Home Blog Page 1120

मावळातून श्रीरंग बारणेंंना पुन्हा उमेदवारी ,एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची पहिल्या यादीत 8 पैकी 7 खासदारांना पुन्हा संधी

मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये आठ लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यात हिंगोली लोकसभा मतदारसंघातून हेमंत पाटील तर बुलडाणा लोकसभा मतदारसंघातून प्रतापराव जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हातकलंगले लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील माने तर कोल्हापूर मधून संजय महाडीक यांना संधी देण्यात आली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातून श्रीरंग बारणे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे पहिल्या यादीत कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पहिल्या यादीमध्ये आठ पैकी सात विद्यमान खासदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून सदाशिवराव लोखंडे यांना पुन्हा एकदा शिवसेनेच्या वतीने उमेदवारी देण्यात आली आहे. तर दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून राहुल शेवाळे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लोकसभेचे उमेदवार-
१) बुलढाणा -प्रा. नरेंद्र खेडेकर
२)यवतमाळ – वाशिम-संजय देशमुख
३)मावळ- संजोग वाघेरे पाटील
४)सांगली-चंद्रहार पाटील
५)हिंगोली- नागेश पाटील आष्टीकर
६)संभाजीनगर-चंद्रकांत खैरे
७)धारशीव-ओमराजे निंबाळकर
८)शिर्डी-भाऊसाहेब वाघचौरे
९)नाशिक-राजाभाऊ वाजे
१०)रायगड-अनंत गीते
११)सिंधुदुर्ग – रत्नागिरी-विनायक राऊत
१२)ठाणे-राजन विचारे
१३)मुंबई – ईशान्य-संजय दिना पाटील
१४)मुंबई – दक्षिण-अरविंद सावंत
१५)मुंबई – वायव्य-अमोल कीर्तिकर
१६)परभणी-संजय जाधव
१७) दक्षिण मध्य- अनिल देसाई

मुंबई विभागातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये येत्या २९ ते ३१ मार्च रोजी सुरू राहणार

मुंबई, दि. 28 : मुंबई विभागातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये शासकीय सुट्टीच्या दिवशी 29 ते 31 मार्च 2024 या कालावधीत चालू ठेवण्यात येणार आहेत, असे मुंबई विभाग नोंदणी उपमहानिरीक्षक राजू थोटे यांनी कळविले आहे.

महाराष्ट्र मुद्रांक शुल्क (अभय योजना) या संबंधीचे कामकाज करण्यासाठी व 1 एप्रिल रोजी दरवर्षी वार्षिक बाजारमूल्य दर प्रसिद्ध होत असल्यामुळे मार्च महिन्यात दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांची गर्दी होत असते तसेच आर्थिक वर्ष 2023-24 या वर्षाचा इष्टांक पूर्ण करण्याच्या कामकाजासाठी राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांनी सर्व दुय्यम निबंधक कार्यालये वरील दिवशी सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

या अनुषंगाने मुंबई शहरातील मुद्रांक जिल्हाधिकारी व नोंदणी कार्यालये 29 ते 31 मार्च रोजी शासकीय सुट्टीच्या दिवशी चालू राहणार असल्याने या सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबईचे मुद्रांक जिल्हाधिकारी कृष्णा जाधव यांनी केले आहे.

पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू

पुणे, दि. २८ मार्च २०२४चालू व थकीत वीज बिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शुक्रवारी (दि. २९) ते रविवार (दि. ३१) पर्यंत सलग तीन दिवस सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत.

सध्या थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या मोहिमेला मोठा वेग देण्यात आला आहे. त्यामुळे थकबाकी तसेच चालू वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी दि. २९ ते ३१ मार्चपर्यंत जबिल भरणा केंद्र सुरु राहणार आहेत. आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणकडून थकीत रक्कम किती आहे हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची धडक कारवाई सुरु आहे. ही कटू कारवाई तसेच नियमानुसार पुनर्जोडणी शुल्काचा भरणा, वीज नसल्याने गैरसोय होणे टाळण्यासाठी थकीत वीजबिलाची रक्कम ताबडतोब भरावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

वीजग्राहकांना केव्हाही व कुठूनही ऑनलाइनद्वारे थकीत व चालू वीजबिल भरण्याची सोय www.mahadiscom.in या वेबसाईटवर तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे उपलब्ध आहे. तसेच ५ हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचे बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे वीजबिल भरण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. त्यासाठी आवश्यक माहितीचा तपशील संबंधित ग्राहकांच्या वीजबिलावर उपलब्ध आहे.

विजय कोंडके यांचा नवा चित्रपट-  ‘लेक असावी तर अशी’

ज्येष्ठ दिग्दर्शक विजय कोंडके हे नाव घेतलं की, ‘माहेरची साडी’ हा चित्रपट डोळ्यांसमोर येतो. या चित्रपटाने मराठी चित्रपट उत्पन्नाचे सर्व उच्चांक मोडले. निर्मिती, वितरण आणि दिग्दर्शन अशी तिहेरी मुशाफिरी करत विजय कोंडके यांच्या  मराठी चित्रपटाने यशाचे आणि लोकप्रियतेचे नवे मापदंड निर्माण केले.  १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘माहेरची साडी’ चित्रपटाच्या यशानंतर निर्माता-दिग्दर्शक विजय कोंडके यांनी ३४ वर्षानंतर पुन्हा एकदा नव्या मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. विजय कोंडके यांची निर्मिती, दिग्दर्शन असलेला ‘लेक असावी तर अशी’ हा मराठी चित्रपट २६ एप्रिलला आपल्या भेटीला येतोय. ‘ज्योती पिक्चर्स’ निर्मित आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेन्टची प्रस्तुती असलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी असणार आहे. 

सोंगाड्या, पांडू हवालदार, बोट लावीन तिथं गुदगुल्या, तुमचं आमचं जमलं, राम राम गंगाराम, आली अंगावर यांसारख्या दादा कोंडके यांच्या अनेक यशस्वी चित्रपटांच्या वितरणामध्ये विजय कोंडके यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. मराठी प्रेक्षकांची अभिरुची ओळखून त्यानुसार यशस्वी चित्रपट निर्मिती करण्याची गुरुकिल्ली माहीत असलेले विजय कोंडके ‘लेक असावी तर अशी’ हा कौटुंबिक चित्रपट प्रेक्षकांच्या रंजनासाठी  घेऊन सज्ज झाले आहेत. 

निर्माते-वितरक म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केल्यानंतर आपणही कधीतरी दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसून आपल्या मनातील सिनेमा बनवण्याच्या इच्छेतून आणि दादा कोंडके यांनी दिलेल्या संधीमुळे मी ‘माहेरची साडी’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाचे शिवधनुष्य उचलले. यशापलीकडे या चित्रपटाने मला रसिकांचे अमाप प्रेमही मिळवून दिले. रसिकांच्या याच प्रेमापोटी ‘लेक असावी तर अशी’ हा नवा मराठी चित्रपट मी २६ एप्रिलला घेऊन येतोय. 

NXTDIGITAL मीडिया ग्रुपने ब्रॉडबँडचा केला विस्तार

मुंबई, 28 मार्च 2024 : ONEOTT इंटरटेनमेंट लिमिटेड (OIL), भारतातील 4व्या सर्वात मोठे खाजगी इंटरनेट सेवा प्रदाता (ISP), आणि 7Star ग्रुप ही एक अग्रगण्य प्रादेशिक ISP कंपनी यांनी धोरणात्मक भागीदारीची घोषणा करत ब्रॉडबँड व्यवसाय वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. OIL चा एक भाग NXTDIGITAL मीडिया ग्रुप आणि हिंदुजा ग्लोबल सोल्युशन्स लि. (HGS) ची उपकंपनी, 7Star सोबत पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान सामायिक करेल आणि त्यातून वेगाने वाढणाऱ्या ब्रॉडबँड स्पेसमध्ये दोन्ही सहयोगी भागीदारांच्या सामर्थ्याचा वाढीसाठी फायदा घेतील.

ही भागीदारी NXTDIGITAL मीडिया ग्रुपची ग्राहकांपर्यंत सेवा पोहोचवण्याची सखोल वचनबद्धता सिद्ध करते आणि प्रस्थापित इंडस्ट्री प्लेयर्ससाठी एकत्र येऊन ग्राहकांना उत्कृष्ट उत्पादनांसह एकात्मिक सेवा देण्यासाठी आणखी एक उद्योग बेंचमार्क सेट करते. अत्यंत प्रतिष्ठित 7Star ग्रुपचे मुंबई आणि महाराष्ट्रात मजबूत नेटवर्क आहे आणि ग्राहकांशी चांगले नाते आहे. इतर बाजारपेठांमध्ये एकत्रितपणे सेवांचा विस्तार करण्यासाठी टोन सेट करताना दोन्ही भागीदार सुरुवातीला महाराष्ट्रात ब्रॉडबँड व्यवसाय वाढवण्यावर लक्ष केंद्रित करू पाहत आहेत.

ग्राहकांना एकात्मिक सेवा ऑफर करण्याच्या योजना देखील ही भागीदारी विकसित करत असून, ब्रॉडबँडच्या पलीकडे OTT, IPTV, WIFI, VoIP/इंटरकॉम आणि अगदी विशिष्ट CCTV सोल्यूशन्ससारख्या इतर सेवांपर्यंत विस्तारित होतील.

भागीदारीबद्दल बोलताना, HGS चे पूर्णवेळ संचालक आणि OIL चे एमडी आणि सीईओ व्हिन्स्ले फर्नांडिस म्हणाले की, “भविष्य हे सर्व सहकार्यासाठी आहे आणि ब्रॉडबँड ग्राहकांसाठी उच्च दर्जाची सेवा प्रस्थापित करणाऱ्या 7Star पेक्षा चांगला सहयोगी भागीदार नाही. ब्रॉडबँडचा वेग वाढवण्यासाठी आम्ही एकमेकांच्या क्षमतांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू.”

7Star ग्रुपचे संस्थापक नादिर अली जयराज आणि एम एम देवेंद्रन यांनी त्यांच्या भावनांना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, “आम्हाला हिंदुजा समूहाच्या ब्रॉडबँड वर्टिकल – या क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित ब्रँड OIL सोबत ही भागीदारी करताना आनंद होत आहे. आम्हाला विश्वास आहे की ब्रॉडबँड वाढवण्याची आणि नवीन बाजारपेठांमध्ये विस्तार करण्याची संधी आता आहे आणि आम्ही आमच्या ग्राहकांना एकत्रितपणे मूल्य प्रदान करत राहू.”

तरुणाईच्या मनात देशभक्तीचे मूल्य रुजावे-डॉ. सदानंद मोरे 

वंदे मातरम् संघटनेतर्फे ‘देशभक्ती पुरस्कार’ वितरण
पुणे : “कोणताही काळ असला तरी देशभक्ती या मूल्याचे महत्त्व कायम असते. तरुणाईच्या मनात देशभक्तीचे मूल्य रुजायला हवे. आजची तरुणाई राजकारणाकडे आकर्षित होत आहे. ते काही वाईट नाही; पण पक्षनिरपेक्ष समाजकार्य करणारे तरुण समाजासाठी मोलाचे आहेत,” असे मत संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.

‘वंदे मातरम्’ संघटनेच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ‘देशभक्ती पुरस्कार’ वितरण सोहळ्यात डॉ. सदानंद मोरे बोलत होते. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेणू गावसकर यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ग्राहक पेठचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार, लेखक शरद तांदळे, खेळाडू अनिल मुंढे, सामाजिक कार्यकर्ते जावेद खान, उद्योजक राहुल पापळ यांना ‘व्यर्थ ना हो बलिदान देशभक्ती पुरस्कार’ आणि अ‍ॅड. असीम सरोदे यांना ‘विशेष सामाजिक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
सदाशिव पेठेतील उद्यान प्रसाद मंगल कार्यालयात झालेल्या या सोहळ्याप्रसंगी एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), वंदे मातरम् संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सचिन जामगे, प्रदेशाध्यक्ष वैभव वाघ, विकास हांडे, ऍड. चंद्रकांत घाणेकर, राजेश शर्मा, महेश बाटले, झहीर मुलानी, शीतल नलावडे, मोहित काकडे, सुरज जाधव, लेशपाल जवळगे, संचित कर्वे, राज घाटे आदी उपस्थित होते. शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्या स्मरणार्थ अलका चौक ते स. प. महाविद्यालय मशाल रॅली काढण्यात आली. भारत माता की जय, वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबाद अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
भूषण गोखले म्हणाले, ‘‘सैन्यात कोणताही जात-धर्म नसतो. तिथे केवळ ‘भारतीय’ हाच एक धर्म असतो. आपल्या सैन्याला संरक्षण सेना म्हणू नका, तर सशस्त्र सेना म्हणा, असा माझा आग्रह असतो. आपला देश पुढे नेण्याची जबाबदारी आता तरुणांच्या खांद्यांवर आहे.’’
रेणू गावसकर म्हणाल्या, ‘‘मूल होणे आणि आपल्यातील लहान मूल जागे ठेवणे, या आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्टी आहेत. पण ज्या वयात मुलांनी खेळायचे-बागडायचे, त्या वयात लहान मुले आपल्या अस्तित्वासाठी झगडताना पाहून मला अतिशय वाईट वाटले होते. माझ्या कामाची प्रेरणा मला आईने दिली होती.’’

श्रीराम पवार म्हणाले, “भगतसिंग यांनी सहिष्णुता आणि सर्वसमावेशकतेची मूल्ये सांगितली. आज त्याची उजळणी करण्याची वेळ आली आहे. आज भारतीयांमधील वैविध्य कमी करण्याचा तसेच सगळ्यांना एकाच मापात बसविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याला नाकारणे म्हणजेच भगतसिंग यांचा आदर्श घेणे आहे.” 
अ‍ॅड. सरोदे म्हणाले की, ‘‘भगतसिंग साम्यवादी विचारसरणीचे आणि विश्लेषणात्मक बुद्धिमत्तेचे होते. मी देव मानत नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली होती. केवळ फाशीवर गेले म्हणून नाही, तर त्यांनी जे विचार मांडले त्यामुळे ते क्रांतिकारक ठरले.’’

प्रास्ताविकात सचिन जामगे म्हणाले, “यापुढील काळातील लढा जातीसाठी नसून, मातीसाठी आहे. त्यामुळे तरुणांनी मातीसाठी एकत्र यावे. भविष्यात महासत्ता व्हायचे असेल, तर देश म्हणून पुढे जावे लागेल. तिथे जातीधर्म टिकणार नाही.”

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने देशात विकली ६ कोटी वाहने

गुरुग्राम२८ मार्च २०२४ – होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (एचएमएसआय) या देशातील आघाडीच्या दुचाकी उत्पादक कंपनीने आपल्या प्रवासाताली एक लक्षणीय टप्पा गाठल्याचे जाहीर केले आहे. कंपनीने भारतात ६ कोटी देशांतर्गत विक्रीचा पार करून ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

ही विलक्षण कामगिरी भारतीय बाजारपेठेप्रती एचएमएसआयची बांधिलकी दर्शवणारी आहे.

२००१ मध्ये एचएमएसआयने आपली पहिली दुचाकी – अ‍ॅक्टिव्हासह भारतात प्रवेश केला आणि पुढे काय घडलं तो इतिहास आहे! इतक्या वर्षांत होंडाच्या अक्टिव्हा ब्रँडने कित्येक विक्रमी टप्पे पार केले आणि आजही ती देशातील सर्वात लोकप्रिय दुचाकी आहे. स्थापनेपासून एचएमएसआय नाविन्यदर्जा आणि ग्राहकांना समाधान देण्याच्या बाबतीत आघाडीवर असून भारतीय ग्राहकांच्या गरजा वैविध्यपूर्ण गरजा पूर्ण करण्यासाठी सातत्याने जागतिक दर्जाची उत्पादने पुरवत आहे. 

६ कोटींचे बळ – भारतीय ग्राहकांचा विश्वास मिळवतानाचा होंडाचा प्रवास

जून २००१ पासून रिटेल कामकाजाची सुरुवात करत होंडाने भारतीय ग्राहकांना सलग दोन दशके आनंद दिला आहे. पहिले १ कोटी ग्राहक मिळवण्यासाठी कंपनीला ११ वर्ष लागली, मात्र त्यानंतर वेग तिप्पट झाला आणि कंपनीने दोन कोटींचा टप्पा केवळ तीन वर्षांत पार केला. ३ कोटींचा टप्पा एप्रिल २०१७ मध्ये आणि स्थापनेपासून १६ वर्षांत पूर्ण केला गेला, मात्र पुढील ३ कोटी ग्राहक केवळ सात वर्षांत होंडाच्या परिवारात सामील झाले आणि मार्च २०२४ मध्ये देशांर्तंगत विक्रीचा ६ कोटींचा टप्पा गाठला गेला.

या विक्रमी कामगिरीमध्ये होंडाची अ‍ॅक्टिव्हा – भारतातील सर्वात लोकप्रिय कौटुंबिक स्कूटर आणि द शाइन मोटरसायकल या उत्पादनांचा महत्त्वाचा टप्पा आहे. विश्वासार्हता, कामगिरी आणि आधुनिक वैशिष्ट्ये यांसाठी प्रसिद्ध असलेल्या अ‍ॅक्टिव्हा आणि शाइनला भारतीय ग्राहकांची सर्वाधिक पसंती असते. या क्षेत्रात नवे मापदंड प्रस्थापित करत त्यांनी एचएमएसआयच्या यशात मोठे योगदान दिले आहे.

या ऐतिहासिक कामगिरीविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालकअध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी – श्री. त्सुत्सुमु ओतानी म्हणाले, ‘एचएमएसआयमध्ये आता सहा कोटी ग्राहकांचा समावेश झाला आहे. विक्रीचा हा टप्पा भारतीय ग्राहकांना होंडा ब्रँडवर असलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे. आम्हाला या कामगिरीचा अतिशय अभिमान वाटतो आणि ग्राहकांच्या अपेक्षा भरभरून पूर्ण करण्यासाठी व भारतीय दुचाकी क्षेत्राच्या विकासासाठी आम्ही बांधील आहोत.’

या लक्षणीय कामगिरीविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. चे विक्री आणि विपणन विभागाचे संचालक श्री. योगेश माथुर म्हणाले, ‘एचएमएसआयने देशांतर्गत विक्रीत ६ कोटींचा टप्पा गाठल्याचे जाहीर करताना आम्हाला अतिशय आनंद वाटत आहे. या प्रवासात साथ देणारे आमचे निष्ठावान ग्राहक, भागीदार आणि समभागधारकांप्रती आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो.’

वैविध्यपूर्ण उत्पादन श्रेणी – १०० सीसी शाइन ते प्रमुख उत्पादन १८०० सीसी गोल्ड विंग टुर

– १०० सीसी शाइन ते प्रमुख उत्पादन असलेल्या १८०० सीसी गोल्ड विंग टुरपर्यंत वैविध्यपूर्ण उत्पादनांचा समावेश असलेली श्रेणी असलेली होंडा ही भारतातील एकमेव दुचाकी उत्पादक आहे. कंपनीच्या रेड विंग उत्पादन श्रेणीमध्ये चार स्कूटर मॉडेल्स (अ‍ॅक्टिव्हा आणि ११० सीसी डिओ, अ‍ॅक्टिव्हा १२५ आणि डिओ १२५, १२५ श्रेणी) यांचा समावेश होतो. मोटरसायकल विभागात कंपनीद्वारे नऊ आकर्षक मॉडेल्स उपलब्ध करण्यात आली असून त्यात १००- ११० सीसी (शाइन १००, ११० ड्रीम डिलक्स आणि लिवो), १२५ सीसी (शाइन १२५ आणि सपी १२५), १६० सीसी (युनिकॉर्न आणि एसपी१६०) आणि १८०-२०० सीसी (हॉर्नेट २.० आणि सीबी२००एक्स) विभाग आणि इतर स्पेशल एडिशन्सचा समावेश आहे.

एचएमएसआयच्या प्रीमियम मोटरसायकल रिटेल फॉरमऍटमध्ये संपूर्ण प्रीमियम मोटरसायकल श्रेणी (३०० सीसी ते १८०० सीसी) बिगविंग टॉपलाइन अंतर्गत हाताळली जाते, तर आघाडीची शहरे आणि बिगविंग मध्यम आकाराच्या विभागाचे (३०० सीसी- ५०० सीसी) कामकाज सांभाळते. कंपनीच्या वैविध्यपूर्ण मोटरसायकल्समध्ये नवी CB350, H’ness CB350, CB350RS, CB300F, CB300R, NX500, XL750 ट्रान्सल्प, आफ्रिका ट्विन आणि गोल्ड विंग टुर यांचा समावेश आहे.

ग्राहकांना आनंद देण्याचा एचएमएसआयचा दोन दशकांपेक्षा जास्त काळाचा प्रवास

वर्षविक्रमी टप्पा
1999–          होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. (एचएमएसआय) ची स्थापना
2001–          मानेसर येथील पहिल्य प्लांटमधून उत्पादन सुरू. पहिले मॉडेल अ‍ॅक्टिव्हाचे पर्दापण
2002–          भारतातून होंडाची निर्यात सुरू
2004–          मोटरसायकल बाजारपेठेत १५० सीसी युनिकॉर्नसह प्रवेश-          अ‍ॅक्टिव्हाच्या आघाडीसह पहिल्या क्रमांकावर
2006–          १२५ सीसी शाइनच्या लाँचसह मोटरसायकल क्षेत्रात वैविध्यपूर्ण विस्तार
2009–          इक्विलायझर तंत्रज्ञानासह कॉम्बी- ब्रेक यंत्रणेची सुरुवात – क्षेत्रात पहिल्यांदाच
2011–          तापुकारा (राजस्थान) येथे दुसऱ्या उत्पादन कारखान्याचे उद्घाटन
2012–          एकत्रित देशांतर्गत विक्रीचा १ कोटीचा टप्पा पार–          दुचाकी क्षेत्रातील एकमेव होंडा-          सर्वसमावेश एसईडीबीक्यू सुविधेसह नव्या टेक्निकल केंद्राचे उद्घाटन
2013–          नरसापुरा (कर्नाटक) येथे तिसऱ्या प्लांटचे उद्घाटन-          सुधारित मायलेजसाठी नवे होंडा इको तंत्रज्ञान (एचईटी)
2014–          नरसापुरा (कर्नाटक) येथे तिसऱ्या प्लांटचे उद्घाटन-          होंडा गोल्ड विंग – भारतात GL1800 लाँच
2015–          भारतात २ कोटी देशांतर्गत विक्रीचा टप्पा पार–          CBR 650F ही पहिली भारतीय बनावटीची बाइक लाँच
2016–          विठलापूर (गुजरात) येथे चौथ्या उत्पादन प्लांटचे उद्घाटन
2017–          देशांतर्गत विक्रीचा ३ कोटींचा टप्पा पार–          तिसऱ्या उत्पादन प्लांटमधील क्षमतेचा विस्तार-          प्रसिद्ध अ‍ॅक्टिव्हा बनली भारतातील पहिल्या क्रमांकाची दुचाकी
2018–          देशांतर्गत विक्रीचा ऐतिहासिक ४ कोटींचा टप्पा पार–          गुजरातमधील होंडाच्या विठलापर प्लँटमध्ये ६.३ अब्ज रुपयांची गुंतवणूक-          या क्षेत्रातील पहिला १००टक्के डिजिटल कस्टमर लॉयल्टी प्रोग्रॅम ‘होंडा जॉय क्लब’ लाँच
2019–          भारतात एक्सक्लुसिव्ह प्रीमियम बिग बाइक व्यवसाय विभागाची स्थापना-          नव्या अ‍ॅक्टिव्हा १२५ सह होंडाचा बीएसव्हीआय पर्वाची हरित
2020–          ऑनलाइन बुकिंग प्लॅटफॉर्म – क्लिक, बुक अँड रिलॅक्स लाँच-          मिड- साइज ३५० सीसी मोटरसायकल क्षेत्रात दमदार प्रवेश – H’ness CB350 चे जागतिक स्तरावर अनावरण
2021–          भारतात ५ कोटी देशांतर्गत विक्रीचा टप्पा पार–          नव्या परदेशी व्यवसाय विस्तार व्यवसाय विभागासह ‘मेकिंग इन इंडिया फॉर द वर्ल्ड’मध्ये दमदार प्रवेशाची घोषणा–          ग्राहकांसाठी इमरसिव्ह डिजिटल सुविधा लाँच, प्रीमियम मोटरसायकल विभागातील पहिल्या व्हर्च्युअल दालनाचे लाँच
2022–          एक कोटी ग्राहकांचा विक्रमी टप्पा गाठणारी ‘शाइन’ ही पहिली १२५ सीसी मोटरसायकल
2023–          शाइन १०० सह एंट्री लेवल १०० सी कम्युटर मोटरसायकल क्षेत्रात प्रवेश-          भारतातील सर्वाधिक खपाच्या अ‍ॅक्टिव्हाने साजरा केला तीन कोटी विक्रीचा टप्पा  
2024–          विठलापूर (गुजरात) येथील चौथ्या उत्पादन प्लँटमध्ये नव्या असेंब्ली लाइनसह क्षमता विस्तार–          एचएमएसआयतर्फे भारतात देशांतर्गत ६ कोटी विक्रीचा टप्पा पार

इंटरनेट केबलमुळे बिघाड,३ लाख ९ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा तासभर खंडित

पुणे, दि. २८ मार्च २०२४: धायरीमधील आनंदविहार येथे महापारेषणच्या २२० केव्ही अतिउच्चदाब वीजवाहिनीला गुरूवारी (दि. २८) दुपारी १.५३ वाजता इंटरनेट केबलचा स्पर्श झाल्याने नांदेड सिटी २२० केव्ही उपकेंद्रातील ५० एमव्हीए पॉवर ट्रान्सफॉर्मरचा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे विजेची तूट भरून काढण्यासाठी महापारेषणची स्वयंचलित भारव्यवस्थापन यंत्रणा (Load Trimming Scheme- LTS) कार्यान्वित झाली. परिणामी पुणे शहरातील वडगाव धायरी, नऱ्हे, हिंगणे, कोथरूड, जुनी सांगवी, पद्मावती, धनकवडी, कात्रज, आंबेगाव आदी परिसरातील सुमारे ३ लाख ९ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा तासभर खंडित झाला होता.

याबाबत माहिती अशी की, आनंदविहार येथे इंटरनेट केबल टाकण्याच्या प्रयत्न सुरु होता. त्याच ठिकाणी असलेल्या महापारेषणच्या २२० केव्ही अतिउच्चदाब वीजवाहिनीला आज दुपारी १.५३ वाजता या इंटरनेट केबलचा स्पर्श झाला. त्यामुळे मोठा आवाज होऊन वीजवाहिनीद्वारे होणारा नांदेड सिटी २२० केव्ही उपकेंद्रातील ५० एमव्हीएच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरचा वीजपुरवठा खंडित झाला. यात सुमारे ६० मेगावॅट विजेची तूट निर्माण झाल्यामुळे भारव्यवस्थापनासाठी महापारेषणची स्वयंचलित एलटीएस (Load Trimming Scheme) यंत्रणा कार्यान्वित झाली. त्यामुळे पर्वती २२० केव्ही, नांदेड सिटी २२० केव्ही, कोंढवा (येवलेवाडी) २२० केव्ही तसेच कोथरूड १३२ केव्ही व एनसीएल १३२ केव्ही या अतिउच्चदाब उपकेंद्रातून भारव्यवस्थापन करण्यात आले.

महापारेषणच्या या पाचही अतिउच्चदाबाच्या उपकेंद्रांतील भारव्यवस्थापनामुळे महावितरणच्या विविध उपकेंद्रांना होणारा वीजपुरवठा बंद पडला. परिणामी वडगाव, धायरी, नऱ्हे, किरकीटवाडी, सिंहगड रस्ता, सनसिटी रस्ता, हिंगणे, पद्मावती, मार्केटयार्ड, कात्रज, आंबेगाव, धनकवडी, जुनी सांगवी, शितोळेनगर, आनंदनगर, एरंडवणे, डहाणूकर कॉलनी या परिसरातील सुमारे ३ लाख ९ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा दुपारी १.५३ खंडित झाला. महापारेषणच्या अभियंते व तांत्रिक कर्मचाऱ्यांनी तातडीने आनंदविहार येथे जाऊन अतिउच्चदाब वीजवाहिनीतील बिघाड दुरूस्त केला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व परिसरातील वीजपुरवठा दुपारी २.५६ वाजेपर्यंत पूर्ववत करण्यात आला.  

गुलामहुसेन हमीद खान,राज अंबिके यांची नियुक्ती

पुणे -शहर जिल्हा काँग्रेस कमिटी पुणे लोकसभा निवडणुक २०२४ साठी सोशल मिडियाच्या प्रमुख पदी गुलामहुसेन हमीद खान आणि प्रेस मिडिया प्रमुख पदी राज अंबिके यांची नियुक्ती करण्यात आली. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या हस्ते काँग्रेस भवन येथे नियुक्ती पत्र देण्यात आले.

    गुलामहुसेन खान (मो. 9604777786) हे पुणे शहर काँग्रेस कमिटीचे सोशल मिडिया अध्यक्ष असून सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांचे पक्षकार्य अविरत सुरू आहे. त्याचबरोबर राज अंबिके (मो. 9822085485)  हे काँग्रेस पक्षाचे गेली २० वर्षांपासून काम करीत आहेत. त्यांनी आत्तापर्यंत NSUI प्रदेश सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस प्रवक्ते पदी काम केले आहे त्यामुळे पक्ष संघटनेचा त्यांना दांडगा अनुभव आहे.

     यावेळी शहर उपाध्यक्ष राजेंद्र भुतडा, हेमंत राजभोज, अजित जाधव, पप्पु सुर्यवंशी, रवि आरडे, मुन्ना खंडेलवाल आदी उपस्थित होते. 

भाजपा छत्रपतींच्या गादीचा अपमान करत आहे,मराठी माणसावर सूड उगवत आहे -सुप्रिया सुळे यांचा आरोप

पुणे- दिल्लीत उदयनराजेंना रांगेत ,प्रतीक्षेत ताटकळत ठेवणे म्हणजे छत्रपतींच्या गादीचा अपमान भाजप करत आहे. राजकारणात यांना छत्रपतींचे नाव लागते, आणि निवडणुकीत पहिल्या यादीत या गादीचे वारसदार उदयन राजेंचे नाव पाहिजे होते पण भाजप मराठी माणसाच्या अपमानाचे राजकारण सुडाचे राजकारण करत आहे असा आरोप आज येथे खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.
भाजपला बेरोजगारीचे प्रश्न सोडवायचे नाहीत , महागाई कमी करायची नाही. गरिबाला मदत करायची नाही ,दुष्काळ तीव्र आहे, पाणी प्रश्न सतावतो आहे पण भाजप पक्ष फोडातोडीकडे लक्ष देत आहे. शरद पवारांना संपविण्यासाठी भाजप महाराष्ट्रात राजकारण करत आहे.जे जे विरोधात आहेत त्यांना जेलमध्ये टाकायचे नाही तर भाजपात घ्यायचे असा भाजपचा मार्ग देशाला दडपशाहीकडे नेणारा मार्ग आहे. असेही ते म्हणाले.

उद्योजक पुनीत बालन यांची लोणीतील विविध प्रकल्पांना भेट

  • आर एम धारीवाल यांच्या नावाने वसतीगृह आणि इंद्राणी बालन यांच्या नावाने बहुउद्देशीय हॉल बांधण्याची घोषणा

पुणे – लोणी (ता. आंबेगाव जि. पुणे) येथे ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’च्या माध्यमातून चालू असलेल्या विविध विकास प्रकल्पांना उद्योजक आणि ‘पुनीत बालन ग्रुप’ व ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’चे अध्यक्ष पुनीत बालन यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी आर.एम. धारीवाल नावाने लोणी गावात एक वसतीगृह आणि इंद्राणी बालन यांच्या नावाने बहुउद्देशीय हॉल बांधण्याची घोषणाही त्यांनी केली. यावेळी त्यांच्यासमवेत पत्नी जान्हवी धारिवाल-बालन याही उपस्थित होत्या.‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’च्यावतीने लोणी येथे भव्य शाळागृह इमारतीचे बांधकाम तसेच गावासाठी तीन कोटी लीटर पाणी साठवण क्षमतेचे तळे आणि त्याभोवती उद्यान विकसित करण्यात येत आहे. आर. एम. डी. फौंडेशनच्या वतीने गावात दहा हजार वृक्ष लागवडही करण्यात येत आहे. या सर्व प्रकल्पांची पुनीत बालन आणि ‘आर.एम.डी. फाऊंडेशन’च्या कार्याध्यक्षा जान्हवी धारिवाल बालन यांनी पाहणी केली.याप्रसंगी झालेल्या छोटेखानी समारंभात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी ढोल लेझीमच्या तालात पाहुण्यांचे अनोखे स्वागत केले. यावेळी पुनीत बालन आणि जान्हवी बालन-धारीवाल यांचा विशेष सत्कार करण्यात आला. लोणी हे गाव माझ्या परिवाराचाच एक भाग असून लोणीतील विकासकामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे यावेळी बोलताना पुनीत बालन यांनी नमूद केले. लोणी गाव हे हिरवाईने नटवण्यासाठी हवी तेवढी झाडे उपलब्ध करुन देतील असं आश्वासन यावेळी जान्हवी बालन-धारीवाल यांनी दिलं. यावेळी क्रीडा स्पर्धेत यश मिळवणाऱ्या आठ विद्यार्थ्यांचा पुनीत बालन यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनीचे अध्यक्ष उदयराजे वाळुंज यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

गृह विभागाचे सहसचिव कैलास गायकवाड, सरपंच डॉ. सावळाभाऊ नाईक, माजी सरपंच उद्धव लंके तसेच शाळेतील विद्यार्थिनी तनिष्का सोनार यांनीही मनोगत व्यक्त केलं. लोणी ग्रामपंचायतीच्या वतीने पुनीत बालन आणि जान्हवी बालन यांचा विशेष सत्कार करण्यात आला.याप्रसंगी प्रबोधिनीचे सदस्य बाळासाहेब गायकवाड, मयूर लोखंडे, राजेश वाळुंज, सुरेश वाळुंज, संतोष पडवळ, पुनीत बालन ग्रुपचे चेतन लोखंडे, समाजभूषण कैलास राव गायकवाड, अशोक वाळुंज, बाळशिराम वाळुंज, अशोक आदक पाटील, संदीप आढाव, प्रकाश वाळुंज, प्रकाश सोनवणे, कैलास सिनलकर, सुधीर सोनार, प्रशालेचे प्राचार्य सुभाष वेताळ तसेच शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अविनाश वाळुंज यांनी केले.

गावाचं गावपण टिकवून शहरातील सुविधांप्रमाणे पर्यावरणाचं संरक्षण करुन गावातही सुविधा उपलब्ध केल्या तर गावातील स्थलांतर रोखण्यास निश्चित मदत होईल. शिवाय शहरांवर येणारा ताणही कमी होईल. त्यादृष्टीने सामाजिक दायित्त्वाच्या भावनेतून गावासाठी शक्य ते करण्याचा माझा नेहमी प्रयत्न राहील आणि ग्रामस्थांचंही त्यासाठी सहकार्य राहील, असा विश्वास आहे.

पुनीत बालनअध्यक्ष,पुनीत बालन ग्रुप

अमोल कोल्हेंनी आढळराव पाटील दिसताच त्यांना केला वाकून नमस्कार

पुणे- आज शिवजयंती … शिवनेरीवर माथा टेकायला गेलेल्या दोन विरोधकांची येथे भेट झाली आणि चक्क डॉ. अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील दिसताच त्यांच्या दिशेने जाऊन त्यांना वाकून नमस्कार केला.
अमोल कोल्हे म्हणाले , शिवनेरीवर मला दिल्लीच्या तक्तासमोर झुकायचे नाही हि प्रेरणा मिळते ,पण मराठी वयस्कर माणूस समोर आल्यावर त्याला वाकून नमस्कार करण्याची संस्कृती देखील मी विसरू शकत नाही.

राजकीय प्रश्नावर बोलताना ते म्हणाले,’धोरणात्मक टीका व्हायला हवी, वैयक्तिक टीका, व्यावसायिक कामाविषयी की टीका करणार नाही, पण धोरणात्मक टीका होणार समोरासमोर बसून चर्चा करु पाच वर्षात मी काय केलं यावर बोलू2019 ची निवडणूक मी शरदचंद्र पवार यांच्या आशीर्वादाने केली आणि आताही तेच करतोय, माझ्या भूमिकेत कुठं बदल झालायशिरूर सह इतर मतदारसंघात ही मला लक्ष देता येतय, मी खूप सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे,त्यामुळे सामन्यांच्या व्यथा समजायला मला वेळ लागत नाहीय.

मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी रद्द होऊ शकते; शिरोळे यांचे उदाहरण देत नाराज संजय काकडेंनी टाकला बॉम्ब!

मोहोळांना उमेदवारी दिल्याने भाजपात घमासान- काकडे म्हणाले, होय मी नाराजच, पण एकटा नाही बरेचजण नाराज

पुणे- लोकसभा निवडणुकीसाठी कसब्या च्या पराभवाची मीमांसा करून उमेदवारी द्या अशी मागणी पुणे भाजपच्या कार्यकर्त्यांकडून होत असताना वरिष्ठ नेत्यांनी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर केल्यापासून पक्षांतर्गत नाराजी आहे, पण पैलवानांची टीम माझ्याकडे आहे , घरोघरी प्रचार करेल असे सांगत विविध प्रिंट मीडियाच्या कार्यालयांना आणि जुन्या नव्या मान्यवर नेत्यांच्या भेटीगाठी घेत मोहोळ यांनी प्रचार सुरु केला आणि या नाराजीकडे सर्रास दुर्लक्ष करत वाटचाल सुरु ठेवली. नाराजी मोठ्या प्रमाणावर वाढतेय हे लक्षात आल्यावर मोहोळ यांनी परवा संध्याकाळी माजी खासदार आणि लोकसभा उमेदवारी स्पर्धेतील इच्छुक संजय काकडे यांची सर्वात शेवटी भेट घेतली ,पण नाराजी मात्र येथे संपली नाही , या भेटीचे फोटो केवळ मोहोळ यांनीच आपल्या सोशल मिडियातुन प्रसारित केले. काकडे यांनी मात्र तसे काही केले नाही . या नाराजीच्या कायम राहण्याने सूत्रांच्या म्हणण्यानुसार काळ संध्याकाळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी काकडे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली तेव्हा काकडे यांनी आपल्या मनातील सारी व्यथा आणि ६ मतदार संघातील परिस्थिती चव्हाण यांच्यापुढे मांडली आणि हे सारे अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पर्यंत पोहोचवा असेही सांगितले. याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यावर आज सकाळी काही इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रतिनिधींनी काकडे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी धाव घेतली तेव्हा काकडे म्हणाले,’ उमेदवार बदला असे म्हटलेले नाही, मात्र उमेदीच्या काळात कोणी पक्षासाठी काय काय केले हे सांगितले, मी अजूनही १०० टक्के इच्छुक आहे आणि मोहोळांना उमेदवारी दिल्याने नाराज देखील १०० टक्के आहेच , मी एकटाच नाराज नाही तर बरेच जण नाराज आहेत . जोपर्यंत बी फॉर्म देण्यात येत नाही तोवर मी उमेदवारीसाठी प्रयत्न करत राहील असे ते म्हणाले. नेमके काकडे काय म्हणाले ते एक त्यांच्याच शब्दात …..

भाजपा उमेदवार बदला,पुण्यातून मागणी..पक्षांतर्गत नाराजी…

संजय काकडेंनी मांडल्या कार्यकर्त्यांच्या व्यथा आणि वास्तव…मुरलीधर मोहोळांच्या उमेदवारीवर पसरलेल्या नाराजीवर समजूत काढण्यासाठी रवींद्र चव्हाणांनी भेट घेतली संजय काकडेंची
Lok Sabha Election 2024 पुणे: पुण्यात भाजपचा उमेदवार बदलण्याची मागणी जोर धरू लागलीय. पुणे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केलीय. काकडे यांनी थेट फेसबूकवर पोस्ट लिहून  आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पुणे लोकसभेसाठी भाजपकडून उमेदवारीसाठी जे इच्छुक होते त्यातील एक, माजी खासदार संजय काकडे यांनी आज पक्षाने दिलेल्या उमेदवाराबाबत एकूणच नागरिकात किती नाराजी आहे याबाबतची माहिती राज्यातील मंत्री रवींद्र चव्हाण यांना दिल्याची माहिती येथे समजते आहे.

दरम्यान याबाबत सोशल मिडीयावर एक पोस्ट हि काकडे यांनी केली आहे. या मध्ये त्यांनी असे म्हटले आहे कि
,’राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे माझ्या वेदना व पुणे लोकसभेचे वास्तव मांडले. पुणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, भाजपाचे वरिष्ठ नेते आणि माझे मित्र श्री रवींद्र चव्हाण यांनी आज माझ्या निवासस्थानी माझी भेट घेतली.यावेळी मी माझ्या मनातील सर्व वेदना आणि माझ्या आयुष्यातील उमेदीची 10 वर्षे पक्षासाठी देऊन या काळात काय काय कामे केली हे त्यांना सविस्तराने सांगितले. तसेच, पुणे लोकसभा मतदार संघातील वास्तव स्थितीदेखील मी त्यांना सांगितली. मी त्यांना सांगितलेल्या माझ्या वेदना आणि पक्ष हिताच्या सर्व गोष्टी आमचे वरिष्ठ नेते, मार्गदर्शक व केंद्रीय गृहमंत्री आदरणीय श्री अमितभाई शाह आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री रवींद्र चव्हाण यांनी मला या भेटी दरम्यान दिला. पक्षाचे वरिष्ठ नेते मला योग्य तो न्याय देतील आणि पुणे शहरासाठी योग्य तो निर्णय करतील ही आशा आहे.

हि पोस्ट त्यांनी पंतप्रधान मोदी,अमित शहा, जे पी नड्डा, देवेंद्र फडणवीस यांना # tag ने जोडली आहे.

मात्र उमेदवार बदला असे थेट कुठेही संजय काकडे यांनी म्हटलेले नाही

माढा आणि अमरावतीपाठोपाठ आता पुण्यातही भाजपचा उमेदवार बदलण्याची मागणी जोर धरू लागलीय. पुणे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात भाजपचे कार्यकर्ते आणि नागरीकातून नाराजी व्यक्त केली जातेय. काकडे यांनी तर थेट फेसबूकवर पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पक्षशिस्त म्हणुनच त्यांनी त्या मर्यादित शब्दातून व्यक्त केल्या असाव्यात.

काकडे नाराज असल्यामुळेच सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी पुण्यात त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याचे वृत्त आहे.या भेटीत त्यांनी आपल्या वेदना आणि पुणे लोकसभेचं वास्तव चव्हाणांसमोर मांडल्याचं काकडेंनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलंय. पक्षातील वरिष्ठ नेत्यांपर्यंत आपल्या भावना पोहचवण्याचं आश्वासन चव्हाणांनी दिल्याचं काकडेंनी सांगितलं.

सारी पदे कोथरूडला आणि महापालिकेच्या’त्या’ पदाधिकाऱ्यांचा कारभार

कसबा विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवातील मुख्य कारण महापालिकेतील भाजपा 2 पदाधिकारी यांनी केलेला ५ वर्षातील कारभार असल्याचेच काही जण मानतात,मोहोळ हे या ५ वर्षात स्थायी समिती अध्यक्ष,महापौर अशा पदांवर सर्वाधिक काळ होते या काळात खुद्द तत्कालीन खासदार बापट यांना सुद्धा या कारभाराचा फटका बसत होता.त्यामुळे बापट यांना थेट पालकमंत्र्यांच्या बैठकीतून सभात्याग करावा लागला, ,आयुक्तांच्या बंगल्यावर आंदोलन करावे लागले होते.असे असताना,शिवाय कोथरूडला महापौर,स्थायी समिती अध्यक्ष,पालकमंत्री, शिक्षण मंत्री आणि आता राज्सयभा सदस्य अशी सारीच पदे दिलेली असताना पुन्हा कोथरूडच्याच मोहोळ यांना निवडणुकीत महापालिकेतील त्यांचाच कारभार आणि स्वभाव पराभूत करेल अशी स्थिती दिसत असताना, त्यांनाच भरभरून दिल्यासारखी उमेदवारी देणे उचित नाही असे म्हणणे देखील काहींनी सातत्याने मांडलेले आहे.

डिजिटल मिडिया क्षेत्रात स्वतः ची आचारसंहिता महत्त्वाची: राजा माने

डिजिटल माध्यमांनी माहिती प्रसारणाची गती अन् देवाणघेवाण प्रक्रियाही वाढवली: मनोज पाटील

पुणे- सुरुवातीच्या काळामध्ये माहितीचे प्रसारण करण्यासाठी किमान २४ तासाचा कालावधी लागत होता परंतु इलेक्ट्रॉनिक माध्यमातून तो वेळ कमी झाला परंतु या दोन्ही माध्यमांमध्ये असणाऱ्या मर्यादा लक्षात घेता नव्याने उदयास आलेले डिजिटल मीडिया हे कसे प्रभावी माध्यम असून यातून वेळ आणि ठिकाणाच्या मर्यादा सीमा ओलाडणारे अन खिशातच अपडेटेड बातम्या देण्यापर्यंत डिजिटल मीडिया माध्यमांनी मजल मारली आहे हे अत्यंत प्रभावी असून यातून देवाण-घेवाणही तेवढ्याच तत्परपणे काही क्षणामध्ये मिळत असल्याने आगामी काळात या डिजिटल मीडिया या नव्या माध्यमाचे भविष्य उज्वल असल्याचे मत पुण्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार राजा माने उपाध्यक्ष जेष्ठ पत्रकार नंदकुमार सुतार व संगणक तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर उपस्थित होते.
आजच्या काळामध्ये नव्या तंत्रज्ञानामुळे आपल्याला आवश्यक असलेली माहिती काही सेकंदामध्ये आपल्या हातातील मोबाईल मध्ये मिळत असली तरी सुद्धा त्याची सत्यता ही निर्मित संस्थेवरती अवलंबून असते सध्या जगामध्ये अनेक नवनवीन तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे माहीती थेट मिळत असली तरी सुद्धा या माहितीची अचूक आणि थेट नेमकी माहिती डिजिटल प्रतिनिधींकडेच असते. या नव्या तंत्रज्ञानाचा कायद्यांच्या चौकटीत बसून कसा फायदा घ्यायचा याबाबत यावेळी मनोज पाटील यांनी मार्गदर्शन केले.
संगणक तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांनी डिजिटल माध्यमांचे बदलते स्वरूप अन् डिजिटल मीडिया या क्षेत्रात काम करताना तंत्रज्ञानाचा वापर या विषयावरती विश्लेषण करताना आगामी काळातील माध्यमांवरील आव्हाने आणि या आव्हानातही डिजिटल मीडियाचे अस्तित्व कसे अबाधित राखायचे याबाबत सखोल विश्लेषण केले. सध्या जगामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावरती कोणतीही रचना करण्यात येत असली तरी यामध्ये कोणती काळजी घ्यायची या विषयावरती सखोल विश्लेषण करणार आहे तर नव्या आव्हानांना सामोरे जाताना संगणकाचा या डिजिटल माध्यमातून कसा फायदा होत आहे आणि यातून नक्की काय साध्य करता येईल या विषयावरती ही विश्लेषण केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष राजा माने यांनी अनुभवाच्या जोरावर बदलत्या आव्हानांना कसे सामोरे जायचे अन् तंत्रज्ञानाच्या वाढत्या भडिमारामध्ये आपल्या डिजिटल माध्यमांची विशेष पकड आणि वेगळेपण हेच आगामी काळात या आव्हानांना सामोरे जाण्यास ताकद दिल्याशिवाय राहणार नाही असे सांगून विविध विषयावरती डिजिटल माध्यमांनी आपली मते व्यक्त करण्याचे आवाहन केले. तर पुणे शहर विभागाच्या वतीने ही एक अनोखी संधी निर्माण केल्यामुळे तंत्रज्ञान आणि कायदे या विषयावरती सखोल चर्चा करण्यास एक हक्काचे व्यासपीठ मिळाल्याचे कायदे आणि तंत्रज्ञान ही डिजिटल मीडिया साठी कायमच हातामध्ये हात घालून जाणारी गोष्ट आहे आणि डिजिटल मीडिया म्हटलं की वेळ आणि त्यावरची कसरत ही साध्य करताना प्रत्यक्ष काम करणाऱ्या पत्रकारांना कोणती काळजी घ्यावी याविषयीही माहिती दिली.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रामध्ये नंदकुमार सुतार (संपादक) यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञान डिजिटल माध्यमांसाठी कशी वरदायीनी आहे हे स्पष्ट करून सांगताना याबाबत विस्तृत माहिती दिली. या बदलत्या तंत्रज्ञानानुसार परदेशात दैनंदिन वापरले जाणारे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञान हे डिजिटल पन्नकारिता किती फायदेशीर आहे याची माहिती देत फक्त याबाबत कोणत्या दक्षता घेतल्या पाहिजेत याविषयीही मार्गदर्शन केले. 
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे पदाधिकारी व पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत भुजबळ यांनी डिजिटल माध्यमांसाठी निवडणूक आचारसंहिता व कायदे, नियमावली यावेळी विषद करून सांगितले. निवडणुका जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू होते म्हणून माध्यमांनी बचावात्मक भूमिका न घेता आदर्श पत्रकारितेच्या आचरणाने प्रशासनावरील अर्थातच निवडणूक आयोगावरील दबाव कायम ठेवावा. सदृढ लोकशाहीसाठी निवडणूक काळात माध्यमांवरील जबाबदारी महत्वपूर्ण असते. निवडणूक काळात माध्यमांनी प्रेस कॉन्सिल ऑफ इंडियाने मार्गदर्शक तत्वे जारी केलेले आहेत त्यांचे अनुकरण, पालन करावे असे आवाहन चंद्रकांत भुजबळ यांनी केले. निवडणूक काळात राजकीय पक्ष व उमेदवारांचे वृत्तांकन डिजिटल मीडियाने प्रसारण करताना घ्यावयाची काळजी व उपलब्ध जाहिरात परवानगी प्रक्रियेबाबत तसेच पेड न्यूज बाबत नियमांची माहिती उपस्थितांना दिली. डिजिटल माध्यमांसाठी उपलब्ध कायदे आणि डिजिटल माध्यमांची विश्वासहार्यता याबाबत मार्गदर्शन केले तर विधीज्ञ अतुल पाटील यांनीही माध्यमांसाठी आचारसंहिता आणि कायदे या विषयावरती सखोल विश्लेषण केले.
कार्यक्रमाचे आयोजन माऊली म्हेत्रे : राज्य संघटक, महेश टेळे पाटील : अध्यक्ष पुणे शहर, हर्षद कोठावडे कार्याध्यक्ष पुणे शहर, धनराज माने, कार्याध्यक्ष पुणे शहर, केतन महामुनी : सहसचिव यांनी केले होते .सतीश सावंत उपाध्यक्ष, विकास भोसले पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, महेश कुगांवकर : सचिव, राज्य संघटक : शरद लोणकर, संजय कदम,अमोल पाटील, तेजस राऊत, सातारा जिल्हा अध्यक्ष गणेश बोतालजी, पुणे जिल्हा अध्यक्ष अजिंक्य स्वामी, पिंपरी-चिंचवड अध्यक्ष विकास शिंदे, गणेश हुंबे यांच्यासह डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.