मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे (Hemant Dhome) कायम आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या विषयांवर व्यक्त होताना दिसतो. नीट पेपरफुटीनंतर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलकांसह, विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या लाठीमारामुळे संपूर्ण देशातून युवकांचा रोष व्यक्त होतोय. दरम्यान, विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाबाहेर केलेल्या ठिय्या आंदोलनानंतर विरोधी पक्षातील खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi), खासदार प्रियंका गांधी यांच्यासह अनेक विरोधी पक्ष नेत्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलिसांच्या या कारवाईनंतर मनोरंजन सृष्टीतूनही अनेक कलाकारांकडून प्रतिक्रिया उमटल्या.यावर मराठी अभिनेता हेमंत ढोमेची (Hemant Dhome) प्रतिक्रिया सध्या चर्चेत आहे.सोशल मीडियावर राहुल गांधींना उचलून नेणाऱ्या पोलिसांचा फोटो ठेवत त्यांनी सरकारवर टीका केलीय.


काय म्हणाला हेमंत ढोमे?
कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला आणि एकूणच तरुणांच्या शिक्षण व्यवस्थेविषयीच्या प्रश्नावर याआधीही अभिनेता हेमंत ढोमे व्यक्त झाला आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाबाहेर घोषणाबाजी करणाऱ्या विरोधी पक्षातील खासदारांवर कारवाई करण्यात आल्यानंतर हेमंत ढोमे ने instagram वर स्टोरी पोस्ट करत सरकारवर टीका केली आहे. तो म्हणाला ‘ भारताचा विरोधी पक्षनेता असा उचलून नेणाऱ्या अहंकारी सरकारचा अंत आता जवळ आला आहे! आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार हे नक्की!’ असं तो या पोस्टवर म्हणालाय.






