पुणे-औंध परिसरातीत चार ते पाच घरांमध्ये पार्किंगमधून चारचाकी पळवून नेण्यात आल्याची घटना घडली. डी पी सोसायटीत अज्ञात चाेरांनी चाव्यांची चोरी करत हुंडाई गेट्झ कंपनीची कार चोरल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी आज (सोमवारी) दिली.
या घटनेबाबत राहूल बेंदुगडे (वय 27) यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. ही घटना डॉ राजगाव यांच्या घरात घडली. राजगाव काही कामानिमित्त हैद्राबाद येथे गेले होते. राजगाव यांना कोणीही नातेवाईक नसल्याने राहूल त्यांच्या घरी दिवसभर थांबून रात्री दुसऱ्या सदनिकेत झोपण्यास गेले होते.
रविवारी ( 26 फेब्रुवारी ) सकाळी पुन्हा राजराव यांच्या घरी परतल्यानंतर त्यांना दाराची कडी तुटलेल्या अवस्थेत असल्याचे दिसले. तसेच खोलीमधील कपाट उघडे असल्याचे दिसले. घरातील सामान अस्ताव्यस्त होते. चारचाकीच्या चाव्याही न मिळाल्याने त्यांनी वाहने पार्किंगमध्ये येऊन पाहिली. तेंव्हा हुंडाई गेटझ कार जागेवर नव्हती व फाेक्सवॅगन बीटेल कारची चावीही चाेरटयांनी चाेरुन नेल्याचे कळल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. चोरी झाल्याचे कळताच राहूल यांनी पोलिसांकडे घटनेची तक्रार नोंदवली.
त्यानंतर साेसायटीतील अन्य चार ते पाच घरातही चाेरटयांनी डल्ला मारल्याचे उघडकीस आले. एका घराच्या दरवाजाचा लॅच ताेडून जुना टीव्हीही चाेरुन नेला आहे. या घटनेची माहिती मिळताच, चतुश्रृंगी पाेलिसांनी घटनास्थळी दाखल हाेत परिस्थितीची पाहणी केली. करत चाेरटयांचा शाेध सुरु केला आहे. याबाबत पुढील तपास पाेलिस उपनिरीक्षक एस. महाडीक करत आहेत.