गुरुग्राम, २८ मार्च २०२४ – होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (एचएमएसआय) या देशातील आघाडीच्या दुचाकी उत्पादक कंपनीने आपल्या प्रवासाताली एक लक्षणीय टप्पा गाठल्याचे जाहीर केले आहे. कंपनीने भारतात ६ कोटी देशांतर्गत विक्रीचा पार करून ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
ही विलक्षण कामगिरी भारतीय बाजारपेठेप्रती एचएमएसआयची बांधिलकी दर्शवणारी आहे.
२००१ मध्ये एचएमएसआयने आपली पहिली दुचाकी – अॅक्टिव्हासह भारतात प्रवेश केला आणि पुढे काय घडलं तो इतिहास आहे! इतक्या वर्षांत होंडाच्या अक्टिव्हा ब्रँडने कित्येक विक्रमी टप्पे पार केले आणि आजही ती देशातील सर्वात लोकप्रिय दुचाकी आहे. स्थापनेपासून एचएमएसआय नाविन्य, दर्जा आणि ग्राहकांना समाधान देण्याच्या बाबतीत आघाडीवर असून भारतीय ग्राहकांच्या गरजा वैविध्यपूर्ण गरजा पूर्ण करण्यासाठी सातत्याने जागतिक दर्जाची उत्पादने पुरवत आहे.
६ कोटींचे बळ – भारतीय ग्राहकांचा विश्वास मिळवतानाचा होंडाचा प्रवास
जून २००१ पासून रिटेल कामकाजाची सुरुवात करत होंडाने भारतीय ग्राहकांना सलग दोन दशके आनंद दिला आहे. पहिले १ कोटी ग्राहक मिळवण्यासाठी कंपनीला ११ वर्ष लागली, मात्र त्यानंतर वेग तिप्पट झाला आणि कंपनीने दोन कोटींचा टप्पा केवळ तीन वर्षांत पार केला. ३ कोटींचा टप्पा एप्रिल २०१७ मध्ये आणि स्थापनेपासून १६ वर्षांत पूर्ण केला गेला, मात्र पुढील ३ कोटी ग्राहक केवळ सात वर्षांत होंडाच्या परिवारात सामील झाले आणि मार्च २०२४ मध्ये देशांर्तंगत विक्रीचा ६ कोटींचा टप्पा गाठला गेला.
या विक्रमी कामगिरीमध्ये होंडाची अॅक्टिव्हा – भारतातील सर्वात लोकप्रिय कौटुंबिक स्कूटर आणि द शाइन मोटरसायकल या उत्पादनांचा महत्त्वाचा टप्पा आहे. विश्वासार्हता, कामगिरी आणि आधुनिक वैशिष्ट्ये यांसाठी प्रसिद्ध असलेल्या अॅक्टिव्हा आणि शाइनला भारतीय ग्राहकांची सर्वाधिक पसंती असते. या क्षेत्रात नवे मापदंड प्रस्थापित करत त्यांनी एचएमएसआयच्या यशात मोठे योगदान दिले आहे.
या ऐतिहासिक कामगिरीविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी – श्री. त्सुत्सुमु ओतानी म्हणाले, ‘एचएमएसआयमध्ये आता सहा कोटी ग्राहकांचा समावेश झाला आहे. विक्रीचा हा टप्पा भारतीय ग्राहकांना होंडा ब्रँडवर असलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे. आम्हाला या कामगिरीचा अतिशय अभिमान वाटतो आणि ग्राहकांच्या अपेक्षा भरभरून पूर्ण करण्यासाठी व भारतीय दुचाकी क्षेत्राच्या विकासासाठी आम्ही बांधील आहोत.’
या लक्षणीय कामगिरीविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. चे विक्री आणि विपणन विभागाचे संचालक श्री. योगेश माथुर म्हणाले, ‘एचएमएसआयने देशांतर्गत विक्रीत ६ कोटींचा टप्पा गाठल्याचे जाहीर करताना आम्हाला अतिशय आनंद वाटत आहे. या प्रवासात साथ देणारे आमचे निष्ठावान ग्राहक, भागीदार आणि समभागधारकांप्रती आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो.’
वैविध्यपूर्ण उत्पादन श्रेणी – १०० सीसी शाइन ते प्रमुख उत्पादन १८०० सीसी गोल्ड विंग टुर
– १०० सीसी शाइन ते प्रमुख उत्पादन असलेल्या १८०० सीसी गोल्ड विंग टुरपर्यंत वैविध्यपूर्ण उत्पादनांचा समावेश असलेली श्रेणी असलेली होंडा ही भारतातील एकमेव दुचाकी उत्पादक आहे. कंपनीच्या रेड विंग उत्पादन श्रेणीमध्ये चार स्कूटर मॉडेल्स (अॅक्टिव्हा आणि ११० सीसी डिओ, अॅक्टिव्हा १२५ आणि डिओ १२५, १२५ श्रेणी) यांचा समावेश होतो. मोटरसायकल विभागात कंपनीद्वारे नऊ आकर्षक मॉडेल्स उपलब्ध करण्यात आली असून त्यात १००- ११० सीसी (शाइन १००, ११० ड्रीम डिलक्स आणि लिवो), १२५ सीसी (शाइन १२५ आणि सपी १२५), १६० सीसी (युनिकॉर्न आणि एसपी१६०) आणि १८०-२०० सीसी (हॉर्नेट २.० आणि सीबी२००एक्स) विभाग आणि इतर स्पेशल एडिशन्सचा समावेश आहे.
एचएमएसआयच्या प्रीमियम मोटरसायकल रिटेल फॉरमऍटमध्ये संपूर्ण प्रीमियम मोटरसायकल श्रेणी (३०० सीसी ते १८०० सीसी) बिगविंग टॉपलाइन अंतर्गत हाताळली जाते, तर आघाडीची शहरे आणि बिगविंग मध्यम आकाराच्या विभागाचे (३०० सीसी- ५०० सीसी) कामकाज सांभाळते. कंपनीच्या वैविध्यपूर्ण मोटरसायकल्समध्ये नवी CB350, H’ness CB350, CB350RS, CB300F, CB300R, NX500, XL750 ट्रान्सल्प, आफ्रिका ट्विन आणि गोल्ड विंग टुर यांचा समावेश आहे.
ग्राहकांना आनंद देण्याचा एचएमएसआयचा दोन दशकांपेक्षा जास्त काळाचा प्रवास
वर्ष | विक्रमी टप्पा |
1999 | – होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. (एचएमएसआय) ची स्थापना |
2001 | – मानेसर येथील पहिल्य प्लांटमधून उत्पादन सुरू. पहिले मॉडेल अॅक्टिव्हाचे पर्दापण |
2002 | – भारतातून होंडाची निर्यात सुरू |
2004 | – मोटरसायकल बाजारपेठेत १५० सीसी युनिकॉर्नसह प्रवेश- अॅक्टिव्हाच्या आघाडीसह पहिल्या क्रमांकावर |
2006 | – १२५ सीसी शाइनच्या लाँचसह मोटरसायकल क्षेत्रात वैविध्यपूर्ण विस्तार |
2009 | – इक्विलायझर तंत्रज्ञानासह कॉम्बी- ब्रेक यंत्रणेची सुरुवात – क्षेत्रात पहिल्यांदाच |
2011 | – तापुकारा (राजस्थान) येथे दुसऱ्या उत्पादन कारखान्याचे उद्घाटन |
2012 | – एकत्रित देशांतर्गत विक्रीचा १ कोटीचा टप्पा पार– दुचाकी क्षेत्रातील एकमेव होंडा- सर्वसमावेश एसईडीबीक्यू सुविधेसह नव्या टेक्निकल केंद्राचे उद्घाटन |
2013 | – नरसापुरा (कर्नाटक) येथे तिसऱ्या प्लांटचे उद्घाटन- सुधारित मायलेजसाठी नवे होंडा इको तंत्रज्ञान (एचईटी) |
2014 | – नरसापुरा (कर्नाटक) येथे तिसऱ्या प्लांटचे उद्घाटन- होंडा गोल्ड विंग – भारतात GL1800 लाँच |
2015 | – भारतात २ कोटी देशांतर्गत विक्रीचा टप्पा पार– CBR 650F ही पहिली भारतीय बनावटीची बाइक लाँच |
2016 | – विठलापूर (गुजरात) येथे चौथ्या उत्पादन प्लांटचे उद्घाटन |
2017 | – देशांतर्गत विक्रीचा ३ कोटींचा टप्पा पार– तिसऱ्या उत्पादन प्लांटमधील क्षमतेचा विस्तार- प्रसिद्ध अॅक्टिव्हा बनली भारतातील पहिल्या क्रमांकाची दुचाकी |
2018 | – देशांतर्गत विक्रीचा ऐतिहासिक ४ कोटींचा टप्पा पार– गुजरातमधील होंडाच्या विठलापर प्लँटमध्ये ६.३ अब्ज रुपयांची गुंतवणूक- या क्षेत्रातील पहिला १००टक्के डिजिटल कस्टमर लॉयल्टी प्रोग्रॅम ‘होंडा जॉय क्लब’ लाँच |
2019 | – भारतात एक्सक्लुसिव्ह प्रीमियम बिग बाइक व्यवसाय विभागाची स्थापना- नव्या अॅक्टिव्हा १२५ सह होंडाचा बीएसव्हीआय पर्वाची हरित |
2020 | – ऑनलाइन बुकिंग प्लॅटफॉर्म – क्लिक, बुक अँड रिलॅक्स लाँच- मिड- साइज ३५० सीसी मोटरसायकल क्षेत्रात दमदार प्रवेश – H’ness CB350 चे जागतिक स्तरावर अनावरण |
2021 | – भारतात ५ कोटी देशांतर्गत विक्रीचा टप्पा पार– नव्या परदेशी व्यवसाय विस्तार व्यवसाय विभागासह ‘मेकिंग इन इंडिया फॉर द वर्ल्ड’मध्ये दमदार प्रवेशाची घोषणा– ग्राहकांसाठी इमरसिव्ह डिजिटल सुविधा लाँच, प्रीमियम मोटरसायकल विभागातील पहिल्या व्हर्च्युअल दालनाचे लाँच |
2022 | – एक कोटी ग्राहकांचा विक्रमी टप्पा गाठणारी ‘शाइन’ ही पहिली १२५ सीसी मोटरसायकल |
2023 | – शाइन १०० सह एंट्री लेवल १०० सी कम्युटर मोटरसायकल क्षेत्रात प्रवेश- भारतातील सर्वाधिक खपाच्या अॅक्टिव्हाने साजरा केला तीन कोटी विक्रीचा टप्पा |
2024 | – विठलापूर (गुजरात) येथील चौथ्या उत्पादन प्लँटमध्ये नव्या असेंब्ली लाइनसह क्षमता विस्तार– एचएमएसआयतर्फे भारतात देशांतर्गत ६ कोटी विक्रीचा टप्पा पार |