संजय नहार एकसष्टी अभीष्टचिंतन सोहळा गुरुवारी

Date:

पुणे : सरदह, पुणेचे संस्थापक संजय नहार यांचा एकसष्ठी अभीष्टचिंतन सोहळा, त्यांच्यावरील गौरव ग्रंथाचे प्रकाशन आणि सरहदचा त्रिदशकपूर्ती सोहळा गुरुवार, दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित करण्यात आला आहे.

संजय नहार गौरव समितीतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नहार यांचा सत्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे अध्यक्षस्थानी असणार आहेत. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, नगरविकास, परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष गिरीश गांधी, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, पुणे बुक फेस्टिव्हलचे मुख्य समन्वयक राजेश पांडे, ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर, माजी खासदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. विशेष अतिथी म्हणून जम्मू काश्मीर येथील डीपीएस स्कूलचे अध्यक्ष विजय धर, मणिपूरमधील राज्यसभा खासदार प्रमोद बोडो, जम्मू काश्मीरचे माजी वित्तमंत्री हसीब द्राबू, रॉचे माजी प्रमुख ए. एस. दुल्लत, लडाख येथील खासदार मोहम्मद हनीफा जान, जम्मू काश्मीरमधील ज्येष्ठ उद्योजक मुश्ताक छाया, ग्रेटर काश्मीरचे मुख्य संपादक फैय्याज कल्लु यांची उपस्थिती असणार आहे, अशी माहिती गौरव समितीचे अध्यक्ष डॉ. शैलेश पगारिया, कार्याध्यक्ष शैलेश वाडेकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात 15 ऑक्टोबरपासून दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद; महापालिकेचा मोठा निर्णय

पुणे : अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पर्जन्यमानात झालेली घट...

दादांच्या नंतर ‘सोमेश्वर’वर वहिनींची सत्ता; सुनेत्रा पवारांच्या पॅनेलची एकतर्फी घोडदौड

बारामती, 12 ऑक्टोबर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर...