Home Blog Page 1119

जैन तेरापंथ धर्मसंघाचे महातपस्वी आचार्य श्री महाश्रमणजी यांचे पुण्यात अभिवादन,यात्रेने स्वागत

पुणे : सादा जीवन उच्च विचार, मानव जीवन का शृंगार… कैसे बदले जीवन धारा, प्रेक्षाध्यान साधना द्वारा… संयम ही जीवन है… अशा प्रकारच्या आशयाचे विविध संदेशाचे फलक घेत शालेय विद्यार्थी, युवक-युवतींसह महिला व पुरुषांनी मोठया संख्येने अभिवादन यात्रेत सहभाग घेतला आणि जैन तेरापंथचे धर्मसंघाचे महातपस्वी आचार्य श्री महाश्रमणजी यांचे पुण्यात स्वागत केले. नेपाळ, भूतान देशासह भारतातील २३ राज्यात जवळपास ६० हजार कि.मी. पेक्षाही अधिक पदयात्रा करणाऱ्या श्री महाश्रमणजी यांचे गंगाधाम चौकाजवळील वर्धमान सांस्कृतिक केंद्रात दिनांक २ एप्रिल पर्यंत दररोज सकाळी ९.३० वाजता प्रवचन होणार असून दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

आचार्य श्री महाश्रमण प्रवास व्यवस्था समितीतर्फे गंगाधाम चौक येथे श्री महाश्रमणजी यांचे आगमन होताच मोठया उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यानंतर आयोजित अभिवादन रॅलीमध्ये मोठ्या संख्येने जैनबांधव सहभागी झाले. यावेळी श्री जैन श्वेताम्बर तेरापंथ सभा चे अध्यक्ष महावीर कटारिया, आचार्य महाश्रमण प्रवास व्यवस्था समिती चे संयोजक महेंद्र मरलेचा, स्वागताध्यक्ष रतनमल दुगड आदींनी मनोगत व्यक्त केले. महिला मंडल ने स्वागतगीत सादर केले.

यापूर्वी सन १९६८ मध्ये तेरापंथ धर्मसंघाचे नववे गुरु आचार्य श्री तुलसी हे पुण्यात आले होते. त्यानंतर तब्बल ५७ वर्षांनंतर  अकरावे आचार्य महाश्रमणजी यांचे पुण्यात आगमन झाले आहे. वाकडेवाडी- शनिवारवाडा- श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर मार्गे  येताना विविध ठिकाणी आमदार सुनील कांबळे, रवींद्र धंगेकर यांनी स्वागत केले.

प्रवचनात आचार्य श्री महाश्रमणजी म्हणाले,  मनुष्यत्व हे दुर्लभ सांगितले आहे. जे दुर्लभ आहे, ते आपल्याला मिळाले आहे. त्यामुळेच मनुष्य जीवनाला विशेष महत्व आहे. आपल्या जीवनात वेळेचे मूल्यांकन होणे गरजेचे आहे. मानवी जीवनात मिळालेल्या वेळेत आत्मकल्याणासाठी आपण खूप करु शकतो. साधना किंवा आराधना देखील यावेळेत होऊ शकते. धर्म हा कल्पवृक्ष आणि चिंतामणी रत्न आहे. हे ज्याला मिळते तो अतिशय भाग्यशाली असतो आणि जी व्यक्ति मनुष्य जन्मात धर्म आराधना करत नाही, साधना करत नाही ,ती व्यक्ती भाग्यशाली असू शकत नाही. त्यामुळे धर्माप्रती जागरुकता असणे गरजेचे आहे. त्यासाठीच वेळेचे मूल्यांकन व सदुपयोग आपण करायला हवा.

नशामुक्त पुणे आणि  नशामुक्त भारत या अभियानांतर्गत या दौ-यामध्ये आचार्य श्री महाश्रमणजी  मार्गदर्शन करणार आहेत. आचार्य श्री महाश्रमण जी यांनी जनकल्याण आणि राष्ट्राच्या चारित्र्य निमार्णासाठी पदयात्रा करत सद्भभावना, नैतिकता, व्यसनमुक्तीचा संदेश दिला आहे. त्यांच्या प्रेरणेने लाखो लोक व्यसनमुक्त झाले आहेत. दि. २ एप्रिल पर्यंत वर्धमान सांस्कृतिक भवन आणि दि.२ एप्रिल ला तेरापंथ भवन, दि. ३ एप्रिल रोजी मगनकुंज, कल्याणी नगर आणि दि. ४ एप्रिल रोजी वाघोली येथे कार्यक्रम होणार आहेत. आचार्य श्री महाश्रमण प्रवास व्यवस्था समिति एवं समस्त तेरापंथ समाज पुणे, श्री भिक्षु मेमोरियल फाउंडेशन, तेरापंथ युवक परिषद, तेरापंथ महिला मंडळ, तेरापंथ प्रोफेशनल फोरम, अणुव्रत समिती  यामध्ये सहभागी झाले होते

सार्वत्रिक निवडणुकांच्या घोषणेपासून आतापर्यंत या ॲपद्वारे 79,000 हून अधिक नियम उल्लंघनाच्या तक्रारीची नोंद ; 99 % तक्रारींचे निवारण


नवी दिल्ली , 29 मार्च 2024

भारतीय निवडणूक आयोगाचे C-Vigil ॲप हे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन करण्याच्या घटनांबाबत तक्रार नोंदवण्यासाठी नागरिकांना उपलब्ध असलेले एक प्रभावी साधन बनले आहे.  2024 च्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्यापासून आजपर्यंत या अॅपवर 79,000 हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापैकी  99% पेक्षा जास्त तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, यापैकी जवळपास 89%  तक्रारींचे नोंदणी झाल्यानंतर केवळ 100 मिनिटांत निराकरण करण्यात आले आहे.  गती आणि पारदर्शकता हे C-Vigil ॲपचे आधारस्तंभ आहेत.

58,500 हून अधिक तक्रारी (एकूण 73%) बेकायदेशीर होर्डिंग्ज आणि बॅनर्सच्या विरोधात आहेत.  पैसे, भेटवस्तू आणि दारू वाटपाच्या संदर्भात 1400 हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. जवळपास 3% तक्रारी (2454) मालमत्तेच्या विद्रुपीकरणाशी संबंधित आहेत, तर शस्त्र दाखवणे आणि धमकावणे या प्रकरणात प्राप्त झालेल्या 535 तक्रारींपैकी 529 प्रकरणे याआधीच निकाली काढण्यात आली आहेत. 1000 तक्रारी निश्चित कालावधीच्या पलीकडे प्रचार प्रकरणी 1000 तक्रारी नोंदवल्या गेल्या होत्या, यात परवानगी देण्यात आलेल्या वेळेपलीकडे स्पीकरचा वापर अशा घटनांचा समावेश आहे.

C-Vigil ॲपने निवडणूक पर्यवेक्षण आणि प्रचारातील गोंधळ कमी करण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.  2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या घोषणेसाठी आयोजित पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले होते आणि आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन तसेच मतदारांना कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनाचे वितरण यासारख्या घटनांची तक्रार नोंदवण्यासाठी या ॲपचा वापर करावा, अशी सूचनाही केल्याचे लक्षात येते.

C-Vigil हे वापरकर्ता-अनुकूल आणि हताळण्यास सोपे ऍप्लिकेशन आहे, जे सतर्क नागरिकांना जिल्हा नियंत्रण कक्ष, निवडणूक अधिकारी आणि भरारी पथकांशी संपर्क साधण्यास मदत करते. या ॲपचा वापर करून नागरिकांना राजकीय गैरव्यवहाराच्या घटनांची तक्रार निवडणूक अधिकारी कार्यालयात गर्दी न करता काही मिनिटांत करता येईल. C-Vigil ॲपवर तक्रार नोंदवताच तक्रारदाराला एक युनिक आयडी मिळेल ज्याद्वारे तक्रारदार व्यक्ती आपल्या मोबाईलवरून तक्रार निवारण प्रक्रियेचा मागोवा घेऊ शकेत.

एकाच वेळी कार्य करणाऱ्या घटकांची त्रिसूत्री C-Vigil ला यशस्वी बनवते.  ॲपचे वापरकर्ते रिअल-टाइममध्ये ऑडिओ, फोटो किंवा व्हिडिओ मुद्रीत करु शकतात. अशा तक्रारींना वेळेनुसार प्रतिसाद देण्यासाठी “100-मिनिटांचे” काउंटडाउन सुनिश्चित केले जाते. वापरकर्त्याने नियम उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी C-Vigil मधील कॅमेरा सुरु केल्यावर ॲप स्वयंचलितपणे जिओ-टॅगिंग वैशिष्ट्य सक्षम करते.  यामुळे भरारी पथकाला नियम उल्लंघनाचे नेमके स्थान कळू शकते आणि नागरिकांनी घेतलेली छायाचित्रे न्यायालयात पुरावा म्हणून वापरली जाऊ शकतात. नागरिक आपले नाव गुप्त ठेवूनही तक्रारी नोंदवू शकतात.

हे ॲप तंत्रज्ञानाचा फायदा घेत मतदार आणि राजकीय पक्षांना सुविधा देण्यासाठी आयोगाने तयार केलेल्या अनेक ॲप्सपैकी एक आहे.

कलाकारांची मांदियाळी असलेला ‘जुनं फर्निचर’

सत्य – सई फिल्म्स आणि स्कायलिंक एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘जुनं फर्निचर’ हा चित्रपट येत्या २६ एप्रिल रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टिझर लाँच सोहळा दिमाखात पार पडला. टीझरमधील महेश मांजरेकर यांच्या करारी व्यक्तिरेखेची झलक सर्वांनीच पाहिली. आता या चित्रपटातील इतर कलाकारही समोर आले आहेत. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून यात महेश मांजरेकर यांच्यासोबत मेधा मांजरेकर, उपेंद्र लिमये, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर आणि सचिन खेडेकर दिसत आहेत. पोस्टरमध्ये न्यायालय, न्यायधीश आणि काही कागदपत्रे दिसत आहेत, ज्यावर न्याय, हक्क, कायदा लिहिलेले आहे. त्यामुळे आता ही कोणती लढाई लढली जाणार आहे, याचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहूनच मिळणार आहे.

दरम्यान या चित्रपटात समीर धर्माधिकरी, डॉ. गिरीश ओक, विजय निकम, संतोष मिजगर, अलका परब, शरद पोंक्षे यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. याव्यतिरिक्त या चित्रपटात ओंकार भोजने, शिवाजी साटम यांचीही झलक पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या चित्रपटात अनेक बड्या कलाकारांना एकत्र पाहाण्याची संधी मिळणार आहे. या मल्टीस्टारर चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन महेश वामन मांजरेकर यांनी केले असून यतिन जाधव ‘जुनं फर्निचर’चे निर्माते आहेत.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर म्हणतात, ”जुन्या फर्निचरमध्ये किती ताकद असते, हे दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. एका ज्येष्ठ नागरिकाचा लढा यात दाखवण्यात आला आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक अशा प्रकारच्या परिस्थितीला सामोरे जात असतील, परंतु ही प्रकरणे समोर येत नाहीत. मी म्हणेन प्रत्येक तरूणाने आपल्या पालकांसोबत हा चित्रपट पाहावा, जेणे करून त्यांचा दृष्टिकोन बदलेल.”

गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न 

श्री शिवाजी मराठा सोसायटी इन्स्टिटयुट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च
पुणे: श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या इन्स्टिटयुट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्चमध्ये वार्षिक स्नेह संम्मेलन व पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. जी 20 समिटमध्ये सहभागी झाल्याबद्दल कावेरी बिराजदार या विद्यार्थीनीचा विशेष सन्मान करण्यात आला. 
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून जेष्ठ इतिहास अभ्यासक अॅड. डॉ . श्रीमंत शिवाजी कोकाटे  उपस्थित होते. संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र जगताप यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. मानद सहसचिव विकास गोगावले, खजिनदार जगदीश जेधे  सत्येंद्र कांचन, विलास गव्हाणे, गंगाधरराव घारे, तानाजी घारे, रघुनंदन जाधव, संताजी जेधे, डॉ. सुनील  जगताप,  बाळकृष्ण पाटील, प्रदीप उरसळ, अशोक  शिंदे यावेळी उपस्थित होते. 
प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात विविध कलागुणांचे सादरीकरण केले. सर्व प्रमुख अतिथींचे इन्स्टिट्यूटच्या प्रभारी संचालिका डॉ. प्राजक्ता वराळे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले.  सहाय्यक प्राध्यापिका सई जेधे यांनी आभार व्यक्त केले

९५ टक्के मतदातांचा ईव्हीएमवर विश्वास नाही

बहुजनांना न्याय मिळण्यासाठी ‘परिवर्तन’ चा सर्वे
बसपा, वीबीए व भारिप पक्षांना अचूक रणनिती आखण्यास ठरेल उपयुक्त

पुणे, दि. २९ मार्च: लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाजाच्या प्रवर्गातील स्वयंप्रचेरित सामाजिक कार्यकर्त्यांच्या परिवर्तन संघटनेने बहुजन समाजांच्या गंभीर समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने नुकताच ऑनलाइन सर्वे केला. हा सर्वे नुसार ९५ टक्के मतदातांना ईव्हीएमवर विश्वास नाही. निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूकीसाठी पारंपारिक मतपत्रिका निवडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच बहुजन समाज पार्टी (बसपा), वंचित बहुजन आघाडी (वीबीए), आणि भारतीय रिपब्लिकन पक्ष(भारिप) यांना अचूक रणनिती आखण्यास हा सर्वे उपयुक्त ठरू शकेल. अशी माहिती अ‍ॅड. अरूण कुमार डोळस, इनक्राफ्ट टेक्नॉलॉजीज प्रा.लि.चे पंकज जाधव व दत्तात्रय गोरखे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
अ‍ॅड. अरूण कुमार डोळस यांनी सांगितले की, सर्वेनुसार सात प्रमुख निष्कर्ष काढण्यात आले आहेत. यानुसार युतीच्या रणनितीबाबत : वीबीए, बसपा आणि भारिप (आ) पक्षांनी इंडिया गटाबरोबर युती करावी. सर्वेनुसार ६३ टक्यांना वाटते की, वीबीए आणि इंडिया गटात युती व्हावी. ६२ टक्के सहभागीदारांना बसपा आणि भारत यांच्यात युती अपेक्षित आहे. तर ५२ टक्के सहभागीदार भारिप (आ) आणि इंडिया गटात युतीची अपेक्षा करतात.
बहुजन समाजाच्या मतदारांच्या पसंती बाबतः ४९ टक्के (सर्वोच्च) सहभागीदारांनी सूचित केले की बहुजन समाजाचे प्रतिनिधत्व करणार्‍या राजकीय पक्षांची एनडीए किंवा इंडिया या दोन गटांपैकी एका बरोबर युती व्हावी. अन्यथा मतदान करताना वीबीए त्यांचा सर्वाधिक पसंतीचा पक्ष असेल. ३१ टक्के सहभागीदरांनी अशा परिस्थितीत मत देताना इंडिया गटाला पसंती दर्शवली. बहुजन समाजातील नागरिकांमध्ये वीबीएची वाढती लोकप्रियता तसेच राज्यात इंडिया व वीबीए मध्ये युतीची गरज दर्शवते.
मतदान माध्यमाला प्राधान्य देण्याबाबतः ९५ टक्के लोकांचा मतदानाचे साधन किंवा माध्यम ईव्हीएमवर विश्वास नाही. निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रियेसाठी ईव्हीएमपेक्षा पारंपारिक मतपत्रिका निवडण्याची इच्छा आहे.
एकतेच्या निर्मितीतील अडथळ्यांविषयीः ६१ टक्के सहभागीदारांना वाटते की महाराष्ट्रातील सध्याच्या परिस्थितीत वीबीए आणि बसपा एका पक्षात एकत्र येऊ शकतात. ५९ टक्के सहभागीदारांनी वीबीए व भारिप (आ) यांच्यात ऐक्य होण्याची इच्छा व्यक्त केली. ५४ टक्के सहभागीदाराना बसपा, वीबीए आणि भारिप (आ) हे तिन्ही प्रमुख पक्ष, सध्या एकत्रित येण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही. तर ६० टक्के सहभागीदारांना बसपा आणि भारिप (आ) यांच्यात ऐक्याची शक्यता दिसत नाही.
एकतेच्या निर्मितीतील अडथळ्यांविषयीः या सर्वेक्षणात नेत्यांचा अहंकार (२५ टक्के) स्वार्थ (२३ टक्के) आणि परस्पर विश्वासाचा अभावा (१५ टक्के) हे प्रमुख अडथळे दूर केले तर बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करणार्‍या पक्षांच एकत्रीकरण शक्य आहे.
बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करणार्‍या राजकीय पक्षांमधील ऐक्याबाबतः सर्वेतील ५५ टक्क्यांचा विश्वास आहे की बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करणारे सर्व राजकीय पक्ष त्यांच्यात ऐतिहासिक मतभेद आहेत. त्यांना एकत्रित करण्याचे भूतकाळातील प्रयत्न अयशस्वी होऊनही एकत्र येऊ शकतात. तरूण म्हणजे ३८ वर्षे वयापर्यंतच्या ६५ टक्के स्त्रिया आणि ६२ टक्के पुरूष एकजूट होण्याविषयी अधिक आशावादी आहेत. ७७ टक्क्यांना मोठ्या गटाला या पक्षांनी एकत्र येऊन एक मजबूत राजकीय पक्ष उभारावा अस वाटतं.
राजकीय पटला बाबतः यात असे दिसते की बहुजन समाज भारताच्या लोकसंख्येच्या ८० टक्के पेक्षा अधिक आहे. तरीही त्यांच्या मतांचे विविध राजकीय पक्षांमध्ये विभाजन होत असल्याने त्यांचे प्रतिनिधित्व करणारा कोणताही मोठा राजकीय पक्ष केंद्रात किंवा महाराष्ट्रात सरकार स्थापन करणार नाही.

सर्वे संदर्भात विस्तृत माहितीः
बहुजन समाजाच्या एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातील स्वयंप्रेरित सामाजिक कार्यकर्त्यांच्या परिवर्तन या अनौपचारिक संघटनेने केलेला हा सर्वे आहे. १४ फेब्रुवारी ते २४ मार्च या कालावधित चाललेल्या सर्वेत बहुजन समाजातील १०२३ महाराष्ट्रीयन व्यक्तींनी प्रतिसाद दिला. या सर्वेत ५ विभागात ५० प्रश्न विचारण्यात आले. येणार्‍या निवडणुकीचे निकष लक्षात घेता युती, बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करणार्‍या राजकीय पक्षांमधील एकता, ईव्हीएम, इत्यादींशी थेट संबंधित असलेल्या १४ प्रश्नांचे निष्कर्ष आहे.

पब, बिअरबार,रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि आइस्क्रीम पार्लर यांना रात्री दीडपर्यंत परवानगी,मात्र रस्त्यावरील स्टॉल्स हातगाडीना नाही म्हणजे नाही..

पुणे:शहरातील पब, बिअर बार आस्थापनांना रात्री दीड वाजेपर्यंतची वेळ यापूर्वीच ठरवून दिली आहे. परंतु आता रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि आइस्क्रीम पार्लर यांनाही रात्री दीडपर्यंत परवानगी राहील.तर रस्त्यालगतच्या खाद्य पदार्थांच्या स्टॉल्सना रात्री साडेअकरानंतर बंद ठेवण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.

देशी दारूच्या दुकानांना सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत वेळ आहे. त्यांनाही वेळेचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, दारूच्या दुकानाजवळ अंडाभुर्जी, चायनीज खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर मद्यपी दारू पितात. त्यामुळे अशा अंडाभुर्जी, चायनीज खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

शहरात रस्त्यावर किरकोळ कारणावरून मारहाणीच्या घटना वाढत आहेत. यापुढे रस्त्यावरील गुन्हेगारी रोखण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. ‘स्ट्रीट क्राईम’ आणि वाहनांची तोडफोड करणाऱ्यांना यापुढे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला.सार्वजनिक ठिकाणी महिलांची छेडछाड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. महिलांच्या सुरक्षिततेबाबत निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. संघटित गुन्हेगारी टोळ्यांतील गुन्हेगार, फरार आरोपी, बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांची धरपकड सुरू आहे. शहरात नाकाबंदी आणि बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. घरफोडीच्या घटना रोखण्यासाठी कोंढवा, भारती विद्यापीठ, चतु:शृंगीसह सर्व पोलिस ठाण्यांच्या पोलिस निरीक्षकांना गस्त वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

प्रफुल्ल पटेल 840 कोटी च्या घोटाळ्यात सीबीआय नेच आता पुरावा नाही सांगत दिला क्लोजर रिपोर्ट

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात सुरू असलेल्या कथित घोटाळा प्रकरणाचा तपास सीबीआयने आता बंद केल्याची माहिती समोर येत आहे. प्रफुल्ल पटेल यांच्यावर यूपीए सरकारमध्ये नागरी विमान वाहतूक मंत्री असताना एअर इंडियासाठी विमान खरेदी व्यवहारात अनियमितता असल्याचा आरोप करण्यात आला होता.

आरोपांनुसार प्रफुल्ल पटेल यांच्यावर सरकारचे ८४० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. प्रफुल्ल पटेल यांच्याशी संबंधित प्रकरण हे सीबीआयकडे प्रलंबित होते. मागील सात ते आठ वर्षांपासून सीबीआयकडून याबाबत तपास केला जात होता. मात्र, आता सीबीआयने क्लोजर रिपार्ट दिल्याने पटेल यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, विराेधकांनी यावर टीका केली असून भाजपसोबत हातमिळवणी केली की अनेकांची मागची चौकशी बंद होते, असे म्हटले आहे.प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात कोणताही पुरावा सापडला नसल्याचे सीबीआयने क्लाेजर रिपोर्टमध्ये म्हटले आहे. २०१७ मध्ये पटेलांवर सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. मंत्रिपदावर असताना प्रफुल्ल पटेल यांनी भ्रष्टाचार करून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा हा कथित आरोप होता. तेव्हापासून सीबीआयची चौकशी आणि याप्रकरणी तपास सुरू होता.

‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४’ आदर्श आचार संहिता – काय करावे? काय करू नये?

भारत निवडणूक आयोगाने 16 मार्च 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम घोषित केला. तेव्हापासून ते निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत देशभरात आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. निवडणुकीचा हा महाउत्सव भयमुक्त व आनंदी वातावरणात साजरा करण्यासाठी आदर्श आचार संहितेचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असते. या आचारसंहिता कालावधीत उमेदवार आणि राजकीय पक्ष यांच्या मार्गदर्शनासाठी “काय करावे” व “काय करु नये” याबाबत मागदर्शक तत्त्वे आयोगामार्फत सांगण्यात आली आहेत. त्याचा घेतलेला हा आढावा…

आदर्श आचारसंहिता : “काय करावे”

1)       निवडणुका घोषित होण्यापूर्वी क्षेत्रात प्रत्यक्षपणे सुरु करण्यात आलेले कार्यक्रम पुढे चालू ठेवता येतील.

2)       पूर, अवर्षण, रोगाची घातक साथ किंवा इतर नैसर्गिक आपत्ती यांच्यामुळे प्रभावित झालेल्या क्षेत्रांतील जनतेसाठी पीडानिवारण आणि पुनर्वसन कार्य सुरु करता व चालू ठेवता येऊ शकेल.

3)       मरणासन्न किंवा गंभीररित्या आजारी असलेल्या व्यक्तींना उचित मान्यतेचे रोख रक्कम किंवा वैद्यकीय सुविधा चालू ठेवता येऊ शकेल.

4)      मैदानांसारख्या सार्वजनिक जागा सर्व पक्षांना/ निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना निवडणूक सभा घेण्यासाठी नि:पक्षपातीपणे उपलब्ध दिल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे सर्व पक्षांना/  निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना हेलिपॅडचा वापर नि:पक्षपातीपणे करता आला पाहिजे.

5)      इतर राजकीय पक्ष किंवा उमेदवार यांच्यावर करण्यात येणारी टीका, त्यांची धोरणे, कार्यक्रम, पूर्वीची कामगिरी, पार पाडलेली कामे, केवळ याबाबींशी संबंधित असावी.

6)      शांततापूर्ण आणि उपद्रवरहित गृहस्थ जीवन जगण्याचा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार पूर्णपणे जतन करण्यात यावा.

7)      इतर पक्षांनी आयोजित केलेल्या सभा व मिरवणूकीमध्ये कोणतेही अडथळे निर्माण करण्यात येऊ नयेत. स्थानिक पोलिस प्राधिकाऱ्यांना प्रस्तावित सभांची जागा आणि वेळ याबाबत पुरेशी आगाऊ सूचना देऊन आवश्यक ती परवानगी घेतलेली असावी.

8)      प्रस्तावित सभेच्या जागी कोणतेही निर्बंधक किंवा प्रतिबंधक आदेश जारी केलेले असल्यास त्यांचे पूर्णपणे पालन करण्यात यावे. आवश्यक असल्यास  त्याबाबत सूट मिळण्याकरिता अर्ज केला पाहिजे आणि अशी सुट वेळीच मिळवावी.

9)       प्रस्तावित सभेसाठी ध्वनिवर्धकाचा वापर करण्याची आणि अशा इतर कोणत्याही सुविधांसाठी परवानगी  मिळवावी.

10)     सभांमध्ये अडथळे आणणाऱ्या किंवा अन्यथा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या व्यक्तींचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात यावी.

11)     मिरवणूक सुरु होण्याची वेळ आणि जागा, मिरवणूकाचा मार्ग आणि ती जेथे मिरवणूक संपणार असेल ती वेळ आणि जागा अगोदर निश्चित करण्यात येवून पोलिस प्राधिकाऱ्यांकडून त्यासाठी आगाऊ परवानगी घेण्यात यावी.

12)     मिरवणूक जेथून जाणार असेल त्या भागांमध्ये कोणताही निर्बंधक आदेश जारी असल्यास, त्याबाबत खात्री करुन घेऊन, त्याचे पूर्णपणे अनुपालन करण्यात यावे. त्याचप्रमाणे वाहतूक विनियम आणि इतर निर्बंध यांचेही अनुपालन करण्यात यावे.

13)     मिरवणुकीमुळे वाहतुकीला अडथळा होऊ देऊ नये.

14)    मतदान शांततापूर्ण आणि सुनियोजितरितीने पार पडावे यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांना नेहमीच सहकार्य करावे.

15)    बिल्ले व ओळखपत्र, निवडणूकीचे काम करणाऱ्‍या व्यक्तींनी ठळकपणे लावावीत.

16)     मतदारांना देण्यात येणाऱ्‍या ओळखचिठ्ठ्या या साध्या (पांढऱ्‍या) कागदावर देण्यात येतील व त्यावर कोणतेही चिन्ह उमेदवारांचे किंवा पक्षाचे चिन्ह यांचा उल्लेख असणार नाही.

17)    प्रचाराच्या कालावधीमध्ये व मतदानाच्या दिवशी वाहनांच्या वापरावरील निर्बंधाचे पूर्णपणे पालन करण्यात येईल.

18)    निवडणूक आयोगाचे वैध प्राधिकारपत्र असल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही वेळी मतदान कक्षात प्रवेश करता येणार नाही. इतर व्यक्ती कितीही उच्चपदस्थ असली तरी (उदा. मुख्यमंत्री, मंत्री, संसद सदस्य, विधानसभा सदस्य) यांनाही यातून सूट देण्यात आलेली नाही.

19)     निवडणूक पार पाडण्याच्या संबंधातील कोणतीही तक्रार किंवा समस्या, निवडणूक निर्णय अधिकारी/क्षेत्र/प्रभाग/दंडाधिकारी यांच्या किंवा भारत   निवडणूक आयोग यांनी नियुक्त केलेल्या निरीक्षकांच्या निदर्शनास आणून देण्यात येईल.

20)    निवडणूक आयोग/निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे निवडणूकीच्या विविध पैलूंच्या संबंधातील सर्व बाबीविषयीचे निदेश/आदेश/सूचना यांचे पालन करण्यात यावे.

आचारसंहिता : “काय करु नये”

1) सत्तेमध्ये असलेला पक्ष/शासन यांनी सध्या केलेल्या कामगिरी विषयी सरकारी राज्यकोषातील खर्चाने कोणतीही जाहिरात व सर्व जाहिराती काढण्यास प्रतिबंध आहे.

2) कोणताही मंत्री, तो उमेदवार असल्याखेरीज किंवा प्राधिकृत प्रतिनिधी असल्याखेरीज किंवा मतदानासाठी मतदार या नात्याने असेल त्याखेरीज मतदान कक्षामध्ये किंवा मतमोजणीच्या जागी प्रवेश करणार नाही.

3) शासकीय कामाची निवडणूक मोहिम/निवडणूक प्रचार कार्यासोबत सरमिसळ करू नये.

4) मतदारास आर्थिक किंवा अन्य प्रकारचे कोणतेही प्रलोभन दाखविण्यात येऊ नये.

5) मतदारांच्या जातीय भावनांना आवाहन करण्यात येऊ नये.

6) विभिन्न जाती, जमाती यांच्यातील किंवा धार्मिक किंवा भाषिक गटातील सध्याचे मतभेद ज्यामुळे अधिक तीव्र होतील किंवा परस्परातील वैमनस्य वाढेल किंवा त्यांच्यात तणाव निर्माण होईल अशी कोणतीही कृती करण्याचा प्रयत्न करण्यात येऊ नये.

7) इतर पक्षांचे कोणतेही नेते किंवा कार्यकर्ते यांच्या सार्वजनिक कार्याशी संबंधित नसेल अशा त्यांच्या खाजगी जीवनातील कोणत्याही पैलूवर टीका करण्याची परवानगी देण्यात येऊ नये.

8) इतर पक्ष किंवा त्यांचे कार्यकर्ते यांच्यावर, आंधळेपणाने केलेल आरोप आणि विपर्यस्त माहिती यांच्या आधारावर टिकाटिप्पणी करू नये.

9) शासकीय वाहने किंवा कर्मचारी वर्ग किंवा यंत्रणा यांचा निवडणूक प्रचारा विषयक कामासाठी वापर करण्यात येऊ नये.

10) कोणत्याही वित्तीय अनुदानाची घोषणा करणे, कोनशिला बसविणे, नवीन रस्ते इत्यादी बांधण्याचे वचन देणे इ. गोष्टी करू नयेत.

11) शासन/सार्वजनिक उपक्रम यांच्या सेवेत कोणत्याही तदर्थ नियुक्त्या करू नयेत.

12) निवडणूक प्रचार तसेच भाषण, निवडणूक प्रचाराचे फलक, संगीत इत्यादी यासाठी देवळे, मशिदी, चर्च, गुरुद्वार किंवा कोणत्याही प्रार्थनास्थळाचा वापर करू नये.

13) लाच देणे, अवाजवी प्रभाव टाकणे, मतदारांना धाकटपशा दाखविणे, खोट्या नावाने मतदान करणे, मतदान कक्षापासून १०० मीटरच्या आत निवडणूक प्रचार करणे, मतदानाची वेळ समाप्त होण्याच्या वेळेबरोबर संपणाऱ्या ४८ तासांच्या कालावधीत सार्वजनिक सभा घेणे, मतदारांना मतदान कक्षापर्यंत पोहचविणे व तेथून परत नेणे यासारख्या भ्रष्ट प्रथा किंवा निवडणूक विषयक अपराध करण्यास प्रतिबंध आहे.

14) व्यक्तीची मते किंवा कृत्ये याविरुध्द व्यक्त करण्यासाठी त्यांच्या घरासमोर निदर्शने करणे किंवा धरणे धरण्यात येऊ नये.

15) कोणत्याही व्यक्तीला, अन्य कोणत्याही व्यक्तीची जमीन, इमारत, आवारभिंत इत्यादीचा वापर त्यांच्या परवानगीखेरीज ध्वजदंड उभारणे, कापडी फलक लावणे, नोटीसी चिकटविणे किंवा घोषणा इत्यादी यासाठी वापर करता येणार नाही. यामध्ये खाजगी व सार्वजनिक जागांचा समावेश असेल.

16) इतर राजकीय पक्षाच्या किंवा उमेदवारांच्या सार्वजनिक सभांमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण करण्यात येऊ नये.

17) एका पक्षाची जेथे सभा चालू असेल अशा जागी दुसऱ्‍या पक्षाद्वारे मोर्चा काढण्यात येऊ नये.

18) दुसऱ्‍या पक्षाने किंवा उमेदवाराने काढलेली प्रचारपत्रके काढून टाकण्यात येऊ नये.

19) मतदानाच्या दिवशी ओळखचिठ्ठ्या वितरीत करण्याच्या जागी किंवा मतदान कक्षानिकट प्रचार पत्रके, पक्षांचे ध्वज, चिन्हे किंवा इतर प्रचार साहित्य यांचे प्रदर्शन करू नये.

20) ध्वनीवर्धकांचा मग ते एकाच जागी लावलेले असोत किंवा फिरत्या वाहनांवर बसवलेले असोत, सकाळी ६.०० वाजण्यापूर्वी किंवा रात्री १०.०० वाजल्यानंतर आणि संबंधित प्राधिकाऱ्यांची लेखी परवानगी घेतली असल्याखेरीज वापर करू नये.

21) संबंधित प्राधिकाऱ्यांची पूर्व लेखी परवानगी घेतली असल्याखेरीज सार्वजनिक सभेच्या जागी किंवा मोर्चात ध्वनिवर्धकाचा वापर करू नये. सर्वसाधारणपणे अशा सभा/मोर्चे रात्री १०.०० वाजल्यानंतर चालू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात येणार नाही व याखेरीज ती स्थानिक कायदे, त्या क्षेत्रातील सुरक्षितेच्या आवश्यकतेच्या स्थानिक दृष्टिकोन आणि हवामान, सणासुदीचा मोसम, परीक्षेचा काळ याच्या अधिनतेने असतील.

चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांनी आज कोथरूडमधील शिवस्मारक येथे शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन

पुणे, २८ : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंतीनिमित्त आज सर्वत्र जन्मोत्सव साजरा केला जात आहे. यानिमित्त उच्च व तंत्र मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोथरूडमधील शिवस्मारक येथे शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी मुरलीधर मोहोळ देखील उपस्थित होते.

तिथीनुसार आज सर्वत्र शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव साजरी केला जात आहे. चंद्रकांत पाटील यांनी प्रथम आपल्या कोथरूडमधील निवासस्थानी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर कोथरूडमधील शिवस्मारक येथे शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

मुरलीधर मोहोळ यांनी देखील चंद्रकांत पाटील यांच्या समवेत अखंड हिंदुस्थानचे प्रेरणास्त्रोत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कोथरुड येथील अश्वारुढ पुतळ्यास अभिवादन केले.

दरम्यान पुणे येथील महापालिकेचे माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या नेतृत्वाखालील सम्राट ग्रुप ने शिवजयंती उत्सव धुमधडाक्यात साजरा केला ज्यास असंख्य मान्यवरांनी भेट दिली .

नागरिकांनी मताधिकाराचा वापर करावा-दादासाहेब गीते

पुणे, दि.२८: राज्यघटनेने १८ वर्षावरील भारतीय नागरिकाला लोकशाही प्रक्रियेमध्ये मतदानाचा अधिकार दिलेला आहे. या अधिकाराचा वापर करत अधिकाधिक नागरिकांनी लोकसभा निवडणुकीत मतदान करावे,असे आवाहन शिवाजीनगर मतदार संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब गीते यांनी केले.

पंडित नेहरू सांस्कृतिक भवन येथे मतदार जनजागृतीकरिता शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या व महिला बचत गटांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी अतिरिक्त सहायक मतदार नोंदणी अधिकारी रवी खंदारे, निवडणूक नायब तहसीलदार सायली धस, स्वीप समितीचे राजेंद्र मोरे, पांडुरंग महाडिक,दीपक कदम, सागर काशीद, डॉ. प्रभाकर वराडे, डॉ. नंदकुमार बोराडे,महेश मिस्त्री उपस्थित होते.

श्री.गीते यांनी भारत निवडणूक आयोगाच्या सीव्हीजील , मतदार नोंदणी करता व्होटर हेल्पलाइन, दिव्यांगांसाठी सक्षम, उमेदवारांच्या माहितीकरीत केवायसी अशा विविध मोबाईल ॲपबाबत माहिती दिली. स्वीपच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या मतदार जनजागृतीमुळे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

  यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी योगा प्रात्यक्षिक, पथनाट्य सादरीकरणासह 'माझे मत माझा अधिकार' या विषयावर मनोगत व्यक्त केले. 

कार्यक्रमाला शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी व महिला बचत गट सदस्य उपस्थित होते.

पालकसभेत मतदान जनजागृती

      मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाअंतर्गत रामोशी वाडी येथील अंगणवाडी क्रमांक ६ येथे पालकसभेत  मतदान प्रक्रियेची माहिती देण्यात आली.   

यावेळी पालकांना मतदान प्रक्रियेविषयी मार्गदर्शन करुन मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले. यावेळी सहायक निवडणूक अधिकारी दादासाहेब गीते, नायब तहसीलदार सायली धस आदी उपस्थित होते.

पारंपरिक पालखी रथसोहळा व मिरवणुकीद्वारे पूर्व भागात शिवरायांना नमन

गुरुवार पेठेत प्रभात मित्र मंडळतर्फे शिवजयंती उत्सव ; श्री धाम वृंदावन येथील अखिल भारतीय साध्वी शक्ती परिषदेच्या केंद्रीय महामंत्री पू. साध्वी डॉ. प्रज्ञा भारती, रा.स्व.संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक सुरेश उर्फ नानासाहेब जाधव यांची प्रमुख उपस्थिती
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांची रथावर विराजमान झालेली सिंहासनाधिष्ठीत मूर्ती… शिवछत्रपतींची प्रतिमा पालखी रथात ठेऊन केलेले पूजन…रांगोळीच्या पायघड्या व फुलांची उधळण…पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिला… ढोल-ताशांचा गजर व शंख निनाद आणि मर्दानी खेळांचे सादरीकरण… अशा शिवमय झालेल्या वातावरणात शहराच्या पूर्व भागातील सर्वात मोठा शिवजयंती सोहळा उत्साहात पार पडला. गुरुवार पेठेतील प्रभात मित्र मंडळातर्फे आयोजित शिवजयंती उत्सवात पारंपरिक पालखी सोहळा हे यंदाचे मुख्य आकर्षण ठरले.
यावेळी श्री धाम वृंदावन येथील अखिल भारतीय साध्वी शक्ती परिषदेच्या केंद्रीय महामंत्री पू.साध्वी प्रज्ञा भारती, रा.स्व. संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक सुरेश उर्फ नानासाहेब जाधव, मंडळाचे अध्यक्ष किशोर चव्हाण, सचिव उदय वाडेकर, रवींद्र भन्साळी, संदीप नाकील, मंगेश शिंदे, उत्सव प्रमुख शिवराज बलकवडे, विजय चौधरी, ओंकार नाईक, हेमराज साळुंखे, सचिन भोसले, निलेश कांबळे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. शिवजयंती उत्सवाचे यंदा ४० वे वर्ष आहे. पू.साध्वी प्रज्ञा भारती म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला, तेव्हा सनातन चा संस्कार संकटात होता. सनातन संस्कृतीच्या रक्षणार्थ त्यांनी पाऊल उचलले. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे देखील संरक्षण केले. लहानपणापासून मिळालेल्या संस्कारांनी शिवरायांना घडविले. 
नानासाहेब जाधव म्हणाले, राष्ट्रभक्ती, देशप्रेम छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेत निर्माण केले. शिवजयंती साजरी करताना आपल्या देखील काही जबाबदाऱ्या आहेत. आजही देशाचे तुकडे व्हावे, असा विचार करणारे काही जण आहेत. त्यांना तोंड देण्यासाठी आपण सिद्ध राहायला हवे. 
सुरुवातीला शिवप्रतिमेचे पूजन पू.साध्वी प्रज्ञा भारती यांच्या हस्ते झाले. त्यानंतर फुलांची उधळण करीत स्थानिक महिला व कार्यकर्त्यांनी मिरवणुकीचेस्वागत केले. यावेळी विनोद आढाव यांच्या कसबा पेठेतील त्र्यंबकेश्वर मर्दानी आखाडा मधील कलाकारांनी सादर केलेले मर्दानी खेळ पाहण्याकरीता पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती. तसेच केशव शंखनाद पथक, श्री गजलक्ष्मी ढोल-ताशा पथक व सोलापूर टेंभूर्णी येथील ओम श्री हलगी पथकाच्या तालावर उपस्थितांनी ठेका धरला. यावेळी वेडात दौडले वीर मराठे सात या स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या बलिदानावर आधारित जीवंत देखावा देखील सादर करण्यात आला. किशोर चव्हाण म्हणाले, सार्वजनिक स्वरुपात शिवजयंती उत्साहात साजरी व्हायलाच हवी. मात्र, घराघरात शिवजयंती साजरी व्हावी, याकरीता मंडळ प्रयत्न करीत आहे. प्रत्यक्ष शिवजयंतीच्या दिवशी पारंपारिक पध्दतीने शिवजयंती साजरी होईल व घरोघरी शिवचरित्राचे वाचन होईल यासाठी मंडळाच्या माध्यमातून जागृती करण्यात येत आहे. याशिवाय परिसरातील नागरिकांकरिता विविध स्पर्धांसारखे उपक्रम देखील राबविण्यात आले आहेत.

पुणे येथे ऑनलाईन निवडणूक निधी व्यवस्थापन प्रणालीबाबत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आणि स्टेट बँकेदरम्यान करार

पुणे, दि. २८: राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक निधीची ऑनलाईन पद्धतीने हाताळणी, तसेच सर्व व्यवहारांमध्ये पारदर्शकता, गतिमानता, अचूकता आणण्यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने विकसित केलेल्या ‘ऑनलाईन निवडणूक निधी व्यवस्थापन प्रणाली’ संदर्भांत भारतीय स्टेट बँक आणि राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य यांच्यामध्ये करारनामा आज करण्यात आला.

निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांच्या उपस्थितीत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्यावतीने सचिव वसंत पाटील आणि भारतीय स्टेट बँकेच्यावतीने उपमहाव्यवस्थापक नवीन मिश्रा यांनी स्वाक्षरी केली. या संगणक प्रणालीच्या विकसनाचा, अंमलबजावणीचा आणि देखभालीचा संपूर्ण खर्च भारतीय स्टेट बँकेने उचललेला आहे.

जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी आणि तालुका अथवा प्रभाग सहकारी निवडणूक अधिकारी यांच्या बँक खात्यावर सहकारी संस्थांचा निवडणूक निधी जमा होणे, त्याचे संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांना वेळोवेळी आवश्यकतेनुसार वितरण होणे आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक कार्यक्रम राबविण्याकरीता निधीचा खर्च करणे, तसेच निवडणूक खर्च प्रस्ताव मान्यतेसाठी सादर होणे व मंजुरी प्राधिकारी यांनी त्याबाबत निर्णय घेणे या सर्व टप्प्यांचे केंद्रीभूत पद्धतीने सनियंत्रण करण्याच्या उद्देशाने सर्वसमावेशक अशी ‘निवडणूक निधी व्यवस्थापन पोर्टल’ ही संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणावर राज्यातील २५० व त्यापेक्षा कमी सभासद असणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्था वगळता अन्य सहकारी गृहनिर्माण संस्था आणि राज्यातील सर्व सहकारी संस्था, कृषि उत्पन्न बाजार समिती यांच्या निवडणुकांमध्ये मतदार याद्यांचे अधिक्षण, निर्देशन व नियंत्रण करणे व अशा सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यादृष्टीने प्राधिकरणाने ही प्रणाली विकसित केली आहे.

या प्रणालीमुळे निवडणूक निधीचे सर्व व्यवहार रोखीने करण्याऐवजी डिजिटल व्यवहार करण्याचे सर्व फायदे प्राप्त होणार असून सर्व  व्यवहारांमध्ये पारदर्शकता, गतिमानता, अचूकता आणण्यासाठी मदत होणार आहे. निवडणूक कार्यक्रमांची अंमलबजावणी परिणामकारकरित्या व प्रभावी व्हावी यासाठी राज्यातील जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी आणि तालुका अथवा प्रभाग सहकारी निवडणूक अधिकारी आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कामकाजावर सनियंत्रण ठेवता येणार आहे.

जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी आणि तालुका अथवा प्रभाग सहकारी निवडणूक अधिकारी यांच्याकडील खात्यामध्ये जमा होणाऱ्या निवडणूक निधीची संस्थानिहाय जमा-खर्च ताळमेळ ठेवणे सुकर होणार आहे. तसेच हा निधी विहित केलेल्या दराने जमा करण्यात आला आहे किंवा कसे याबाबत पडताळणी करणे सोयीस्कर होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विहित केलेल्या निवडणूक खर्चाची बाबवार खतावणी ऑनलाईन उपलब्ध राहणार आहे. निवडणूकीनंतर निवडणूक खर्चास मान्यता प्राप्त करुन घेण्याचा प्रस्ताव बिनचूक आणि मुदतीत सादर करण्यास मदत होणार आहे.

ऑनलाईन पद्धतीने विविध प्रकारचे डॅशबोर्ड्स, नियमित सूचना तसेच आवश्यकतेनुसार विविध रिपोर्टस् उपलब्ध राहणार आहेत. निवडणूक खर्चाच्या प्रस्तावांचा निवडणूक निर्णय अधिकारी निहाय ताळमेळ घेणे आणि निवडणूक खर्चास मान्यता देणे या बाबींचे संनियंत्रण सुकर होणार आहे.

कोणत्या संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्यात आलेल्या आहेत आणि त्यांचे संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक खर्चाच्या हिशोबाच्या प्रस्तावास मान्यता घेतली आहे किंवा कसे याची सातत्याने पडताळणी घेणे, कनिष्ठ कार्यालयाने कार्यवाही मुदतीत न केल्यास त्याबाबत त्यांचे संबंधित वरिष्ठ कार्यालय प्रमुखांना संगणक प्रणालीच्या माध्यमातून नियमित ॲलर्टस जाणे शक्य होणार आहे, असेही राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून कळविण्यात आले आहे.

रामटेकच्या काँग्रेस उमेदवाराचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याची कारवाई राजकीय द्वेषातून: नाना पटोले.

स्वयंघोषीत विश्वगुरूच्या पक्षावर दुसऱ्या पक्षातील उमेदवार आयात करण्याची वेळ.

मुंबई, दि. २८ मार्च
लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव होणार असल्याचे चित्र देशात आहे. या पराभवाच्या भितीने भाजपाला ग्रासले असून त्याच भितीतून ते विरोधी पक्षांच्या विरोधात षडयंत्र करत आहेत. रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याची कारवाई ही राजकीय सुडबुद्धीतून केलेली आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

गोंदियामध्ये पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, रामटेक मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले असले तरी घाबरण्याचे कारण नाही, काँग्रेस पक्षाने त्या मतदारसंघात दुसरा अर्ज आधीच दाखल केलेला आहे. परंतु भारतीय जनता पक्ष घाबरलेला असून ते खालच्या पातळीवरचे राजकारण करत आहेत. स्वाभाविक आहे की सत्तेतून बाहेर जाण्याची भिती भाजपाला सतावत असल्याने अशा प्रकाराचे राजकारण ते करत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली तर शिवसेनेचे उमेदवार अमोल किर्तीकर यांना ईडीने नोटीस पाठवली, हे सर्व प्रकार पराभवाच्या मानसिकतेतून विरोधी पक्षांची मुस्कटदाबी करण्यासाठी भाजपा करत आहे.

भारतीय जनता पक्ष जगातील सर्वात मोठा पक्ष व त्यांच्या पक्षाचे स्वयंघोषीत विश्वगुरू असतानाही भारतीय जनता पक्षाकडे निवडणुक लढवण्यालाठी उमेदवारही नाहीत. भाजपाला दुसऱ्या पक्षातून उमेदवार आयात करावे लागत आहेत त्यामुळे ४०० पारच्या घोषणा पोकळ आहेत हे स्पष्ट दिसत आहे. भाजपाने १० वर्षात देशाची बरबादी केली, जाती-धर्मामध्ये वाद लावले, देशाला व जनतेला आर्थिक कमजोर केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान संपवण्याचे काम भाजपा करत आहे, त्यामुळे त्यांना सत्तेतून बाहेर जावे लागेल आणि जनता जनार्दनच भाजपला इंगा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून आदर्श आचारसंहितेचा भंग, तात्काळ कारवाई करावी: अतुल लोंढे.

खासदार नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणी चंद्रशेखर बावनकुळेंकडून न्यायालयाचा अवमान आणि जनतेची दिशाभूल

नवनीत राणांचे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ठ असताना निकाल लागल्याचा बावनकुळेंचा दावा.

मुंबई, दि. २८ मार्च.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केला असून निवडणुक आयोगाने त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचे प्रकरण सुप्रीम कोर्टात अद्याप प्रलंबित आहे, त्याचा निकाल लागलेला नाही असे असताना बावनकुळे यांनी निकाल लागला असल्याचा दावा करुन मा. न्यायालयाचा अवमान केला आहे, हा गंभीर गुन्हा असून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

यासंदर्भात काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिका-यांकडे लेखी तक्रार केली असून या तक्रारीत असे म्हटले आहे की, २८ मार्च २०२४ रोजी खासदार नवनीत राणा यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी, सुप्रीम कोर्टाने खासदार नवनीन राणा प्रकरणी निर्णय दिलेला आहे, अशा प्रकारचा चुकीचा व दिशाभूल करणारा खोटा दावा केला आहे. अशा पद्धतीचे विधान जाणीवपूर्वक करुन खोटी माहिती पसरवली जात आहे, हा प्रकार मतदारांवर प्रभाव टाकण्यारा आहे तसेच आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असून भारतीय दंड संहिते अंतर्गत गुन्हा आहे, असेही अतुल लोंढे म्हणाले.

नवनीत राणा या अमरावती लोकसभा मतदारसंघातून २०१९ च्या निवडणुकीत विजयी झाल्या, अमरावतीची जागा अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव आहे. या मतदारसंघातून विजयी झालेल्या नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र मा. मुंबई हायकोर्टाने २०२१ मध्ये रद्द ठरवत दोन लाखांचा दंडही ठोठावला आहे. त्यानंतर नवनीत राणा यांनी हायकोर्टाच्या निर्णयाला मा. सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. २८ फेब्रुवारी २०२४ च्या सुनावणीनंतर मा. सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवलेला आहे, असे असतानाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी निकाल लागलेला आहे, असे खोटे सांगून जनतेची दिशाभूल केली आहे, असा आरोप अतुल लोंढे यांनी केला आहे.

कॉंग्रेसचे माजी खासदार अभिनेते गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश,ठाकरेंच्या शिवसेना उमेदवाराला पाडण्यासाठी

या पूर्वी कॉंग्रेसमधून लढून भाजपच्या राम नाईकांचा केला होता पराभव

मुंबई-सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता,कॉंग्रेसचे माजी खासदार गोविंदाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत गुरुवारी सायंकाळी प्रवेश केला. २००४ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेच्या रिंगणात उतरलेले अभिनेते गोविंदा यांनी भाजपचे केंद्रीय मंत्रिपद भूषवलेल्या राम नाईक यांनी ५ वेळा जिंकलेला भाजपाचा राखलेला गड खालसा केला होता. जवळपास ५० हजारांचं मताधिक्य मिळवत गोविंदा यांनी राम नाईक यांचा पराभव केला होता. नाईकांना ५ लाख ११ हजार ४९२, तर गोविंदा यांना ५ लाख ५९ हजार ७६३ मतं मिळाली होती.

उत्तर पश्चिम मतदारसंघासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी दिली आहे. त्याच वेळी त्यांच्याविरोधात महायुतीकडून कोणत्याही उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नव्हती. अखेर आज गोविंदाने बाळासाहेब भवन येथे शिंदे गटात प्रवेश करून उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढण्याचे संकेत दिले.