तीस वर्षांपेक्षा कमी वयाच्या स्त्रियांमधील 34 टक्के जणींना ग्रासले ‘डिमिनिश्ड ओव्हरियन रिझर्व्ह’ने

Date:

पुणे,  स्त्रियांमध्ये सुरुवातीच्या काळात सुमारे 20 लाख स्त्रीबिजे असतात. स्त्रीचे वय वाढत जाते, तसे ही स्त्रीबिजे कमी होत जातात. उच्च जर्जाची स्त्रीबिजे (आणि अर्थातच सुदृढ, निरोगी भ्रूण) निर्माण करण्याची स्त्रीची क्षमता ‘ओव्हरियन रिझर्व्ह’ (ओआर) या नावाने ओळखली जाते. एखाद्या स्त्रीचा प्रजनन क्षमतेचा काळ किंवा तिचे त्यासंबंधीचे आरोग्य हे या ‘ओआर’वर अवलंबून असते. वयानुसार स्त्रियांमधील हे ओआर कमी-जास्त प्रमाणात घटत जात असते.

पुण्यातील ‘नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी’च्या सल्लागार डॉ. करिश्मा डाफळे यांनी आज येथील पत्रकार परिषदेत स्त्रियांमधील ओआर कमी होण्याची कारणे व त्यावरील उपचार यांविषयी माहिती दिली. त्या म्हणाल्या,  “सन 2019 मध्ये ‘नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी’ने केलेल्या पाहणीत कमी ‘ओव्हेरियन रिझर्व्ह’ असलेल्या स्त्रियांची संख्या 26 टक्के आढळली. यातील 34 टक्के स्त्रियांचे वय तीसपेक्षा कमी होते. पुनरुत्पादनाचे चक्र चालू असताना, एक स्त्री दरमहा सुमारे 30 ते 50 स्त्रीबिजे गमावते. यामुळे तिच्या ‘ओआर’मध्येही घट होत जाते. रजोनिवृत्ती होण्याच्या वेळी, वयाच्या 45 ते 50 वर्षापर्यंत तिचा ओआर संपूर्णपणे संपतो. ओव्हरियन रिझर्व्ह संपत चालल्यामुळे स्त्रियांमधील नैसर्गिकरित्या गर्भधारणेच्या क्षमतेत अडथळे येतात.  ज्या महिलांनी गर्भधारणेस उशीर करण्याचे ठरविले असेल, त्यांना  एएमएच चाचणी नावाची एक साधी रक्त चाचणी करून घेता येईल. यातून मूल जन्माला घालणे किती काळ लांबविता येईल, हे त्यांना समजून घेता येते. त्यानुसार त्या गर्भधारणेची नियोजन करू शकतात.”

वयाच्या पस्तिशीपूर्वीच रजोनिवृत्ती आली किंवा ओव्हरियन रिझर्व्ह संपल्याची स्थिती उद्भवली, तर त्यास्थितीस बीजकोश अकाली निकामी होणे (प्रीमॅच्युअर ओव्हरियन फेल्युअर – पीओएफ) असे म्हणतात. या परिस्थितीत स्त्रीबीज उत्पन्न करण्याची स्त्रीची क्षमता अधिक वेगाने संपते. त्यामुळे तिच्या गर्भधारणेच्या संभाव्यतेवर परिणाम होऊ शकतो. वंशानुगत, जीवनशैली आणि पर्यावरणीय घटक हे रजोनिवृत्ती नैसर्गिकपणे येण्यावर परिणाम करतात.

रजोनिवृत्तीचे सरासरी वय 50 वर्षे हे आहे. सुमारे 1 टक्का इतक्या स्त्रियांना वयाच्या साठीनंतरही मासिक पाळी येते. तथापि, सध्याच्या काळात 40 वर्षांखालील महिलांमध्ये रजोनिवृत्ती येण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा स्त्रियांची संख्या वाढते आहे. 29 ते 34 वर्षांच्या काळात रजोनिवृत्तीची लक्षणे आढळली, असे 1 ते 2 टक्के स्त्रियांनी म्हटल्याचे एका अभ्यासात नमूद करण्यात आलेले आहे. 35 ते 39 वर्षे वयोगटातील महिलांच्या बाबतीत ही आकडेवारी 8 टक्क्यांपर्यंत गेली आहे.

ओव्हरियन रिझर्व्ह कमी होण्याची कारणे कोणती?

धूम्रपान, जंक फूडचा वापर इत्यादी आजकालच्या जीवनशैलीच्या सवयी ओआर कमी होण्यास कारणीभूत ठरतात. अर्थात इतरही काही घटकांचा यात समावेश आहेः

  • अनुवांशिक विकृती (कमी प्रतीचीएक्स गुणसूत्रे आणि इतर एक्स गुणसूत्रांमधील विकृती)
  • आक्रमक उपचार (कर्करोगासाठीविकिरण)
  • ‘एंडोमेट्रिओसिस’सारखी गर्भाशयाचीशस्त्रक्रिया

बीजकोश अकाली अक्षम होण्याची कारणे

एक्स-गुणसूत्रांमधील विकृती, ऑटोसोमलची कारणे, गॅलॅक्टोजेमिया, ऑटोइम्यून डिसऑर्डर, कर्करोगासाठीचा उपचार, टर्नर्स सिंड्रोम, एंजाइममधील दोष आणि पर्यावरणातील विषारी द्रव्ये यांमुळे प्राथमिक ‘ओव्हरियन इन्सफिशिअन्सी’ उद्भवू शकते. याव्यतिरिक्त, योग्य निरीक्षण न करता वंध्यत्व उपचार प्रक्रियेचा भाग म्हणून केल्या गेलेल्या बीजकोश उत्तेजनाचे अनेकदा केलेले उपचारदेखील ओआर कमी होण्यास कारणीभूत ठरू शकतात. तसेच, पीओएफच्या 10 टक्के प्रकरणांमध्ये बीजकोश अकाली निकामी होण्यास अनुवंशिकता कारणीभूत असू शकते.

बीजकोशातील प्राथमिक अपुरेपणा शोधणे

१.२ अब्ज लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात तब्बल 3 कोटी जोडप्यांना वंध्यत्वाचा त्रास होत असतो, असा अंदाज आहे. यापेक्षाही चिंताजनक बाब म्हणजे तरुण स्त्रियांमध्ये वंध्यत्वाचा सामना करण्याचे प्रमाण वाढत आहे. मध्यमवयीन जोडप्यांमध्ये वंधत्याच्या ज्या समस्या यापूर्वीच्या काळात प्रामुख्याने दिसून येत असत, त्या आता 35  वर्षांपेक्षा कमी वयाच्या स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येत आहेत.

एक प्रकरणः आयटी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या व 32 वर्षे वयोगटातील एका जोडप्याने प्राथमिक वंध्यत्वावर उपचार घेण्यासाठी पुणे येथील नोवा आयव्हीएफ फर्टिलिटी येथे भेट दिली. मासिक पाळीच्या काळात कमी रक्तस्त्राव होण्याव्यतिरिक्त, रुग्णाला इतर कोणत्याही तक्रारी नव्हत्या. अल्ट्रासाऊंड तपासणी केल्यावर तिच्या शरीरात स्त्रीबिजांची संख्या तिच्या वयाच्या अनुषंगाने खूपच कमी असल्याचे (2 बिजे / बीजकोश) आढळले. तिला एएमएच चाचणी करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यातून असे दिसून आले की तिचा ओआर खूपच कमी झाला आहे. तिची एएमएच पातळी 0.3 इतकी होती. तिला त्वरीत आयव्हीएफ आणि ‘एम्ब्रियो पूलिंग’चा सल्ला देण्यात आला. दोनवेळा सलग आयव्हीएफ उपचार घेतल्यानंतर आम्हाला २ चांगल्या ग्रेडचे भ्रूण मिळाले. ते रुजविल्यानंतर ती गर्भवती झाली व तिने एका निरोगी बाळाला जन्म दिला.

बीजकोशाच्या प्राथमिक अपुरेपणाच्या काही प्रमुख लक्षणांमध्ये अनियमित मासिक पाळी, प्राथमिक किंवा दुय्यम अमिनोरेरिया, गरम फ्लश, रात्री घाम येणे, कामवासना कमी होणे इत्यादींचा समावेश आहे. म्हणूनच विशीच्या उत्तरार्धात आणि तिशीच्या सुरुवातीच्या वयाच्या तरुण स्त्रियांना गर्भधारणा होण्यात अडचणी येत असल्यास त्यांनी तज्ज्ञांचा सल्ला तबडतोब घ्यावा, अशी शिफारस केली जाते. या अडचणींच्या कारणांचा लवकर शोध घेण्याने उपचार यशस्वी होण्याची शक्यता वाढते.

ओआर जाणून घेण्यासाठी अँटी-मुल्येरियन हार्मोन (एएमएच) चाचणी

डॉ. करिश्मा म्हणाल्या, “महिलेचे वय आणि प्रजनन क्षमता या एकमेकांशी निगडीत असतात. महिलांमधील बिजांचे प्रमाण वयानुसार कमी होत असल्याने जोडप्यांनी त्यानुसार गर्भधारणेचे नियोजन करायला पाहिजे. एखाद्या महिलेची प्रजनन क्षमता निर्धारित करण्यासाठी डॉक्टर ‘अँटी-म्युलरीन हार्मोन’ (एएमएच) चाचणी करण्याची शिफारस करतात. एएमएच या हार्मोनचा स्राव विकसनशील पिशव्या (फोलिकल्स) मधील पेशींद्वारे होतो. ओव्हरियन रिझर्व्ह जाणून घेण्याकरीता या हार्मोनचे प्रमाण जाणणे आवश्यक असते. रक्ताच्या चाचणीतून ते ओळखता येते. स्त्रीच्या रक्तातील ‘एएमएच’ची पातळी तिच्या ‘ओआर’चे प्रमाण सांगते. तिच्या बीजांची संख्या आणि भविष्यात किती वर्षांपर्यंत ती गर्भधारणा करू शकेल, याचा अंदाज यातून काढता येतो.”

नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटीविषयी..

नोव्हा आयव्हीआय फर्टिलिटी (एनआयएफ) ही भारतात प्रजनन क्षमता निर्मिती क्षेत्रात सर्वात मोठी सेवा देणारी संस्था आहे. असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी (एआयटी – आर्ट) हे अत्याधुनिक तंत्रज्ञान स्पेनमधील आयव्हीआय या संस्थेच्या सहकार्याने भारतात आणण्याचे एनआयएफचे उद्दीष्ट आहे. या भागीदारीमुळे नोव्हाच्या आयव्हीएफ सेवांमध्ये व तंत्रज्ञानामध्ये मोलाची भर पडणार आहे. या तंत्रज्ञानाच्या सॉफ्टवेअरवरील स्वामित्व, प्रशिक्षण व गुणवत्ता व्यवस्थापन यांचा लाभही एनआयएफला होणार आहे. आयव्हीआयकडील नैपुण्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रचंड अनुभव यांच्या सहयोगाने एनआयएफ भारतात तशीच जागतिक दर्जाची सेवा व धोरणे यांचा अवलंब करणार आहे.

आययूआय, आयव्हीएफ आणि अॅन्ड्रॉलॉजी या सेवा देण्याबरोबरच एनआयएफ ही संस्था भ्रूण व बीज साठवणुकीसाठीचे व्हिट्रिफिकेशन हे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरते. तसेच भ्रूण स्वीकृत करण्यासाठी गर्भाशयाची क्षमता व योग्य वेळ आहे, हे तपासण्यासाठीचे इआरए तंत्रज्ञान, त्याचबरोबर भ्रूण गर्भाशयात रुजवण्यासाठीची पीजीएस व पीजीडी ही तंत्रे एनआयएफ उपयोगात आणते. ज्या रुग्णांमध्ये आयव्हीएफचे उपचार यापूर्वीअयशस्वी झाले आहेत, त्यांच्यासाठीही लाभदायक ठरू शकतील, अशा या प्रक्रिया आहेत. एनआयएफची सध्या देशात 20 केंद्रे आहेत. बंगळूरमध्ये 3, मुंबई, अहमदाबाद, नवी दिल्ली येथे प्रत्येकी 2 आणि चेन्नई, कोईमतूर, हिस्सार, हैदराबाद, इंदूर, जालंधर, कोलकता, लखनौ, पुणे, सूरत व विजयवाडा येथे प्रत्येकी 1 अशी ही केंद्रे सुरू आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

… अन्यथा शिंदेंच्या शिवसेनेवर राज्यभर बहिष्कार:पुणे श्रमिक पत्रकार संघाचा इशारा

पुणे: पत्रकारांना धमक्या दिलेले खासदार संजय दिना पाटील यांना...

पत्रकारांचा अपमान करणाऱ्या खासदारावर कडक कारवाई करावी – राजा माने

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सर्व जिल्ह्यात करणार आंदोलन मुंबई...

पुण्यात 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या पहिल्या केंद्राच्या उद्घाटनासह कॉस्मो कन्झ्युमरने ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रात आपले स्थान केले आणखी मजबूत

पुणे, 25 जून 2026: कॉस्मो फर्स्ट लिमिटेडच्या ग्राहकाभिमुख व्यवसाय विभाग असलेल्या कॉस्मो कन्झ्युमरने आज पुण्यात आपल्या पहिल्या 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या उद्घाटनाची घोषणा केली. या माध्यमातून कंपनीने संघटित वाहन संरक्षण आणि कार केअर सेवा क्षेत्रात धोरणात्मक विस्तार केला आहे. मजबूत ऑटोमोटिव्ह परिसंस्था, वाढता प्रीमियम वाहनांचा ग्राहकवर्ग आणि वाहन संरक्षण उपायांचा वाढता ग्राहक स्वीकार या कारणांमुळे पुण्याची पहिल्या केंद्रासाठी निवड करण्यात आली. कंपनीच्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट पोर्टफोलिओमधील कॉस्मो पीपीएफ पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कॉस्मो सनशील्ड विंडो फिल्म्स आणि कॉस्मो गार्ड कोटिंग्ज व कंपाऊंड्स यांना मिळालेल्या मजबूत प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर हे उद्घाटन करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष 26 मध्ये या व्यवसायाने 23 कोटी रु. चा महसूल नोंदवला असून, विंडो फिल्म्ससाठी 75 हून अधिक वितरक आणि पेंट प्रोटेक्शन फिल्म्ससाठी 40 वितरक अशा देशव्यापी वितरण जाळ्याच्या बळावर ही वाढ साध्य झाली आहे. नवीन 4C केंद्र हे उत्पादनातील नवकल्पना, वितरण विस्तार, सेवा क्षमता आणि ग्राहक सहभाग यांच्या एकत्रित माध्यमातून ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट मूल्यसाखळीत आपले स्थान अधिक बळकट करण्याच्या कॉस्मो कन्झ्युमरच्या व्यापक धोरणाचे प्रतिक आहे. वाहनांचे सौंदर्य जपणे, अधिक आरामदायी अनुभव देणे आणि वाहनाचे दीर्घकालीन मूल्य टिकवून ठेवणे यासाठी ग्राहकांकडून वाढत्या प्रमाणात उपाययोजनांची मागणी होत असल्याने वेगाने विकसित होत असलेल्या कार केअर आणि वाहन संरक्षण बाजारपेठेत कंपनीला मोठ्या संधी दिसत आहेत. या घडामोडीबाबत बोलताना कॉस्मो फर्स्टचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज पोद्दार म्हणाले, “कॉस्मो फर्स्टमध्ये आम्ही सातत्याने उच्च वाढीची क्षमता असलेली क्षेत्रे ओळखून त्यामध्ये व्यवसाय उभारले आहेत. ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट हे असेच एक भरपूर व्यवसाय संधी असलेले क्षेत्र आहे. भारतातील विंडो फिल्म बाजारपेठेचा आकार सुमारे 1,000 कोटी रु. असल्याचा अंदाज आहे तर पेंट प्रोटेक्शन फिल्म विभागात दरवर्षी जवळपास 30% वाढ होत आहे. त्यामुळे दर्जेदार उत्पादने आणि विश्वासार्ह सेवा देणाऱ्या संघटित कंपन्यांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. आमच्या पहिल्या 4C केंद्राचे उद्घाटन हे त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. 4C नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी आणि कॉस्मो पीपीएफ तसेच कॉस्मो सनशील्ड या आमच्या ब्रँड्सना अधिक बळकटी देण्यासाठी आम्ही सुमारे 20 कोटी रु. ची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. येत्या काही वर्षांत वाहन संरक्षण आणि कार केअर क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून कॉस्मो कन्झ्युमरची ओळख निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.” नवीन कॉस्मो कार केअर सेंटरमध्ये ग्राहकांना एकाच छताखाली वाहन संरक्षण आणि वाहन सौंदर्यवर्धनाशी संबंधित सर्वसमावेशक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये ऑटोमोटिव्ह विंडो फिल्म्स, पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कोटिंग्ज, डिटेलिंग सोल्यूशन्स तसेच वैशिष्ट्यपूर्ण कार केअर सेवांचा समावेश असेल. प्रीमियम उत्पादनांमध्ये व्यावसायिक दर्जाची जोडणी आणि कुशल सेवा यांचा संगम घडवून विना अडथळा, अखंड आणि समाधानकारक ग्राहक अनुभव देण्यासाठी या केंद्राची रचना करण्यात आली आहे. उद्घाटनाबाबत बोलताना कॉस्मो कन्झ्युमरचे व्यवसाय प्रमुख अभिनीश दास म्हणाले, “आमच्या पहिल्या कॉस्मो कार केअर सेंटरचे उद्घाटन हा ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रातील आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. गेल्या वर्षभरात आम्ही आमची उत्पादने, वितरण जाळे आणि इंस्टॉलर भागीदारी यांच्या माध्यमातून मजबूत पाया निर्माण केला आहे. 4C च्या माध्यमातून आम्ही या सर्व क्षमतांना एकत्र आणत ग्राहकांना एकाच छताखाली संपूर्ण वाहन संरक्षण आणि कार केअरचा अनुभव उपलब्ध करून देत आहोत. भविष्याचा विचार करता आर्थिक वर्ष 26-27 दरम्यान भारतभरात सुमारे 35 कॉस्मो कार केअर सेंटर स्थापन करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यामुळे देशव्यापी प्रीमियम कार केअर केंद्रांचे जाळे उभारण्याच्या आमच्या बांधिलकीला अधिक बळ मिळेल.” गेल्या वर्षभरात कॉस्मो कन्झ्युमरने कॉस्मो सनशील्ड अंतर्गत कार्बन पिगमेंट सिरीज सादर करून तसेच कॉस्मो पीपीएफ अंतर्गत चार नवीन प्रकार बाजारात आणून आपला उत्पादन पोर्टफोलिओ अधिक मजबूत केला आहे. तसेच, बाजारपेठेतील पोहोच वाढवण्यासाठी आणि ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कंपनीने भारतभरातील विविध डिटेलिंग स्टुडिओंसोबत भागीदारी केली आहे. पुढील काळात कॉस्मो कन्झ्युमर भारतातील प्रमुख ऑटोमोटिव्ह बाजारपेठांमध्ये 4C मॉडेलचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. यासोबतच विपणन उपक्रमांमध्ये आक्रमक गुंतवणूक, वितरण व भागीदार जाळ्याचा विस्तार आणि सातत्यपूर्ण नवनवीन कल्पना तसेच नवीन ऑटोमोटिव्ह केअर सोल्यूशन्सच्या माध्यमातून उत्पादन पोर्टफोलिओ अधिक सक्षम करण्यावर कंपनी भर देणार आहे. यामुळे देशातील वेगाने वाढणाऱ्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट उद्योगातील तिचे स्थान आणखी मजबूत होईल.

पीएमपीएमएलसाठी महापालिकेची खास सभा-श्रीनाथ भिमाले

पुणे, दि. २५ जून : शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा...