पुणे- दिल्लीत उदयनराजेंना रांगेत ,प्रतीक्षेत ताटकळत ठेवणे म्हणजे छत्रपतींच्या गादीचा अपमान भाजप करत आहे. राजकारणात यांना छत्रपतींचे नाव लागते, आणि निवडणुकीत पहिल्या यादीत या गादीचे वारसदार उदयन राजेंचे नाव पाहिजे होते पण भाजप मराठी माणसाच्या अपमानाचे राजकारण सुडाचे राजकारण करत आहे असा आरोप आज येथे खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.
भाजपला बेरोजगारीचे प्रश्न सोडवायचे नाहीत , महागाई कमी करायची नाही. गरिबाला मदत करायची नाही ,दुष्काळ तीव्र आहे, पाणी प्रश्न सतावतो आहे पण भाजप पक्ष फोडातोडीकडे लक्ष देत आहे. शरद पवारांना संपविण्यासाठी भाजप महाराष्ट्रात राजकारण करत आहे.जे जे विरोधात आहेत त्यांना जेलमध्ये टाकायचे नाही तर भाजपात घ्यायचे असा भाजपचा मार्ग देशाला दडपशाहीकडे नेणारा मार्ग आहे. असेही ते म्हणाले.