श्री महालक्ष्मी मंदिरातील ‘शृंगार’ या संकल्पनेवरील सजावट व विद्युतरोषणाईचे उद्घाटन

Date:

श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग ; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची उपस्थिती

पुणे : श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागच्या वतीने आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सवात मंदिरामध्ये साकारलेल्या ‘शृंगार’ संकल्पनेवर आधारित भव्य सजावट व विद्युत रोषणाईचे उद्घाटन पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते झाले. मंदिराचे भव्य प्रवेशद्वार देखील या संकल्पनेवर साकारले असून ते पाहण्याकरिता देवी भक्तांनी मोठी गर्दी केली.

यावेळी ट्रस्टचे प्रमुख संस्थापक आणि विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, ॲड. प्रताप परदेशी, उत्सव प्रमुख डॉ. तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर यांसह विश्वस्त, पदाधिकारी उपस्थित होते. मंदिरासह परिसरात साकारण्यात आलेली विद्युत रोषणाई देखील भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे.

यंदाच्या नवरात्रोत्सवात ‘शृंगार’ या संकल्पनेवर आधारित सजावट मंदिरामध्ये व भव्य प्रवेशद्वारावर करण्यात आली आहे. यामध्ये मंगळसूत्र, जोडवी, हिरवा चुडा, नथ, कोल्हापुरी साज, ठुशी, तन्मणी, पैंजण, पाटल्या, मोहनमाळ, बोरमाळ यांसह विविध प्रकारचे दागिने आणि सौभाग्यलंकार यांच्या सुरेख प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. तसेच मंदिरामध्ये विविध खांबावर देखील या प्रतिकृती पाहायला मिळतात.त्यामुळे ही सजावट देवीभक्तांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.

यंदाचे वैशिष्ट्य : अष्टलक्ष्मी भव्य मिरवणूक, जिवंत देखावा
मंगळवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजता अष्टलक्ष्मी भव्य मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे. तसेच ललिता पंचमीला गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० वाजता कन्यापूजन कार्यक्रम आणि शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर रोजी गाथा शिवशंभूंची हा जिवंत देखावा ही यंदाच्या उत्सवाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. धार्मिकतेला सामाजिकतेची जोड देणारा, समाजातील सर्व घटकांना सामावून घेणारा सार्वजनिक नवरात्रोत्सव महालक्ष्मी मंदिरात दर वर्षीप्रमाणे यंदाही साजरा होत आहे. तरी देवीभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात पारंपरिक पद्धतीने घटस्थापना 

श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागतर्फे आयोजित ‘सार्वजनिक नवरात्रोत्सव’ ; धार्मिक...

‘अलबत्या-गलबत्या’च्या सात प्रयोगांतून रंगणार बालनाट्याचा शिखर विश्वविक्रम

पुण्यात १५ ऑक्टोबरला सलग ७ प्रयोग महापालिका शाळांतील सात हजार...

“लोकशाही संपताना दिसतेय, पण ती संपून देणार नाही”; शिवाजी पार्कवरील कारवाईवर अमित ठाकरे संतापले

मुंबई, ११ ऑक्टोबर : शिवाजी पार्क परिसरात CJPच्या आंदोलनाच्या...