पुण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची विविध ठिकाणी उड्डाणपूल व अंडरपासच्या कामांची पाहणी; कामांना गती देण्याचे निर्देश

Date:

पुणे:

पुणे शहरातील नागरिकांची वाहतूक कोंडीतून कायमस्वरूपी सुटका करण्यासाठी राबवल्या जात असलेल्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची आज सलग तीन ठिकाणी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सविस्तर पाहणी केली. पुणे महापालिकेचे अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या समवेत येरवडा, गणेशखिंड रस्ता आणि औंध (ब्रेमेन चौक) परिसरातील उड्डाणपूल व अंडरपासच्या कामांचा आढावा घेण्यात आला.

येरवडा परिसर मध्ये संगमवाडीकडून विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी २०२० मध्ये प्रस्तावित करण्यात आलेल्या उड्डाणपूल प्रकल्पाचे काम २०२६ मध्ये सुरू झाले असून, सध्या पिलर्सचे काम अत्यंत वेगाने सुरू आहे.
एप्रिल २०२८ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करून नागरिकांच्या सेवेत दाखल करण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे येरवडा, कल्याणी नगर, विमाननगर, डेक्कन आणि शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनधारकांना दिलासा मिळेल.
उड्डाणपुलाखालील जागेचे स्थानिक संस्कृतीला साजेसे डिझाइन व सुशोभीकरण केले जात असल्याबद्दल महापालिका प्रशासनाचे आमदार शिरोळे यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले.
तसेच गणेशखिंड रस्ता व पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचा मुख्य भाग पूर्ण झाला असून, पाषाण रॅम्पच्या ठिकाणी जमिनीखालील पाण्याच्या समस्येमुळे थांबलेले काम ‘रिटेनिंग वॉल’च्या मजबुतीकरणासह पुन्हा सुरू झाले आहे. हे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होईल. असे शिरोळे म्हणाले.
तसेच सेनापती बापट रस्त्याला जोडणारा आर्म आणि गणेशखिंड रस्त्यावरून औंध राजभवनाकडे जाणाऱ्या अंडरपासच्या कामांचीही प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. हा संपूर्ण प्रकल्प २०२७ च्या अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
तसेच प्रस्तावित ब्रेमेन चौक ते औंध गावठाण उड्डाणपूल ची पाहणी व आढावा झाला . सदर उड्डाणपूल ची मागणी शिरोळे यांनी केली होती आणि त्याला मान्यता मिळाली आहे. पिंपरी-चिंचवड आणि हिंजवडीकडून येणाऱ्या वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी ब्रेमेन चौक ते औंध गावठाण दरम्यान उड्डाणपूल उभारण्याच्या जागेची पाहणी केली. या प्रकल्पाच्या नियोजनासाठी २ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
लँडिंगच्या ठिकाणच्या तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी पुढील आठवड्यात खासदार मुरलीधर अण्णा मोहळ यांच्या नेतृत्वाखाली व पुणे महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक आयोजित केली जाईल. हा उड्डाणपूल पूर्ण झाल्यास पिंपरी-चिंचवड ते शिमला ऑफिस प्रवास पूर्णपणे सिग्नलमुक्त होईल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महाराष्ट्राच्या ऊर्जा विभागाच्या दालनाला सर्वोत्कृष्ट नाविन्यपूर्ण स्टॉलचा पुरस्कार

नवी दिल्लीतील जागतिक परिषदेमध्ये ऊर्जा प्रदर्शनीला मोठा प्रतिसाद मुंबई: नवी दिल्ली...

पुण्यात CNG दरात 2 रुपयांची वाढ; आता प्रतिकिलो 97.75 रुपये

पुणे : पश्चिम आशियातील वाढलेला तणाव आणि त्याचा परिणाम...

कलाकाराने उपेक्षितांचा आवाज बनले पाहिजे

-उर्गेंन आर्ट फेस्टिवल मधील कलाकार परिसंवादामध्ये ज्येष्ठ कलावंतांचे मत पुणे...

प्रविण भागवत यांना अनिरुद्ध देशपांडे यांच्या हस्ते  ‘वासुदेव जीवनदृष्टी गौरव पुरस्कार’ प्रदान

पुणे : वेद वासुदेव प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘वासुदेव जन्मोत्सव...