Home Blog Page 1353

पुणे-सोलापूर महामार्गाच्या हद्दीतील अतिक्रमणे काढून घ्या -कासुर्डी ते कवडीपाट दरम्यान कारवाई होणार

पुणे, दि. १: पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ च्या कासुर्डी ते कवडीपाट रस्त्यावरील अतिक्रमणे व विना परवाना बांधकाम सात दिवसाच्या स्वखर्चाने काढून घेण्याचे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पुणे यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुणे यांच्या अधिकार क्षेत्रामधील पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीमध्ये कासुर्डी ते कवडीपाट दरम्यान लगतच्या मिळकत धारकांनी अनधिकृतपणे अतिक्रमण केले असल्याचे निदर्शनास आले आहे. या अतिक्रमणामुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ च्या विस्तारीकरणास अडथळा होत आहे.

त्यामुळे या लांबीदरम्यान रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूस १५ मीटरमधील अतिक्रमणे स्वखर्चाने काढून घ्यावीत. अन्यथा ही अतिक्रमणे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुणे यांच्यावतीने राष्ट्रीय राजमार्ग नियंत्रण (जमीन आणि वाहतूक) अधिनियम २००२ अन्वये निष्कासीत करण्यात येतील व त्याचा खर्च व दंड संबंधित धारकाकडून वसूल करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी कळविले आहे.
0000

जुडेगा भारत, जितेगा इंडिया या संकल्पनेच्या माध्यमातून यंदाचा ‘सेवा, कर्तव्य आणि त्याग सप्ताह’

माजी मुख्य मंत्री पृथ्वीराज चव्हाण उदघाटक-सुषमा अंधारे,सक्षणा सलगर प्रमुख पाहुण्या

पुणे – अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा, खासदार सोनीया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा,कर्तव्य आणि त्याग सप्ताह दि. २ ते १०डिसेंबर २०२३ या कालावधीत साजरा होत असून, सप्ताहाचे उदघाटन महाराष्ट्राचे माजी मुख्य मंत्री, ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार असून, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाअंधारे,राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा सक्षणा सलगर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.

ही माहिती सप्ताहाचे मुख्य संयोजक, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. उदघाटन सोहळा शनिवार,दि.२ डिसेंबर एस . एम.जोशी सभागृह येथे सायंकाळी साडेपाच वाजता होईल. ‘जुडेगा भारत, जितेगा इंडिया’ या संकल्पनेच्या माध्यमातून यंदाचा सप्ताह साजरा होत असून उदघाटन प्रसंगी मान्यवर भाष्य करतील.
तसेच गांधी,नेहरू आणि आंबेडकर यांचा भारत विषयावर सप्ताहात व्याख्यान आयोजित केले जाणार आहे.

सेवा,कर्तव्य आणि त्याग सप्ताहाचा उदघाटन सोहळा महाराष्ट्राच्या राजकारणात उत्सुकतेचा ठरलेला आहे. विविध विचारवंत, प्रमुख राजकीय नेते यांनी उदघाटन सोहळ्यात केलेली भाषणे राजकारणात गाजलेली असून, त्यावर प्रदीर्घ काळ चर्चा होत राहिली आहे. यंदाचा सोहळाही वैचारिकदृष्ट्या संस्मरणीय ठरेल, असा विश्वास मोहन जोशी यांनी व्यक्त केला.

सोनिया गांधी यांनी पंतप्रधान पदाचा त्याग केला आणि जनतेच्या प्रति सेवाभाव ठेवून निष्ठेने कर्तव्य पार पाडत आहेत. याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी २००४ सालपासून सेवा, कर्तव्य आणि त्याग सप्ताह काँग्रेसच्या वतीने साजरा करत असून यंदाचे १९ वे वर्ष आहे.

या सप्ताहात ससून मधील शवागारात काम करणाऱ्या कामगारांचा सत्कार, मुठाई नदी काल,आज आणि उद्या या विषयावर खुला गट चित्रकला स्पर्धा,रक्तदान शिबिर,महाआरोग्य तपासणी शिबिर,अनाथ आश्रम, वृद्धाश्रम,अंध शाळा आदी ठिकाणी फळे,मिठाई,कपडे वाटप तसेच पद पथावर राहणाऱ्यांना 1 हजार ब्लँकेट वाटप,महिलांसाठी वेशभूषा स्पर्धा,महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिर,सफाई महिला कर्मचारी सत्कार आणि साड्या ,आरोग्य कीट वाटप केले जाईल.संविधान घर तयार करून त्यात प्रदर्शन भरविले जाईल.प्रियदर्शनी इंदिरा विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे.शहराच्या विविध भागात हे उपक्रम राबविले जाणार आहेत,अशी माहिती मोहन जोशी यांनी दिली.

शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरण्याकरीता ७ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

पुणे, दि. १: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा १८ फेब्रुवारी, २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेली असून या परीक्षेकरीता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन अर्ज भरण्याकरीता ७ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

नियमित शुल्कासह ऑनलाईन अर्ज ७ डिसेंबरपर्यंत भरता येणार आहेत. विलंब शुल्कासह ८ ते १५ डिसेंबर, अतिविलंब शुल्कासह १६ ते २३ डिसेंबर, अतिविशेष विलंब शुल्कासह २४ ते ३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबतचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ३१ डिसेंबरनंतर कोणत्याही परिस्थितीत आवेदनपत्रे स्वीकारले जाणार नाही. याची नोंद घेऊन शाळांनी ऑनलाईन अर्ज ७ डिसेंबरअखेरपर्यंत भरण्याची कार्यवाही करावी, असे परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी कळविले आहे.
0000

भारती विद्यापीठ परिसरात पंधरा वर्षीय मुलीवरील अत्याचार:आरोपीवर कडक कारवाई करा- विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे पोलीस आयुक्तांना आदेश

घटनेची जलद गतीने सखोल चौकशी करून गुन्हेगाराला कठोर शिक्षा करावी.

मुंबई/पुणे : पुणे शहरातील भारती विद्यापीठ परिसरात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर शनिवार दि. २७ ऑगस्ट २०२३ रोजी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामधील आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली असली तरी घडलेला प्रकार हा अत्यंत निंदनीय आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हावी असे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे पोलीस आयुक्तांना आदेश दिले आहेत.

तसेच आरोपीला जामीन मिळू नये यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात यावेत. यामध्ये चौकशी अधिकारी म्हणून महिला पोलीस अधिकारी नेमावा. सर्व पुरावे मिळवावेत व लवकरात लवकर चार्ज शीट कोर्टामध्ये दाखल करावे. पीडित अल्पवयीन मुलगी व तिचे पालक यांचे समुपदेशन करण्यात यावे. सदर पीडित अल्पवयीन मुलीला मनोधैर्य योजनेतून ताबडतोब मदत देण्यात यावी. पीडितेच्या पुनर्वसनासाठी व तिच्या पुढील शिक्षणासाठी तिला सर्वोतोपरी सहकार्य करावे. पोलिस व या केससाठी स्त्री आधार केंद्राच्या वतीने अनिता शिंदे , आश्लेषा खंडागळे व हिंगांशी वाडेकर पाठपुरावा करत आहेत . या केस साठी सक्षम सरकारी वकील देण्यात यावा असे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संबंधीत पोलीस आयुक्तांना निर्देश दिले. आज डिसीपी स्मार्तना पाटील यांनी पुणें पोलींसांच्या कार्यवाहीचा अहवाल नीलम गोर्हेंना दिला .

सदर घटनेबाबत केलेल्या कारवाईचा अहवाल तात्काळ उपसभापती कार्यालयास सादर करण्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाच्या ऑनलाईन तिकीट प्रणालीला नागरिकांचा मिळतोय प्रतिसाद

पुणे- महापालिकेच्या राजीव गांधी प्राणिसंग्रहालय जाणि वन्यजीव संशोधन केंद्राच्या तिकीटाची प्रणाली ऑनलाईन करण्यात आली आहे. या माध्यमातून घरबसल्या राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाचे ऑनलाईन तिकीट काढता येत असल्याने या प्रणालीना नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतोय, कात्रज परिसरात पुणे महापालिकेच्या पतीने राजीव गांधी प्राणिसंग्रहालय आणि वन्यजीव संशोधन केंद्र निर्माण केले बाहे. या संग्रहालयात विविध प्रकारचे पक्षी, प्राणी, साप पाहायला मिळतात. हे संग्रहालय पाहण्यासाठी राज्याच्या विविध भागातून लोक येत असतात. यात शाळांच्या महत्रीचे प्रमाण देखील मोठे असते. शनिवार, रविचार किंवा इतर मुट्टीच्या दिवशी झू मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यामुळे कधी कधी नागरिकांना तिकिटासाठी वाट पाहावी लागत होती. हे टाळण्यासाठी पुणे महापालिकेने प्राणी संग्रहालयासाठी स्वतंत्र पोर्टल सुरु केले आहे. या माध्यमातून नागरिक घरबसल्या ऑनलाईन तिकीट काढू शकतात.

पुणे महापालिकेच्या या उपक्रमांला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विदेशी नागरिकांसाठी प्रति १०० रुपये, लहान मुलांसाठी फ्री तर भारतीय नागरिकांनाठी ४० रुपये तिकीट दर असून ऑनलाईन तिकीट काढण्याची प्रक्रिया अतिशय मोपी व सुलभ करण्यात आली आहे. याशिवाय व्हिडिओ केंमेन्याचे २०० रुपये व फक्त फोटोसाठी वापरण्यात येणान्या गेल्याचे ५० रुपये तिकीट दर आहे. दिव्यांग व्यक्तीकडून कोणत्याही प्रकारचे तिकीट आकारण्यात येणार नसून त्यांना प्राणिसंग्रहालयात मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. तर, प्रत्येक बुधबारी प्राणिसंग्रहालयाचा साप्ताहिक सुट्टी असणार आहे. तर, इतर दिवशी हे प्राणिसंग्रहालय सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० याफाळात सुरु असेल, तरी जास्तीतजास्त नागरिकांनी ऑनलाईन तिकीट प्रणालीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे महापालिकेच्या वतीने करण्यातआले आहे

ऑनलाईन तिकीट कसे काढता येईल?

3 सर्वांत प्रथम PMC CARE च्या अँप वर जाऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा 3 त्यानंतर तुमच्या प्रोफाइलमध्ये ‘ झू बुकिंग ‘ विभागात जा.

तारीख आणि वेळ निवडा,

3 आवश्यक तिकिटांची संख्या टाका.

2 पेमेंट करा.

‘मुक्ताई’ चित्रपटाचे नवे आकर्षक पोस्टर भेटीला

संत ज्ञानेश्वरांची लहान बहीण म्हणून संत मुक्ताबाई या सर्वांना परिचित आहेत. मुक्ताईचे छोटेसे जीवन अत्यंत तेजोमय, प्रखर ज्ञानचेतनेने सिद्ध जीवन होते. अशा या ‘मुक्ताई’चे माता, भगिनी, गुरु असे वेगवेगळे पदर उलगडणारा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा भव्य मराठी चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच त्याविषयीची उत्सुकता वाढलेली आहे.

‘शिवराज अष्टका’तील चित्रपटांच्या अभूतपूर्व यशानंतर महाराष्ट्राच्या संत परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा अध्याय ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यासाठी लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सज्ज झाले आहेत. या चित्रपटाची प्रस्तुती ए.ए.फिल्म्स ही नामांकित वितरण संस्था करीत आहे. नुकतेच या चित्रपटाचे नवे आकर्षक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. त्यामध्ये ज्ञानेश्वरांच्या छायेत बसलेली दिव्य मुक्ताई दिसून येत आहे.  जून २०२४ मध्ये हा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे.

आदिमायेचा अवतार मानल्या जाणाऱ्या मुक्ताईने त्या काळात स्त्रियांना अध्यात्माचे क्षेत्र खुले करून दिले. संत ज्ञानेश्वरांच्या भागवत धर्माच्या क्रांतीचा ती आधार बनली.  केवळ चौदा ते अठरा वर्षांच्या अल्प अवतार आयुष्यात मुक्ताईने शेकडो अभंग रचून स्त्री-कर्तृत्वाचा आदर्श उभा केला. कार्यरूपाने संजीवन असणाऱ्या संत मुक्ताई यांचे अजोड कार्य व विचार आजच्या पिढीला प्रेरणा देणारे व्हावेत, या उद्देशाने ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाचा विषय हाती घेतल्याचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सांगतात.

होंडा रेसिंग इंडिया रायडर्स थायलंडमधील २०२३ एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपमधील अंतिम फेरीसाठी सज्ज<

चँग इंटरनॅशनल सर्किट (बरियम), १ डिसेंबर २०२३ – २०२३ एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीप (एआरआरसी) थरारक अंतिम फेरीसाठी सज्ज होत असून ही फेरी चँग इंटरनॅशनल सर्किट (बरियम) येथे या वीकेंडला पार पडणार आहे. इदेमित्सु होंडा रेसिंग इंडिया टीम चॅम्पियनशीपच्या या अंतिम फेरीसाठी सज्ज आहे.

पाचव्या फेरीत इदेमित्सु होंडा रेसिंग इंडिया टीमने  मौल्यवान पॉइंट्स मिळवत एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपमधील (एआरआरसी) एकूण पॉइंट्स २७ वर नेले आहेत.

कविन क्विंतल आणि मोहसिन परांबेन या भारतीय चालकांच्या जोडीने आतापर्यंत असामान्य कौशल्य आणि जिद्दीचे प्रदर्शन करत इदेमित्सु होंडा रेसिंग इंडिया टीमसाठी दर्जेदार कामगिरी केली आहे.

पाचव्या फेरीच्या पहिल्या रेसमध्ये कविन क्विंतल यांनी १० लॅपच्या रेसमध्ये सर्व आंतरराष्ट्रीय रेसर्सविरोधात आपली एकाग्रता दर्शवली. त्यांनी नीडरपणे पुढे जात १४ व्या स्थानावर चेकर्ड लाइन पार केली. अंतिम फेरीत कविन यांनी १२ व्या स्थानापर्यंत पोहोचताना आपले रेसिंगचे कौशल्य दर्शवले आणि टीमसाठी ४ पॉइंट्स मिळवले. दरमयान मोहसिन परांबेन यांनी आपले सर्वोत्तम कौशल्य दाखवत सातत्यपूर्ण कामगिरी केली. दुसऱ्या रेसमध्ये आव्हान अधिक कठीण असतानाही त्यांनी १८ वे स्थान मिळवले.

आगामी अंतिम फेरीत होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाच्या विक्री आणि विपणन विभागाचे संचालक श्री. योगेश माथुर म्हणाले, इदेमित्सु होंडा रेसिंग इंडिया टीमचा एक भाग म्हणून आम्ही या सीझनमध्ये पॅशन, चिकाटी आणि असामान्य कामगिरीचा अनुभव घेतला. कविन क्विंतल आणि मोहसिन परांबेन या आमच्या रायडर्सनी रेसिंगचे अनोखे प्रदर्शन केले. पूर्ण सीझनदरम्यान त्यांची निश्चयी वृत्ती, प्रत्येक रेसमध्ये आव्हानावर मात करण्याची क्षमता आणि अडथळे पार करण्याची चिकाटी त्यांनी दाखवली. त्यांच्या कामगिरीतून त्यांची वैयक्तिक गुणवत्ता दिसून आलीच, शिवाय संपूर्ण टीमची ताकद आणि एकी पाहायला मिळाली. हा प्रवास थरारक होता. थायलंडमधील अविस्मरणीय अंतिम फेरीसाठी आम्ही उत्सुक आहोत.

होंडा रेसिंग इंडिया रायडर कविन क्विंतल म्हणाले, ‘माझ्यासाठी रेसिंग हा केवळ वेगाचा थरार असून योग्य वेळेस योग्य, अचूक डावपेच वापरत मर्यादा पार करणे आहे. एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत येताना मी सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहे. प्रत्येक वळण, प्रत्येक लॅप स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची संधी दिसेल. ट्रॅकवर उतरून टीमचे मेहनत दर्शवणारी सांगता करण्यासाठी मी सज्ज आहे. ’

होंडा रेसिंग इंडिया रायडर मोहसिन परांबेन म्हणाले, ‘अंतिम फेरीत जात असताना सर्किटवरील वळणे आणि सोबत येणारं प्रत्येक आव्हान पार करण्यावर मी लक्ष केंद्रित केले आहे. माझा निश्चय दृढ आहे आणि स्वतःच्या मर्यादा ओलांडण्यासाठई मी सक्षम आहे.’

२०२३ एफआयएम एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीप (एआरआरसी) –

एफआयएम एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपची २६ व्या आवृत्ती आशियातील सर्वात स्पर्धात्मक मोटरसायकल रोड रेसिंग चॅम्पियनशीप असून १९९६ पासून ती घेतली जात आहे. २०२३ सीझनमध्ये सहा फेऱ्यांचा समावेश आहे. मार्च २०२३ मध्ये चँग इंटरनॅशनल सर्किट (थायलंड) येथे अधिकृत चाचणी सीझन ओपनर झाल्यानंतर या सीझनच्या चॅम्पियनशीपची शेवटची फेरी जिथून सुरुवात झाली तिथेच म्हणजेच चँग इंटरनॅशनल स्ट्रीट सर्किट येथे होणार आहे.

मुख्यमंत्रीसाहेब,’महंमदवाडीचा बकालपणा अगोदर दूर करा .. अरविंद शिंदे

भंपक प्रसिध्दी व सनसनाटी राजकीय फायद्यासाठी बेकायदा मागण्यांकडे दुर्लक्ष करा

पुणे-येथील महंमदवाडी परिसराचे नाव महादेव वाडी करावे अशा आ. भरत गोगावले आणि पुण्यातील प्रमोद भानगिरे यांनी केलेली मागणी भंपक प्रसिद्धीसाठी ,केलेली बेकायदा मागणी असून अगोदर त्यांनी महमदवाडी चा बकालपणा तेथील समस्या दूर कराव्यात आणि महापालिका प्रशासकीय काळात असला कायदेशिर तत्वांचा अवमान करू नये असे कॉंग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी म्हटले आहे. देव,धर्म,जात ,पात असे नावे बदलणे यातून नागरिकांची दिशाभूल करण्यापेक्षा त्यांच्या रोजगार, शिक्षण आणि मुलभूत गरजा आणि समस्या अगोदर सोडवा असेही शिंदे यांनी म्हटले आहे .

या संदर्भात अरविंद शिंदे यांनी असे म्हटले आहे कि पुणे शहर देशाचे आठवे महानगर म्हणून वेगाने उदयास येत आहे. पुणे शहर हे राज्याची सांस्कृतीक राजधानी, विद्येचे माहेरघर, औद्योगिक नगरी, संगणक नगरी म्हणून देशाला ज्ञात आहे. राज्याच्या व देशाच्या आर्थिक घडीत महत्वाचे स्थान असलेले पुरोगामी मानसिकतेचे शांतताप्रिय शहर ही पुण्याची देशाला ओळख आहे. शिवकालीन काळापासून विविध जाती-धर्माचे व १८ पगड जाती जमातीचे लोक गुण्यागोविंदाने पुणे शहरात राहत आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात व्यापक ठसा पुण्याने जगभरात उमटविला आहे.

     शिवसेनेचे कोकणातील महाडचे आमदार भरत गोगावले यांनी पुण्याच्या हडपसर क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत महंमदवाडी परिसराचे नाव महादेव वाडी करावे असे संदर्भाकिंत १ अन्वये आपणास पत्र दिले आहे. तसेच पुणे शहर शिवसेना (शिंदे गट) अध्यक्ष प्रमोद भानगिरे यांनी देखील श्री. गोगावले यांच्या पत्राशी साधर्म्ये पत्र दिलेले आहे. या पत्रातील मजकूर निश्चितच संवेदनशिल, बेजबाबदार व शहरातील सामाजिक सलोख्यास बाधा आणणारा आहे. MMC ॲक्ट नुसार शहरातील कोणत्याही परिसरास नविन नाव देणे अगर नाव बदलणेसाठी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी यांचा सहभाग असलेल्या मुख्य सभेने मान्यता देणे आवश्यक आहे. मात्र लोकप्रतिनिधी नसताना त्याचा राजकीय फायदा घेण्याच्या हेतूने सदर बेकायदेशिर मागणी पुढे रेटली जात आहे. महंमदवाडी परिसर पुण्यातील उच्चभ्रु तसेच मध्यमवर्गीय लोकसंख्येचा गुन्यागोविंदाने नांदणारा परिसर आहे. या परिसरात अल्पसंख्याक समाजाची देखील बहुसंख्य वस्ती आहे. या परिसराचे नाव शिवकालिक काळापासून महंमदवाडी असे असून स्थानिकांना अथवा संपूर्ण पुणे शहराल या परिसराचे नाव बदलण्यात अगर पुर्नरचना करण्यामध्ये कोणतेही स्वारस्य नाही. मात्र कोकणातील महाडचे आमदार गोगावले यांनी पुणे शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक, सार्वजनिक जीवनाशी सूताचाही संबध नसताना केवळ भंपक प्रसिध्दी व सनसनाटी मिळवून राजकीय फायदा घेण्याच्या उद्देशाने ही मागणी केलेली आहे. मंत्री पदासाठी व पालकमंत्री पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आमदार गोगावले यांचा बेजबाबदार व कर्तव्यात जाणीवपूर्वक कसूर करण्याचा उपद्व्याप नक्कीच हिन प्रवृत्तीचा आहे.पुणे शहर हे देशातील महत्वाचे आर्थिक केंद्र असून वाढते शहरीकरण, बेसुमार नागरिकरण, अरूंद रस्ते, वाहतुक कोंडी, विस्कळीत पाणी पुरवठा, रखडलेले मल:निस्सरण प्रकल्प, महिला अत्याचार व गुन्हेगारीचे वाढलेले उच्चांकी प्रमाण, बेरोजगार यांनी ग्रासलेले आहे. सर्व पक्षिय लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून शहराचे मूलभुत प्रश्न सर्वोच्च प्राधान्याने सोडविणे ऐवजी शहराशी कोणताही दूरान्वये संबध नसलेल्या आमदारगोगावले यांच्या असंवेदनशिल मागणीस पाठबळ देणारी आपली भूमिका दुर्दैवी आहे.  महाडचे आ. गोगावले यांनी पुणे शहराऐवजी त्यांच्या महाड विधानसभा मतदार संघातील परिसराचा विचार करावा. आ. गोगावले यांनी पुणे शहराच्या विकासात लुडबूड करण्याएवढी वेळ निश्चितच अजून आलेली नाही आणि भविष्यातही येणार नाही. अशा आक्षेपार्ह मागणीस राज्यसरकारने राजकीय फायद्यासाठी आशिर्वाद दिल्यास पुणे शहरातील अन्य भागातील राजकीय घटक देखील परिसराची नावे बदलण्याचा वादग्रस्त प्रघात सुरू करतील. राज्यात इतरत्र देखील हाच प्रकार सर्वत्र सुरू होऊ शकतो. जेणेकरून राज्यातील सार्वजनिक सलोखा बिघडू शकतो.आमदार भरत गोगावले यांच्या विषयाकिंत मागणीस पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही तीव्र विरोध दर्शवित आहोत. कोकणातील महाडचे आ. श्री. भरत गोगावले यांनी केलेली मागणी कायदेशिर निकषात बसत नसल्याने शहरातील शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आपल्या अधिकारात सदर मागणीचे खंडन आपण करावे. सर्व सहमती व कायदेशिर तत्वांचा अवमान करून सदर मागणी प्रशासनाने पुढे रेटल्यास आम्ही रस्त्यावर येऊन काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करू व न्यायालयीन दाद मागू.   

काकाच्या पाठीत सुरा कुणी खुपसला,चुलत बहिण नको होती मग ओवाळायला का जाता? जितेंद्र आव्हाड यांचे अजितदादांना प्रत्युत्तर

मुंबई- काकाच्या पाठीत सुरा कुणी खुपसला. राजकीय जन्म काकांनीच दिला. तुम्हाला चुलत बहिण नको होती मग ओवाळायला का जाता? जे ऐश्वर्य मिळाले ते कुणामुळे? भगीरथ बियाणीने आत्महत्या का केली, त्याच्या पोरीला कुणी छळले, त्यामुळे भगीरथ बियाणीने आत्महत्या केली?, असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाला प्रत्युत्तर दिले आहे.दरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड पुढे बोलताना म्हणाले की, मी आजपर्यंत कुणाचे नाव तोंडात काढले नाही तुम्ही माझे नाव काढाल तर मी शांत बसणार नाही. बीडमध्ये मुंडे नावाच्या तरुणाला मारहाण झाली ती कुणी केली? आजही गुन्हा दाखल झाला नाही. कोण चोरडिया मला माहिती नाही. अंगाशी आल्यावर हे बालिश राजकारण करतायेत. शत्रू मोठा असला तरी काही गुप्तता बाळगायच्या असतात. आपल्या फायद्यासाठी नंतर गोष्टी काढायच्या नसतात.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, 1999 साली पक्ष स्थापन झाला, याची स्थापना कोणी केली, महाराष्ट्रातील लहान पोरं देखील याचे उत्तर सांगतील शरद पवार यांनी केला. घड्याळ देशभरात कुणी नेलं, ओडिसा, अरुणाचल प्रदेश, आसाममध्ये आमदार होते ते कुणामुळे होते.शरदचंद्र सिन्हा यांच्यासारखा काँग्रेसमधील वरिष्ठ नेता शरद पवारांसोबत उभा राहिला होता. केरळमध्ये पक्षाचे लोकप्रतिनिधी होते, या पक्षाला राष्ट्रीय नेतृत्त्व कुणामुळे मिळाले होते. तुम्हाला 5 जुलैच्या सभेत शरद पवारांचा फोटो कशासाठी वापरावा वाटला. कालपर्यंत तुम्ही शरद पवार आमचे दैवत आहेत, असे म्हणायचा आणि आज शरद पवारांवर एवढ्या गोळ्या घालण्याचे कारण काय? आणि कुणी गोळ्या झाडाव्यात, असा सवाल देखील जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाच्या नेत्यांना विचारला आहे.जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मी जे काही करतो माझ्या हिंमतीवर आणि ताकदीवर करतो. काहीही खोटे सांगू नका. तुमच्या प्रत्येक आरोपाचे पुरावे मी देऊ शकतो. कोणत्या फ्लाईटने कुठे गेला, रात्रीच्या अंधारातच दिल्लीला कसे जायचे असते हे सांगेन. शरद पवारांभोवतीच महाराष्ट्राचे राजकारण फिरत आहे. त्यामुळे त्यांची भाषणे पवारांवर आहे. शरद पवारांच्या नावाला स्पर्श केल्याशिवाय राजकीय उन्नती नाही हे सगळ्यांना माहिती असल्याने हे सर्व सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मौजमजेकरीता घरफोडी करणारी तीन अल्पवयीन मुले पोलिसांनी पकडले.

पुणे-मौजमजेकरीता घरफोडी करणा-यांना तीन विधीसंघर्षीतांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. , त्यांचेकडुन ०४ घरफोडीचे गुन्हे उघड झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’हडपसर पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणेकरीता हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. रविंद्र शेळके यांनी तपास पथकाचे पोलीस अधिकारी / पोलीस अंमलदार यांची मिटींग घेवून घरफोडी गुन्हे उघड करण्यासाठी आराखडा तयार केला.हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं.१८१५/२०२३, भा.दं. वि. कलम ३८० मधील फिर्यादी यांचे लोहीया गार्डन मगरपट्टा चौक, हडपसर, पुणे या ठिकाणी असलेल्या स्टोअर रुम व ऑफीस रुमच्या मध्ये ठेवलेले लॅपटॉप व पॉलीकॅब कंपनीच्या वायरचे बंडल चोरी केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता.तपास पथकाचे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक, विजयकुमार शिंदे, पोलीस उप-निरीक्षक, अविनाश शिंदे व पोलीस अंमलदार, प्रशांत दुधाळ, भगवान हंबर्डे असे दाखल गुन्ह्या संदर्भाने माहीती घेत असताना, त्यांना तपासा दरम्यान प्राप्त झालेल्या आरोपींचे वर्णनाबाबत पोलीस अंमलदार, प्रशांत दुधाळ, भगवान हंबर्डे यांना मिळालेल्या बातमीचे आधारे तीन विधीसंघर्षित बालक यांना ताब्यात घेवुन, त्यांचेकडे केले तपासात त्यांनी दाखल गुन्हा तसेच हडपसर पोलीस ठाणे हद्दीत वेळोवेळी घरफोडीचे गुन्हे केल्याची माहीती दिली. सदरचे गुन्हे हे त्यांनी मौज-मजेकरीता पैशांची आवश्यकता असल्याने केले असल्याचे सांगीतले आहे.त्यांचेकडुन पुढीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आणले आहेत. १) हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर गु.र.नं. ७४५/२०२३, भा.दं.वि.कलम ४५४,४५७,३८० २) हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर गु.र. नं.९१६/२०२३, भा.दं. वि.कलम ४५७,३८० ३) हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर गु.र.नं. १५९३/२०२३, भा.दं.वि.कलम ४५७,३८० ४) हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर गु.र.नं.१८१५/२०२३, भा.दं. वि. कलम ३८० प्रमाणेसदर विधीसंघर्षित बालक यांचेकडून दाखल गुन्ह्यातील चोरीस गलेला लॅपटॉप व पॉलीकॅब वायर, दुचाकी व इतर साहीत्य असा या किं. रू १,८२,०००/- चा हस्तगत करण्यात आल्या आहे.
सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे,रंजनकुमार शर्मा, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-०५, पुणे, विक्रांत देशमुख यांचे मागदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, श्रीमती अश्विनी राख, हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रविंद्र शेळके पोलीस निरीक्षक, (गुन्हे), विश्वास डगळे, संदीप शिवले यांचे सुचनेप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, विजयकुमार शिंदे, पोलीस उप-निरीक्षक, अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड, समीर पांडुळे, जोतीबा पवार, सचिन जाधव, जोतीबा पवार, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, भगवान हंबर्डे, सचिन गोरखे, प्रशांत टोणपे, अजित मदने, चंद्रकांत रेजीतवाड, अमोल दणके, कुंडलीक केसकर, रशिद शेख यांचे पथकाने केली आहे.

अश्लील वर्तन:डाॅक्टर श्रीपाद पुजारी यांच्यावर गुन्हा दाखल

पुणे-रुग्णालयात तपासणीसाठी गेलेल्या एका तरुणीसोबत डॉक्टरने अश्लील वर्तन केल्याची संतापजनक घटना पुण्यात घडली आहे. या प्रकरणी स्वारगेट परिसरातील मुकुंदनगर येथील डाॅक्टर श्रीपाद पुजारी यांच्यावर स्वारगेट पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पीडित तरुणीने पोलिसांकडे डाॅक्टर पुजारी यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणीला डोकेदुखीचा त्रास होता. त्यामुळे ती डाॅक्टर पुजारी यांच्या मुकुंदनगर स्थित रुग्णालयात गेली होती. त्यांचे रुग्णालय या उच्चभ्रु भागातील एका इमारतीच्या 6 व्या मजल्यावर होते. त्यावेळी डाॅक्टर पुजारी यांनी तिला तपासणी करताना ‘तू एकटी आली आहे का? तू खूप सुंदर दिसते’ असे सांगून तिच्याशी अश्लील वर्तन केले. तसेच तरुणीला नकाे ते प्रश्न विचारत तिच्याशी शारिरिक जवळीक साधून तिच्या मनास लज्जा उत्पन्न हाेईल असे वर्तन केले. याबाबत स्वारगेट पाेलिस ठाण्याच्या पाेलिस उपनिरीक्षक कीर्ती चाटे पुढील तपास करत आहेत.

मांगडेवाडीचा तौफिक लाला शेख जेरबंद

पुणे- मकोका मध्ये एक वर्षापासुन फरार असलेला कात्रजच्या मांगडेवाडीचा तौफिक लाला शेखला पोलिसांनी जेरबंद केला आहे. या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे गुन्हा रजि नं. ३७६/२०२२, भा. द. वि. कलम ३०७,३२४, ३२३,५०४,५०६,१४३,१४७,१४९, आर्म अॅक्ट ४ (२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१) (३) सह १३५, क्रिमीनल अमेंडमेंन्ट अॅक्ट कलम ७, महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा कलम ३(१)(ii),३(२), ३(४) या गुन्हयातील पाहीजे आरोपीत तौफिक लाला शेख, वय-२६ वर्षे, रा. १०/३, मांगडेवाडी, भैरवनाथ हाईटस, कात्रज, पुणे हा मागील एक वर्षापासुन मिळुन येत नव्हता. सदर आरोपीत हा त्याचे अस्तीत्व लपवुन वारंवार वेग-वेगळ्या जिल्हयांमध्ये त्याची ओळख व ठाव ठिकाणा बदलुन वास्तव करीत होता.
सदर आरोपीत तौफिक शेख याचा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार तांत्रिक विश्लेषणावरुन शोध घेत असताना, पोलीस अंमलदार, विक्रम सावंत, अभिजीत जाधव यांना नमुद आरोपी हा मांगडेवाडी, गणपती मंदीराजवळ त्याचे आईस भेटण्यासाठी आला आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने लागलीच तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी जावुन आरोपीताचा शोध घेतला तौफिक लाला शेख हा मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन पुढील कारवाईकामी गुन्हयाचे तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे, नारायण शिरगावकर यांचे ताब्यात देण्यात आले असुन, त्यांनी सदर आरोपीत यास नमुद गुन्हया मध्ये अटक केली आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, प्रविणकुमार पाटील, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ०२, श्रीमती स्मार्तना पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे, नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विनायक गायकवाड, तसेच पोलीस निरीक्षक, (गुन्हे), विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहा. पोलीस निरीक्षक, अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक, धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार, अभिजीत जाधव, विक्रम सावंत, शैलेश साठे, सचिन सरपाले, चेतन गोरे, महेश बारावकर, मंगेश पवार, निलेश ढमढेरे, हर्षल शिंदे, अवधतु जमदाडे, निलेश खैरमोडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, राहुल तांबे, मितेश चोरमोले, आशिष गायकवाड, अभिनय चौधरी यांचे पथकाने केली आहे.

मुलगा वंशाचा दिवा असे काही नाही:मुली चांगला वंशाचा दिवा लावतात असा काहींना अनुभव, अजित पवारांचा टोला

कर्जत-कुटुंब नियोजनाच्या मुद्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना जोरदार टोला हाणला. भविष्यातील आव्हाने पाहता सर्वांनी 1 किंवा 2 अपत्यावर थांबावे. मुलगा वंशाचा दिवा असतो असे काही नाही. मुलीही वंशाचा दिवा चांगला लावतात असा काहींना अनुभव आहे, असे ते म्हणाले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे कर्जतमध्ये 2 दिवसीय अधिवेशन सुरू आहे. त्याच्या समारोपीय भाषणात अजित पवारांनी कुटुंब नियोजन व समान नागरी कायद्यावरील आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी कुटुंब नियोजनाच्या मुद्यावर आपले मत मांडताना खासदार सुप्रिया सुळे यांना टोला हाणला. काळाची गरज ओळखून सर्वांनी एक किंवा दोन मुलांवर थांबले पाहिजे. मुलगा वंशाचा दिवा असतो असे काही नाही. दोन्ही मुली झाल्या तरी चांगलेच आहे. मुली वंशाचा दिवा चांगल्या पद्धतीने लावतात असा काहींना अनुभव आहे, असे ते म्हणाले.

अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, सद्यस्थितीत जगात भारतात सर्वाधिक तरुणवर्ग आहे. पण आणखी 20 वर्षांनी आपला आकडा 160 कोटींवर जाईल. यात काही हयगय होणार नाही. आपण तिथपर्यंत पोहोचूच. त्यावेळी हाच भारत जगातील सर्वात वृद्ध देश होईल. त्यामुळे आपण भविष्यावर गांभिर्याने विचार केला पाहिजे.पुढच्या पीढीच्या भवितव्यासाठी आपल्याला एक किंवा दोन अपत्यांवर थांबले पाहिजे. यासाठी कायदा करण्याची गरज असेल तर तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करावा. कोणत्याही जातीने, पंथाने, धर्माने किंवा देव अथवा अल्लाहने एवढी पैदास करा म्हणून सांगितले नाही. एक-दोन अपत्यांवर थांबले नाही प्यायलाही पाणी मिळणार नाही. घरांचीही व्यवस्था करता येणार नाही. त्यामुळे सर्वांनी समान नागरी कायद्यावर विचार केला पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.

समान नागरी कायद्याच्या मुद्यावर मागसवर्गात काही गैरसमज आहेत. या कायद्यामुळे आरक्षणाला धक्का लागेल असे त्यांना वाटते. पण तुमचे आरक्षण कुणीही काढू शकत नाही. कुणीही राज्यकर्ते आले तरी ते बदलणार नाही. त्यामुळे समान नागरी कायद्याचा मुद्दा जनतेने मनावर घेतला पाहिजे. राजकीय पक्षांनीही या प्रकरणी भूमिका घेतली पाहिजे. कुणाच्या मनात काही शंका कुशंकाी असतील तर त्यावर चर्चेने तोडगा काढला जाईल. पण पुढच्या पीढीच्या भविष्यावर आजच विचार करण्याची गरज आहे. या प्रकरणी वेगवेगळे मतप्रवाह असले पाहिजे. पण त्यावर चर्चा झालीच पाहिजे, असे अजित पवार यावेळी समान नागरी कायद्याचे समर्थन करताना म्हणाले.कुटुंब नियोजनाच्या मुद्यावर यापूर्वी आणीबाणीच्या काळात संजय गांधी यांनी एक 5 कलमी कार्यक्रम आणला होता. पण त्याची योग्य अंमलबजावणी झाली नाही. त्याचा अतिरेक झाला. त्यामुळे त्याची किंमत आगामी निवडणुकीत इंदिरा गांधी यांना मोजावी लागली. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होऊ द्यायचा नाही. त्यावर चर्चा करून तोडगा काढायचा. त्यामुळे कुटुंब नियोजन व समान नागरी कायद्यावर सर्वांनी विचार करावा, असेही अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले.

अजित पवार म्हणाले,’ ‘बारामती’ लढवणार सातारा, रायगड, शिरूर लोकसभा लढवणार

कर्जत-अजित पवार यांनी शुक्रवारी आपला पक्ष बारामतीसह शिरूर, सातारा व रायगड या लोकसभेच्या 4 जागा लढवणार असल्याची घोषणा केली. बारामती NCP च्या खासदार तथा शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचा मतदार संघ आहे. त्यामुळे या ठिकाणी त्यांना अजित पवार गटाचा थेट सामना करावा लागेल असा अंदाज आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे कर्जतमध्ये 2 दिवसीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात पक्षाध्यक्ष म्हणून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अजित पवार यांनी जागा वाटपाच्या मुद्यावर आपली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्राथमिक टप्प्यातील चर्चा झाल्याचे स्पष्ट केले.

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामागे ताकद उभी करायची आहे. त्यांना पुन्हा पंतप्रधानपदी निवडून आणायचे आहे. यासाठी महाराष्ट्रातील सर्व 48 खासदार निवडून येणे गरजेचे आहे. यात बारामत, शिरूर, सातार व रायगडमध्ये आपले उमेदवार असतील. इतर जागांवर शिंदे व फडणवीस यांच्याशी चर्चा करून निर्णय जाहीर केला जाईल. या प्रकरणी त्यांच्याशी प्राथमिक टप्प्यातील चर्चा झाली आहे, असे अजित पवार याविषयी बोलताना म्हणाले.

काहीजण आमच्यावर गुन्हे दाखल असल्यामुळे आम्ही तिकडे गेल्याचा आरोप करतात. मंत्रिमंडळात मी त्या खात्याचा मंत्री होतो म्हणून मला या प्रकरणी टार्गेट केले गेले. पण माझ्यावरील एकही आरोप सिद्ध झाला नाही. या प्रकरणी नियुक्त करण्यात आलेल्या समितीने मला क्लिनचीट दिली. माझ्यावर सातत्याने आरोप होतात. पण मी कामाशी कटिबद्ध असणारा नेता आहे. आज पुन्हा माझ्याकडे अर्थखाते असून, त्याचे तब्बल 6 लाख कोटींचे बजेट आहे, असे अजित पवार यावेळी विरोधकांवर निशाणा साधताना म्हणाले.

मी गत अनेक वर्षांपासून पक्ष संघटनेत काम करत आहे. पण 2004 मध्ये जे घडले ते आज मला समजले. पूर्वी जनसंघावर जातीयवादी पक्ष असल्याचा आरोप केला जात होता. त्यामुळे आपण त्यांच्यापासून दूर राहत होतो. पण आता काळ बदलला आहे. आपण आपली विचारधारा सोडली नाही. माझे मुस्लिम समुदायालाही सांगणे आहे की, आम्ही भाजप व एकनाथ शिंदेंसोबत आहोत. पण आम्ही आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या विचारावरच मार्गक्रमण करत आहोत.

अजित पवार यांनी यावेळी उर्वरित जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा तिढा लवकरच सोडवण्याचीही ग्वाही दिली. सध्या पक्षाच्या काही मंत्र्यांकडे पालकमंत्रीपदाची जबाबदारी आहे. पण उर्वरित मंत्र्यांनाही पालकमंत्रीपद मिळावे यासाठी चर्चा करून लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल. आमचा इतर मंत्र्यांनाही पालकमंत्रीपद देण्याचा प्रयत्न आहे. मी या प्रकरणी लवकरच अन्य नेत्यांसोबत बसणार आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

विकासकामांच्या मुद्यावर आपले पहिले प्राधान्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना, दुसरे खासदारांना व तिसरे राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना असल्याचेही अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी मंत्री आदिती तटकरे यांना युवती संघटनेतील काही वाद तातडीने निकाली काढण्याचे निर्देश दिले. तसेच युवक संघटनेलाही अंग झटकून कामाला लागण्याचे आदेश दिले.

मंत्रिमंडळ विस्तारात आम्हाला आमदार प्रकाश साळुंके यांना मंत्री करता आले नाही. त्यामुळे ते नाराज झाले. पण आम्ही त्यांची समजूत काढली. त्यांना कार्याध्यक्ष करण्याचे आश्वासन दिले. आता शब्द दिला म्हणजे तो अंमलात आणावाच लागेल. त्यामुळे शब्द देताना 10 वेळा विचार करा, असे अजित पवार म्हणाले.

आयसीआयसीआय बँकेतर्फे रूपे क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून युपीआय पेमेंट्स सुविधा लाँच

मुंबई – आयसीआयसीआय बँकेने आज रूपे क्रेडिट कार्डावर युपीआय व्यवहारांची सोय उपलब्ध करत ग्राहकांसाठी पेमेंट सेवा आणखी सुलभ केल्याचे जाहीर केले. यामुळे आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांना त्यांचे रूपे क्रेडिट कार्ड युपीआयशी लिंक करून पर्सन-टु-मर्चंट (पीटुएम) व्यवहार ऑनलाइन करता येईल. ग्राहकांना खरेदी, युटिलिटी बिल्सची पेमेंट, पीओएस मशिन्सवर (पॉइंट ऑफ सेल) पेमेंट्स सहज- सोप्या पद्धतीने करता येतील. त्याशिवाय त्यांना आपल्या खर्चावर रिवॉर्ड पॉइंट्स मिळवून डिजिटल पेमेंट अनुभव आणखी उंचावता येईल.

बँकेने रूपे क्रेडिट कार्डावर युपीआय व्यवहार शक्य करण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाशी (एनपीसीआय) करार केला आहे. ग्राहकांना आयसीआयसीआय बँक रूपे क्रेडिट कार्ड, आयसीआयसीआय बँक एचपीसीएल सुपर सेवर रूपे क्रेडिट कार्ड आणि आयसीआयसीआय बँक रूबेएक्स रूपे क्रेडिट कार्ड युपीआयवर जोडता येईल. त्यांना मर्चंट क्यूआर कोड स्कॅन करून त्यांच्या रूपे क्रेडिट कार्डावरून आयमोबाइल अ‍ॅपसह युपीआय पेमेंट अ‍ॅप पेमेंट्सवरून पैसे भरता येतील.

आयसीआयसीआय बँकेच्या कार्ड्स विभागाचे प्रमुख श्री. बिजिथ भास्कर म्हणाले, ‘आमचे रूपे क्रेडिट कार्ड युपीआयवर उपलब्ध करून देण्यासाठी एनपीसीआयबरोबर भागिदारी करताना आनंद होत आहे. ही भागिदारी ग्राहकांना डिजिटल पेमेंट क्षेत्रात सोयीस्करपणा मिळवून देण्यासाठी महत्त्वाची ठरेल. रूपे क्रेडिट कार्ड आणि युपीआयच्या एकत्र येण्याने ग्राहकांना जास्त चांगली आर्थिक लिक्विडिटी मिळेल तसेच ५० दिवसांपर्यंत व्याजमुक्त कर्ज मिळेल. या सोयीमुळे ग्राहकांच्या बदलत्य गरजा पूर्ण करण्यासाठी सोप्या व सुलभ सुविधा देण्याची आमची बांधिलकी आणखी मजबूत होईल.’

या भागिदारीविषयी एनपीसायच्या मुख्य ऑपरेटिंग अधिकारी श्रीमती. प्रवीणा राय म्हणाल्या, ‘आयसीआयसीआय बँक रूपे क्रेडिट कार्ड आता युपीआयवर लाइव्ह असल्याचे जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. रूपे कार्ड आता आधुनिक आणि आकर्षक ब्रँड बनला असून तो अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध आहे. पर्यायाने याची स्वीकार्हता आणि सुरक्षा वाढली आहे. युपीआयचे वैविध्य आणि रूपे क्रेडिट कार्डाची विश्वासार्हता यांच्या एकत्रीकरणातून आम्ही डिजिटल पेमेंट्स क्षेत्राला नव्याने आकार देत आहोत. या नव्या सुविधेमुळे ग्राहकांना जास्त सहजपणे डिजिटल पेमेंट्स करता येतील. आयसीआयसीआय बँकेच्या सहकार्याने रूपे क्रेडिट कार्ड ग्राहकांना डिजिटल पेमेंट्सचा सुधारित अनुभव देऊन पर्यायाने भारताच्या आर्थिक विकासाला चालना देण्याचे ध्येय आहे.’

या सुविधेची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत –

·           सोयीस्करपणा आणि सुरक्षा – ग्राहकांना सहजपणे मर्चंट क्यूआर कोड स्कॅन करून थेट त्यांच्या युपीआय अ‍ॅपवरून सुरक्षितपणे व सुलभपणे पैसे भरता येतील.

·           रिवॉर्ड पॉइंट्स – या सुविधेमुळे ग्राहकांना त्यांच्या रूपे क्रेडिट कार्डावर रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील.

·           आर्थिक लवचिकता – रूपे क्रेडिट कार्डावर युपीआय व्यवहार करून ग्राहकांना ५० दिवसांपर्यंतचा व्याजमुक्त कालावधी मिळेल व त्यांना आपले खर्च अधिक प्रभावीपणे करता येतील.

रूपे क्रेडिट कार्डावर आयमोबाइल पे वर युपीआयसह जोडण्यासाठी पुढील सोप्या टिप्सचा अवलंब करा –

·           आयमोबाइल पे अ‍ॅपमध्ये ‘UPI Payments’ > ‘Manage’ > ‘My Profile’ > ‘Create New UPI ID’

·           पेमेंटची पद्धत म्हणून रूपे क्रेडिट कार्डाची निवड करा

·           तुम्हाला लिंक करायचा असलेला युपीआय आयडी निवडा आणि > ‘Proceed’ करा व व्यवहाराचे तपशील तपासा

·            ‘Confirm’ वर क्लिक करून व्यवहार निश्चित करा.