पुणे शहराचा पाणीपुरवठा सुरळीत; सध्या कोणतीही पाणीकपात नाही – महापौर मंजुषा नागपुरे

Date:

पुणे, दि. २२ जुलै २०२६ :
पुणे शहरातील नागरिकांना दिला जाणारा पाणीपुरवठा पूर्णपणे सुरळीत सुरू असून, सध्या शहरात कोणत्याही प्रकारची पाणीकपात करण्यात आलेली नाही, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी दिली.शहरातील धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा, पाणीपुरवठा व्यवस्था आणि वितरण यंत्रणेचा नियमित आढावा महानगरपालिकेकडून घेतला जात आहे. नागरिकांना नियमित वेळेनुसार पुरेसा पाणीपुरवठा होत असून, पाणीकपातीबाबत प्रसारित होणाऱ्या अफवा किंवा अप्रमाणित माहितींवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महापौरांनी केले आहे.पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून शहरातील सर्व भागांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने पाणीपुरवठा सुरू असून, कोणत्याही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांना पाण्याचा वापर जपून व जबाबदारीने करण्याचे आवाहनही महापौरांनी केले.महानगरपालिका नागरिकांना अखंड पाणीपुरवठा करण्यासाठी कटिबद्ध असून, सध्या पुणे शहरात कोणतीही पाणीकपात लागू करण्यात आलेली नाही, असे महापौर मंजुषा नागपुरे यांनी स्पष्ट केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संसदीय कारकिर्दीच्या शताब्दीनिमित्त पुणे महापालिका राबवणार विशेष उपक्रम

व्याख्यानमाला, परिसंवाद, प्रदर्शनांसह वर्षभर विविध कार्यक्रम; एक कोटी रुपयांच्या...

महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राज्यभरात विविध उपक्रम

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची माहिती​​मुंबई दि.०६ :- सत्यशोधक...

पुण्यात २०१७ पासून किती झाडे तोडली आणि किती जगली? संपूर्ण हिशेब द्या! — मनसेचे साईनाथ बाबर

वृक्षतोड, पुनर्रोपण आणि भरपाई वृक्षलागवडीचे स्वतंत्र लेखापरीक्षण करा; कंत्राटदारांवरील...