सीएसआर गुंतवणुकीचा सामाजिक परिणाम मोजणे आवश्यक ; पुण्यात राष्ट्रीय सल्लामसलत

Date:

पुणे, दि. ८ : कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (CSR) अंतर्गत होणाऱ्या गुंतवणुकीचे मूल्यमापन केवळ खर्च किंवा प्रकल्पांची संख्या यावर न करता, त्यातून निर्माण झालेला प्रत्यक्ष सामाजिक परिणाम, शाश्वतता आणि समुदायाला मिळणारे दीर्घकालीन फायदे यावर आधारित असावे, असे मत पुण्यात झालेल्या राष्ट्रीय सल्लामसलतीत व्यक्त करण्यात आले.

प्रायमरी हेल्थकेअर फाउंडेशन (PHCF) यांच्या वतीने नुकतेच ‘National Consultation on Social Impact Assessment’ या राष्ट्रीय सल्लामसलतीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सीएसआर संस्था, स्वयंसेवी संस्था, संशोधन संस्था तसेच शासनाचे प्रतिनिधी अशा सुमारे १०० प्रतिनिधींनी सहभाग घेतला.

सीएसआरच्या माध्यमातून होणारी गुंतवणूक केवळ निधी खर्च करण्यापुरती मर्यादित न राहता स्थानिक गरजा आणि विकासातील तफावत ओळखून अपेक्षित सामाजिक परिणाम निर्माण करणारी असावी. सीएसआर उपक्रमांचा परिणाम, त्यांची शाश्वतता आणि समुदायावर होणारा दीर्घकालीन लाभ यांचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन केल्यास या निधीचा अधिक परिणामकारक वापर करता येईल.
या प्रकल्पांची आखणी करताना स्थानिक गरजा व विकासातील तफावत ओळखून प्रकल्पाच्या सुरुवातीपासून परिणामांचे मोजमाप करणे तसेच प्रकल्पांनंतरही त्याची शाश्वतता सुनिश्चित करणे आवश्यक असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी स्पष्ट केले.

शासकीय प्रशासकीय यंत्रणा व स्थानिक पातळीवरील पोहोच आणि सीएसआर संस्थांची आर्थिक संसाधने, तंत्रज्ञान व नवकल्पना यांचा प्रभावी समन्वय झाल्यास विकासात्मक उपक्रमांचे परिणाम अधिक व्यापक होऊ शकतात. पुणे जिल्हा परिषदेच्या सीएसआर सहयोग पोर्टल सारख्या डिजिटल व्यासपीठांच्या माध्यमातून सीएसआर प्रकल्प, निधी, लाभार्थी आणि त्यांचे परिणाम यांची एकत्रित माहिती उपलब्ध करून देणे शक्य असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

दरम्यान, सीएसआर प्रकल्पांच्या मूल्यमापनासाठी National CSR Assessment Template (NCAT) या समान राष्ट्रीय चौकटीचा विकसित करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. सीएसआरच्या केंद्रबिंदूवर ‘खर्चातून परिणामाकडे, प्रकल्पातून सामाजिक प्रभावाकडे आणि स्वतंत्र उपक्रमांतून समन्वित शाश्वत विकासाकडे’ जाण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; अभिनय, संवेदनशीलतेचा भारदस्त चेहरा काळाच्या पडद्याआड

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना...

भारतीय लोकशाहीसाठी काळा दिवस’; प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे बालगंधर्व चौकात आंदोलन

राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि INDIA आघाडीच्या खासदारांवरील पोलीस...