संविधानाच्या माध्यमातून स्वराजाकडून सुराज्याकडे जाण्याचा प्रयत्न करू या – मुख्यमंत्री

Date:

पुणे : लोकमान्य टिळकांच्या मार्गाने संविधानाच्या माध्यमातून स्वराज्याकडून
सुराज्याकडे जाण्याचा प्रयत्न करुन टिळकांचे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प करूया, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांनी आज येथे केले.

येथील टिळक स्मारक सभागृहात ‘स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि ते मी मिळविणारच’
या घोषणेच्या शताब्दी समारंभात, ते बोलत होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट, सामाजिक
न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ पत्रकार सर्वश्री दिलीप पाडगांवकर, किरण ठाकूर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, की लोकमान्य टिळकांनी “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते
मी मिळविणारच” या घोषणेव्दारे देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला ऊर्जा दिली, स्वातंत्र्यवीरांना, क्रांतिकारकांना प्रेरणा दिली. 1857 चा स्वातंत्र लढा इंग्रजांनी मोडून काढला. त्यानंतर देशात लढण्याची प्रवृती कमी झाल्याचे जाणवत होते, नैराश्य निर्माण झाले होते. समाजातील मोठा वर्ग इंग्रजाशी लढून यशस्वी होवू शकत नाही अशा मानसिकतेत होता. त्यांच्यामध्ये टिळकांच्या या खणखणीत वाक्याने प्रेरणा तयार झाली, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

लोकमान्य टिळकांनी 25/30 वर्षे समाजात अभिसरण, एकत्रीकरण झाले पाहिजे. यासाठी व्यापक
उपक्रम हाती घेतले. वृत्तपत्रातील लेखनाद्वारे ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय’ असे शक्तिशाली विचार मांडून प्रबोधन केले. ताकत दिली. अशा या महापुरुषांचे विचार नवीन पिढीपर्यंत जाण्यासाठी या शताब्दीच्या निमित्ताने पुस्तके, ई-बुकद्वारे पोहचविण्याचे चांगले कार्य केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना धन्यवाद दिले.
लोकमान्य टिळकांनी त्या काळात मांडलेला स्वदेशीचा विचार आणि आजचा स्वदेशीचा विचार
यामध्ये फरक आहे. आज ‘मेक इन इंडिया’ हा विचार महत्वाचा आहे. लोकमान्यांचे स्वदेशी,स्वावलंबन, राष्ट्रीय शिक्षणाचे विचार आजही महत्वाचे आहेत. या शताब्दी वर्षात लोकमान्य टिळकांना अपेक्षित गणेशोत्सव साजरा व्हावा. विविध उपक्रम साजरे करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. याद्वारे लोकमान्य टिळकांचे विचार पुन्हा सामान्यांपर्यंत पोहचवले जातील. महापुरुषांचे विचार कधीही कालबाह्य होत नाहीत, असे विचारं मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी मांडले.
यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले की, ‘लोकमान्य टिळकांचा स्पष्टवक्तेपणा,
सत्यप्रीयता, देशभक्ती, प्रचंड स्वातंत्र्य प्रेम आदी गुणांचा नवीन पिढीने अंगीकार केला पाहिजे. त्यांनी स्वराज्य,स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण हे चार मंत्र दिले. या मंत्रांचा नवीन अर्थ बदललेल्या संदर्भात लावला पाहिजे, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगांवकर लिखित ‘टिळक इन आवर टाईम्स’ छायाचीत्रांकित
तसेच चरित्राचे आणि ई-बुकचे प्रकाशनही मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. मुक्ता टिळक यांनी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नरेंद्र मोदींनीच राष्ट्रहितासाठी ‘त्याग’ करून ‘वानप्रस्थाश्रमाकडे मार्गस्थ व्हावे’ : हर्षवर्धन सपकाळ.

देशावरील संकट हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नाकर्तेपणा व बेफिकीरवृत्तीचा...

लॉरिट्झ क्नुडसेन कडून अत्‍याधुनिक तंत्रज्ञान श्रेणी सादर

; भारतातील ऊर्जा क्षेत्रामधील नवीन अध्यायाला गती मिळणार ऊर्जा क्षेत्रात लवचिकता आणि सक्षम यंत्रणेची तातडीची गरज लक्षात घेऊन कंपनीने विविध महत्त्वाच्या उद्योगांसाठी १० हून अधिक अत्याधुनिक ऊर्जा व्यवस्थापन आणि ऑटोमेशन सोल्यूशन्स सादर केले आहेत १००० हून अधिक ग्राहक, भागीदार, सल्लागार आणि उद्योग क्षेत्रातील भागधारकांसाठी लाइव्‍ह प्रात्यक्षिके आणि टेक्निकल सत्रांचे आयोजन. लो-व्होल्टेज स्विचगियर, ऊर्जा व्यवस्थापन सोल्यूशन्स, डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि स्मार्ट होम सोल्यूशन्ससह ३०० हून अधिक उत्पादने आणि नाविन्‍यतांचे प्रदर्शन. भारताची औद्योगिक आणि ऊर्जा संक्रमणाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मेड-इन-इंडिया व जागतिक स्तरावर स्पर्धात्मक तंत्रज्ञान देण्‍याप्रती लॉरिट्झ क्नुडसेनची कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे. मुंबई, मे ७, २०२६: लॉरिट्झ क्नुडसेन इलेक्ट्रिकल अँड ऑटोमेशन या भारतातील इलेक्ट्रिकल आणि ऑटोमेशन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीने आज आपल्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या पोर्टफोलिओ प्रदर्शनाचा भाग म्हणून १० हून अधिक नेक्‍स्‍ट-जनरेशन इनोव्‍हेशन्‍सच्‍या लाँचची घोषणा केली. यासह...

पुरस्कारावर समाधानी राहू नका : राजीव तांबे

अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा पुरस्कार प्रदान सोहळा पुणे : तुमच्या...