पुणे- काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांनी मुरलीधर मोहोळ यांनी आचारसंहिता भंग केल्याबद्दलची तक्रार निवडणूक आयोगाकें केली. रामनवमी च्या दिवशी आपल्या वतीने पुणेकरांना शुभेच्छा देताना मोहोळ यांनी वृत्तपत्रांतून पाठविलेल्या पत्रकात राम मूर्तीला वंदन करणारे नरेंद्र मोदी आणि खाली मोहोळ यांचा फोटो कमळ चिन्ह आणि ते भाजपचे उमेदवार असल्याचे त्यावर स्पष्ट लिहिलेले होते . यावर आक्षेप घेऊन रामाच्या नावाचा उपयोग निवडणूक प्रचारात करता येणार नाही यावरून हल्लकल्लोळ मजला होता त्यावरून मोहन जोशी यांनी आयोगाकडे तक्रार केली. याप्रकरणी माजी आमदार मोहन जोशी व काँग्रेसचे सोशल मीडिया राज्य समन्वयक चैतन्य पुरंदरे यांनी सांगितले की, ” राम मंदिराला निवडणुक प्रचाराचा मुद्दा बनवून याद्वारे धार्मिक प्रलोभन दाखवून मोहोळ यांनी मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे.” त्यावर आज मोहोळ यांनी आपली प्रति प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
काँग्रेसच्या तक्रारीवर मुरलीधर मोहोळ –
- काँग्रेसचा प्रभू श्रीराम द्वेष पुन्हा अधोरेखित झाला
- काँग्रेसचं खरं रुप या तक्रारीमुळे पुणेकरांसमोर आलं
- काँग्रेसने कायम प्रभू श्रीरामाला विरोध केलाय
- अशा हजार तक्रारी करा