SHARAD LONKAR

59047 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

पुण्याचा गुटकाकिंग कोण ?कुठवर चालणार छापे सत्र ??

२२.९१ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; दोन आरोपी अटकेत पुणे | पुण्याचा प्रमुख गुटखा किंग कोण ? पोलीस छोटे मोठे छापे टाकून करोडोचा गुटखा पकडत...

बाप- लेकीच्या नात्याची‘द्विधा’

बाप आणि लेक हे नातं शब्दांत व्यक्त करणं कठीण असतं. आईच्या कुशीत माया तर वडिलांच्या सावलीत सुरक्षिततेचा आधार असतो. आपल्या लेकीच्या आनंदासाठी झटणारा बाप आणि संकटात वडिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी लेक, हे नात्याचं सर्वात सुंदर रूप असतं. ‘द्विधा’ या आगामी मराठी चित्रपटातही बाप-लेकीच्या नात्यातील प्रेम, त्याग आणि भावनिक जिव्हाळा अत्यंत हळुवार व हृदयस्पर्शी पद्धतीने उलगडण्यात आला आहे. ‘फादर्स डे’चं औचित्य साधत ‘द्विधा’ चित्रपटाचे भावस्पर्शी पोस्टर आणि टिझर प्रदर्शित करण्यात  आला असून येत्या २१ ऑगस्टला हा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन निलेश भास्कर नाईक यांचे आहे. निर्माती विदुला रमेश आजगावकर आहेत.  नात्यांमधली ‘द्विधा’ ही फक्त निर्णयांची नव्हे, तर भावनांचीही लढाई असते. विश्वास आणि अपेक्षा यांच्या मधोमध उभं राहिलेलं मन कधी स्वतःसाठी, तर कधी समोरच्यांसाठी झुकतं. ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर आणि अभिनेत्री मानसी कुलकर्णी यांच्या प्रभावी भूमिकांतून ‘द्विधा’ बाप-लेकीच्या नात्याचा हळवा प्रवास प्रेक्षकांसमोर मांडणार आहे. या दोघांसोबत रेणूका दफ्तरदार, निमिष कुलकर्णी, आस्ताद काळे, तन्वी कुलकर्णी, पुष्कर सराड, मनोज कोल्हटकर, भूषण कडू, प्रफुल्ल सावंत, हेमांगी वेळणकर, ओवी तानवडे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. ‘द्विधा’ हा केवळ बाप-लेकीच्या नात्याचा चित्रपट नाही, तर प्रत्येक नात्यात येणाऱ्या भावनिक संघर्षाची कहाणी आहे. आयुष्यात एखादी वेळच अशी येते की, मन ‘द्विधा’ अवस्थेत अडकतं. ही भावना अत्यंत संवेदनशीलतेने पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. फादर्स डेच्या निमित्ताने प्रदर्शित झालेला हा टिझर प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करेल, असा विश्वास दिग्दर्शक निलेश नाईक यांनी व्यक्त केला. ‘द्विधा’ चित्रपटाची कथा, पटकथा, दिग्दर्शन, संकलन निलेश नाईक यांनी केले आहे. चित्रपटातील गीते गीतकार मंगेश कांगणे, मंदार चोळकर यांची असून संगीताची जबाबदारी निलोत्पल बोरा आणि शैलेंद्र बर्वेयांनी सांभाळली आहे. निलोत्पल बोरा यांनी नेटफ्लिक्ससाठी अनेक लोकप्रिय वेब सिरीज आणि प्रकल्पांवर काम केले आहे. हंसिका परीक, मयुरी पटवर्धन यांचा स्वरसाज गाण्यांना लाभला आहे. छायांकन सिमरजीत सुमन, अश्विनी पाखरोट,श्रीधर अल्ले यांचे आहे  वेशभूषा विदुला आजगावकर यांची आहे. ध्वनीरचना इक्रामुद्दीन रुस्तम लोचूर तर ध्वनीमिश्रण योगेश कारभारी नेहे, आकाश स्वजन सेनगुप्ता यांनी केले आहे.

फुरसुंगीत स्टील व्यावसायिकाच्या कार्यालयावर गोळीबार; बिश्नोई गँगच्या कनेक्शनची चर्चा

पुणे-पुण्यात खंडणीसाठी एका व्यावसायिकाच्या कार्यालयासमोर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हडपसर-सासवड रस्त्यावरील फुरसुंगी भागात सोमवारी रात्री हा प्रकार घडला. प्राथमिक तपासात यामागे...

इतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज : प्र. के. घाणेकर

वनराई आणि इतिहास प्रबोधन समितीच्या संयुक्त उपक्रमात ‘इतिहासातील पर्यावरण’ विषयावर व्याख्यान पुणे, : पर्यावरण संवर्धनासाठी केवळ वर्तमानातील उपाययोजनांवर अवलंबून न राहता इतिहासातील पर्यावरणविषयक जाण, परंपरा...

प्रकाशकांनी ३० जून पर्यंत वार्षिक विवरणपत्र दाखल करावे, विवरणपत्र दखल न केल्यास दहा हजारांचा दंड

पुणे दि. २३: प्रेस आणि नियतकालिक नोंदणी अधिनियम, २०२३ अंतर्गत नोंदणीकृत प्रत्येक नियतकालिकाने आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र (Annual Statement) प्रेस सेवा पोर्टल (PSP)...

Breaking

सरकारच देतेय आता भेसळयुक्त पेट्रोल:E-20 पेट्रोल मुद्द्यावरून मोठे आंदोलन उभारण्याची तयारी

नवी दिल्ली : 'नीट' पेपरफुटी प्रकरणात जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनानंतर...

ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते समाजगुरूंचा सन्मान…

पुणे, दि.27 : विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या,...

‘विद्यार्थ्यांसोबत गुन्हेगारांसारखे वर्तन यापूर्वी कधीही झाले नाही’:संसदेत खरगे यांचा हल्ला, गदारोळात अँटी पेपर लीक विधेयक सादर

नवी दिल्ली-संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याची सुरुवात सोमवारीही सत्ताधारी...

पुण्यात काँग्रेसचा कँडल मार्च; नीट पेपरफुटी प्रकरणी आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली, केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी

पुणे-नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आणि आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली...
spot_imgspot_img