दंतोपचाराचा सरकारी आरोग्य योजनांमध्ये समावेश करण्यासाठी प्रयत्नशील

Date:

चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन; इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल डेन्टिस्ट्रीतर्फे अत्याधुनिक दंतोपचारावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
पुणे : ” दंतोपचारांना सरकारी आरोग्य योजनांमध्ये समाविष्ट करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आहे. केंद्र सरकारची आयुष्यमान भारत योजना व राज्य सरकारच्या महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी यातून दंतोपचार मोफत किंवा सवलतीच्या दरात होतील, यासाठी प्रयत्नशील आहे,” असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल डेन्टिस्ट्रीतर्फे (आयएसडीडी) अत्याधुनिक दंतचिकित्सा व दंतरोपण या विषयावरील तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. बालेवाडी येथील हॉटेल ऑर्किड येथे झालेल्या कार्यक्रमावेळी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज आणि ॲग्रीकल्चरचे (एमसीसीआयए) महासंचालक प्रशांत गिरबाने, ‘आयएसडीडी’चे अध्यक्ष डॉ. रत्नदीप जाधव, संस्थापक अध्यक्ष डॉ. पंकज चिवटे, सचिव डॉ. विजय ताम्हाणे, संचालक व खजिनदार डॉ. कौस्तुभ पाटील, डॉ. विपीन माहूरकर आदी उपस्थित होते. या परिषदेमध्ये देश-विदेशातील ६०० ते ७०० दंतवैद्यक सहभागी झाले आहेत.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “आजही भारतात दंतोपचार हे ‘लक्झरी’ उपचार मानले जातात, त्यामुळे ते न परवडणारा मोठा वर्ग आपल्या आजुबाजूला आहे. अशांसाठी दंतोपचार कमीत कमी खर्चात व्हावेत यासाठी आम्ही मागील बऱ्याच काळापासून प्रयत्नशील आहोत. सध्या आपल्याकडे ‘एमएनजीएल’च्या माध्यमातून दोन मोबाईल व्हॅन कार्यरत असून त्याव्दारे आपण गरीब व गरजू रुग्णांना दंतोपचारांसह इतर आरोग्य सुविधा पुरवत आहोत. वस्ती भागातील नागरीकांना याचा चांगला फायदा होत असून येत्या काळात आपण ही सुविधा आणखी वाढविण्याचा प्रयत्न करणार आहोत.”

प्रशांत गिरबाने म्हणाले, गेल्या काही वर्षात भारताने तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्वच क्षेत्रात वेगाने प्रगती केली आहे. यामध्ये डिजिटल हेल्थचाही सहभाग असून दंतोपचारांतील डिजिटल क्रांती वाखाणण्याजोगी आहे. येत्या काळात तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा वापर दंतवैद्यांसाठी प्रगतीचा मार्ग ठरेल. वैद्यक क्षेत्रात वाढलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे आरोग्य सुविधा अधिक जलद, सोप्या व सहज होत आहेत. डिजिटल इंडियामुळे लाभार्थ्यांना थेट मदत मिळणे शक्य होत आहे. आरोग्य क्षेत्रात भारत आत्मनिर्भर व्हायचा असेल, तर आपल्याला अधिक प्रमाणात संशोधन, इनोव्हेशन करावे लागेल. या आंतरराष्ट्रीय परिषदेतून या कार्याला गती मिळत असून अजूनही मोठे काम व्हायला हवे.

डॉ. रत्नदीप जाधव यांनी प्रास्ताविकात सांगितले की, या परिषदेच्या माध्यमातून डिजिटल डेन्टिस्ट्रीचा प्रचार व प्रसार करण्याचा उद्देश आहे. परिषदेत अत्याधुनिक मशिनरी, विविध प्रगत संगणक प्रणाली, थ्रीडी प्रिंटिंग, स्कॅनिंग, रोबोटिक सारख्या नव्या दंतोपचार व दंतरोपण उपचारांवर चर्चा झाली. दंतोपचारावरील उपकरणे बनवणाऱ्या कंपन्या व दंतवैद्यांना एकत्र आणण्यासाठी ही परिषद महत्वपूर्ण ठरेल. भारतात सध्या मोठ्या प्रमाणात नावीन्यपूर्ण संशोधन होत असून महाराष्ट्राचाह त्यात महत्त्वाचा वाटा आहे. मागील काही वर्षात परिषदेला मार्गदर्शन करणाऱ्या तज्ज्ञांमध्ये भारतीय तज्ज्ञांचा सहभाग वाढत आहे ही आनंदाची बाब आहे.  

या परिषदेत देशविदेशातून आलेल्या तज्ज्ञ दंतवैद्यकांची मार्गदर्शनपर सत्रे झाली. परिषदेच्या निमित्ताने दंतचिकित्सा व दंतरोपणातील आधुनिक तंत्रज्ञान व उपकरणांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. वैशाली वर्मा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर डॉ. कौस्तुभ पाटील यांनी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे जिल्हा परिषदेचे २५ गुणवंत विद्यार्थी अमेरिकेतील नासा, स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि गुगल परिसराला देणार भेट

२० हजार विद्यार्थ्यांमधून आयुका संस्थेच्या निवड प्रक्रियेद्वारे निवड; २०...

मॉडेल स्कूल चांदे आणि ग्राम सचिवालयाचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण !

303 मॉडेल स्कूलची कामे पूर्णत्वाकडे; उर्वरित कामे डिसेंबरअखेर पूर्ण...