मोहोळांचे का दुर्लक्ष ? अखेरीस राजू शेट्टींनी देखील विमानतळ प्राधिकरणावर ओढले ताशेरे…

Date:

पुणे- पुणे विमानतळाच्या आवारात खाजगी वाहनांना निर्बंध घालून प्रवासी वाहनांच्या मार्फत काही टोळकी प्रवाश्यांची लुटमार करत असल्याच्या तक्रारी ज्येष्ठ पत्रकारांनी आरटीओ, तसेच रिक्षाचालक संघटनेचे नितीन पवार यांच्याकडे केली होती पण या कडे हा प्राधिकरणाच्या आवारातील प्रश्न आहे असे त्यांनी स्पष्ट केले आणि वेळीच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे तक्रार केल्यावर त्यांनी याकडे सरार्स दुर्लक्ष केले होते आता याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पुणे विमानतळ प्राधिकरणावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, विमानतळावर प्रवाशांना घेण्यासाठी येणाऱ्या ओला, उबरसह इतर टॅक्सी वाहनांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जाते. यामुळे दररोज १२ ते १५ लाख रुपयांची जादा वसुली होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

शेट्टी यांनी त्यांचा अनुभव सांगितला. दिल्लीहून रात्री दोन वाजता पुणे विमानतळावर आल्यावर त्यांनी टॅक्सी बुक केली. विमानतळापासून शासकीय विश्रामगृहापर्यंतचे ऑनलाइन भाडे ३५० ते ३७५ रुपये होते. मात्र, विमानतळाच्या गेटवरून टॅक्सीने प्रवाशाला घेऊन जाण्यासाठी ६५० रुपये द्यावे लागले. चौकशी केल्यावर त्यांना समजले की, गेटवरून प्रवासी घेतल्यास अतिरिक्त शुल्क लागते. हे शुल्क टाळण्यासाठी विमानतळापासून ६०० मीटर दूर असलेल्या एरोमॉलमध्ये जावे लागते.

प्रवाशांकडे सामान आणि बॅगा असल्याने रात्रीच्या वेळी ६०० मीटर चालत जाणे अनेकांना शक्य नसते. त्यामुळे प्रवाशांना नाईलाजाने हे अतिरिक्त शुल्क भरावे लागते, असे शेट्टी म्हणाले. त्यांच्या माहितीनुसार, ६५० रुपयांच्या भाड्यात ३७५ रुपये टॅक्सी कंपनीचे मूळ भाडे असते, तर २७५ रुपये टर्मिनल शुल्क असते. यातून ओला, उबर किंवा इतर कंपन्या २५ ते ३० टक्के कमिशन घेतात. इंधन, वाहन देखभाल, कर्जाचा हप्ता आणि चालकाचा खर्च वजा केल्यावर टॅक्सीचालकाच्या हातात खूप कमी पैसे उरतात.

या संपूर्ण व्यवस्थेत मोठी मक्तेदारी तयार झाली असून प्रवासी आणि टॅक्सी व्यावसायिकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. या कंत्राटांमध्ये काही राजकीय नेते, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी सहभागी असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. मात्र, त्यांनी या आरोपांचे कोणतेही पुरावे सार्वजनिक केलेले नाहीत. विमानतळ प्राधिकरणाने या शुल्काबाबत पारदर्शक माहिती जाहीर करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

दिल्लीत बेकायदा इमारतींवर चालणार बुलडोझर; CM रेखा गुप्तांचे MCDला निर्देश

सत्य निकेतन PG दुर्घटनेनंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये; सर्व PGची...

गणेशोत्सवात नियम मोडणाऱ्यांची गय नाही; अमितेश कुमारांचा स्पष्ट इशारा

दहीहंडीत ध्वनिप्रदूषण नियमभंगाच्या 116 प्रकरणांत कारवाई; प्लाझ्मा-प्रेशर साऊंडवर बंदी,...

एकनाथ शिंदेंचा लंडनमध्ये तिहेरी गौरव; ब्रिटिश संसदेत दोन मानाचे सन्मान

‘लाडकी बहीण’, ‘शासन आपल्या दारी’सह लोककल्याणकारी योजनांची आंतरराष्ट्रीय दखल;...

डीजे-दणदणाट संस्कृतीला शोभत नाही : लोकमान्य टिळकांचे खापर पणतू रोहित टिळकांचा मंडळांना स्पष्ट संदेश

गणेशोत्सवाची मूळ संकल्पना समाज संघटनाची; ध्वनीप्रदूषण टाळून पारंपरिक पद्धतीने...