पुणे-: टाटा पॉवर स्कील डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट, ही ना-नफा चालणारी कौशल्य विकास संस्था आहे. या संस्थेला ब्युरो व्हेरिटास या नॅशनल अॅक्रेडिटेशन बोर्डाच्या प्रमाणपत्रीय मंडळातर्फे, आयएसओ २९९९०:२०१० आणि ९००१:२०१५ असे दुहेरी प्रमाणपत्र देऊन मान्यता देण्यात आली आहे.
अध्ययन सेवा पुरवठादारांसाठी उच्चतम विशेष दर्जा असलेले हे आयएसओ २९९९०:२०१०प्रमाणपत्र आहे. यात विकासाच्या संहिता, पुरवठा, मूल्यांकनाचा परिणाम आणि गुणांकन यातील प्रशिक्षणाचा समावेश असून, प्रमाणपत्रात तब्बल १९ प्रक्रियांचा समावेश असेल.
आयएसओ ९००१:२०१५ हे दर्जा व्यवस्थापन यंत्रणेसाठीचे प्रमाणन आहे आणि जगभरात दर्जात्मकतेसाठी सर्वात मोठ्या प्रमाणात ते वापरले जाते.
टाटा पॉवर स्कील डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट (टीपीएसडीआय)द्वारे प्रक्रियांतील उत्कृष्टता आणि दर्जात्मक सेवा दिल्या जातात, या दोन्हीसाठी हे प्रमाणपत्र असल्याचे सिद्ध झाले आहे. २०१५ साली द टाटा पॉवर कंपनी लिमिटेड या भारतातील सर्वात मोठ्या एकीकृत ऊर्जा कंपनीतर्फे तरुणांमध्ये रोजगाराच्या संधी वाढाव्यात, तसेच भारतीय ऊर्जा आणि संबंधित क्षेत्रांमधील आवश्यक कौशल्यांमधील त्रुटी भरून काढाव्यात यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.
“ग्राहक आणि प्रशिक्षणार्थींना दर्जात्मक अध्ययन सेवा प्राप्त होतील, याची खात्री दुहेरी प्रमाणपत्रामुळे मिळते, आमच्या सर्व प्रशिक्षण केंद्रांमधून अशा प्रकारचे प्रमुख प्रशिक्षण दिले जाते आणि यातही सातत्याने सुधारणा केल्या जातात. आम्ही प्रशिक्षण संस्था म्हणून जे काही करू ते दर्जेदारच असेल, तो दर्जा प्राप्त करण्यासाठी आम्ही आमच्या सर्व संकल्पना पणाला लावलेल्या आहेत,’’ असे टाटा पॉवर स्कील डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटचे प्रमुख श्री. सी एन नागाकुमार म्हणाले.
“ऊर्जा क्षेत्र आणि संबंधित क्षेत्रांमधील समकालीन आणि भविष्यकालीन कौशल्यांसाठी सर्वोत्कृष्ट एकीकृत तांत्रिक प्रशिक्षण संस्था बनणे, हा संस्थेच्या गुणांकनातील एक मोठा टप्पा आहे. दर्जा आणि प्रक्रियेतील उत्कृष्टता या धर्तीवर टाटा पॉवर्सची संस्कृती आणि मूल्य उभारलेली आहेत आणि ही मान्यता प्राप्त होणे ही आम्ही प्रत्येक दिवशी जगत असलेल्या मूल्याची पोचपावतीच आहे,’’ असे टाटा पॉवर को. लिमिटेडचे सीओओ आणि ईडी श्री. अशोक सेठी म्हणाले.
या संस्थेतर्फे रोजगारासाठी उपयुक्त असे विस्तारित श्रेणीतील अत्याधुनिक प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र पुरवले जाते. थर्मल, जलरंग आणि नवीकरणीय ऊर्जा, परिवर्तन आणि वितरण यासाठी लागणारी कौशल्ये, याबरोबरच संबंधित क्षेत्रातील कौशल्यांचाही यात समावेश आहे.
टीपीएसडीआयतर्फे देशभरात ५ जागतिक दर्जाची प्रशिक्षण केंद्रे चालवली जातात –यापैकी महाराष्ट्रात शहाड आणि ट्रॉम्बे येथे ही केंद्रे आहेत, शिवाय झारखंडमध्ये मेथौन आणि जमशेदपूर व गुजरातमध्ये मुंद्रा आदी ठिकाणी केंद्रे आहेत. उद्योगातील मागणी आणि शैक्षणित स्तरावरील अध्यापन यांच्यातील त्रुटी भरून काढण्यासाठी, संस्थेतर्फे आयटीआय, पॉलिटेक्निक्स आणि ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग कॉलेजांतील विद्यार्थ्यांनाही प्रशिक्षण दिले जाते.
टीपीएसडीआयतर्फे देशभरात ५ जागतिक दर्जाची प्रशिक्षण केंद्रे चालवली जातात –यापैकी महाराष्ट्रात शहाड आणि ट्रॉम्बे येथे ही केंद्रे आहेत, शिवाय झारखंडमध्ये मेथौन आणि जमशेदपूर व गुजरातमध्ये मुंद्रा आदी ठिकाणी केंद्रे आहेत. २०१५ मध्ये स्थापना झाल्यापासून या संस्थेने २९००० अधिक लोकांना प्रशिक्षित केले आहे.
ऊर्जा क्षेत्रातील अनुभवी तंत्रज्ञांपासून रोजगारक्षम कौशल्यांच्या शोधात असणाऱ्या बेरोजगार तरुणांपर्यंत… शिकण्याची इच्छा असणाऱ्या सर्वांनाच टीपीएसडीआय सामावून घेते. सर्व प्रकारच्या उद्योगातील मागणी आणि शैक्षणित स्तरावरील अध्यापन यांच्यातील त्रुटी भरून काढण्यासाठी, संस्थेतर्फे आयटीआय, पॉलिटेक्निक्स आणि ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग कॉलेजांतील विद्यार्थ्यांनाही प्रशिक्षण दिले जाते.
टाटा पॉवरविषयी:
टाटा पॉवर ही भारतातील सर्वांत मोठी एकात्मिक वीज कंपनी असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरही तिचा विस्तार होत आहे. कंपनी, तिच्या सर्व उपकंपन्या आणि संयुक्तरित्या नियंत्रित कंपन्या अशा सर्वांची मिळून १०७५७ मेगावॉट वीजनिर्मिती क्षमता आहे; तसेच ऊर्जा क्षेत्राच्या सर्व विभागांमध्ये, म्हणजेच- इंधन सुरक्षा व लॉजिस्टिक्स, निर्मिती (औष्णिक, जल, सौर व पवनऊर्जा), पारेषण, वितरण व व्यापार- यांमध्ये कंपनी काम करत आहे.
भारतात वीजनिर्मिती, पारेषण आणि वितरण यांसाठी कंपनी यशस्वीरित्या सार्वजनिक-खासगी भागीदारीतील प्रकल्प राबवत आहे. उत्तर दिल्लीमध्ये वीजवितरणासाठी दिल्ली विद्युत बोर्डासोबत “टाटा पॉवर दिल्ली डिस्ट्रिब्युशन लिमिटेड”, भूतानमधील ताला जलविद्युत प्रकल्पातून विजेचे निर्वासन (इव्हॅक्युएशन) करून दिल्लीला आणण्यासाठी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडसोबत “पॉवरलिंक्स ट्रान्समिशन लिमिटेड” आणि झारखंडमध्ये १०५० मेगावॉटच्या प्रकल्पासाठी दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनसोबत “मैथोन पॉवर लिमिटेड” ही या प्रकल्पांची काही उदाहरणे.
टाटा पॉवर भारतातील २.६ दशलक्ष ग्राहकांना वितरणसेवा देत आहे आणि अत्यंत महत्त्वाच्या तंत्रज्ञानावर आधारित असा देशातील पहिला ४००० मेगावॉट क्षमतेचा महाऊर्जा प्रकल्प कंपनीने गुजरातमधील मुंद्रा येथे विकसित केला आहे. टाटा पॉवर ही भारतातील सर्वांत मोठ्या नूतनीकरणीय ऊर्जा कंपन्यांपैकी एक असून, स्वच्छ (पर्यावरणपूरक) ऊर्जेची कंपनीची श्रेणी ३४१७ मेगावॉट इतकी आहे.
कंपनीने आंतरराष्ट्रीय स्तरावरही विस्तार केला असून, इंडोनेशियातील अग्रगण्य कोळसा कंपनी पीटी कॅल्टिम प्रायमा कोल अर्थात केपीसीमध्ये टाटा पॉवरचे ३० टक्के समभाग आहेत; सिंगापूरमधील पीटी बरामल्टिसुकेसराराना टीबीके (“बीएसएसआर”) खाण कंपनीत, ट्रस्ट एनर्जी रिसोर्सेसमार्फत कोळशाचा पुरवठा सुरक्षित राखण्यासाठी तसेच आपल्या औष्णिक वीजनिर्मितीसाठी कोळसा आयात करण्यासाठी, २६ टक्के भागधारणा आहे; आफ्रिकेतील सब-सहारा भागात प्रकल्प विकसित करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेसोबत ‘सेनेर्गी’ हा संयुक्त उपक्रम सुरू आहे; झांबियामध्ये १२० मेगावॉट जलविद्युत निर्मितीसाठी झेस्कोसोबत ५०:५० भागीदारीत संयुक्त उपक्रम २०१६ मध्ये कार्यान्वित झाला आहे; जॉर्जियामध्ये एजीएलमार्फत पर्यावरणपूरक ऊर्जेसाठी संयुक्त उपक्रमातून नॉर्वे व आयएफसीमध्ये १८७ मेगावॉट जलविद्युत निर्मितीचा प्रकल्प सुरू आहे आणि भूतानच्या राजेशाही सरकारसोबत भागीदारीत भूतानमध्ये जलविद्युत निर्मिती सुरू आहे.
अग्रगण्य तंत्रज्ञान, प्रकल्पांचे उत्तम कार्यान्वयन, सुरक्षेसाठी जागतिक दर्जाच्या प्रक्रिया, ग्राहकांची काळजी आणि पर्यावरणपूरक उपक्रम या वैशिष्ट्यांच्या जोरावर टाटा पॉवर बहुअंगांनी वाढीसाठी सज्ज असून येणाऱ्या अनेक पिढ्यांची ‘आयुष्ये प्रकाशमान करण्यासाठी’ वचनबद्ध आहे.