मुंबई – आयसीआयसीआय बँकेने आज रूपे क्रेडिट कार्डावर युपीआय व्यवहारांची सोय उपलब्ध करत ग्राहकांसाठी पेमेंट सेवा आणखी सुलभ केल्याचे जाहीर केले. यामुळे आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांना त्यांचे रूपे क्रेडिट कार्ड युपीआयशी लिंक करून पर्सन-टु-मर्चंट (पीटुएम) व्यवहार ऑनलाइन करता येईल. ग्राहकांना खरेदी, युटिलिटी बिल्सची पेमेंट, पीओएस मशिन्सवर (पॉइंट ऑफ सेल) पेमेंट्स सहज- सोप्या पद्धतीने करता येतील. त्याशिवाय त्यांना आपल्या खर्चावर रिवॉर्ड पॉइंट्स मिळवून डिजिटल पेमेंट अनुभव आणखी उंचावता येईल.
बँकेने रूपे क्रेडिट कार्डावर युपीआय व्यवहार शक्य करण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाशी (एनपीसीआय) करार केला आहे. ग्राहकांना आयसीआयसीआय बँक रूपे क्रेडिट कार्ड, आयसीआयसीआय बँक एचपीसीएल सुपर सेवर रूपे क्रेडिट कार्ड आणि आयसीआयसीआय बँक रूबेएक्स रूपे क्रेडिट कार्ड युपीआयवर जोडता येईल. त्यांना मर्चंट क्यूआर कोड स्कॅन करून त्यांच्या रूपे क्रेडिट कार्डावरून आयमोबाइल अॅपसह युपीआय पेमेंट अॅप पेमेंट्सवरून पैसे भरता येतील.
आयसीआयसीआय बँकेच्या कार्ड्स विभागाचे प्रमुख श्री. बिजिथ भास्कर म्हणाले, ‘आमचे रूपे क्रेडिट कार्ड युपीआयवर उपलब्ध करून देण्यासाठी एनपीसीआयबरोबर भागिदारी करताना आनंद होत आहे. ही भागिदारी ग्राहकांना डिजिटल पेमेंट क्षेत्रात सोयीस्करपणा मिळवून देण्यासाठी महत्त्वाची ठरेल. रूपे क्रेडिट कार्ड आणि युपीआयच्या एकत्र येण्याने ग्राहकांना जास्त चांगली आर्थिक लिक्विडिटी मिळेल तसेच ५० दिवसांपर्यंत व्याजमुक्त कर्ज मिळेल. या सोयीमुळे ग्राहकांच्या बदलत्य गरजा पूर्ण करण्यासाठी सोप्या व सुलभ सुविधा देण्याची आमची बांधिलकी आणखी मजबूत होईल.’
या भागिदारीविषयी एनपीसायच्या मुख्य ऑपरेटिंग अधिकारी श्रीमती. प्रवीणा राय म्हणाल्या, ‘आयसीआयसीआय बँक रूपे क्रेडिट कार्ड आता युपीआयवर लाइव्ह असल्याचे जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. रूपे कार्ड आता आधुनिक आणि आकर्षक ब्रँड बनला असून तो अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध आहे. पर्यायाने याची स्वीकार्हता आणि सुरक्षा वाढली आहे. युपीआयचे वैविध्य आणि रूपे क्रेडिट कार्डाची विश्वासार्हता यांच्या एकत्रीकरणातून आम्ही डिजिटल पेमेंट्स क्षेत्राला नव्याने आकार देत आहोत. या नव्या सुविधेमुळे ग्राहकांना जास्त सहजपणे डिजिटल पेमेंट्स करता येतील. आयसीआयसीआय बँकेच्या सहकार्याने रूपे क्रेडिट कार्ड ग्राहकांना डिजिटल पेमेंट्सचा सुधारित अनुभव देऊन पर्यायाने भारताच्या आर्थिक विकासाला चालना देण्याचे ध्येय आहे.’
या सुविधेची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत –
· सोयीस्करपणा आणि सुरक्षा – ग्राहकांना सहजपणे मर्चंट क्यूआर कोड स्कॅन करून थेट त्यांच्या युपीआय अॅपवरून सुरक्षितपणे व सुलभपणे पैसे भरता येतील.
· रिवॉर्ड पॉइंट्स – या सुविधेमुळे ग्राहकांना त्यांच्या रूपे क्रेडिट कार्डावर रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील.
· आर्थिक लवचिकता – रूपे क्रेडिट कार्डावर युपीआय व्यवहार करून ग्राहकांना ५० दिवसांपर्यंतचा व्याजमुक्त कालावधी मिळेल व त्यांना आपले खर्च अधिक प्रभावीपणे करता येतील.
रूपे क्रेडिट कार्डावर आयमोबाइल पे वर युपीआयसह जोडण्यासाठी पुढील सोप्या टिप्सचा अवलंब करा –
· आयमोबाइल पे अॅपमध्ये ‘UPI Payments’ > ‘Manage’ > ‘My Profile’ > ‘Create New UPI ID’
· पेमेंटची पद्धत म्हणून रूपे क्रेडिट कार्डाची निवड करा
· तुम्हाला लिंक करायचा असलेला युपीआय आयडी निवडा आणि > ‘Proceed’ करा व व्यवहाराचे तपशील तपासा
· ‘Confirm’ वर क्लिक करून व्यवहार निश्चित करा.