कसब्यात भाजपचा उमेदवार ब्राम्हण समाजाचाच ….

Date:

पुणे- येथील कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाने ब्राम्हण समाजाचाच उमेदवार देण्याचे ठरविल्याचे वृत्त हाथी आले आहे. यामुळे शैलेश टिळक आणि धीरज घाटे हि दोन नावे आता आता आघाडीवर असल्याचे सांगण्यात येत आहे, या खेरीज मेधा कुलकर्णी या कसब्याच्या रिंगणात नाहीतच आणि स्वरदा बापट यांची संधी खासदार बापट यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव आणि खुद्द स्वरदा या देखील प्रसुतीच्या आराम काळात असल्याने दूर गेल्याचे मानले जाते आहे. दरम्यान राज्यातील नेतृत्वाच्या वरच्या  फळीतील एका नेत्याने मात्र कसबा मतदार संघात आता ब्राम्हण मतदार किती उरला आहे याचा अभ्यास केला पाहिजे असे मत नोंदवीत ब्राम्हणेतर उमेदवार द्यावा अशी अप्रत्यक्ष मागणी नोंदविल्याचे हि समजते आहे.

भाजपकडून कसबा पोटनिवडणुकीसाठी शैलेश टिळक यांच्या नाव आघाडीवर आहे. शैलेश टिळक हे भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे पती आहेत. शैलेश टिळक यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंबईत भेट घेतली आहे.तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली आहे , त्यांनी ‘कळवितो ‘ असे त्यांना सांगितले आहे,तर धीरज घाटे यांनी देखील फडणवीस यांची भेट घेतली आहे आणि टिळकांना देणार नसाल तर आपला प्राधान्याने विचार करावा असे सांगितले आहे.कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी आपण कसबा मतदार संघात निवडणूक लढविण्यास इच्छुक नसल्याचे सांगत त्यामुळे  या संदर्भात आपण कोणाला संपर्क केलेला नाही आणि कोणी आपल्याला संपर्क केलेला नाही असे म्हटले आहे. आपल्याला तेथील स्थानिक पदाधिकारी, इच्छुक यांच्या हक्कावर गदा आणण्याची अजिबात इछ्या नाही असेही त्यांनी म्हटल्याचे वृत्त समजते आहे. तर कन्यारत्न प्राप्त झाल्याने आता महिनाभर स्वरदा बापट माहेरी सांगलीतच असतील असेही समजते आहे.दरम्यान खासदार गिरीश बापट यांचा मतदार संघात मोठा प्रभाव आहे त्यांचा जसा  घरोघरी प्रत्यक्ष संपर्क आहे तसा टिळकांचा नाही आणि सर्व स्तरातील नागरिकांना सहज उपलब्ध होऊ शकेल असा उमेदवार म्हणून घाटे यांच्या सारखी तुलना टिळकांची होऊ शकत नाही . केवळ या अशाच मुद्द्यांवर आणि घराणेशाही नको या विचारावरच टिळकांना नाकारले जाईल असेही कोणाला वाटत नाही.मात्र  शेवटच्या क्षणी निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी खुद्द शरद पवारांशी जर खासदार बापट यांनी संपर्क साधला तरच बिनविरोध निवडणुकीचा मार्ग खुला होऊ शकणार आहे असेही मानले जाते. मात्र बापट यांच्या प्रकृती स्वस्थ्यामुळे हि शक्यता मावळली कि काय ? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होतो  आहे. महापालिकेतील माजी सभागृहनेते  गणेश बिडकर, माजी  स्थायी समिती अध्यक्ष  हेमंत रासने यापैकी ब्राम्हणेतर समाजातील इच्छुकांना हि येथून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा आहे , एवढेच नव्हे तर रासने यांनी जोरदार तयारीही सुरु केल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे. तीन वेळा स्थायी समिती अध्यक्षपद दिल्यानंतर रासने यांना उमेदवारी कशाला ? असा प्रश्न उपस्थित होत असला तरी त्यांची तयारी नजरेत भरणारीआहे .तरीही  भाजपचे राजकीय गणित धक्कातंत्रावर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही .याच आधारावर काल रात्री एका ज्येष्ठ पत्रकाराने कसब्यात माजी खासदार संजय काकडे यांना उमेदवारी दिली जाईल अशी टूम सोडल्याने बरीच खसखस पिकली .भाजप उद्या किंवा परवा अधिकृत उमेदवार घोषणा करण्याची शक्यता आहे.उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी फडणवीस किंवा चंद्रकांत दादा पाटील या दोहोपैकी एक जण खा. बापट यांच्याशी फोनवर संपर्क साधून उमेदवारी घोषित करतील असेही सांगितले जाते आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रांगोळ्यातून उलगडले छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य 

धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, पुणे...

हडपसरमध्ये रक्ताच्या कर्करोगावरील अत्याधुनिक उपचारांना नवी दिशा: सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी ऑटोलॉगसस्टेमसेल प्रत्यारोपण

नियमित आरोग्य तपासणीतून रक्ताच्या कर्करोगाचे निदान; मेकॅनिकल इंजिनिअरने केली कर्करोगावर यशस्वी मात पुणे, 26 जून 2026: हडपसर येथे राहणारे 46 वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअर ऋतिक मेहरा यांच्यासाठी जानेवारी 2026 मधील नियमित वार्षिक आरोग्य तपासणी आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. कोणतीही लक्षणे नसताना आणि नेहमीप्रमाणे काम सुरू असतानाच त्यांच्या रक्त तपासणीत हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे आढळले. पुढील तपासणीत त्यांना IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा या अस्थिमज्जेतील प्लाझ्मा पेशींमध्ये होणाऱ्या रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा हा प्लाझ्मा पेशींचा (Plasma Cells) एक प्रकारचा कर्करोग आहे, ज्यामध्ये शरीरातील असामान्य प्लाझ्मा पेशी लॅम्बडा लाईट चेन (Lambda Light Chain) नावाचे मोनोक्लोनल प्रोटीन जास्त प्रमाणात तयार करतात। सामान्यतः आपल्या शरीरातील प्लाझ्मा पेशी संसर्गाशी लढण्यासाठी अँटीबॉडीज बनवतात, परंतु या आजारात त्या निकामी आणि हानिकारक प्रोटीन्स बनवू लागतात.  "उपचारांपेक्षा कर्करोगाचे निदान स्वीकारणे माझ्यासाठी अधिक कठीण होते," असे ऋतिक मेहरा यांनी सांगितले. "मी पूर्णपणे सामान्य आयुष्य जगत होतो आणि मला कोणतीही लक्षणे नव्हती. नियमित आरोग्य तपासणीतून अचानक कर्करोग झाल्याचे समजल्याने मोठा धक्का बसला. मात्र माझ्या पत्नीने संपूर्ण काळात मला सकारात्मक राहण्यासाठी प्रोत्साहन दिले. उपचार आणि स्टेम सेल प्रत्यारोपणाची प्रक्रिया माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच सुरळीत झाली आणि आता मी हळूहळू माझ्या दैनंदिन आयुष्यात परतत आहे." निदानानंतर ऋतिक यांनी केमोथेरपीच्या तीन सायकल्स पूर्ण केल्या. त्यानंतर डॉक्टरांनी ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. या प्रक्रियेत रुग्णाच्याच स्टेम सेल्सचा वापर करून उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर रक्तपेशींची निर्मिती पुन्हा सुरू करण्यास मदत केली जाते.  त्यांना 15 मे 2026 रोजी सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर – मणिपाल हॉस्पिटल्सच्या नेटवर्कमधील रुग्णालयात  दाखल करण्यात आले. उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर, पूर्वी संकलित केलेले त्यांचे स्टेम सेल्स 16 मे 2026 रोजी पुन्हा शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले. कोणत्याही गुंतागुंतीशिवाय ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आणि उत्कृष्ट प्रकृतीसह त्यांना 2 जून 2026 रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या प्रकरणाविषयी बोलताना डॉ. चंद्रकांत लहाणे, सल्लागार हिमॅटॉलॉजिस्ट व हिमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर, म्हणाले, "मल्टिपल मायलोमा हा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही स्पष्ट लक्षणे न दाखवता वाढू शकतो. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणीमुळे या रुग्णामध्ये आजाराचे लवकर निदान होऊ शकले. पात्र रुग्णांमध्ये ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण हा मल्टिपल मायलोमावरील अत्यंत प्रभावी उपचार पर्याय असून, यामुळे दीर्घकालीन चांगले परिणाम आणि अधिक सखोल रेमिशन मिळण्यास मदत होते." ही केस रुग्णालयासाठीही महत्त्वपूर्ण ठरली असून, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर येथे बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेवा यशस्वीपणे सुरू झाल्याचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे हडपसर, मगरपट्टा, खराडी, वानवडी, हांडेवाडी, सासवड, बारामती, अकलूज, सोलापूर आणि आसपासच्या परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक रक्ताच्या कर्करोगावरील उपचार अधिक सुलभ होणार आहेत. इंडियन सोसायटी फॉर ब्लड अँड मॅरो ट्रान्सप्लांटेशन (ISBMT) च्या माहितीनुसार, भारतात 1983 ते 2022 या कालावधीत 26,843 बोन मॅरो आणि स्टेम सेल प्रत्यारोपण करण्यात आले आहेत. मात्र, दरवर्षी सुमारे 39,000 रुग्णांना या उपचारांची आवश्यकता असतानाही प्रत्यक्षात केवळ सुमारे 2,000 प्रत्यारोपणेच केली जातात. या सेवांच्या विस्ताराविषयी बोलताना डॉ. शशिकांत आपटे, संचालक – हिमॅटॉलॉजी, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नगर रोड, म्हणाले, "अधिकाधिक रुग्णांना त्यांच्या घराजवळ वेळेत आणि प्रभावी उपचार मिळावेत यासाठी प्रादेशिक स्टेम सेल प्रत्यारोपण केंद्रे बळकट करणे अत्यंत आवश्यक आहे. हडपसर येथे ही सेवा सुरू होणे हे अत्याधुनिक हिमॅटॉलॉजी उपचार अधिक व्यापकपणे उपलब्ध करून देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे." श्री. सगीर सिद्दीकी, प्रादेशिक संचालक – पश्चिम विभाग, मणिपाल हॉस्पिटल्स, म्हणाले,...

युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्य पुणे, दि....