नेमणूका करताना क्षमतेबरोबर समोरच्यातला माणूसही समजावून घ्या!
पुणे : कोणत्याही कंपनीतील एचआर किंवा मानव संसाधन विभाग हा केवळ नव्या नेमणुका व पगार ठरवण्यापुरता मर्यादीत नसून नेमलेल्या माणसाची क्षमता पाहातानाच त्याची एक माणूस म्हणून वैयक्तीक व कौटुंबिक स्थितीही समजावून घेण्यासाठी हवा, असा सल्ला डीएसके उद्योगसमूहाचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक डी. एस. कुलकर्णी यांनी दिला. ओ. एच. आर. (ओन्ली ह्यूमन रिसोर्सेस) या संस्थेच्या तिसर्या वर्धापनदिन सोहळ्यात ते बोलत होते.
पंडील जवाहरलाल नेहरू सभागृहातील कार्यक‘मात डी. एस. कुलकर्णी यांच्यासोबत हास्ययोगतज्ज्ञ मकरंद टिल्लू यांनीही यावेळी तणावमुक्त व आनंददायी जीवनशैलीवर मार्गदर्शन केले. यावेळी ओ.एच.आर.चे संस्थापक सदस्य सुधीर फाटक, प्रदीप तुपे, जीतेंद्र पेंडसे आणि प्रशांत इथापे उपस्थित होते. त्या दोघांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच डी. एस. कुलकर्णी यांनी ओएचआरतर्फे आठ संस्थांच्या मानव संसाधन विभागाच्या प्रतिनिधींचा सन्मानचिन्ह देऊन गौरवले. त्यामध्ये मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ऍण्ड ऍग‘ीकल्चर (एमसीसीआयए), नॅशनल एचआरडी नेटवर्क (एनएचआरडी), नॅशनल इंडस्ट्री ऑफ पर्सनल मॅनेजमेंट (एनआयपीएम), इंडियन सोसायटी फॉर ट्रेडींग ऍण्ड डेव्हलपमेंट (आयएसटीडी), मोअर दॅन एचआर (एमटीएचआर), व्हायब‘ंट एचआर (व्हीएचआर) आणि एचआर होप्स यांचा समावेश होता.
आपल्या भाषणात डी. एस. कुलकर्णी म्हणाले की, एचआर विभागाने संस्थेसाठी गुणवंत कर्मचारी नेमताना त्याच्यात तो भविष्यात याच संस्थेचा मालक बनू शकतील अशी क्षमता तपासून ती वाढवली पाहिजे. या कर्मचार्यांमध्ये मुकेश अंबानी व बिल गेट यांच्यासारखे मोठे उद्योगसमूह काढण्याची क्षमता निर्माण होईल असे वातावरण त्यांना दिले पाहिजे. अगदी प्यून, ड्रायव्हर ते व्यवस्थापकाच्या निवडीतही त्या कामातील क्षमता व त्यामागची त्यांची जीवनशैलीही शोधायला हवी.टिल्लू यांनी आपल्या खुमासदार शैलीत भाष्य करताना सांगितले की, दुसर्यांचे आयुष्य बदलते ते एचआर! हसण्याने माणसातील भांडखोर वृत्ती कमी होते, तसेच आनंदी माणसे संस्थेची उत्पादकताही वाढवू शकतात. त्यासाठी आधी स्वत:मधील जिवंतपणा बाहेर काढून तो व्यक्त करायला शिका व चेहर्यावरील हास्य कायम ठेवा. यावेळी ओएचआरचे संस्थापक सदस्य सुधीर फाटक यांनी मानव संसाधन क्षेत्रात कुशल व्यवस्थापक निर्माण करण्यासाठी संस्थेच्या भविष्यातील उपक्रमांची माहिती दिली. सचिन लांडगे आणि शैलेंद्र देशपांडे यांनी कार्यक‘माचे सूत्रसंचालन केले.