मुर्खोंकि सरकार है..स्कूल मी गुरु नही दे रहे, विश्वगुरु बनणे जा रहे- जॉब ची गॅरंटी देणारी शिक्षणव्यवस्था सावित्रीमाईंच्या पुण्यातून निर्माण व्हावी

Date:

पुणे-मुर्खोंकि सरकार है..स्कूल मी गुरु नही दे रहे, विश्वगुरु बनणे जा रहे- जॉब ची गॅरंटी देणारी शिक्षणव्यवस्था सावित्रीमाईंच्या पुण्यातून निर्माण व्हावी असे वक्तव्य आज येथे काँग्रेस नेते कन्हैयाकुमार यांनी केले . यावेळी कॉंग्रेसच्या शहर अध्यक्षा दीप्ती चवधरी , कॉंग्रेस चे प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.

काँग्रेस नेते कन्हैयाकुमार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधींच्या २२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाला विरोध करणारे तेच लोक आहेत, ज्यांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर दगड आणि शेण फेकले होते, असे कन्हैयाकुमार म्हणाले. राहुल गांधी पुण्यात सावित्रीच्या लेकींशी संवाद साधणार आहेत.

कन्हैयाकुमार यांच्या मते, राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यामुळे भाजपने धसका घेतला आहे. त्यामुळेच ते कार्यक्रमात अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपने कितीही अडवणूक केली किंवा अपप्रचार केला तरी ‘छात्रों की गुंज’ हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कन्हैयाकुमार यांनी भाजप सरकारच्या शैक्षणिक धोरणांवरही जोरदार टीका केली. मनुवादी विचारांनी देशातील शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. देशात दर तासाला दोन जवान आत्महत्या करत आहेत, २५ शाळा बंद होत आहेत आणि अनेक अभियांत्रिकी महाविद्यालये बंद पडत आहेत, असे ते म्हणाले. ‘ना पढे है, ना पढने देंगे’ हे भाजपचे धोरण असून, त्यांचे पदवी प्रमाणपत्रही बनावट असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजप नेत्यांची मुले परदेशात शिक्षण घेत असल्याने त्यांना या परिस्थितीचा फरक पडत नाही, असेही कन्हैयाकुमार म्हणाले.

आज शिक्षण महागडे झाले असून ते सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेले आहे. पदवीसाठी ३० लाख रुपये खर्च करावे लागत असतील आणि ८० कोटी जनता ५ किलो धान्यावर जगत असेल, तर त्यांना हे महागडे शिक्षण कसे परवडणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. खाजगी शाळांना आमचा विरोध नाही, पण सरकारी शाळा बंद होता कामा नयेत, अशी भूमिका त्यांनी मांडली.

महागडे शिक्षण घेऊनही नोकरीची शाश्वती नाही. परीक्षांचे पेपर फुटत आहेत आणि या सरकारला दहावीची परीक्षाही व्यवस्थित घेता येत नाही. सीबीएसईच्या परीक्षेतही घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला. शिक्षण हा आमचा अधिकार आहे, तो विशेषाधिकार बनवला जात आहे, असे कन्हैयाकुमार यांनी नमूद केले.

कन्हैयाकुमार यांनी पुन्हा एकदा सांगितले की, राहुल गांधींच्या ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाचा भाजपने धसका घेतला आहे. कोटा येथून सुरू झालेल्या या कार्यक्रमांना प्रत्येक वेळी अडवण्याचा प्रयत्न झाला, पण ते सर्व कार्यक्रम यशस्वी झाले. पुण्यातही परवानगी देताना अनेक अटी घालण्यात आल्या आहेत, पण अशा प्रयत्नांनी कार्यक्रम थांबणार नाही, तो मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल यात शंका नाही, असे ते म्हणाले. भाजपने सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड करून ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाबद्दल अपप्रचार सुरू केला आहे, पण या कार्यक्रमाला पैसे देऊन कोणाला आणण्याची गरज नाही, लोक स्वतःहून येत आहेत, असे कन्हैयाकुमार यांनी स्पष्ट केले. कितीही अडथळा आणला तरी राहुल गांधी येणार आणि कार्यक्रमही होणारच. राहुल गांधी अमित शाह यांच्यासमोर झुकले नाहीत, तर फडणवीस यांच्यासमोर कशाला झुकतील, असा सवालही त्यांनी केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचे...

नाना पाटेकरांचे पार्थिव पुण्यात; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वाहिली श्रद्धांजली

राज्य सरकारतर्फे मानवंदना; डोणजे येथील फार्महाऊसवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पुणे...

नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; अभिनय, संवेदनशीलतेचा भारदस्त चेहरा काळाच्या पडद्याआड

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना...