विजयस्तंभ अभिवादन सोहळा ; शताब्दी वर्षानिमित्ताने आयोजनासाठीच्या तयारीला सुरुवात

Date:

पुणे, दि. २० : पेरणे फाटा येथील विजयस्तंभ येथे १ जानेवारी २०२७ रोजी होणाऱ्या अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. यंदा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १ जानेवारी १९२७ रोजी विजयस्तंभास भेट देऊन आपल्या पूर्वजांना मानवंदना दिल्याच्या ऐतिहासिक घटनेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या शताब्दी वर्षानिमित्त सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाकडून विविध सुविधांचे नियोजन करण्यात येत आहे.

या अनुषंगाने विविध शासकीय विभागांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांची संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी जाऊन पाहणी केली. अनुयायांसाठी स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, वाहनतळ, बुक स्टॉल, हिरकणी कक्ष, निवारा कक्ष, कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र कक्ष, रक्तसंकलन केंद्र, प्रसारमाध्यमांसाठी व्यासपीठ, नियंत्रण कक्ष तसेच मानवंदना कार्यक्रमाच्या निवेदनासाठीच्या व्यवस्थेची पाहणी करून आवश्यक नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली.

या पाहणीवेळी हवेलीचे प्रांताधिकारी यशवंत माने, बार्टीच्या निबंधक डॉ. सुचिता शिंदे, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोढे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी राधाकिसन देवडे, लोणीकंद पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अजय पाटील, पीएमपीएमएलचे प्रतिनिधी यशवंत हिगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. पायल राठोड, डॉ. आयेश फातेमा, रामदास लोखंडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

शताब्दी वर्षाचे औचित्य आणि अपेक्षित गर्दी विचारात घेऊन अनुयायांना अधिकाधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर प्रशासनाचा भर आहे. बार्टीच्या माध्यमातून संबंधित सर्व शासकीय विभागांमध्ये समन्वय साधून नियोजन करण्यात येत आहे. अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांना कोणतीही गैरसोय होऊ नये, तसेच हा सोहळा शांततेत, सुरक्षित आणि सुव्यवस्थित वातावरणात पार पडावा, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे जिल्हा परिषदेचे २५ गुणवंत विद्यार्थी अमेरिकेतील नासा, स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि गुगल परिसराला देणार भेट

२० हजार विद्यार्थ्यांमधून आयुका संस्थेच्या निवड प्रक्रियेद्वारे निवड; २०...

मॉडेल स्कूल चांदे आणि ग्राम सचिवालयाचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण !

303 मॉडेल स्कूलची कामे पूर्णत्वाकडे; उर्वरित कामे डिसेंबरअखेर पूर्ण...

राज्यस्तरीय शालेय स्क्वॅश क्रीडा स्पर्धेत पुणे विभागाला वैयक्तिक गटात प्रथम व तृतीय क्रमांक

आठ विभागांतील ३४ खेळाडूंचा सहभाग; विजेत्या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी...

मुंबई-पुणे महानगर प्रदेशांतील पाणी पुरवठ्यासाठी दीर्घकालीन नियोजन करा

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस • धरण प्रकल्पांसह सांडपाणी पुनर्वापर, पाणीगळती नियंत्रण...