Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पूजाच्या प्रेग्नंसीचे गुपित उलगडले

Date:

मराठी तरुणांच्या हृदयाचा ठोका चुकवणारी ग्लॅम अभिनेत्री पूजा सावंत चक्क प्रेग्नंट असल्याची बातमी वा-यासारखी पसरली, आणि पूजाच्या चाहत्यांना मोठा धक्काच बसला. सोशल नेट्वर्किंग साईटवर पब्लिश झालेल्या पूजाच्या ८ महिन्याच्या बेबी बंप फोटोजमुळे चर्चेला सुरुवात झाली होती. पण, आता याला पूर्णविराम मिळाला असून, आगामी ‘लपाछपी’या सिनेमाच्या चित्रिकरणादरम्यानचा तिचा हा नवा लुक असल्याचे समोर आले आहे. मिडास टच मुव्हीजचे जितेंद्र पाटील आणि वाईल्ड एलीफंट मोशन पिक्चर्स  प्रायव्हेट लिमिटेडच्या अरुणा भट आणि सुर्यवीरसिंग भुल्लर यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. विशाल फुरिया लिखित आणि दिग्दर्शित ‘लपाछपी’ हा सिनेमा येत्या  १४ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
‘लपाछपी’ या सिनेमाची अंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी कौतुकास्पद आहे. महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यापूर्वी  या सिनेमाने अनेक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये आपले नशीब आजमावले असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकूण १५ पुरस्कारांवर या सिनेमाने बाजी मारली आहे. तसेच हडसन,ओहायो येथील इंटरनेशनल हॉरर हॉटेलचा पुरस्कार देखील ‘लपाछपी’ या चित्रपटाने आपल्या नावे केला आहे. शिवाय  २०१६ साली माद्रिद येथे झालेल्या माद्रिद इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल्समध्ये या चित्रपटाला पाच नामांकने देण्यात आली होती. ज्यात पूजाची  सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीत निवड करण्यात आली होती. त्याचप्रमाणे गतवर्षीच्या ब्रुकलीन फिल्म फेस्टिवल्समध्ये या चित्रपटाला स्पिरीट अवार्डने सन्मानित करण्यात आले होते. तसेच लंडन येथे लवकरच होत असलेल्या  लंडन इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये देखील हा सिनेमा दाखवला जाणार आहे. 
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ट्रेलरमधील सळ्या केबिनमध्ये घुसल्या, चालकाचा दुर्दैवी अंत

पुणे-पुण्यात अवजड वाहनांकडून होणाऱ्या अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे....

नवी मुंबईतील कंपनीत गॅस गळती:कामगारांवर कार्बन मोनॉक्साईडचा परिणाम, 25 महिला बेशुद्ध

नवी मुंबईतील एका कंपनीमध्ये गुरुवारी सकाळी गॅस गळतीची घटना...

PMRDA आयुक्त यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या दहाव्या वर्धापन...