सोनिया गांधी, राहुल गांधी व खरगे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल

Date:

नवी दिल्ली येथे दि. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’च्या सामूहिक गायनास जाणीवपूर्वक अडथळा निर्माण केल्याचा आरोप करत, भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक नंदलाल सुरेश गवळी यांनी काँग्रेसनेत्या सोनिया गांधी, खा. राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याविरुद्ध छत्रपती संभाजीनगर येथील जवाहर नगर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीत नमूद केल्यानुसार, दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे 9 वाजता दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात (24 अकबर रोड) झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात “वंदे मातरम्”चे सामूहिक गायन सुरू असताना वरील तिन्ही नेत्यांनी परस्पर संकेत व हावभाव करून, तसेच उपस्थित व्यक्तींना निर्देश देऊन गायनात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केल्याचे एका दृश्य-श्राव्य चित्रफितीत प्रथमदर्शनी दिसून येते, असा दावा गवळी यांनी केला आहे.
गुन्हा दिल्ली येथे घडला असला तरी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 च्या कलम 173 (1) अन्वये तो “झिरो एफ.आय.आर.” म्हणून नोंदवून संबंधित हद्दीतील पोलीस ठाण्याकडे वर्ग करावा, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. तसेच कार्यक्रमाचे मूळ व्हिडिओ फुटेज, सीसीटीव्ही फुटेज, संबंधित यूट्यूब व्हिडिओचे मेटाडेटा व मूळ डिजिटल प्रत तातडीने सुरक्षित करून प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब नोंदवावेत, अशीही विनंती करण्यात आली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सीमेवरील जवानांना पुण्यातून राखीचा स्नेहबंध,सीमेवर तैनात जवानांसाठी २१ हजार राख्या रवाना

पुणेः आपल्या घरातील भावाच्या मनगटावर राखी बांधताना देशाच्या सीमेवर...

‘निरोगी सखी राहील सुखी’ महापौर महिला आरोग्य अभियानाचा दुसरा टप्पा सुरू

महिलांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेऊन निरोगी जीवनशैलीचा अंगीकार करावा...

तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय:राज्यात आजपासून सुटे तेल विक्रीवर पूर्णपणे बंदी

गतवर्षी तब्बल ५ कोटी ३१ लाखांचे निकृष्ट तेल जप्त मुंबई-...