सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात पारंपरिक पद्धतीने घटस्थापना 

Date:

श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागतर्फे आयोजित ‘सार्वजनिक नवरात्रोत्सव’ ; धार्मिक विधींसह मान्यवरांची उपस्थिती

पुणे : सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिराच्या वतीने आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सवात पारंपरिक पद्धतीने बेलराईज इंडस्ट्रीज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत बडवे आणि सुप्रिया बडवे यांच्या हस्ते घटस्थापना झाली. धार्मिक कार्यक्रमांसोबतच सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम देखील उत्सवात आयोजित करण्यात आले आहेत. 

घटस्थापनेला ट्रस्टचे प्रमुख संस्थापक आणि विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त ॲड. प्रताप परदेशी, डॉ. तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर यांसह विश्वस्त व पदाधिकारी उपस्थित होते. धार्मिकतेला सामाजिकतेची जोड देणारा, समाजातील सर्व घटकांना सामावून घेणारा सार्वजनिक नवरात्रोत्सव महालक्ष्मी मंदिरात दर वर्षीप्रमाणे यंदाही साजरा होत आहे. 

उत्सवाच्या दहा दिवसांत अभिषेक, याग, महाआरती असे धार्मिक कार्यक्रम देखील मंदिरामध्ये होणार आहेत. सर्व धार्मिक कार्यक्रमांचे पौरोहित्य मिलिंद राहूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली होईल. भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात ५० सीसीटीव्ही कॅमेरे आणि ५० हून अधिक सुरक्षारक्षक आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व खबरदारी घेण्यात आली असून, पुणेकरांनी मोठ्या संख्येने उत्सवात सहभागी व्हावे, असे विश्वस्त मंडळाकडून आवाहन करण्यात आले आहे.

भव्य सामूहिक श्रीसूक्त पठण सोहळा सोमवारी (दि.१२) 

सोमवार, दि. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ६ वाजता भव्य सामूहिक श्रीसूक्त पठण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीसूक्त हे ऋग्वेदातील श्री महालक्ष्मी देवीच्या स्तुतीस समर्पित पवित्र वैदिक स्तोत्र आहे. सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती आणि कल्याण यांचे प्रतीक असलेल्या देवी महालक्ष्मीच्या उपासनेत श्रीसूक्त पठणाला विशेष महत्त्व आहे. सामूहिक पठणातून भक्ती, सकारात्मक ऊर्जा आणि सामूहिक मंगलभावनेचा संदेश देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. 

या विशेष सोहळ्यास पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांना प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. पुणे शहरातील सर्व भाविक, ज्येष्ठ नागरिक, युवक-युवती आणि देवीभक्तांनी या मंगलमय सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन देवीचा आशीर्वाद घ्यावा, असे आवाहन श्री महालक्ष्मी मंदिराच्या विश्वस्त मंडळाने केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे नवरात्रौ महोत्सवाचे जल्लोषात उद्घाटन; दुष्काळ निधीसाठी सामंत यांच्याकडून १० लाखांची घोषणा

पुणे-राज्यात यंदा दुष्काळाचे मोठे संकट असून, संकटग्रस्त बांधवांना मदत...

दोन आठवडे झाले पार, अहवाल द्या सरकार! ध्वनीप्रदूषणाच्या कारवाईचा हिशोब मागत बालगंधर्व चौकात आंदोलन

पुणे : गणेशोत्सव संपून दोन आठवडे उलटूनही ध्वनीप्रदूषणाच्या तक्रारी,...

राहुल गांधींचे आवाहन : “सर्व पक्षांनी एकत्र सर्वोच्च न्यायालयापुढे जाऊ ”

मोदी, शहा, डोवाल आणि मोहन भागवत यांना पायउतार...

श्री महालक्ष्मी मंदिरातील ‘शृंगार’ या संकल्पनेवरील सजावट व विद्युतरोषणाईचे उद्घाटन

श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग ; पोलीस आयुक्त अमितेश कुमार...