मोदी, शहा, डोवाल आणि मोहन भागवत यांना पायउतार व्हावेच लागेल.
नवी दिल्ली, ११ ऑक्टोबर : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रविवारी नव्या व्हिडिओ संदेशातून सर्व विरोधी पक्ष, सामाजिक संघटना आणि संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन केले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसह निवडणूक प्रक्रियेवरील प्रश्न सर्वोच्च न्यायालयासमोर मांडण्यासाठी १२ ऑक्टोबर रोजी मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे.
हातात संविधानाची प्रत घेऊन राहुल गांधी म्हणाले, “सर्व पक्षांनी आमच्यासोबत सामील होऊन सर्वोच्च न्यायालयात जावे. मोदी, शहा, डोवाल आणि मोहन भागवत आमचा आवाज दाबू शकत नाहीत. त्यांना पायउतार व्हावेच लागेल.” राहुल गांधी यांनी या व्हिडिओत केंद्र सरकारवर लोकशाही संस्थांवर दबाव आणल्याचा आरोप केला. त्यांच्या या आरोपांना सत्ताधारी पक्षाने नाकारले आहे.
राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी, कथित मतचोरीच्या आरोपांची चौकशी, SIR प्रक्रियेवरील आक्षेप आणि निवडणूक व्यवस्थेच्या पारदर्शकतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयासमोर नेण्याची भूमिका घेतली आहे. काँग्रेस आणि INDIA आघाडीतील नेते सरन्यायाधीशांना निवेदन देणार असल्याचेही वृत्त आहे.
दिल्लीतील CJP आंदोलन आणि आंदोलकांवरील पोलिस कारवाईच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी यापूर्वीही केंद्र सरकारवर तीव्र टीका केली होती. त्यांनी आंदोलनकर्त्यांना पाठिंबा देत लोकशाही आणि संविधानाच्या संरक्षणासाठी संघर्ष सुरू ठेवण्याचे आवाहन केले आहे.

