मुंबई, 28 मार्च 2024 : ONEOTT इंटरटेनमेंट लिमिटेड (OIL), भारतातील 4व्या सर्वात मोठे खाजगी इंटरनेट सेवा प्रदाता (ISP), आणि 7Star ग्रुप ही एक अग्रगण्य प्रादेशिक ISP कंपनी यांनी धोरणात्मक भागीदारीची घोषणा करत ब्रॉडबँड व्यवसाय वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. OIL चा एक भाग NXTDIGITAL मीडिया ग्रुप आणि हिंदुजा ग्लोबल सोल्युशन्स लि. (HGS) ची उपकंपनी, 7Star सोबत पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान सामायिक करेल आणि त्यातून वेगाने वाढणाऱ्या ब्रॉडबँड स्पेसमध्ये दोन्ही सहयोगी भागीदारांच्या सामर्थ्याचा वाढीसाठी फायदा घेतील.
ही भागीदारी NXTDIGITAL मीडिया ग्रुपची ग्राहकांपर्यंत सेवा पोहोचवण्याची सखोल वचनबद्धता सिद्ध करते आणि प्रस्थापित इंडस्ट्री प्लेयर्ससाठी एकत्र येऊन ग्राहकांना उत्कृष्ट उत्पादनांसह एकात्मिक सेवा देण्यासाठी आणखी एक उद्योग बेंचमार्क सेट करते. अत्यंत प्रतिष्ठित 7Star ग्रुपचे मुंबई आणि महाराष्ट्रात मजबूत नेटवर्क आहे आणि ग्राहकांशी चांगले नाते आहे. इतर बाजारपेठांमध्ये एकत्रितपणे सेवांचा विस्तार करण्यासाठी टोन सेट करताना दोन्ही भागीदार सुरुवातीला महाराष्ट्रात ब्रॉडबँड व्यवसाय वाढवण्यावर लक्ष केंद्रित करू पाहत आहेत.
ग्राहकांना एकात्मिक सेवा ऑफर करण्याच्या योजना देखील ही भागीदारी विकसित करत असून, ब्रॉडबँडच्या पलीकडे OTT, IPTV, WIFI, VoIP/इंटरकॉम आणि अगदी विशिष्ट CCTV सोल्यूशन्ससारख्या इतर सेवांपर्यंत विस्तारित होतील.
भागीदारीबद्दल बोलताना, HGS चे पूर्णवेळ संचालक आणि OIL चे एमडी आणि सीईओ व्हिन्स्ले फर्नांडिस म्हणाले की, “भविष्य हे सर्व सहकार्यासाठी आहे आणि ब्रॉडबँड ग्राहकांसाठी उच्च दर्जाची सेवा प्रस्थापित करणाऱ्या 7Star पेक्षा चांगला सहयोगी भागीदार नाही. ब्रॉडबँडचा वेग वाढवण्यासाठी आम्ही एकमेकांच्या क्षमतांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू.”
7Star ग्रुपचे संस्थापक नादिर अली जयराज आणि एम एम देवेंद्रन यांनी त्यांच्या भावनांना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, “आम्हाला हिंदुजा समूहाच्या ब्रॉडबँड वर्टिकल – या क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित ब्रँड OIL सोबत ही भागीदारी करताना आनंद होत आहे. आम्हाला विश्वास आहे की ब्रॉडबँड वाढवण्याची आणि नवीन बाजारपेठांमध्ये विस्तार करण्याची संधी आता आहे आणि आम्ही आमच्या ग्राहकांना एकत्रितपणे मूल्य प्रदान करत राहू.”