Home Blog Page 1087

अमेरिकेतील शेणॉय दाम्पत्याकडूनविद्यार्थी सहाय्यक समितीला एक कोटी

पुणे : अमेरिकेतील सुनील आणि साधना शेणॉय दाम्पत्याकडून विद्यार्थी साहाय्यक समितीच्या ‘एफसीआरए’ (विदेशी योगदान नियमन कायदा) खात्यात एक लाख १५ हजार डॉलर म्हणजेच ९५ लाख २५ हजार रुपयांची देणगी जमा केली. गेल्या वर्षी त्यांनी ६२०० डॉलर पाठवले होते. एक फेसबुक पोस्ट वाचनात आली अन या दाम्पत्याने चौकशी करत माहिती घेत, समितीत येऊन देणगी द्यायला सुरुवात केली.

शेणॉय कुटुंबीय समितीचे विश्वस्त डॉ. मकरंद फडके यांचे फेसबुक फ्रेंड आहेत. डॉ. फडके यांच्या फेसबुक पोस्टवरून त्यांना समितीच्या कार्याविषयीची माहिती मिळाली. त्या पोस्टला प्रतिसाद म्हणून त्यांनी प्रथम ६२०० डॉलर पाठवले होते. गेल्या जानेवारीमध्ये शेणॉय कुटुंबीयांनी पुण्यातील मुलींच्या नवीन वसतिगृह बांधकामाला भेट दिली. त्यावेळी त्यांना समिती कार्याची विस्तृत माहिती मिळाली. समितीचे सेवाभावी काम पाहून ते प्रभावित झाले व आणखी एक लाख डॉलर देण्याचा मानस व्यक्त केला. प्रत्यक्षात काल १ लाख १५ हजार डॉलर पाठवले.

“सोशल मीडियाच्या माध्यमातून समितीला एवढी मोठी मदत (अंदाजे १ कोटी रु) मिळाली, याचे समाधान आहे. जेव्हा आपले काम प्रामाणिक, पारदर्शी आणि समाजाभिमुख असते; तेव्हा समाजाचा त्यावर विश्वास दृढ होतो आणि सढळ हाताने देणगी येते. ही त्याची पावतीच आहे. साधना व सुनील शेणॉय आणि डॉ. मकरंद फडके यांच्याप्रती समिती परिवार ऋणी आहे,” असे विश्वस्त तुकाराम गायकवाड यांनी नमूद केले.

काँग्रेसमुळेच पुणे शहराला आले भरभराटीचे स्वरूप – रवींद्र धंगेकर

पुणे-काँग्रेस पक्षाच्या राजवटीतच पुणे शहराला उद्योगनगरी, क्रीडानगरी,आयटीनगरी, उद्याननगरी, महोत्सवाची नगरी असे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यातून पुणे शहराला भरभराटीचे स्वरूप आले आहे. लाखो तरुण व महिलांना चांगला रोजगार येथे निर्माण झाला. त्यामुळेच पुणे शहराच्या विकासात काँग्रेसचे योगदान अमूल्य आहे याची जाणीव सर्वसामान्य पुणेकर नागरिकांना आहे. म्हणून ते या लोकसभा निवडणुकीत  महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास पुण्यातील महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केला.

या प्रसंगी पुणे लोकसभा निवडणूक प्रचारप्रमुख व माजी आमदार मोहन जोशी म्हणाले की, या निवडणुकीतील ही पहिलीच पदयात्रा असून नागरिकांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद उमेदवार रवींद्र धंगेकर यांना मिळत आहे. असेच वातावरण सर्व पुण्यात असून रवींद्र धंगेकर हे चांगल्या मताधिक्याने विजयी होतील याची प्रचीतीच या पदयात्रेला मिळत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादावरून दिसून येते.

निवडणूक  उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आज पासून लगेच धंगेकर यांनी पुणे शहरातील मतदारांच्या भेटीगाठीसाठी आपल्या धडाकेबाज पदयात्रांना प्रारंभ केला. आज कसबा विधान मतदार संघात ग्रामदैवत कसबा गणपतीची आरती करून त्यांची जीप यात्रा / पदयात्रा सुरु झाली व स. प. महाविद्यालय चौक येथे समाप्त झाली त्यानंतर ते बोलत होते.

पुण्यातून निवडून गेलेल्या काँग्रेसच्या सर्वच खासदारांनी प्रयत्नांची शिकस्त करून शहराच्या वैभवात भर घातली आहे याची जाणही पुणेकरांना आहे असे ते म्हणाले. आपणही अशीच दैदिप्यमान कामगिरी करून पुणेकरांचा विश्वास सार्थ ठरवू असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला.

प्रारंभी रवींद्र धंगेकर यांनी पुण्याचे ग्राम दैवत श्री. कसबा गणपतीचे दर्शन घेत आरती केली. ढोलताशांचा गजर, रविंद्र धंगेकर यांच्या विजयाच्या घोषणा व फटाक्यांची आतषबाजी, ठिकठिकाणी महिलांकडून धंगेकर यांचे औक्षण, पदयात्रेवर होणारी पृष्पवृष्टी, प्रत्येक घरांतून धंगेकर यांना हात दाखवून भाऊ विजय तुमचाच होणार, असा उत्स्फूर्त प्रतिसाद कसबा विधानसभा मतदार संघातील पदयात्रेत रविंद्र धंगेकर यांना मिळाला.

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व लोकसभा निवडणूक समन्वयक अरविंद शिंदे, पुणे लोकसभा निवडणूक प्रचारप्रमुख व माजी आमदार मोहन जोशी,  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख गजनान थरकुडे, माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे, माजी आमदार दीप्ती चवधरी,  डॉ. रोहित टिळक, ज्येष्ठ नेते रविंद्र माळवदकर संगिता तिवारी, निता परदेशी, नाना करपे, गौरव बोराडे, स्वाती शिंदे,  गोरख पळसकर, गणेश नलावडे, दीपक जगताप, रोहन पायगुडे, दीपक पोकळे, अजिंक्य पालकर, अप्पा जाधव,   आम आदमी पक्षाचे सुदर्शन जगदाळे, धनंजय बेनकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळी 8 वाजता पदयात्रेला सुरुवात झाली त्यांच्यासमवेत काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आम आदमी पार्टी आणि अन्य मित्र पक्षांचे प्रमुख पदाधिकार्‍यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुरुवातीला धंगेकर यांनी लाल महाल परिसर, शनिवार पेठ, नारायण पेठ, सदाशिव पेठेतील नागरिकांच्या भेटी घेतल्या. विविध ठिकाणी महिलांनी त्यांचे औक्षण केले. ठिकठिकाणी पाणी, लिंबू सरबत पदयात्रेतील सहभागींना देण्यात येते होते. फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे स्वागत करण्यात येते होते. केसरीवाड्यातील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन धंगेकर यांनी अभिवादन केले. त्यानंतर पदयात्रा पुढे जात असताना नागरिक धंगेकर यांचा जयजयकार करीत होते. ज्येष्ठ नेते बाळासाहेब दाभेकर यांनी धंगेकरांचे स्वागत केले. राजाराम गणेश मंडळाच्या श्रीचे दर्शन धंगेकरांनी घेतले तसेच कसबा विधानसभा मतदार संघातील विविध भागातील गणेश मंडळ तसेच सामाजिक संस्थेच्या वतीने रविंद्र धंगेकर यांचे स्वागत करण्यात आले.

लाल महाल-एच. व्ही. देसाई कॉलेज-कडबे आळी तालीम-हरिहरेश्वर मंडळ – वीर मारूती-आहिल्या देवी चौक-गाडगीळ निवास-मेहुणपुरा-मंदार लॉज – कन्या शाळा-बालविकास-सुयोग मंगल कार्यालय- शिंदे पार – रमणबाग शाळा – केसरी वाडा – माती गणपती – गोगटे शाळा – मोदी गणपती – बाळासाहेब दाभेकर यांचे कार्यालय – पत्र्या मारूती चौक – लोखंडे तालीम – कुंठे चौक – लक्ष्मी रोड – विजय टॉकीज चौक-  गरूड गणपती – जोंधळे चौक – कुमठेकर रोड – खालकर तालिम चौक – कुंजीर तालिम हौद – स्विट होम – श्री मिसळ – विष्णुप्रसाद सभागृह – रिध्दी सिध्दी गणपती – सावजी बिर्याणी – राजाराम मंडळ – ज्ञानप्रबोधीनी – निंबाळकर सायकल मार्ट – ब्राम्हण मंगल कार्यालय – नागनाथ पार – शनी पार – लक्ष्मीड्राय फ्रुट – सुजाता मस्तानी – खुन्या मुरलीधर चौक – शिवाजी मंदिर – पेरूगेट पोलीस चौकी – भावे हायस्कूल – हत्ती गणपती – दुर्वांकुर हॉटेल – महाराष्ट्र मंडळ – टिळक स्मारक मंदिर – शेडगे आळी – भरत नाट्य मंदिर – सहस्त्रबुध्दे दत्त मंदिर – चिमण्या गणपती – वंदे मातरम चौक – भिकारदास मारूती चौक – खजिना विहिर – एस.पी. कॉलेज चौक येथे पदयात्रेचा समारोप झाला.

पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपतीचा आशिर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात केली आहे. पुणे लोकसभा मतदार संघातील प्रत्येक विधानसभा मतदार संघासह कान्याकोपर्‍यातील मतदारांपर्यंत जाणार आहे. महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे सर्व मित्र पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांसह सर्वांचाच प्रचारात सहभाग आहे. नागरिकांडून मला प्रचंड प्रतिसाद मिळत असून माझा विजय निश्‍चत आहे. सध्या विरोधाकडून आचारसंहितेचा भंग केला जात आहे. अचारसंहितेचा भंग करण्यार्‍यावर कारवाई करण्यात यावी.

–  रविंद्र धंगेकर, (उमेदवार) महाविकास आघाडी व इंडिया आघाडी.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात दुपारी ५ वाजेपर्यंत ५४.८५ टक्के मतदान

मुंबई, दि.१९ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज दि. १९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत सरासरी ५४.८५  टक्के मतदान झाले आहे.

पहिल्या टप्प्यातील एकूण ५ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे –

रामटेक  ५२.३८ टक्के

नागपूर ४७.९१ टक्के

भंडारा- गोंदिया ५६.८७ टक्के

गडचिरोली- चिमूर ६४.९५ टक्के

आणि चंद्रपूर ५५.११ टक्के आहे.

खडकवासला विधानसभा मतदारसंघातील सहा कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित

पुणे: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कामकाजात टाळाटाळ केल्याप्रकरणी खडकवासला विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नियुक्त सहा कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय आसवले यांनी दिली आहे.

पुणे महानगरपालिकेच्या कै. ह. तू. थोरवे प्राथमिक विद्यालय शाळा क्र. १६२ बी व विद्या निकेतन १९ चंद्रभागनगर कात्रज या शाळेतील शिक्षकांना निवडणूक कामकाजाकरीता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून आदेश बजावण्यात आले होते. या कर्मचाऱ्यांनी वारंवार संधी देऊनही त्यांना नियुक्त केलेल्या भागाचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून आपले निवडणूक कर्तव्य पार पाडण्यात अक्षम्य दुर्लक्ष, कुचराई, दिरंगाई केल्याच्या कारणास्तव त्यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० कलम ३२ अन्वये निलंबनाची कारवाई प्रस्तावित करावी असे निर्देश पुणे महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. यापुढेही निवडणूक कामकाजात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यासह कडक कारवाई करण्यात येईल, असेही श्री. आसवले यांनी स्पष्ट केले आहे.

उमेदवारांच्या निवडणूक खर्चविषयक नोंदी काटेकोर ठेवा- निवडणूक खर्च निरीक्षक सुधांशू राय

0

पुणे: निवडणूक निर्णय अधिकारी तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय स्तरावर नियुक्त निवडणूक खर्च विषयक कक्षातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी विहित नमुन्यातील नोंदी तसेच उमेदवारांनी दिलेल्या खर्चाच्या माहितीच्या नोंदींची पडताळणी करावी आणि नोंदवह्या काटेकोरपणे अद्ययावत ठेवाव्यात, असे निर्देश मावळ लोकसभा विधानसभा मतदार संघासाठी नियुक्त निवडणूक खर्च निरीक्षक सुधांशू राय यांनी दिले.

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाकडून नियुक्त निवडणूक खर्च निरीक्षक श्री. राय यांनी आकुर्डी पुणे येथील पीएमआरडीए प्रशासकीय भवनातील मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास भेट देवून कामकाजाची माहिती घेतली, त्यावेळी राय बोलत होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये स्थापित करण्यात आलेल्या विविध कक्षांची माहिती दिली. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले, समन्वय अधिकारी प्रविण ठाकरे, हिम्मत खराडे आदी उपस्थित होते.

भारत निवडणूक आयोगाच्या निवडणूक खर्च संनियत्रण यावरील अनुदेशांचा सारसंग्रह मधील लेख्यांची तपासणी या तरतूदीनुसार उमेदवाराने ठेवलेल्या दैंनदिन खर्च विषयक लेख्यांची तपासणी करण्यात येत असते. त्या अनुषंगाने श्री. राय यांनी निवडणूक खर्च व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेवून विविध निर्देश दिले. निवडणूक खर्चाची नोंद योग्य पद्धतीने घेवून प्रत्येक नोंदी अद्ययावत ठेवाव्या, बँकांकडून प्राप्त झालेल्या तपशीलाची माहिती संकलीत करावी, विविध भरारी पथके सातत्याने कार्यान्वीत ठेवून प्रत्येक बाबीची बारकाईने तपासणी करावी, अशा सूचना राय यांनी यावेळी दिल्या.

श्री. राय यांनी मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील माध्यम कक्ष, एक खिडकी कक्ष, आचार संहिता कक्ष, निवडणूक खर्च व्यवस्थापन कक्ष, कायदा व सुव्यवस्था कक्ष, टपाली मतदान कक्ष अशा विविध कक्षामध्ये प्रत्यक्ष भेट देवून येथील कामकाजाची माहिती घेतली.

यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या निवडणूक खर्च तपासणी पथक प्रमुख अश्विनी मुसळे, निवडणूक निरीक्षक समन्वय कक्षाचे प्रमुख प्रमोद ओभासे, समन्वय सुरेंद्र देशमुखे, सचिन चाटे आदी उपस्थित होते.

कलाकृती कलाकारापेक्षा दीर्घायुषी असते

वासुदेव कामत: ‘एमआयटी एडीटीत’र्फे ‘विश्वारंभ कला पुरस्कारा’चे वितरण 
पुणेः  चित्रकार कलेच्या माध्यमातूनच आपले विचार मांडण्याचा प्रयत्न करत असतो. कलाकार कलाकृती साकारत असतो तोपर्यंतच ती त्याच्या मालकीची असते. एकदा का त्याने तिच्यावर सही केली ती सार्वजनिक होते. इतिहासात कायमच योगदानाची नोंद राहते व्यवहाराची नाही. कारण, कलाकृती ही कलाकारापेक्षा जास्त आयुष्य घेऊन जन्मते, त्यामुळे कलाकाराने केवळ व्यवहारावर भर न देता योगदानावर भर द्यावा व अखेरीस शांती व तृप्ती रसाचा आनंद घ्यावा, असे प्रतिपादन प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांनी केले.
ते एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, पुणेच्या ललित कला, परफॉर्मिंग आर्ट्स, मीडिया, डिझाइन आणि आर्किटेक्चरचा सर्वांत मोठा महोत्सव असणाऱ्या “कारी-२०२४” निमित्ताने राजा रविवर्मा आर्ट गॅलरी येथे आयोजित ‘विश्वारंभ कला पुरस्कार’ स्विकारल्यानंतर बोलत होते. याप्रसंगी, प्रसिद्ध दिग्दर्शक जब्बार पटेल, माईर्स एमआयटी शिक्षण समुहाच्या कार्यकारी संचालक सौ.ज्योती ढाकणे, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डाॅ.अनंत चक्रदेव, डाॅ.मिलिंद ढोबळे, डाॅ.आनंद बेल्हे, डाॅ.अश्विनी पेठे आदी उपस्थित होते.    कामत यांनी आपल्या अमोघ वाणीतून रसिकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी ते पुढे म्हणाले, आपल्या क्षेत्रामध्ये प्रत्येक जण मी अप्लाईड आणि फाईन आर्टिस्ट आहे, असे सांगतो. परंतू माझ्या मते आपले कलाकार असणे आणि त्यापेक्षाही आपल्यातील कला’कारी’ अधिक महत्त्वाची असते. कला ही मनुष्याच्या अंतापर्यंत साथ देते, आणि ज्याला कलेची आवड आहे, त्यालाच मनुष्य म्हटले जाऊ शकते. प्रा.डाॅ.चक्रदेव यावेळी म्हणाले, ‘कारि’ म्हणजे, काहीतरी नाविण्यपूर्ण घडविणे. ज्यामध्ये कविता, कलाकृती, चित्र, फोटो, तंत्रज्ञान, चित्रपट अशा प्रत्येक गोष्टीचा अंतर्भाव होऊ शकतो. एमआयटी एडीटी विद्यापीठाचा कॅम्पस मुळात अनेक कलाकृतींचा संगम असून जेथून अनेक कलाकार घडत आहेत. 
विश्वशांती प्रार्थनेने सुरू झालेल्या या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली, ज्याचे सुत्रसंचालन स्नेहा वाघटकर यांनी केले. 

बंद आखोंसे देखे गये सपनों को जो साकार करें वो कलाकार होता है!, अगदी तशाच प्रकारे ‘विश्वारंभ’, या नावातच काहीतरी नाविन्यपूर्ण तयार करण्याची संकल्पना जडलेली आहे. अर्थातच या नावामागे आणि या पुरस्कारामागे आमचे मार्गदर्शक प्रा.डाॅ.विश्वनाथ दा.कराड यांची प्रेरणा आहे. प्रा.डाॅ.कराड हेही एक सुंदर कलाकार आहेत. जगातील सर्वांत मोठा विश्वशांती घुमट आणि विश्वराजबागेची बांधनी या त्यांच्याच दृष्टीतून साकारल्या गेलेल्या अप्रतिम कलाकृती आहेत. त्यामुळे आज श्री.वासुदेव कामत यांना ‘कारि’ प्रसंगी ‘विश्वारंभ कला पुरस्कार’ प्रदान करताना अतिशय आनंद होत आहे.- सौ.ज्योती ढाकणे – कराड कार्यकारी संचालक, माईर्स एमआयटी शिक्षण समुह

कलाकृती भविष्याशी संवाद साधतात – पटेलआपल्या अध्यक्षीय भाषणात प्रसिद्ध दिग्दर्शक जब्बार पटेल यांंनी अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, जेव्हा मी कुठल्याही कलाकाराला विचारतो तेव्हा तो काहीतरी नवीन साकारतोय असे म्हणतो. परंतू जगात नवीन असे काहीच नाही. कारण एक कलाकार सर्वच गोष्टी आपल्या भवतालच्या गोष्टींना पाहून साकारत असतो. त्यात तो जी काही कलाकारी साकारतो ती इतिहासाचा अविभाज्य भाग होऊन जाते. त्यामुळे, कलाकारांच्या कलाकृती भविष्यातील पिढीशी संवाद साधण्याचे काम करता. त्यामुळे, कलाकाराचा हात नाजूक असला तरी त्याची कलाकृती मात्र कणखर हवी, असेही पटेल यांनी म्हटले. 

केवळ धर्मावर बोलणाऱ्यांच्या मागे जाऊ नका  गुरुबाबा औसेकर महाराज 


श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट आयोजित श्री जंगली महाराज १३४ वा पुण्यतिथी उत्सव

पुणे :  आज धर्मावर बोलणारे खूप लोक आहेत, परंतु धर्मावर केवळ बोलून भागणार नाही तर धर्मामध्ये सांगितलेल्या तत्त्वानुसार आपले आचरणही ठेवले पाहिजे. केवळ धर्मावर बोलणाऱ्यांच्या मागे न जाता धर्मानुसार स्वतःचे आचरण असणाऱ्या व्यक्तींच्या मागे जर समाज उभा राहिला तर समाजाची खऱ्या अर्थाने प्रगती होते, असे मत  गुरुनाथ बाबा औसेकर महाराज यांनी व्यक्त केले. 

श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट, पुणेच्या वतीने आयोजित सद्गुरु श्री जंगली महाराज यांच्या १३४ व्या पुण्यतिथी उत्सवात गुरुनाथ बाबा औसेकर महाराज यांचे ‘धर्मोपदेशक जगद्गुरु संत तुकाराम महाराज’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. 

गुरुबाबा औसेकर महाराज म्हणाले,धर्मावर आधारित जर समाजाचा पाया असेल तर निश्चितच असा समाज जगाला दिशा दाखवू शकतो आणि हेच संत तुकाराम महाराज यांनी आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी असे म्हणत सोळाव्या शतकामध्ये काम केले. त्यांच्या विचारांचे  आपण जर आचरण केले तर केवळ आपलीच  नव्हे तर समाजाची प्रगती होऊ शकेल.  
दुष्काळामुळे होरपळलेल्या तसेच सामाजिक परिस्थितीने रंजलेल्या आणि धार्मिक गोंधळामुळे गांजलेल्या समाजाला जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी सोळाव्या शतकामध्ये जागे करण्याचे काम केले. समृद्ध आणि सुदृढ समाज निर्माण करण्यामध्ये संत तुकाराम महाराजांचे कार्य मोठे आहे

युपीएससी परिक्षेत झळकले सारथीचे २० विद्यार्थी

मुंबई : नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा स्पर्धा परीक्षा २०२३ चा अंतिम निकाल जाहीर झाला. त्यात पुणे येथील सारथी संस्थेमार्फत मुलाखतीसाठी प्रायोजित ४५ विद्यार्थ्यांपैकी २० विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादीत निवड झाली आहे. ज्यामध्ये ४ विद्यार्थिनींचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातून ६, नाशिक जिल्ह्यातून ५, अहमदनगर जिल्ह्यातून २ तसेच कोल्हापूर, बुलढाणा, जळगाव, अकोला, वाशिम, हिंगोली, व सातारा जिल्ह्यातील प्रत्येकी एक विद्यार्थी यशस्वी झाला आहे, अशी माहिती सारथी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी दिली.

सारथी संस्थेने मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी ह्या लक्षित गटातील होतकरू विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परिक्षेच्या तयारीकरिता विद्यावेतन देऊन नवी दिल्ली व पुणे येथील नामांकित कोचिंग संस्थेत निःशुल्क प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली होती. युपीएससी मुलाखतीच्या तयारीकरिता ४५ विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण नियोजित करून तज्ञांमार्फत विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन देण्यात आले.

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे ही संस्था मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी ह्या लक्षित गटाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी काम करते. लक्षित गटातील उमेदवारांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरीता सारथी संस्था प्रयत्नशील आहे. सारथीमार्फत युपीएससीकरिता लाभ घेऊन यश मिळविलेल्या २० विद्यार्थ्यांची रँक क्रमांक व नावे पुढीलप्रमाणे :

१२२ विनय सुनील पाटील (नाशिक), १४७ आशिष अशोक पाटील (कोल्हापूर), २२४ ठाकरे ऋषिकेश विजय (अकोला), २५८ शामल कल्याणराव भगत (पुणे), २६७ उन्हाळे आशिष विद्याधर (बुलडाणा),२८७  निरंजन महेंद्रसिंह जाधवराव (पुणे), ३०८ घोगरे हर्षल भगवान (पुणे), ३५९ शुभम भगवान थिटे (पुणे), ३९५ अंकित केशवराव जाधव (हिंगोली), ४१४ खिलारी मंगेश पराजी (अहमदनगर), ४९६ पाटील लोकेश मनोहर (जळगाव), ५३१ मानसी नानाभाऊ साकोरे (पुणे), ६०४ आविष्कार विजय डेले (नाशिक), ६१० केतन अशोक इंगोले (वाशिम), ६२२ देशमुख राजश्री शांताराम (अहमदनगर), ७०६ निकम सुरज प्रभाकर (नाशिक), ७३२ कुणाल संजय अहिरराव (नाशिक), ७५९ गौरी शंकर देवरे (पुणे), ८३७ शुभम उत्तमराव बारकाळे(नाशिक),  ९७६ श्रावण अमरसिंह देशमुख (सातारा), हे विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परिक्षेत यशस्वी झाले आहेत.

मागील तीन वर्षात सारथी संस्थेमार्फत ५८ विद्यार्थी युपीएससी परिक्षेत यशस्वी झाले होते. यावर्षी २० विद्यार्थी यशस्वी झाले असून आतापर्यंत सारथी संस्थेमार्फत एकूण ७८ विद्यार्थी युपीएससी परिक्षेत यशस्वी झाले आहेत.

एअर इंडियाचे आयकॉनिक A350 दिल्ली-दुबई मार्गावर 1 मे पासून पदार्पण करणार

गुरुग्राम, दिल्ली-दुबई या अत्यंत रहदारीच्या मार्गावर आपले नवीन A350 विमान तैनात करण्याची घोषणा एअर इंडियाने गुरुवारी केली. यामुळे कमी अंतराच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये या विमानाचे पदार्पण होईल.

1 मे 2024 पासून, दिल्ली आणि दुबई दरम्यान उड्डाण करणारे एअर इंडियाचे प्रवासी A350 चा अनुभव घेऊ शकतात. AI995/996 या नंबरने ओळखले जाणारे हे विमान दररोज रात्री 20:45 वाजता दिल्लीहून निघेल आणि रात्री 22:45 वाजता दुबईला पोहोचेल. तर परतीचे फ्लाइट दुबईहून दुसऱ्या दिवशी मध्यरात्री 00:15 वाजता निघेल आणि आणि पहाटे 04:55 वाजता दिल्लीला पोहोचते. उड्डाण आणि पोहोचण्याच्या सगळ्या वेळा या स्थानिक वेळेनुसार असतील.

यासह, भारत आणि दुबई दरम्यान A350 हे विमान चालवणारी एअर इंडिया ही एकमेव कंपनी बनली आहे.

दिल्ली-दुबई मार्गावरील A350 विमानातील जागा एअर इंडियाच्या वेबसाइट, मोबाइल ॲपवर किंवा ट्रॅव्हल एजंटद्वारे आरक्षणासाठी उपलब्ध आहेत.

एअर इंडियाच्या A350 विमानाच्या बिझनेस क्लासमध्ये पूर्ण-फ्लॅट बेडसह 28 खासगी सूट, प्रीमियम इकॉनॉमी केबिनमध्ये अतिरिक्त लेगरूम आणि इतर सुविधांसह 24 जागा तर इकॉनॉमी क्लासमध्ये 264 प्रशस्त जागा आहेत. A350 मधील सर्व सीट्सना आधुनिक Panasonic eX3 इन-फ्लाइट मनोरंजन प्रणाली आणि HD स्क्रीन आहे. यामुळे जगभरातील विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा जवळपास 2,200 तासांहून अधिक काळ आनंद घेऊ शकता.

एअर इंडियाने या वर्षाच्या सुरुवातीला A350s च्या वापरास सुरुवात केली. त्यांनी भारतामध्येच क्रू परिचय आणि नियम कळण्यासाठी विमाने उडवली आहेत.

दुबईला एअर इंडियाची सध्या आठवड्यातून एकूण 72 उड्डाणे आहेत. पाच शहरांमधून ही सेवा सुरू आहे. त्यापैकी 32 उड्डाणे दिल्लीहून आहेत.

दिल्ली आणि दुबईतील एअर इंडियाच्या A350 उड्डाणांचे वेळापत्रक
01 May 2024 पासून लागू
 
Flight No.Days of OperationSectorDepartureArrival
AI995दररोजदिल्ली – दुबई2045 Hrs2245 Hrs
AI996दररोजदुबई-दिल्ली0015 Hrs0455 Hrs

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत ३२.३६ टक्के मतदान             

मुंबई, दि. १९ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज दि.१९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.०० वा.पासून सुरु झाले आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात दुपारी १.०० वाजेपर्यंत  ३२.३६ टक्के मतदान झाले आहे.

पहिल्या टप्प्यातील एकूण ५ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :-

रामटेक  २८. ७३ टक्के

नागपूर २८. ७५ टक्के

भंडारा- गोंदिया ३४ .५६ टक्के

गडचिरोली- चिमूर ४१ .०१ टक्के

 चंद्रपूर ३०.९६ टक्के

गोळवलकर गुरुजींच्या विचाराचे हिंदू राष्ट्र निर्माण करणे, मनुस्मृतीच्या तत्वावर घटनेत बदल करणे भाजपचा हेतू

पुणे-संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड येथे म्हणाले कि,’लोकशाहीमध्ये घटना हि अत्यंत महत्वाची असते आणि घटनेची जी तत्वे आहेत, महात्मा फुलेंची समता, शाहू महाराजांचे बंधुत्व ,डॉ. आंबेडकरांचा न्याय आणि शिवाजी महाराजांचे स्वातंत्र्य , स्वराज्य हि महाराष्ट्राने घटनेला दिलेली विचारधारा आहे , या विचार धरलाच धोका निर्माण झाला आहे. हि घटना , लोकशाही , देश सुरक्षित राहिला पाहिजे म्हणून आम्ही महाविकास आघाडीला काल संभाजी ब्रिगेडची नासिक येथे बैठक घेऊन पाठिंबा जाहीर केला आहे. १९२५ला डॉ हेगडेवारांनी नागपूरला आर एस एस स्थापना केली. त्यानंतर द्वितीय संघचालक गोळवलकर गुरुजी यांनी एक पुस्तक लिहिले. बेंच ऑफ थॉट्स नावाचे . त्यानंतर हा देश कसा असावा याच्यासाठी त्यांनी ३२ वर्षे काम केले. आणि तीच विचारधारा आर एस एस ची झाली. आता पुढच्या वर्षी या आर एस एस ला १०० वर्षे पूर्ण होत आहेत . त्यामुळे देशात आणि राज्य राज्यात त्यांना भाजपाचे सरकार कोणत्याही परिस्थितीत आणायचे आहे. गोळवलकर गुरुजींच्या विचाराचे हिंदू राष्ट्र निर्माण करायचे आहे. त्यासाठी २ तृतीयांश बहुमत ४०० पारचा नारा आहे आणि त्याद्वारे राज्यघटना मनुस्मृतीच्या तत्वावर नेणे , जिथे संत तिथे विषमता ,जिथे न्याय तिथे अन्याय राहील,अशा प्रकारची स्थिती निर्माण होईल. कारण पूर्वीच्या काळात या देशात तशी स्थिती होती .ती निर्माण करण्यासाठी गोळवलकर गुरुजींच्या पुस्तकातून मार्गदर्शन केले आहे. आपल्या देशात विविध जाती धर्म, प्रांत , भाषा असताना विविधतेने नटलेल्या आणि सौख्य लाभलेल्या देशात अशी स्थिती निर्माण करणे व्याव्हारिकच नाही तर अत्यंत धोकादायक असणार आहे.

दिल्लीवाल्यांना नडतो कोण तर मी आणि अमोल कोल्हे…आम्हाला फाशी दिली तरी कांद्याला भाव मागतच राहू -सुप्रिया सुळे

भांडण लावून दिल्लीत बसून मजा बघतात

बारामती-आज येथे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या ,”’एकीकडे संसदरत्न देतात आणि दुसरीकडे मला निलंबित करतात. मला फाशी दिली तरी चालेल पण मी कांद्याला भाव मागत राहणार. आपल्यात भांडण लावून ते दिल्लीत बसून मजा बघतात. दिल्लीवाल्यांना नडतो कोण तर मी आणि अमोल कोल्हे. फार भानगड नाही करायची, आपण आपली तुतारी वाजवायची. सेवा, सन्मान, स्वाभिमान या ३ गोष्टी धरून मी राजकारण करते”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.सुप्रिया सुळे यांनी आज बारामतीमध्ये प्रचाराचा नारळ फोडला. त्यांनी कन्हेरीच्या मारुती मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली. यानंतर झालेल्या सभेत सुप्रिया सुळे बोलत होत्या.

यावेळी बोलतांना त्यांनी सांगितले कि, मी नात्याचा आणि पदाचा सन्मान केला. मी बाहेरचे बघणार आणि ते सर्व इकडे लक्ष देणार हे ठरले होते, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडखोरीवर खंत व्यक्त केली.

त्या म्हणाल्या, ”सध्या मला काही जण म्हणाले की मी बारामतीमध्ये कमी येते. पण त्यामागेही कारण होते. असं ठरलं होतं की मी दिल्लीत असणार आणि बाकीची कामं इथले लोकं करणार. मी नात्याचा सन्मान केला, पदाचा सन्मान केला, पण आता हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा. झालं गेलं गंगेला वाहिलं. पण आता बदल करावा लागेल. आपली वैचारिक लढाई आहे वैयक्तिक नाही”, अशा भावना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्या.

पुढे त्या म्हणाल्या, ”माझं काम आणि मेरिट बघून मला संधी द्या. बारामतीची निवडणूक अमेरिकापर्यंत पोहचली आहे. न्यूयॉर्क टाईमचे पत्रकार 2 दिवसांपासून बारामतीमध्ये आले आहेत. या देशाचा लोकसभेचा इलेक्शन कव्हर करायला ते आलेत आणि दोन दिवस एकाच मतदार संघात ते फिरत आहेत. तो म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ. म्हणजे आता शरद पवारांची शरद पवारांची ताकद केवळ बारामती जिल्हा, राज्य किंवा देशापुरती मर्यादित राहिली नसून ती पार अमेरिकेपर्यंत पोचली आहे”, असे शरद पवार म्हणाले.

याशिवाय सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ”मी दहा वर्षांत काय केले अशी टीका माझ्यावर केली जाते. त्या सर्वांना मी पुस्तक पाठवणार आहे. यामध्ये माझ्या पाच वर्षांच्या कामांचा आराखडा आहे. सर्व विरोधकांना विनंती आहे की वेळ काढून त्यांनी हे पुस्तक वाचावे”, असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला.

..अशा हज्जार तक्रारी करा -मुरलीधर मोहोळ यांचे काँग्रेसला प्रती आव्हान

पुणे- काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांनी मुरलीधर मोहोळ यांनी आचारसंहिता भंग केल्याबद्दलची तक्रार निवडणूक आयोगाकें केली. रामनवमी च्या दिवशी आपल्या वतीने पुणेकरांना शुभेच्छा देताना मोहोळ यांनी वृत्तपत्रांतून पाठविलेल्या पत्रकात राम मूर्तीला वंदन करणारे नरेंद्र मोदी आणि खाली मोहोळ यांचा फोटो कमळ चिन्ह आणि ते भाजपचे उमेदवार असल्याचे त्यावर स्पष्ट लिहिलेले होते . यावर आक्षेप घेऊन रामाच्या नावाचा उपयोग निवडणूक प्रचारात करता येणार नाही यावरून हल्लकल्लोळ मजला होता त्यावरून मोहन जोशी यांनी आयोगाकडे तक्रार केली. याप्रकरणी माजी आमदार मोहन जोशी व काँग्रेसचे सोशल मीडिया राज्य समन्वयक चैतन्य पुरंदरे यांनी सांगितले की, ” राम मंदिराला निवडणुक प्रचाराचा मुद्दा बनवून याद्वारे धार्मिक प्रलोभन दाखवून मोहोळ यांनी मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे.” त्यावर आज मोहोळ यांनी आपली प्रति प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

काँग्रेसच्या तक्रारीवर मुरलीधर मोहोळ –

  • काँग्रेसचा प्रभू श्रीराम द्वेष पुन्हा अधोरेखित झाला
  • काँग्रेसचं खरं रुप या तक्रारीमुळे पुणेकरांसमोर आलं
  • काँग्रेसने कायम प्रभू श्रीरामाला विरोध केलाय
  • अशा हजार तक्रारी करा

“ये काली काली आंखेच्या सिक्वेलसह हे इंडस्ट्रीतील माझे सर्वात मोठे वर्ष असेल!” ताहिर राज भसीन. 

नेटफ्लिक्सच्या हिट सीरीज ये काली काली आंखे मध्ये मुख्य भूमिकेसाठी ओळखला जाणारा अभिनेता ताहिर राज भसीन या वर्षी त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे. यानिमित्ताने त्यांनी आपला प्रवास आणि वर्षानुवर्षे मिळालेले प्रेम यावर चिंतन केले.
त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी आणि  पडद्यावरील जबरदस्त प्रेजेंससाठी ओळखला जाणारा, ताहिर एक अभिनेता म्हणून उदयास आला आहे जो तीव्र आणि ग्रे शेड अशा दोन्ही प्रकारच्या भूमिका साकारू शकतो. वैविध्यपूर्ण पात्रांमध्ये जिव टाकण्याच्या त्याच्या क्षमतेमुळे त्याला जगभरातील प्रेक्षकांकडून  आणि समीक्षकां कडून प्रशंसा मिळाली आहे.

ताहिरने आपला उत्साह व्यक्त करताना सांगितले की, “ये काली काली आंखेच्या सिक्वेलसह हे माझे इंडस्ट्रीतील सर्वात मोठे वर्ष असेल! त्यामुळे, या वाढदिवसासाठी मी खूप आनंदी आणि कृतज्ञ आहे. नेटफ्लिक्सवरील माझ्या सुपरहिट सीरीजचा सिक्वेल असलेल्या माझ्यासाठी असा एक मोठा प्रोजेक्ट करणे हा वाढदिवस माझ्यासाठी खरोखरच रोमांचित करणारा आहे.”

तो पुढे म्हणाला, “मी ये काली काली आंखेचे शूटिंग करत आहे आणि मला सर्जनशीलतेने खूप समाधान वाटत आहे. मी एक असा अभिनेता आहे ज्याला पडद्यावर सतत स्वत:ला नव्याने आविष्कृत करायचे आहे आणि मी धन्य आहे की त्या नव्या शोधांना इंडस्ट्री, मीडिया तसेच प्रेक्षकांनी पसंत केले आणि त्यांचे कौतुक केले. ये काली काली आंखे हा एक प्रोजेक्ट आहे जो मला आजही प्रेम देत आहे. माझ्या सोशल मीडियावर या मालिकेबद्दल प्रश्नांचा भडीमार होत असतो. प्रेम आणि अपेक्षा स्पष्ट आहे. ”

ताहिर पुढे म्हणतो, “लोक मला माझ्या वाढदिवसानिमित्त ये काली काली आंखेंमधून काहीतरी नविन अपडेट देण्यासाठी आहेत!ह्या वरुण त्या सीरीज ची अविश्वसनीय यशोगाथा दर्शवते. 
ताहिरने त्याच्या प्रवासात आणखी एक मैलाचा दगड ओलांडला असताना, त्याने एक उत्कृष्ट कामगिरी करण्याचा आणि प्रेक्षकांना त्याच्या कलेने भुरळ घालण्याचा निर्धार केला आहे. ताहिर आता नेटफ्लिक्सच्या ‘ये काली काली आँखे’ या हिट सीरीजच्या सिक्वेलमध्ये दिसणार आहे.

शरद पवारांनी शिवसेना संपवण्याचे अनेक प्रयत्न केले : दीपक केसरकर यांचा आरोप

मुंबई:ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शिवसेनेला संपवण्याचे अनेक प्रयत्न सातत्याने केले. याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाने शिवसेनेबरोबरची युती कायम ठेवण्याचे प्रयत्न केले. मात्र उद्धव ठाकरे हे पवारांच्या जाळ्यात फसल्यामुळे पंतप्रधान मोदी आणि भाजपावर ते खोटे-नाटे आरोप करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे प्रतिपादन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी केले. भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीतर्फे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत श्री.केसरकर बोलत होते. राष्ट्रवादीचे नेते आणि मदत, पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, महायुतीचे समन्वयक आ.प्रसाद लाड, रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) प्रदेश सरचिटणीस गौतम सोनवणे, भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी यावेळी उपस्थित होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर निष्ठा असलेल्या शिवसैनिकांनी पवारांच्या भुलथापांना बळी पडू नये, असेही श्री.केसरकर यांनी नमूद केले.
श्री.केसरकर म्हणाले की, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टी यांच्या विरोधात अनेक बेताल आरोप केले आहेत. बाळासाहेबांच्या विचारांवर निष्ठा असणार्‍या शिवसैनिकांनी वस्तुस्थिती जाणून घेणे आवश्यक आहे. शरद पवारांनी बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच शिवसेनेत फूट पाडली, हे जगजाहीर आहे. 2014 नंतर ही अनेक घडामोडीत श्री.पवार यांनी शिवसेनेसारखी लढाऊ संघटना कशी संपेल, या दृष्टीनेच प्रयत्न केले. यावेळी श्री.केसरकर यांनी गेल्या 10 वर्षातील अनेक राजकीय घडामोडींवेळी पडद्यामागे घडलेल्या घटनांचा संदर्भ देत श्री.पवार यांचा शिवसेनेबद्दलचा आकस, द्वेष दाखवून दिला.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्वबळावर बहुमत मिळाले नाही, हे पाहून श्री.पवार यांनी भारतीय जनता पार्टीला न मागताच पाठिंबा जाहीर केला. त्या विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना स्वतंत्रपणे लढले होते. भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ नयेत, या इच्छेमुळेच श्री.पवार यांनी भाजपा ला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता, असे श्री.केसरकर यांनी नमूद केले. 2017 मध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेबरोबर असलेली युती कायम राहिली पाहिजे, अशी भूमिका ठामपणे मांडली होती. श्री.पवार यांनी त्यावेळी शिवसेना बरोबर असेल तर आम्ही भाजपाबरोबर जाणार नाही, शिवसेनेबरोबरची युती तोडली तरच आम्ही तुमच्या बरोबर येऊ, असे भाजपा नेतृत्वाला कळवले होते. यावेळीही पवारांचा शिवसेनेबद्दलचा आकस दिसून आला. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेते या घडामोडींचे साक्षीदार आहेत, असे श्री.केसरकर यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, 2019 मध्येही पवारांची भारतीय जनता पार्टीबरोबर जाण्याची इच्छा होती. मात्र त्या वाटाघाटी फिसकटल्याने त्यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला साथीला घेत सरकार बनवले. शिवसेना संपल्याखेरीज राष्ट्रवादी वाढणार नाही, असा श्री.पवार यांचा समज असल्याने त्यांनी नेहमीच शिवसेनेचे पाय ओढण्याचे राजकारण केले. आता याच पवारांनी राजकीय स्वार्थासाठी भाजपा विरोधात अपप्रचार सुरू केला आहे. दर दोन दिवसांनी महायुतीच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन मविआ नेत्यांची पोलखोल केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.