पुणे,– महर्षि वाल्मिकी यांना जयंतीनिमित्त आज जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात नायब तहसीलदार पल्लवी कोकाटे यांनी महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.