कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील अंबाबाईला घागरा-चोळी परिधान केल्याने भाविक संतप्त झाले आहेत. अंबाबाईला साडीऐवजी घागरा-चोळी नेसवल्याच्या विरोधात भाविकांनी निदर्शन करून पूजाऱ्याचा निषेध केला आहे.
कोल्हापूर महापालिकेत भाजपचे नगरसेवक असलेले श्रीपूजक अजित ठाणेकर यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भक्तांच्या मागणीनुसार ठाणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला . शुक्रवारी योगेश जोशी हा भाविक देवस्थान समितीत 35 हजार रुपयांचा घागरा घेवून देवीला अर्पण करण्यासाठी पोहचला. यावेळी देवस्थान समितीने अशी वस्त्रे देवीला घालत नाहीत, असा खुलासा करुन त्याला परत पाठवले. यावेळी जोशी यांनी श्रीपुजक यांच्याशी संपर्क साधून हा घागरा देवीच्या अंगावर चढवला.