पुणे -शहर जिल्हा काँग्रेस कमिटी पुणे लोकसभा निवडणुक २०२४ साठी सोशल मिडियाच्या प्रमुख पदी गुलामहुसेन हमीद खान आणि प्रेस मिडिया प्रमुख पदी राज अंबिके यांची नियुक्ती करण्यात आली. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या हस्ते काँग्रेस भवन येथे नियुक्ती पत्र देण्यात आले.
गुलामहुसेन खान (मो. 9604777786) हे पुणे शहर काँग्रेस कमिटीचे सोशल मिडिया अध्यक्ष असून सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांचे पक्षकार्य अविरत सुरू आहे. त्याचबरोबर राज अंबिके (मो. 9822085485) हे काँग्रेस पक्षाचे गेली २० वर्षांपासून काम करीत आहेत. त्यांनी आत्तापर्यंत NSUI प्रदेश सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस प्रवक्ते पदी काम केले आहे त्यामुळे पक्ष संघटनेचा त्यांना दांडगा अनुभव आहे.
यावेळी शहर उपाध्यक्ष राजेंद्र भुतडा, हेमंत राजभोज, अजित जाधव, पप्पु सुर्यवंशी, रवि आरडे, मुन्ना खंडेलवाल आदी उपस्थित होते.