‘निरोगी सखी राहील सुखी’ महापौर महिला आरोग्य अभियानाचा दुसरा टप्पा सुरू

Date:

महिलांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेऊन निरोगी जीवनशैलीचा अंगीकार करावा — महापौर सौ. मंजुषाताई नागपुरे

पुणे, दि. २० ऑगस्ट २०२६ :
पुणे महानगरपालिकेच्या ‘पुणे प्रथम’ या संकल्पनेअंतर्गत ‘निरोगी सखी राहील सुखी – महापौर महिला आरोग्य अभियान’ राबविण्यात येत असून, या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात झाली. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमास पुण्याच्या महापौर सौ. मंजुषाताई नागपुरे उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन तसेच महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी उपस्थित महिला भगिनींना आरोग्य विषयक मूलभूत सुविधा, तपासण्या व आवश्यक आरोग्य मार्गदर्शनाचा लाभ उपलब्ध करून देण्यात आला.

यावेळी बोलताना महापौर सौ. मंजुषाताई नागपुरे म्हणाल्या, “महिलांचे आरोग्य हे कुटुंबाच्या आणि समाजाच्या आरोग्याचा पाया आहे. अनेक महिला आपल्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे महिलांना त्यांच्या दैनंदिन जीवनाच्या जवळ आरोग्य तपासणी आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘निरोगी सखी राहील सुखी’ हे अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा आणि आपल्या आरोग्याची नियमित तपासणी करून घ्यावी.”

या अभियानाच्या माध्यमातून महिलांना आरोग्य तपासणी, प्राथमिक निदान, आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन आणि आरोग्यविषयक जनजागृती उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे. महिलांनी आजाराची लक्षणे जाणवण्याची वाट न पाहता नियमित आरोग्य तपासणी करून घेणे आवश्यक असल्याचेही महापौरांनी सांगितले.

‘निरोगी सखी राहील सुखी’ हे अभियान केवळ आरोग्य तपासणीपुरते मर्यादित न राहता महिलांमध्ये प्रतिबंधात्मक आरोग्याची जाणीव निर्माण करणारे व्यापक अभियान म्हणून पुढे नेण्याचा पुणे महानगरपालिकेचा मानस आहे. पुणे शहरातील अधिकाधिक महिलांपर्यंत या अभियानाचा लाभ पोहोचविण्यासाठी आरोग्य विभागाने प्रभावी नियोजन करावे, असे निर्देशही महापौरांनी दिले.

कार्यक्रमास उपमहापौर श्री. परशुरामजी वाडेकर, अतिरिक्त आयुक्त सौ. पवनित कैर, नगरसचिव सौ. योगिता भोसले, नगरसेविका सौ. संगीताताई दांगट, ऐश्वर्या थोरात, अल्पना वर्पे, सौ. स्वरदा बापट, सौ. स्वप्नाली पंडीत, अर्चना पाटील, पूजा दांडेकर, रूपाली पवार, सौ. स्नेहाताई माळवदे, सौ. मनिषा बुटाला, सौ. कल्पना बहिरट, सौ. रुपाली पवार, सौ. शैलजा भोसले, सौ. जयश्रीताई भुमकर तसेच आरोग्य प्रमुख मीना बोराडे, डॉ. वैशाली जाधव, डॉ. मनिषा नाईक, डॉ. राजेश दिघे, डॉ. आंधळे, सारिका फुंदे यांच्यासह पुणे महानगरपालिकेचे आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सीमेवरील जवानांना पुण्यातून राखीचा स्नेहबंध,सीमेवर तैनात जवानांसाठी २१ हजार राख्या रवाना

पुणेः आपल्या घरातील भावाच्या मनगटावर राखी बांधताना देशाच्या सीमेवर...

तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय:राज्यात आजपासून सुटे तेल विक्रीवर पूर्णपणे बंदी

गतवर्षी तब्बल ५ कोटी ३१ लाखांचे निकृष्ट तेल जप्त मुंबई-...