लाच प्रकरणात पकडलेल्या एपीआय राहुल अशोक पाटीलला ५ दिवसाची पोलीस कोठडी

Date:

पुणे- अटकेत असलेल्या आरोपीला जामिनावर सुटण्यासाठी अनुकूल अहवाल द्यावा म्हणून ५ लाखाची लाच मागून त्यातील एकाकडून एक लाख रुपयांची लाच घेणाऱ्या विमानतळ पोलिस ठाण्यातील  सहायक पोलिस निरीक्षकासह त्याच्या साथीदाराला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  ही कारवाई केली. सहायक पोलीस निरीक्षक राहुल अशोक पाटील  (वय ३२, रा. वडगाव शिंदे रस्ता) आणि संतोष भाऊराव खांदवे  (वय ४६, रा. लोहगाव) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती. तक्रारदाराच्या वडिलांचा जमीन-खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. या व्यावसायिक कारणातून त्यांच्या वडिलांविरोधात विमानतळ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात तक्रारदाराच्या वडिलांना अटक झाली असून ते पोलिस कोठडीत आहेत. या प्रकरणात जामीन मिळावा, यासाठी तक्रारदार यांनी पाटील यांच्याशी संपर्क केला होता.जामिनाला विरोध न करण्यासाठी आणि अनुकूल अभिप्रायासाठी पाटील यांनी तक्रारदाराकडे पाच लाखांची लाच मागितली होती.तडजोडीत तक्रारदाराने तीन लाखांची लाच देण्याचे मान्य केले.
लाचेचा पहिला हप्ता म्हणून एक लाखांची मागणी करण्यात आली होती.
पाटील यांनी त्यांचा ओळखीचे खांदवे याला तक्रारदाराकडून लाच घेण्यासाठी लोहगाव परिसरात पाठविले.दरम्यान, या प्रकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून खांदवेला एक लाखांची लाच घेताना पकडले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आरेमधील 65 एकरवर वृक्ष लागवडीचे नियोजन करा

मुंबई उपनगर पालकमंत्री अँड आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई, दि....

आयुष्मान कार्ड अनिवार्य ; ई-केवायसी प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी नोंदणीचे आवाहन

मुंबई दि.४ : ‘एकत्रित आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य व महात्मा ज्योतिराव...

‘गंगामातेने मला बोलावलं होतं आणि आता सगळीकडे कमळच!’ पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया

"गंगोत्रीपासून गंगा सागरपर्यंत सगळीकडे कमळ"दिल्ली: आजचा दिवस ऐतिहासिक आणि...