बळीराजाची सनद’शासनाकडे सुपूर्द
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा १८ वा वर्धापनदिन बळीराजाला समर्पित करण्यात आला. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तयार करण्यात आलेली ‘बळीराजाची सनद’शासनाकडे सुपूर्द करण्यात आली. कौन्सिल हॉल येथे उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी ही प्रत स्वीकारली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वर्धापनदिन नेहमीच एखाद्या सामाजिक प्रश्नासाठी समर्पित करतो. यावर्षी शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ‘बळीराजाची सनद’तयार केली आहे . ज्याद्वारे बळीराजाच्या हितासाठीच्या काही ठोस मागण्या सरकारकडे सादर केल्या आहेत.
यावेळी शहराध्यक्ष वंदना चव्हाण, चेतन तुपे, अंकुश काकडे , रवींद्र माळवदकर , बाबुराव चांदेरे, चंचला कोद्रे , वैशाली बनकर , राजलक्ष्मी भोसले , दिपक मानकर , रत्नप्रभा जगताप , अश्विनी भागवत , नीता कोंढरे , हमीद संखे , भय्यासाहेब जाधव योगेश ससाणे , परवीन शेख सर्व सेलचे प्रमुख , पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापदिनानिमित्त आज पक्ष कार्यालयात शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी अंकुश काकडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी चेतन तुपे, बाबुराव चांदेरे, रवींद्र माळवदकर , इकबाल शेख , वासंती काकडे , स्मिता कोंढरे, अश्विनी भागवत, भय्यासाहेब जाधव, योगेश ससाणे, दीपक मानकर , वैशाली बनकर, चंचला कोद्रे, परवीन शेख, हमीद सुंडके , वनराज आंदेकर , लक्ष्मी आंदेकर ,पदाधिकारी , सर्व सेलचे प्रमुख ,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.