पुण्यात CNG दरात 2 रुपयांची वाढ; आता प्रतिकिलो 97.75 रुपये

Date:

पुणे : पश्चिम आशियातील वाढलेला तणाव आणि त्याचा परिणाम म्हणून स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून LNG (द्रवीभूत नैसर्गिक वायू) वाहतुकीत आलेल्या अडथळ्यामुळे जागतिक पातळीवर स्पॉट LNGच्या दरात मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (MNGL) पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड आणि चाकण, तळेगाव व हिंजवडी परिसरातील वाहनांसाठीच्या CNGच्या दरात प्रतिकिलो 2 केवळ रुपयांची वाढ जाहीर केली आहे.

नवीन दरानुसार CNGचा किरकोळ विक्री दर 97.75 रुपये प्रतिकिलो इतका होणार असून, हा दर 31 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून म्हणजेच 1 सप्टेंबर 2026 पासून लागू झाला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून पश्चिम आशियातील संकट पुन्हा तीव्र झाले असून, जुलै 2026 पासून त्याचा LNGच्या जागतिक पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हा जागतिक ऊर्जा व्यापारातील महत्त्वाचा मार्ग असल्याने तेथून LNG वाहतुकीवर परिणाम झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील LNGच्या किमती संकटापूर्वीच्या तुलनेत जवळपास दुप्पट झाल्या आहेत. त्यातच आगामी हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर युरोपमध्ये नैसर्गिक वायूचा साठा वाढविण्याची लगबग सुरू असल्याने जागतिक LNG बाजारावरील दबाव आणखी वाढला आहे.

भारतामध्येही अर्थव्यवस्थेच्या वेगवान वाढीसोबत CNGची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी CNGसाठी लागणाऱ्या नैसर्गिक वायूचा मोठा हिस्सा आयात केलेल्या स्पॉट LNGमधून मिळवावा लागत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढलेले दर आणि स्पॉट LNGवरील वाढते अवलंबित्व यामुळे CNGच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या गॅसच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे.

या वाढत्या खर्चाचा पूर्ण भार ग्राहकांवर न टाकता MNGLने अतिरिक्त खर्चाचा मोठा हिस्सा स्वतःकडे घेतला असून, त्यातील केवळ काही भाग ग्राहकांवर टाकण्यात आला आहे, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सध्याची दरवाढ मर्यादित ठेवण्यात आल्याचे MNGLकडून सांगण्यात आले.

दरवाढीनंतरही पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत CNGमधून वाहनधारकांना आर्थिक बचत मिळत राहणार आहे. पुणे शहरातील सध्याच्या इंधन दरांचा विचार करता, प्रवासी कारसाठी CNGमुळे पेट्रोलच्या तुलनेत सुमारे 45 टक्के, तर डिझेलच्या तुलनेत सुमारे 23 टक्के बचत होत आहे. ऑटोरिक्षांसाठी ही बचत सुमारे 25 टक्के असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.

दरम्यान, घरगुती वापराच्या PNGच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. PNGचे दर पूर्वीप्रमाणेच कायम राहणार आहेत.

पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, चाकण, तळेगाव आणि हिंजवडी परिसरातील CNG ग्राहकांनी नवीन दराची नोंद घ्यावी, असे आवाहन MNGLने केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान

_१८२ उमेदवार निवडणूक रिंगणात _२ हजार ४१९ मतदान केंद्रांवर १०...

५० टक्के शेतकऱ्यांचा विरोध असल्यास टीपी स्कीम रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे!

शेतकऱ्यांवर नगररचना योजना लादणार नाही; PMRDA आयुक्त डॉ. अभिजीत...

पुणे अग्निशमन दलाच्या ९ जवानांची उल्लेखनीय कामगिरी; सहा महिन्यांचे विशेष प्रशिक्षण यशस्वी!

सहा जवान विशेष प्रावीण्यासह, तर तीन जवान विशिष्ट प्रावीण्यासह...

निकृष्ट रस्ते कामांसाठी आता कंत्राटदारांसह महापालिका अधिकारीही जबाबदार; आयुक्तांचे कठोर निर्देश!

पुणे ग्रँड टूर २०२७ साठी रस्ते विकासकामांना गती; बाणेर–गणेशखिंड...