Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

सोनू निगम ची मराठीत मराठीत एंट्री

Date:

गेल्या काही महिन्यांपासून मराठी सिनेमांत कित्येक अमराठी गायक ठसक्यात मराठी गाणी गाताना दिसू लागलेत. मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय पार्श्वगायक सोनू निगम यांचे नावही ह्या यादीत समाविष्ट आहे. “हिरवा निसर्ग…”  या लोकप्रिय गाण्यापासून ते अगदी हल्लीच्या “टिक टिक वाजते… ”  या त्यांच्या सुमधुर आवाजातील गाण्यांना रसिक प्रेक्षकांकडून चांगलीच पसंती मिळाली. स्विस एंन्टरटेण्मेंटची मराठीतील पहिलीच निर्मिती असलेल्या आगामी अजय फणसेकर लिखित आणि दिग्दर्शित चीटरया सिनेमात सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी पहिल्यांदाच मराठी सिनेमासाठी एकाच सिनेमात दोन मराठी गाणी गायली आहेत. मुंबई येथील एका स्टुडिओमध्ये सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्या  सुमधुर आवाजात दोन गाणी रेकॉर्ड करून या सिनेमाचा मुहूर्त नुकताच संपन्न झाला.
गेली ७-८ वर्ष सोनू निगम यांच्या शोजमध्ये विविध प्रकारची ताल वाद्य वाजविणाऱ्या अभिजित नार्वेकर ह्या तरुणाने या सिनेमासाठी संगीत दिले असून त्याचा हा संगीतकार म्हणून पहिलाच सिनेमा आहे. मी जेव्हा एका मराठी सिनेमासाठी संगीतकार म्हणून काम पाहणार असल्याचे सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांना सांगितले तेव्हा त्यांनी स्वतःहून मला तुझ्यासाठी गायला नक्की आवडेल असे सांगितले. त्या क्षणी मला आनंदाचा सुखद धक्का बसला.पहिलाच सिनेमा आणि त्यासाठी सोनूजी गाणार ही माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. एक गाणे रेकॉर्ड करून झाल्यावर मी त्यांना दुसऱ्या गाण्याबद्दल बोललो आणि त्यांनी क्षणाचा ही विलंब न करता दुसऱ्या गाण्यासाठीही लगेच होकार दिला. दोन्ही गाणी ड्यूएट असून गायिका आनंदी जोशीने त्यांच्यासोबत ही दोन्ही गाणी गायली आहेत. सिनेमात एकूण चार गाणी असून चारही गाणी वेगळ्या पठडीतील आहेत. मला या सिनेमासाठी संगीतकार म्हणून पहिली संधी दिल्याबद्दल मी अजय फणसेकर यांचा आभारी असल्याचे संगीतकार अभिजित नार्वेकर यांनी आवर्जून नमूद केले.
चीटर” या सिनेमाच्या एकंदरीत नावावरूनच आपल्याला सिनेमाचा विषय लक्षात येतोच पण त्याचसोबत या सिनेमातील अजून काही गोष्टी जाणून घेण्यासाठी तुम्हाला अजून थोडी वाट पहावी लागणार आहे. सिनेमाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन अजय फणसेकर यांचे असून लक्ष्मण  बुवा हे या सिनेमासाठी कॅमेरामन म्हणून काम पाहणार आहेत. अभिनेते हृषीकेश जोशी, वैभव तत्ववादी, अभिनेत्री आसावरी जोशी, सुहास जोशी आणि पूजा सावंत अशी या सिनेमाची स्टारकास्ट असून या कलाकारांचा उत्तम अभिनय आपल्याला या सिनेमात पहायला मिळणार आहे. सध्या या सिनेमाचे शुटींग मॉरिशियस येथे सुरु झाले असून उर्वरित काही चित्रीकरण वाई येथे पार पडणार आहे                               

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्याला 1 लाखाची लाच घेताना अटक

पुणे:पिंपरी महापालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरी करीत असलेल्यास...

“भारत गौरव ट्रेन – छत्रपती शिवाजी महाराज सर्किट” ९ जून पासून

पर्यटकांनी ऐतिहासिक़ पर्यटनाचा लाभ घ्यावा- पर्यटनमंत्री शंभूराज देसाईमुंबई, दि....

लोकशाही, संविधान व महाराष्ट्र धर्म वाचवण्याच्या लढाईत काँग्रेस शिवसेनेबरोबर: हर्षवर्धन सपकाळ.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवर घेतली शिवसेना पक्ष...