पुणे, २८ : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंतीनिमित्त आज सर्वत्र जन्मोत्सव साजरा केला जात आहे. यानिमित्त उच्च व तंत्र मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोथरूडमधील शिवस्मारक येथे शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी मुरलीधर मोहोळ देखील उपस्थित होते.
तिथीनुसार आज सर्वत्र शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव साजरी केला जात आहे. चंद्रकांत पाटील यांनी प्रथम आपल्या कोथरूडमधील निवासस्थानी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर कोथरूडमधील शिवस्मारक येथे शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मुरलीधर मोहोळ यांनी देखील चंद्रकांत पाटील यांच्या समवेत अखंड हिंदुस्थानचे प्रेरणास्त्रोत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कोथरुड येथील अश्वारुढ पुतळ्यास अभिवादन केले.
दरम्यान पुणे येथील महापालिकेचे माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या नेतृत्वाखालील सम्राट ग्रुप ने शिवजयंती उत्सव धुमधडाक्यात साजरा केला ज्यास असंख्य मान्यवरांनी भेट दिली .