चँग इंटरनॅशनल सर्किट (बरियम), १ डिसेंबर २०२३ – २०२३ एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीप (एआरआरसी) थरारक अंतिम फेरीसाठी सज्ज होत असून ही फेरी चँग इंटरनॅशनल सर्किट (बरियम) येथे या वीकेंडला पार पडणार आहे. इदेमित्सु होंडा रेसिंग इंडिया टीम चॅम्पियनशीपच्या या अंतिम फेरीसाठी सज्ज आहे.
पाचव्या फेरीत इदेमित्सु होंडा रेसिंग इंडिया टीमने ६ मौल्यवान पॉइंट्स मिळवत एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपमधील (एआरआरसी) एकूण पॉइंट्स २७ वर नेले आहेत.
कविन क्विंतल आणि मोहसिन परांबेन या भारतीय चालकांच्या जोडीने आतापर्यंत असामान्य कौशल्य आणि जिद्दीचे प्रदर्शन करत इदेमित्सु होंडा रेसिंग इंडिया टीमसाठी दर्जेदार कामगिरी केली आहे.
पाचव्या फेरीच्या पहिल्या रेसमध्ये कविन क्विंतल यांनी १० लॅपच्या रेसमध्ये सर्व आंतरराष्ट्रीय रेसर्सविरोधात आपली एकाग्रता दर्शवली. त्यांनी नीडरपणे पुढे जात १४ व्या स्थानावर चेकर्ड लाइन पार केली. अंतिम फेरीत कविन यांनी १२ व्या स्थानापर्यंत पोहोचताना आपले रेसिंगचे कौशल्य दर्शवले आणि टीमसाठी ४ पॉइंट्स मिळवले. दरमयान मोहसिन परांबेन यांनी आपले सर्वोत्तम कौशल्य दाखवत सातत्यपूर्ण कामगिरी केली. दुसऱ्या रेसमध्ये आव्हान अधिक कठीण असतानाही त्यांनी १८ वे स्थान मिळवले.
आगामी अंतिम फेरीत होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाच्या विक्री आणि विपणन विभागाचे संचालक श्री. योगेश माथुर म्हणाले, ‘इदेमित्सु होंडा रेसिंग इंडिया टीमचा एक भाग म्हणून आम्ही या सीझनमध्ये पॅशन, चिकाटी आणि असामान्य कामगिरीचा अनुभव घेतला. कविन क्विंतल आणि मोहसिन परांबेन या आमच्या रायडर्सनी रेसिंगचे अनोखे प्रदर्शन केले. पूर्ण सीझनदरम्यान त्यांची निश्चयी वृत्ती, प्रत्येक रेसमध्ये आव्हानावर मात करण्याची क्षमता आणि अडथळे पार करण्याची चिकाटी त्यांनी दाखवली. त्यांच्या कामगिरीतून त्यांची वैयक्तिक गुणवत्ता दिसून आलीच, शिवाय संपूर्ण टीमची ताकद आणि एकी पाहायला मिळाली. हा प्रवास थरारक होता. थायलंडमधील अविस्मरणीय अंतिम फेरीसाठी आम्ही उत्सुक आहोत.’
होंडा रेसिंग इंडिया रायडर कविन क्विंतल म्हणाले, ‘माझ्यासाठी रेसिंग हा केवळ वेगाचा थरार असून योग्य वेळेस योग्य, अचूक डावपेच वापरत मर्यादा पार करणे आहे. एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत येताना मी सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहे. प्रत्येक वळण, प्रत्येक लॅप स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची संधी दिसेल. ट्रॅकवर उतरून टीमचे मेहनत दर्शवणारी सांगता करण्यासाठी मी सज्ज आहे. ’
होंडा रेसिंग इंडिया रायडर मोहसिन परांबेन म्हणाले, ‘अंतिम फेरीत जात असताना सर्किटवरील वळणे आणि सोबत येणारं प्रत्येक आव्हान पार करण्यावर मी लक्ष केंद्रित केले आहे. माझा निश्चय दृढ आहे आणि स्वतःच्या मर्यादा ओलांडण्यासाठई मी सक्षम आहे.’
२०२३ एफआयएम एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीप (एआरआरसी) –
एफआयएम एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपची २६ व्या आवृत्ती आशियातील सर्वात स्पर्धात्मक मोटरसायकल रोड रेसिंग चॅम्पियनशीप असून १९९६ पासून ती घेतली जात आहे. २०२३ सीझनमध्ये सहा फेऱ्यांचा समावेश आहे. मार्च २०२३ मध्ये चँग इंटरनॅशनल सर्किट (थायलंड) येथे अधिकृत चाचणी सीझन ओपनर झाल्यानंतर या सीझनच्या चॅम्पियनशीपची शेवटची फेरी जिथून सुरुवात झाली तिथेच म्हणजेच चँग इंटरनॅशनल स्ट्रीट सर्किट येथे होणार आहे.