रमणबागेत मातृशक्ती गौरव समारंभ संपन्न
पुणे- डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत नवरात्रीनिमित्त कष्टकरी माता पालकांचा ‘मातृशक्ती गौरव’ समारंभ आयोजित करण्यात आला होता. ज्या माता पालक कष्ट करून पाल्याचे शिक्षण पूर्ण करतात अशा महिलांचा मंदाताई नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पालकांच्या कष्टाचे चीज करा, उच्च ध्येय ठेऊन शिक्षण घ्या असे मत श्रीमती नाईक यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी प्रशालेच्या दैनंदीन अध्यापनात वापरल्या जाणार्या साहित्याचे पूजन करण्यात आले. मुख्याध्यापिका तिलोत्तमा रेड्डी यांनी प्रास्ताविक केले, सीमा कांबळे यांनी सूत्रसंचालन केले, उपमु‘याध्यापिका चारुशिला रौंदाळे यांनी आभार मानले. पर्यवेक्षक सुनील शिवले, रजनी कोलते यांनी संयोजन केले.