेत ग्वाही

0

मुंबई, दि. २८ : ‘राज्य सरकार महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील नागरिकांच्या पाठिशी ठामपणे उभे असून त्यांच्यावर कोणत्याही पद्धतीने अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य छगन भुजबळ यांनी याबाबत उपस्थित केलेल्या मुद्यावर मुख्यमंत्री बोलत होते.कर्नाटकच्या सीमा भागात मराठी भाषकांवर प्रचंड अन्याय आणि अत्याचार सुरू आहेत. या प्रश्नाची सुप्रीम कोर्टात तड लागेपर्यंत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोला. ते ऐकत नसतील, तर देशाचे गृहमंत्री आणि पंतप्रधान यांना सांगून सीमावासीयांचे हाल थांबवा, असे आवाहन मंगळवारी छगन भुजबळ यांनी विधिमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले.

याबाबत निवेदन करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, ‘सीमा प्रश्नाबाबत आपण संवेदनशील असून हा प्रश्न लवकरात लवकर सुटावा अशी प्रामाणिक इच्छा आहे. सीमावर्ती बांधवांवर कर्नाटक सरकारकडून अन्याय होऊ नये अशी शासनाची भूमिका आहे. सर्वोच्च न्यायालयात हा प्रश्न प्रलंबित असून सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडण्यासाठी तज्ज्ञ वकीलांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याशिवाय ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांनाही या प्रकरणात राज्य सरकारची बाजू मांडण्याबाबत विचारणा करण्यात आली असून त्यांनी त्यासाठी तयारी दर्शवली आहे’, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेऊन केंद्र सरकारला तसे आवाहन केले होते, त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची दिल्लीत बैठक घेतली होती. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयात हा प्रश्न प्रलंबित असेपर्यंत सीमावर्ती भागात जैसे थे परिस्थिती कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासोबतच इतर मुद्दे सोडवण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांच्या प्रत्येकी तीन मंत्र्यांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानुसार तीन मंत्र्यांची निवड या समितीसाठी करण्यात आली असून त्यांची बैठक लवकरच आयोजित करण्यात येईल असेही स्पष्ट केले. तसेच सीमावर्ती भागातील तरूणांवर दाखल करण्यात आलेल्या केसेस मागे घ्यायला कर्नाटक सरकारला भाग पाडले असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय राज्य शासनाच्या वतीने सीमावर्ती भागातील संस्थांना देण्यात येणारा मुख्यमंत्री धर्मादाय निधी पुन्हा एकदा द्यायला सुरूवात केली आहे. सीमावर्ती भागातील शाळा आणि संस्थांना अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच महात्मा फुले आरोग्यदायी योजनेचा लाभ सीमावर्ती भागातील नागरिकांना लागू करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. तसेच सीमालढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांचे निवृतीवेतन १० हजारांहून २० हजारांपर्यंत वाढवण्याचा निर्णयही घेतला आहे. अशा निर्णयांच्या माध्यमातून सीमावर्ती भागातील नागरिकांना न्याय देण्याचा निर्णय घेण्यात आला असून कोणत्याही परिस्थितीत सीमावर्ती भागातील नागरिकांवर अन्याय होऊ देणार नाही, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. तसेच या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी अधिवेशन काळात बैठक बोलावल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान, गृहमंत्र्यांना बोला:कर्नाटकच्या मराठी माणसावरील अन्यायावर भुजबळ आक्रमक

छगन भुजबळ म्हणाले की, आपण कन्नड शाळांना प्रोत्साहन देतो. तोच दृष्टीकोन त्यांनी घेतला पाहिजे. मात्र, उलट तिथे अधिवेशन घेणे, विधानसभा बांधणे सुरू आहे. त्यावर मतप्रदर्शित केले, तर लाठीहल्ला करून केसेस टाकत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमाप्रश्नाच्या आंदोलनात भाग घेतला आहे. या प्रश्नाची एक तर सुप्रीम कोर्टात तड लागली पाहिजे. तोपर्यंत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोला. ते जर ऐकत नसलीत, तर देशाचे गृहमंत्री, प्रंतप्रधान यांना सांगून त्यांचे चाललेले हाल थांबवणार का, असा सवाल केला.

सत्तासंघर्षावर आजपासून सलग सुनावणी

0

नवी दिल्ली- राज्यातील सत्तासंघर्ष प्रकरणावर आजपासून पुन्हा घटनापीठासमोर सलग सुनावणी होत आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील ५ न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी होत आहे. सकाळी साडे दहा वाजेपासून सुनावणीला सुरुवात होईल.राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल मार्चच्या पहिल्या आठवड्यात लागू शकतो, अशी महत्त्वाची माहिती ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी दिली आहे.

दरम्यान, सत्तासंघर्षावर मागील आठवड्यात झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाचे अ‌ॅड. कपिल सिब्बल यांनी सलग ३ दिवस युक्तिवाद केला. सत्तासंघर्षात तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवरच सिब्बल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांचे सहकारी अ‌ॅड. अभिषेक मनू सिंघवी यांनीही व्हीपचे उल्लंघन करणाऱ्या शिंदे गटाच्या 39 आमदारांना अपात्र घोषित करा, अशी मागणी केली आहे. त्यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीपूर्वी राजीनामा का दिला, हा कळीचा प्रश्न उपस्थित केला होता.

बहुमत चाचणीत शिंदेंच्या 39 आमदारांनी विरोधात मतदान केले असते व त्यामुळे ठाकरे सरकार पडले असते तर आम्ही त्या आमदारांना अपात्र ठरवू शकलो असतो. बहुमत चाचणीही रद्द केली असती. पण ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे आमदारांवर मतदानाची वेळच आली नाही व तुम्ही (ठाकरेंनी) हा अधिकार गमावला,’ असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. दरम्यान, आजदेखील ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी युक्तिवाद करणार आहेत. या आठवड्यात शिंदे गटालाही युक्तिवादाची संधी मिळेल.

आजच्या सुनावणीबाबत ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत पत्रकार परिषदेत म्हणाले की, शिंदे गटाच्या आमदारांना पक्षांतर बंदी कायदा लागू होतो, अशी भूमिका आम्ही सर्वोच्च न्यायालयात मांडली आहे. कारण एकनाथ शिंदेंनी बंड केले तेव्हा ते पक्षातच होते. त्यांनी आपला वेगळा गट तयार केला नव्हता. त्यामुळे शिंदेंसह 39 आमदार नक्कीच अपात्र होतील, असा आम्हाला विश्वास आहे.

राज्यात सत्तापालट हा सर्व कटाचा भाग

कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला आहे की, शिंदे गटाचे 39 आमदार राज्यपालांकडे जाऊन सत्तास्थापनेचा दावा करतात. तुम्ही कोणत्या पक्षाचे, कुणासोबत युती करत आहात हे तरी राज्यपालांनी त्यांना विचाराला हवे होते? पण हा सर्व कटाचा भाग आहे. भरत गोगावले यांची प्रतोदपदी नेमणूक गुवाहाटीत बसून करण्यात आली. या निवडीला नव्या विधानसभा अध्यक्षांनी मंजुरी दिली. गोगावलेंनी प्रतोद झाल्यावर ठाकरे गटाच्या आमदारांना नोटिसा बजावल्या. मुळात गोगावलेंची नेमणूकच रद्द करायला हवी. कोर्टाच्या निर्णयापर्यंत निवडणूक आयोगाने निकाल देऊ नये, अशी आमची मागणी होती, पण कोर्टाने मागणी फेटाळली. ज्यांच्याव

महात्‍मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. २७ : अनुसूचित जाती व नवबौद्धांसाठी महात्‍मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ राबmmवीत असलेल्या ५० टक्के अनुदान योजना, बीज भांडवल योजना तसेच केंद्र शासनाच्या एनएसएफडीसी उच्च शैक्षणिक योजनेसाठी कर्ज प्रस्ताव  पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महात्‍मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या., जिल्हा कार्यालय मुंबई शहर कार्यालयाकरिता सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी ५० टक्के अनुदान योजना व बीज भांडवल योजनांकरिता ४५ टक्क्यांचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. या दोन्ही योजना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत राबविण्यात येतात. तसेच केंद्र  सरकारच्या एनएसएफडीसी उच्च शैक्षणिक योजनेसाठी कर्ज प्रस्ताव सादर करण्याकरीता या महामंडळाच्या योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी यापूर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तसेच अर्जदारांनी महामंडळाच्या नियमाप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून तीन प्रतींद्वारे अर्ज स्वतः अर्जदाराने मुळ कागदपत्रासह उपस्थित राहून महात्‍मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या., जिल्हा कार्यालय मुंबई शहर कार्यालयात दाखल करावा. त्रयस्थ तसेच मध्यस्थीमार्फत कर्ज अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.

५० टक्के अनुदान योजनेसाठी प्रकल्प मर्यादा ५० हजार रुपयांपर्यंत आणि प्रकल्प मर्यादेच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त १० हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येते व उर्वरित रक्कम बँकेमार्फत देण्‍यात येते. बँक कर्जावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याज आकारण्यात येते. कर्जाची परतफेड सर्वसाधारणपणे 3 वर्षात करावयाची आहे.

बीज भांडवल योजनेसाठी प्रकल्प मर्यादा रु. ५० हजार ते रु. ५ लाखापर्यंत., प्रकल्प मर्यादेच्या २० टक्के बीज भांडवल कर्ज महामंडळामार्फत ४ टक्के द. सा. द. शे. व्याजदराने देण्यात येते. या राशीमध्ये महामंडळाच्या अनुदानाचे १० हजार रुपये समाविष्ट आहे. बँकेचे कर्ज ७५ टक्के देण्यात येते व या कर्जावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याजदर आकारण्यात येतो, महामंडळाचे व बॅंकेच्या कर्जाची  परतफेड एकाच वेळेस ठरवून दिलेल्या समान मासिक हप्त्यानुसार ३ ते ५ वर्षाच्या आत करावी लागेल,अर्जदारास ५ टक्के स्वत:चा सहभाग भरावयाचा आहे.

उच्च शैक्षणिक कर्ज योजनेसाठी एनएसफएसडीसी योजनेंतर्गत व्यावसायिक व तांत्रिक उच्च शिक्षणाकरिता देशांतर्गत कर्ज मर्यादा रु.२० लाख रुपये व देशाबाहेर कर्ज मर्यादा ३० लाख रुपये आहे.

        तीनही योजनेकरिता अर्ज करण्यास आवश्यक पात्रता :

अर्जदार अनुसूचित जाती/नवबौद्ध संवर्गातील असावा व त्याचे वय १८ वर्षापेक्षा जास्त असावे. राज्य महामंडळाच्या योजने करीता वार्षिक उत्पन्न मर्यादा शहरी व ग्रामीण भागाकरिता रुपये ३ लाख असावी. केंद्रीय महामंडळाच्या योजना करिता वार्षिक उत्पन्न रु. ३ लाख इतकी आहे,अर्जदार हा महामंडळाच्या कोणत्याही योजनांचा (राज्य / केंद्र) थकबाकीदार नसावा.

अर्ज करण्यास आवश्यक कागदपत्रे : जातीचा व उत्पनाचा सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला दाखला, २ पासपोर्ट आकाराचे फोटो, रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र, आधारकार्ड प्रत, कोटेशन, व्यवसायासाठी आवश्यक असल्यास जागेचा पुरावा, व्यवसायानुरुप इतर आवश्यक दाखले, आवश्यकतेप्रमाणे प्रकल्प अहवाल, व्यवसायानुरुप आवश्यकतेप्रमाणे इतर दाखलेपत्र, उदा. वाहनाकरीता व व्यवसायाकरिता लायसन्स, परवाना, बॅज नंबर इत्यादी, बँकेचे खाते क्रमांक व पासबुकची झेरॉक्स, महामंडळाच्या नियमानुसार उच्च शैक्षणिक योजनेकरिता कागदपत्रे सादर करावी, असे आवाहन महात्‍मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ जिल्हा कार्यालय मुंबई शहरमार्फत करण्यात आले आहे.

गुरुवारी हडपसर गावठाण, फुरसुंगी, माळवाडीसह इतर भागाचा पाणीपुरवठा बंद

पुणे : पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून रामटेकडी ते खराडी भागात जाणाऱ्या लाईनवर फ्लो मीटर बसविण्याचे काम येत्या गुरुवारी (2 मार्च) करण्यात येणार आहे.त्यामुळे गुरुवारी हडपसर गावठाण, फुरसुंगी, माळवाडीसह इतर भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.तर शुक्रवारी (3 मार्च) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. अशी माहिती पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग

रामटेकडी GSR – ससाणेनगर, काळेबोराटेनगर, हडपसर गावठाण, ग्लायडिंग सेंटर, फुरसुंगी, सय्यदनगर, इंद्रप्रस्थ,
मगरपट्टा, वानवडी SRPF, AIPT, रामटेकडी, रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया, भारत फोर्स कंपनी परिसर, महंमदवाडी,
हांडेवाडी रोड, गोंधळेनगर, माळवाडी, भोसले गार्डन, 15 नं. आकाशवाणी, लक्ष्मी कॉलनी, महादेव नगर,
मगरपट्टा सिटी, मुंढवागाव, केशवनगर, भीमनगर, शिंदे वस्ती, शिर्के कंपनी, काळेपडळ, गाडीतळ, वैदुवाडी, हडपसर, हेवन पार्क, भारत फोर्स कंपनी परिसर.

चार – पाच घरात चाव्यांची चोरी करत पळवली पार्किंगमधून मोटार

पुणे-औंध परिसरातीत चार ते पाच घरांमध्ये पार्किंगमधून चारचाकी पळवून नेण्यात आल्याची घटना घडली. डी पी सोसायटीत अज्ञात चाेरांनी चाव्यांची चोरी करत हुंडाई गेट्झ कंपनीची कार चोरल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी आज (सोमवारी) दिली.

या घटनेबाबत राहूल बेंदुगडे (वय 27) यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. ही घटना डॉ राजगाव यांच्या घरात घडली. राजगाव काही कामानिमित्त हैद्राबाद येथे गेले होते. राजगाव यांना कोणीही नातेवाईक नसल्याने राहूल त्यांच्या घरी दिवसभर थांबून रात्री दुसऱ्या सदनिकेत झोपण्यास गेले होते.

रविवारी ( 26 फेब्रुवारी ) सकाळी पुन्हा राजराव यांच्या घरी परतल्यानंतर त्यांना दाराची कडी तुटलेल्या अवस्थेत असल्याचे दिसले. तसेच खोलीमधील कपाट उघडे असल्याचे दिसले. घरातील सामान अस्ताव्यस्त होते. चारचाकीच्या चाव्याही न मिळाल्याने त्यांनी वाहने पार्किंगमध्ये येऊन पाहिली. तेंव्हा हुंडाई गेटझ कार जागेवर नव्हती व फाेक्सवॅगन बीटेल कारची चावीही चाेरटयांनी चाेरुन नेल्याचे कळल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. चोरी झाल्याचे कळताच राहूल यांनी पोलिसांकडे घटनेची तक्रार नोंदवली.

त्यानंतर साेसायटीतील अन्य चार ते पाच घरातही चाेरटयांनी डल्ला मारल्याचे उघडकीस आले. एका घराच्या दरवाजाचा लॅच ताेडून जुना टीव्हीही चाेरुन नेला आहे. या घटनेची माहिती मिळताच, चतुश्रृंगी पाेलिसांनी घटनास्थळी दाखल हाेत परिस्थितीची पाहणी केली. करत चाेरटयांचा शाेध सुरु केला आहे. याबाबत पुढील तपास पाेलिस उपनिरीक्षक एस. महाडीक करत आहेत.

केंद्रीय सामाजिक न्याय विभागाची २८ फेब्रुवारीपासून पुण्यात राष्ट्रीय कार्यशाळा

देशातील १२ राज्यांच्या मंत्र्यांसह अनेक मान्यवरांची राहणार उपस्थिती

पुणे, दि. २७ : राज्यासह, देशातील अनुसूचित जाती घटकांकरीता असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, जनजागृती, नियम व कायदे याचबरोबर त्या योजना तळागाळापर्यंतच्या नागरीकांपर्यंत पाहोचविण्यासाठी पुण्यात केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष अधिकारीता मंत्रालय व राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय कार्यशाळेचे २८ फेब्रुवारीपासून आयोजन करण्यात आले आहे.

पुण्यातील हॉटेल दी रिट्झ कार्लट्न येरवडा येथे होणाऱ्या या क्षेत्रीय कार्यशाळेत राज्याचे मुख्यमंत्री व केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे मंत्री यांच्यासह पंजाब, हरियाणा, जम्मू-काश्मीर, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र, दीव दमन, दादर नगर हवेली व गोवा अशा १२ राज्यांचे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री, मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव, सचिव, आयुक्त, व संचालक सहभागी होणार आहेत.

या कार्यशाळेत विविध राज्यांमध्ये अनुसूचित जातीच्या घटकांतील लोकांसाठी राबवण्यात येत असलेल्या योजनांची अंमलबजावणी व इतर राज्यांमध्ये नव्याने लागू करण्यात येणाऱ्या योजना व त्या संदर्भातील धोरणांची आखणी, नियम व कायदे तसेच समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विविध राज्यांच्या व केंद्र शासनाच्या योजना पाहोचविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना यावर चर्चा/विचारमंथन करुन मसुदा तयार करण्यात येणार आहे.

ही राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी व देशातील विविध राज्यातील योजनांमध्ये राज्याच्या योजना प्रतिबिंबित व्हाव्यात यासाठी सामाजिक न्याय विभाग प्रयत्न करत आहे. शासनाने याकामी समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांची मुख्य नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

CBI ने मागितली कोर्टाने दिली सिसोदिया यांना 5 दिवसांची कोठडी

0

नवी दिल्ली-

दिल्लीचे उप मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सोमवारी दुपारी 3.10 वा. राउज अव्हेन्यू कोर्टात सादर करण्यात आले होते. तिथे जवळपास 30 मिनिटे सुनावणी झाली. त्यात तपास संस्थेने सिसोदियांची 5 दिवसांची कोठडी मागितली. कोर्टाने ती मान्य केली.5 दिवसांची CBI कोठडी सुनावली. त्यामुळे आता ते 4 मार्चपर्यंत केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताब्यात राहतील. सिसोदियांना सीबीआयने रविवारी सलग 8 तासांच्या चौकशीनंतर अटक केली. सिसोदिया तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप तपास संस्थेने केला आहे.

सिसोदिया यांच्या अटकेनंतर आम आदमी पार्टी (आप) दिल्लीसह देशातील अनेक शहरांमध्ये निदर्शने करत आहे. नेते-कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. दिल्लीतील भाजप कार्यालयाचा घेराव करू, असे आपने म्हटले आहे.जुलै 2022 मध्ये दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी मनीष सिसोदिया यांच्या विरोधात सीबीआय चौकशीची मागणी केली. सक्सेना यांनी सिसोदिया यांनी नियमांकडे दुर्लक्ष करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. यानंतर ईडी आणि सीबीआयने सिसोदियाविरुद्ध तपास सुरू केला.

कोर्ट रूम LIVE…

CBI: वकील कोर्टात म्हणाले, “हे संपूर्ण प्रकरण प्रॉफिटचे आहे. आम्हाला याबाबत अधिक चौकशी करायची आहे. सिसोदिया हे उत्पादन शुल्क मंत्री आहेत आणि ते मंत्र्यांच्या गटाचे नेतृत्व करत होते. मद्य धोरणाच्या मॉडेलबद्दल कोणतीही चर्चा झाली नाही.”

सिसोदिया : वकील दयान कृष्णन म्हणाले, “एलजींनी मे 2021 मध्ये पॉलिसीला ग्रीन सिग्नल दिला होता. नफ्याच्या मार्जिनबद्दलच्या सर्व वादविवादांना एलजींनी मान्यता दिली होती. त्यांनी बदलांना मान्यता दिली होती. पहिल्याच दिवशी सीबीआय फोनबद्दल बोलले. म्हणाले सिसोदिया यांनी 4 फोन वापरले, 3 नष्ट केले. सिसोदिया त्यांचा फोन सेकंड हँड दुकानात देऊ शकत नव्हते का.

सिसोदिया: दयान कृष्णन म्हणाले, “सीबीआय म्हणत आहे की सिसोदिया त्यांना पाहिजे तसा प्रतिसाद देत नाहीत. तपासात सहकार्याचा प्रश्न आहे, सिसोदिया यांनी सहकार्य केले आहे. त्यांच्या घरावर छापे टाकण्यात आले. त्यांचे फोन एजन्सीकडे आहेत. आता एजन्सी म्हणत आहे की सिसोदिया टाळाटाळ करणारी उत्तरे देत आहेत. त्यांना हा अधिकार आहे. व्यक्तीला घटनात्मक अधिकार आहेत.

स्पर्धेच्या,खेचाखेचीच्या धावत्या जगातील ..स्मार्ट शहरात हलका स्पर्श हृदयातच हरविलेल्या आपुलकीच्या गावाचा ..

पुणे : चावडीवर दोघा भावांचा तंटा सोडवणारे पंच, गावाला जागे करणारे वासुदेव, विहीर व हातपंपावर पाणी भरणाऱ्या बाया, कावडीतून पाणी वाहून नेणारे पुरुष, टुमदार घरे, बारा बलुतेदार, हिरवीगार शेती, गावाचा बाजार, जत्रा अन बैलगाडी अवतरली थेट भांडारकर रस्त्यावरील डेक्कन जिमखान्याच्या ‘बाशिम’ गावात!


मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून सोमवारी पुण्याच्या मध्यवर्ती भागात ग्रामीण जीवन आणि ग्रामसंस्कृती अवतरली. भांडारकर रस्त्यावरील मएसो बालशिक्षण मंदिर शाळेच्या शताब्दी पूर्ती वर्षानिमित्त खास दोन दिवसांच्या ग्रामसंस्कृतीचे दर्शन घडवणारे ‘बाशिम’गाव साकारण्यात आले आहे. मंगळवारी (दि. २८) सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे प्रदर्शन पाहता येणार आहे. शिशुनिकेतन व चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवन, ग्रामीण संस्कृतीची ओळख व्हावी, हा यामागील उद्देश आहे.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्की. राजीव सहस्रबुद्धे, सचिव डॉ. भरत व्हनकाटे, प्रसिद्ध गायिका आसावरी गाडगीळ यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक यांनी प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या बाशिम गावात ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा, दवाखाना, पाटलांचा वाडा, कौलारू घरे, मंदिरे, चावडी, शेती व त्यासाठी अवजारे, बाजारहाट, जत्रा, बैलगाडी, गोठा, न्हावी-सुतार-कुंभार-लोहार यासारखे बारा बलुतेदारी करणारे ग्राम व्यवसाय, विविध प्रकारचा रानमेवा आहे. गावातील भजन-कीर्तन, पालखी सोहळा, लोककला व संस्कृतीचे सादरीकरण लक्षवेधी आहे. बैलगाडीची मनसोक्त रपेट मारून झाल्यावर लहानग्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले.


याबाबत बोलताना शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता चव्हाण म्हणाल्या, “शाळेने १०१ व्या वर्षात पदार्पण केले असून, त्यानिमित्ताने वर्षभर मुलांना ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देणारे वैविध्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. त्याचे एकत्रित सादरीकरण या दोन दिवसात झाले आहे. दुरून दिसणारे आणि गावाच्या अंतरंगात काय काय सामावले आहे, याचे दर्शन यातून घडते. मुलांना गाव, तेथील संस्कृती, रचना, विविध घटक यासह रानमेव्याची ओळख व्हावी, हा यामागील उद्देश आहे. या उपक्रमात १ ली ते ४ थी या वर्गातील सर्व मुले, त्यांचे शिक्षक व पालक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत.”

महिला एकेरीत आकर्षी, अनुपमा अंतिम लढत

८४ वी वरिष्ठ गट राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा; पुणे जिल्हा आणि महानगर बॅडमिंटन संघटना (पीडीएमबीए) यांच्या वतीने आयोजित डॉ. सायरस पूनावला आणि वेंकीज यांच्या सहकार्याने व बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन यांच्या मान्यतेने स्पर्धा
पुणे : कुमार गटात जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल मानांकित हरियानाची अनुपमा उपाध्याय आणि छत्तीसगडची आकर्षी कश्यप यांच्यात राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीची अंतिम लढत होणार आहे.
पुणे जिल्हा आणि महानगर बॅडमिंटन संघटना (पीडीएमबीए) यांच्या वतीने आयोजित डॉ. सायरस पूनावाला आणि  वेंकीज यांच्या सहकार्याने व बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन यांच्या मान्यतेने  योनेक्स सनराईज  ८४ वी वरिष्ठ गट राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरू आहे. 

आकर्षीने आदिता रावचे आव्हान २१-९, २१-१९ असे संपुष्टात आणले. अनुपमाने अस्मिता चलिहाचा प्रतिकार २१-१८, ११-२१, २१-१८ असा संपुष्टात आणला. पुरुष एकेरीत महाराष्ट्राच्या हर्षिल दाणीचे आव्हान संपुष्टात आले. हर्षिल दाणीला मध्य प्रदेशच्या प्रियांशु राजावतकडून १४-२१, १५-२१ अशा पराभवाचा सामना करावा लागला.

अनुपमा आणि अस्मिता यांच्यातील खेळात संयम निर्णायक ठरला. अनुपमाने अगदी नियंत्रित सुरुवात करताना पहिल्या गेममध्ये २-२, ६-६, ९-९, १०-१० अशा बरोबरीतील स्थितीनंतर १५-१३, १६-१५ अशी आघाडी कायम राखली. त्या वेळी सलग चार गुणांची कमाई करताना अनुपमाने २०-१६ अशी गुणांची कमाई करताना पहिली गेम निसटणार नाही याची काळजी घेतली. दुसऱ्या गेमला अस्मिताने आपला खेळ कमालीचा उंचावला आणि १-१ नंतर सलग आठ गुण घेत ८-१ अशी आक्रमक सुरुवात केली. यानंतर अनुपमा दुसऱ्या गेमला अस्मिताला गाठूच शकली नाही. गेमच्या मध्याला अस्मिता ११-६ अशी आघाडीवर होती. ही मोठी आघाडी अशीच कायम राखताना अस्मिताने नंतर अनुपमाला केवळ पाचच गुण मिळू दिले. 
निर्णायक गेम मात्र कमालीचा चुरशीचा झाला. अस्मिताने ५-१ अशी झकास सुरुवात केली होती. अस्मिताचे फटके आणि स्मॅशेस अचूक बसत होते. अनेकदा तिने अनुपमाला पुढेही खेचले. पण, अस्मिताला या वर्चस्वाचा फायदा उठवता आला नाही. आक्रमक खेळण्याच्या नादात अस्मिताचे फटक्यांच्या वेगावरील नियंत्रण सुटले आणि अनेकदा शटल नेटमध्ये अडकले. वेगवान फटके मारताना अस्मिताचे फटके बाहेर गेले. या निरर्थक चुकांचा अस्मिताला फटका बसला. अनुपमाने संयमाने खेळ करताना समोर येईल त्या संधीचा फायदा उठवत २०-१७ अशी आघाडी घेतली. त्या वेळी अस्मिताने एक मॅच पॉइंट वाचवला खरा. पण, तिची झुंज तेवढ्यापुरतीच ठरली. पुन्हा एकदा तिचा फटका नेटमध्ये अडकला आणि अनुपमाच्या अंतिम फेरीवर शिक्कामोर्तब झाले.

त्यापूर्वी झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीत आकर्षीला तिसऱ्या मानांकित आदिता रावचा प्रतिकार परतवण्यात फारसे प्रयास पडले नाही. कमालीच्या आत्मविश्वासाने खेळताना अस्मिताने ३८ मिनिटांत आदिताचे आव्हान संपुष्टात आणले.

निकाल  (सर्व उपांत्यफेरी)
महिला एकेरी – आकर्षी कश्यप वि.वि. आदिती राव २१-९, २१-१९, अनुपमा उपाध्याय वि.वि. अस्मिता चलिहा २१-१८, ११-२१, २१-१८

मिश्र दुहेरी – सिद्धार्थ एलान्गो-खुशी गुप्ता वि.वि. मनु अत्री – के मनिषा २२-२०, २१-१३, हेमनागेंद्र बाबू टी-कनिका कन्वल वि.वि एम. अर्जुनकुमार रेड्डी-डी पूजा २१-१८, २१-१६

पुरुष दुहेरी – कुशल राज-प्रकाश राज वि.वि. हरिहरन अम्साकरुणन-रुबन कुमार आर. १६-२१, २१-१९, २१-१९

कसबा : रासने ,धंगेकर आणि रुपाली पाटलांवर ही गुन्हा दाखल ..पुढे काय होणार ते सर्वानांच ठाऊक

पुणे- कसबा पोट निवडणुकीच्या दरम्यान झालेल्या काही प्रसंग घटनांच्या वरून दोन्ही उमेदवार म्हणजे धंगेकर आणि रासने यांच्यासह राष्ट्रवादी च्या रुपाली पाटलांवरही गुन्हा दाखल झाला आहे ,गुन्हा घडत असताना अगदी वर पासून खालपर्यंत चे निवडणूक अधिकारी कोणते कर्तव्य बजावत होते ? कोणास साथ देत होते याची कोणतीही चौकशी अगर काहीही करण्याचा इरादा मात्र दिसून आलेला नाही . या तिघांवर गुन्हे दाखल करून प्रशासन मात्र अगदी स्वच्छ, सभ्य ,कायद्याचे पालन करणारे असल्याचा तोरा आता मिरविणार आहे. आणि या तिघांवरही दाखल झालेल्या गुन्ह्यांचे पुढे काय होणार आहे ? या प्रश्नाचे उत्तर हि जनतेला ठाऊकच असावे.

कसबा आणि चिंचवड विधानसभा पोट निवडणुकांसाठी काल मतदान पार पडलं. मतदानाचा दिवस भाजप आणि महाविकास आघाडीच्या आरोप-प्रत्यारोपांनी गाजला. तर आज मतदानाच्या दुसऱ्या दिवशीही राजकीय घडामोडींना वेग आला आहे.भाजपचे कसब्याचे उमेदवार हेमंत रासने यांनी मतदानाला जाताना गळ्यात भाजपचं उपरणं घातलं होतं. कमळाचं चिन्ह असलेलं हे उपरणं घालूनच त्यांनी मतदान केंद्रात प्रवेश केला आणि मतदान करून बाहेर पडले. या प्रकरणी रासने यांच्याविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर मतदारांना पैसे वाटप केल्याचा आरोप करत उपोषण केलं होतं. भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला होता. पत्नीसह त्यांनी कसबा गणपतीसमोर उपोषण सुरु केलं होतं. हा आचारसंहितेचा भंग असल्याच्या कारणामुळे त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. तर रुपाली पाटील यांनी गोपनियतेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे.