पुणे – महापालिकेतील माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले आणि माजी नगरसेविका वंदना श्रीनाथ भिमाले या दांपत्याने आपल्या पर्वती विधानसभा मतदार संघ प्रभाग क्रमांक – २८ मधील गरजू होतकरु प्रशिक्षण झालेल्या महिला बचत गटांना शिलाई मशीनचे वाटप केले तर त्याच बरोबर प्रभागातील २०० घरेलू कामगारांना कोव्हीशिल्ड-१९ चे लसीकरण करून दिले .