श्री शिवाजी मराठा सोसायटी इन्स्टिटयुट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च
पुणे: श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या इन्स्टिटयुट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्चमध्ये वार्षिक स्नेह संम्मेलन व पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. जी 20 समिटमध्ये सहभागी झाल्याबद्दल कावेरी बिराजदार या विद्यार्थीनीचा विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून जेष्ठ इतिहास अभ्यासक अॅड. डॉ . श्रीमंत शिवाजी कोकाटे उपस्थित होते. संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र जगताप यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. मानद सहसचिव विकास गोगावले, खजिनदार जगदीश जेधे सत्येंद्र कांचन, विलास गव्हाणे, गंगाधरराव घारे, तानाजी घारे, रघुनंदन जाधव, संताजी जेधे, डॉ. सुनील जगताप, बाळकृष्ण पाटील, प्रदीप उरसळ, अशोक शिंदे यावेळी उपस्थित होते.
प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात विविध कलागुणांचे सादरीकरण केले. सर्व प्रमुख अतिथींचे इन्स्टिट्यूटच्या प्रभारी संचालिका डॉ. प्राजक्ता वराळे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. सहाय्यक प्राध्यापिका सई जेधे यांनी आभार व्यक्त केले
गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न
Date: